काय म्हणाले आयुक्त मुंढे राष्ट्रीय महिला आयोगापुढे? वाचा नागपूर : नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या (एनएसएससीडीसीएल) महिला अधिकाऱ्यांनी लावलेले आरोप आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज राष्ट्रीय महिला आयोगापुढे फेटाळून लावले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महिला अधिकाऱ्यास आरोपाबाबतचे पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. पुरावे सादर केल्यानंतर अंतिम सुनावणी होणार आहे. एनएसएससीडीसीएलच्या महिला अधिकाऱ्यांनी जूनमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे मनपा आयुक्त मुंढे यांच्याविरुद्ध प्रसुती रजा नाकारणे, मानसिक त्रास देणे तसेच अपमानजनक वागणूक दिल्याबाबत तक्रार दाखल केली होती. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी आयुक्तांना नोटीस बजावली होती. यावर आज त्यांनी ऑनलाईन सुनावणी घेतली. दिल्लीतील कार्यालयातून ऑनलाईन असलेल्या शर्मा यांनी दोघांनाही बाजू मांडण्याची संधी दिली. मुंढे यांनी महिला अधिकाऱ्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. यावेळी महिला अधिकाऱ्यांनी आयुक्त मुंढे यांच्या अपमानजनक वागणुकीमुळे तसेच मानसिक त्रास दिल्याबाबत यातना सहन कराव्या लागल्याचे सांगितल्याचे सुत्राने नमुद केले. आयोगाच्या अध्यक्ष शर्मा यांनी महिला अधिकाऱ्यास आरोपाबाबतचे पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांविरुद्ध आरोप सिद्ध होईल, असे लेखी कागदपत्राचे पुरावे असल्याचे महिला अधिकाऱ्यांनी सांगितले. आयोगाकडे पुरावे सादर झाल्यानंतर अंतिम सुनावणी होईल. आयोगाचा निर्णय राज्य सरकारसह दोघांनाही कळविण्यात येईल, असे आयोगाच्या अध्यक्ष शर्मा यांनी दोघांपुढे नमुद केल्याचेही सुत्राने सांगितले. तीन महिन्यांच्या बाळाला नागपूरपासून १०० किमी अंतरावरील गावी ठेवण्यात आले आहे. कोविडमुळे बाळाला घेऊन प्रवास शक्य नसल्याने घरून काम करण्याची परवानगी आयुक्तांना मागितली होती. विश्वास बसेल का? तडफदार निर्णय घेणारे तुकाराम मुंढेच संभ्रमात.. नक्की काय आहे कारण..वाचा सविस्त परंतु परवानगी नाकारल्याची तक्रार या महिला अधिकाऱ्यांनी आयोगाकडे केली. एवढेच नव्हे तर प्रसुती संबंधी महिलांच्या कायदेशीर सवलती न देता नोकरीतून बडतर्फ करण्याबाबत मुंढे यांनी नोटीस दिली होती, असेही तक्रारीत नमुद केले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 7, 2020

काय म्हणाले आयुक्त मुंढे राष्ट्रीय महिला आयोगापुढे? वाचा नागपूर : नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या (एनएसएससीडीसीएल) महिला अधिकाऱ्यांनी लावलेले आरोप आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज राष्ट्रीय महिला आयोगापुढे फेटाळून लावले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महिला अधिकाऱ्यास आरोपाबाबतचे पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. पुरावे सादर केल्यानंतर अंतिम सुनावणी होणार आहे. एनएसएससीडीसीएलच्या महिला अधिकाऱ्यांनी जूनमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे मनपा आयुक्त मुंढे यांच्याविरुद्ध प्रसुती रजा नाकारणे, मानसिक त्रास देणे तसेच अपमानजनक वागणूक दिल्याबाबत तक्रार दाखल केली होती. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी आयुक्तांना नोटीस बजावली होती. यावर आज त्यांनी ऑनलाईन सुनावणी घेतली. दिल्लीतील कार्यालयातून ऑनलाईन असलेल्या शर्मा यांनी दोघांनाही बाजू मांडण्याची संधी दिली. मुंढे यांनी महिला अधिकाऱ्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. यावेळी महिला अधिकाऱ्यांनी आयुक्त मुंढे यांच्या अपमानजनक वागणुकीमुळे तसेच मानसिक त्रास दिल्याबाबत यातना सहन कराव्या लागल्याचे सांगितल्याचे सुत्राने नमुद केले. आयोगाच्या अध्यक्ष शर्मा यांनी महिला अधिकाऱ्यास आरोपाबाबतचे पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांविरुद्ध आरोप सिद्ध होईल, असे लेखी कागदपत्राचे पुरावे असल्याचे महिला अधिकाऱ्यांनी सांगितले. आयोगाकडे पुरावे सादर झाल्यानंतर अंतिम सुनावणी होईल. आयोगाचा निर्णय राज्य सरकारसह दोघांनाही कळविण्यात येईल, असे आयोगाच्या अध्यक्ष शर्मा यांनी दोघांपुढे नमुद केल्याचेही सुत्राने सांगितले. तीन महिन्यांच्या बाळाला नागपूरपासून १०० किमी अंतरावरील गावी ठेवण्यात आले आहे. कोविडमुळे बाळाला घेऊन प्रवास शक्य नसल्याने घरून काम करण्याची परवानगी आयुक्तांना मागितली होती. विश्वास बसेल का? तडफदार निर्णय घेणारे तुकाराम मुंढेच संभ्रमात.. नक्की काय आहे कारण..वाचा सविस्त परंतु परवानगी नाकारल्याची तक्रार या महिला अधिकाऱ्यांनी आयोगाकडे केली. एवढेच नव्हे तर प्रसुती संबंधी महिलांच्या कायदेशीर सवलती न देता नोकरीतून बडतर्फ करण्याबाबत मुंढे यांनी नोटीस दिली होती, असेही तक्रारीत नमुद केले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fHGQtw

No comments:

Post a Comment