तब्बल २० हजार रोजगार; पण कंपन्यांना मिळेनात कामगार! औरंगाबाद - कोरोना प्रादुर्भावामुळे औद्योगिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. अद्यापही कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाही. शहर परिसरातील चारही एमआयडीसीत सुरू असलेल्या कंपन्यांना सध्या कामगारांचा तुटवडा भासत आहे. हा तुटवडा थोडाथोडका नव्हे, तर तब्बल २० हजार कामगारांचा आहे! परराज्यात परत गेलेले कामगार परत आणण्यासाठी कंपन्यांतर्फे हालचाली होत आहेत; मात्र जिल्हाबंदीमुळे ते शक्य नाही. यामुळे कामगारांसाठी जिल्हाबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे उद्योग संघटनातर्फे करण्यात येत आहे.  यंदाही विद्यार्थ्यांना मिळणार दोन मोफत गणवेश...पण नियम मात्र बदलला... भरती सुरू असल्याचे लागले बोर्ड वाळूज, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा एमआयडीसीत ८० टक्के उद्योगांचे ५० टक्के उत्पादन सुरू आहे. तर २० टक्के कंपन्या ७० ते ८० टक्के उत्पादन करीत आहेत. उत्पादनक्षमता वाढवलेल्या कंपन्यांना आता कामगारांची गरज भासू लागली आहे. चारही एमआयडीसींमध्ये जवळपास वीस हजार कामगारांची गरज आहे. याविषयी कंपन्यांसमोर ‘भरती सुरू आहे’ असे बोर्डही लावण्यात आले आहेत.  आयटीआय प्रवेशाठी नियमावलीत बदल... अशी आहे नवीन नियमावली  लाखावर गेले गावी  लॉकडाउन काळात परराज्यातील जवळपास एक लाखाहून अधिक कामगार आपल्या गावी गेला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे तो अद्यापही परतलेला नाही. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांची विशेष काळजी घेतली जात आहे. असे असताना इतर जिल्ह्यातील कामगारांना परत आणण्यासाठी लागणाऱ्या पासमध्ये शिथिलता देण्याची मागणी होत आहे. यासाठी उद्योग संघटनातर्फे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन व पाठपुरावा केला जात आहे. १४ ऑगस्टला शहरात आलेले उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग संघटनांनी हा विषय मांडला होता. मासिआतर्फे जिल्हा प्रशासन, एमआयडीसी यांनाही निवेदन देण्यात आल्याचे मासिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले.  कंपन्यांना कामगारांचा तुटवडा भासू लागला आहे. परराज्यात गेलेला कामगार सद्यःस्थितीत येऊ शकत नाही. राज्यातीलच कामगारांवर सध्या ही गरज भागू शकते. जिल्हा प्रशासनाने या कामगारांसाठी नियम शिथिल करावेत, याविषयी आमचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे.  अभय हंचनाळ, अध्यक्ष, मासिआ  चारही एमआयडीसींत वीस हजार कामगारांची गरज आहे. कामगारांना पासेसमुळे येण्यास अडथळा येत आहे. तर कामगार पास घेऊन आलाच तर त्याच १४ दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल आणि तिसरे म्हणजे कामगारमध्ये अजूनही कोरोनाची भीती आहे. यामुळे कामावर येण्याचे अनेकजण टाळत आहे. यामुळे परजिल्ह्यातील कामगार आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकर घ्यावा. कामगारांना आणून त्यांना क्वारंटाइन न करता त्यांची अँटीजेन टेस्ट करावी. त्यानंतर तो निगेटिव्ह आल्यावर त्यास कामावर पाठवावेत. तेव्हाच हा प्रश्‍न सुटू शकतो.  मुकुंद कुलकर्णी, अध्यक्ष, सीआयआय News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, August 18, 2020

तब्बल २० हजार रोजगार; पण कंपन्यांना मिळेनात कामगार! औरंगाबाद - कोरोना प्रादुर्भावामुळे औद्योगिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. अद्यापही कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाही. शहर परिसरातील चारही एमआयडीसीत सुरू असलेल्या कंपन्यांना सध्या कामगारांचा तुटवडा भासत आहे. हा तुटवडा थोडाथोडका नव्हे, तर तब्बल २० हजार कामगारांचा आहे! परराज्यात परत गेलेले कामगार परत आणण्यासाठी कंपन्यांतर्फे हालचाली होत आहेत; मात्र जिल्हाबंदीमुळे ते शक्य नाही. यामुळे कामगारांसाठी जिल्हाबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे उद्योग संघटनातर्फे करण्यात येत आहे.  यंदाही विद्यार्थ्यांना मिळणार दोन मोफत गणवेश...पण नियम मात्र बदलला... भरती सुरू असल्याचे लागले बोर्ड वाळूज, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा एमआयडीसीत ८० टक्के उद्योगांचे ५० टक्के उत्पादन सुरू आहे. तर २० टक्के कंपन्या ७० ते ८० टक्के उत्पादन करीत आहेत. उत्पादनक्षमता वाढवलेल्या कंपन्यांना आता कामगारांची गरज भासू लागली आहे. चारही एमआयडीसींमध्ये जवळपास वीस हजार कामगारांची गरज आहे. याविषयी कंपन्यांसमोर ‘भरती सुरू आहे’ असे बोर्डही लावण्यात आले आहेत.  आयटीआय प्रवेशाठी नियमावलीत बदल... अशी आहे नवीन नियमावली  लाखावर गेले गावी  लॉकडाउन काळात परराज्यातील जवळपास एक लाखाहून अधिक कामगार आपल्या गावी गेला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे तो अद्यापही परतलेला नाही. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांची विशेष काळजी घेतली जात आहे. असे असताना इतर जिल्ह्यातील कामगारांना परत आणण्यासाठी लागणाऱ्या पासमध्ये शिथिलता देण्याची मागणी होत आहे. यासाठी उद्योग संघटनातर्फे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन व पाठपुरावा केला जात आहे. १४ ऑगस्टला शहरात आलेले उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग संघटनांनी हा विषय मांडला होता. मासिआतर्फे जिल्हा प्रशासन, एमआयडीसी यांनाही निवेदन देण्यात आल्याचे मासिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले.  कंपन्यांना कामगारांचा तुटवडा भासू लागला आहे. परराज्यात गेलेला कामगार सद्यःस्थितीत येऊ शकत नाही. राज्यातीलच कामगारांवर सध्या ही गरज भागू शकते. जिल्हा प्रशासनाने या कामगारांसाठी नियम शिथिल करावेत, याविषयी आमचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे.  अभय हंचनाळ, अध्यक्ष, मासिआ  चारही एमआयडीसींत वीस हजार कामगारांची गरज आहे. कामगारांना पासेसमुळे येण्यास अडथळा येत आहे. तर कामगार पास घेऊन आलाच तर त्याच १४ दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल आणि तिसरे म्हणजे कामगारमध्ये अजूनही कोरोनाची भीती आहे. यामुळे कामावर येण्याचे अनेकजण टाळत आहे. यामुळे परजिल्ह्यातील कामगार आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकर घ्यावा. कामगारांना आणून त्यांना क्वारंटाइन न करता त्यांची अँटीजेन टेस्ट करावी. त्यानंतर तो निगेटिव्ह आल्यावर त्यास कामावर पाठवावेत. तेव्हाच हा प्रश्‍न सुटू शकतो.  मुकुंद कुलकर्णी, अध्यक्ष, सीआयआय News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2FsKLhp

No comments:

Post a Comment