महापालिकेच्या इतिहासात प्रथमच होणार अशी सभा, सविस्तर वाचा नागपूर : आतापर्यंत नागरिकांचे फोन घेण्यापुरता तसेच मॅसेज वाचणे, फोटो पाहण्यासह सोशल मीडियाच्या वापरासाठीच असलेल्या मोबाईलवरूनच सर्वच राजकीय पक्षांचे नगरसेवक ऑनलाइन एकत्र येणार आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऑनलाइन पद्धतीने सहभागी होऊन मोबाईल, लॅपटॉपवरूनच नगरसेवकांना अधिकाऱ्यांना प्रश्न विचारता येणार आहे. ऑनलाइन सभेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे; परंतु यात सदस्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे राज्य सरकारने महापालिकांना सर्वसाधारण सभेसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय दिला आहे. मागील सभेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यानंतर येत्या २० ऑगस्टला होणारी सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. महापालिकेत विविध पक्षांचे निवडून आलेले १५१ तर नामनिर्देशित ५, असे एकूण १५६ नगरसेवक असून सर्वांना या सभेबाबत तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय अधिकाऱ्यांनाही महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स विभागाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेची माहिती व मार्गदर्शन दिले आहे. २० ऑगस्टला सकाळी ११ वाजता सभा सुरू होणार आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिलीच ऑनलाइन सभा असल्याने या सभेला विशेष महत्त्व आहे. सभेच्या ४५ मिनिटांपूर्वी सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सभेची लिंक पाठविण्यात येणार आहे. प्रथमच ऑनलाइन प्रश्नोत्तरांचा तास होणार आहे. यात अधिकाऱ्यांसोबतच नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचीही कसोटी लागणार आहे. पहिलीच ऑनलाइन सभा असल्याने नगरसेवकांचा गोंधळ उडण्याचीही शक्यता आहे. याच सभेत सत्ताधारी पाणी करवाढ कमी करण्याचाही प्रस्ताव आणणार आहे. आयुक्तांचा याला विरोध आहे.  मोठी बातमी: राष्ट्रवादीच्या या खासदाराचे भाजपमध्ये गेलेल्यांच्या घरवापसीबद्दल मोठे व्यक्तव्य.. म्हणाले..​ त्यामुळे आयुक्त व नगरसेवकांतील संघर्ष ऑनलाइन दिसून येणार आहे. प्रशासनाकडून विविध प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आले आहे. यावर चर्चा होणार आहे. ऑनलाइन चर्चेत नेमके काय घडणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. ऑनलाइन सभेसाठी नगरसेवकांना काय करावे लागणार?  वेबेक्स मीटिंग ॲप प्लेस्टोअरमधून डाउनलोड करावे लागणार.  हेडफोनचा वापर  इंटरनेट व मोबाईल बॅटरीची खात्री करून घ्यावी.  सभेच्या २० मिनिटांपूर्वी उपस्थिती आवश्यक. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, August 16, 2020

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच होणार अशी सभा, सविस्तर वाचा नागपूर : आतापर्यंत नागरिकांचे फोन घेण्यापुरता तसेच मॅसेज वाचणे, फोटो पाहण्यासह सोशल मीडियाच्या वापरासाठीच असलेल्या मोबाईलवरूनच सर्वच राजकीय पक्षांचे नगरसेवक ऑनलाइन एकत्र येणार आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऑनलाइन पद्धतीने सहभागी होऊन मोबाईल, लॅपटॉपवरूनच नगरसेवकांना अधिकाऱ्यांना प्रश्न विचारता येणार आहे. ऑनलाइन सभेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे; परंतु यात सदस्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे राज्य सरकारने महापालिकांना सर्वसाधारण सभेसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय दिला आहे. मागील सभेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यानंतर येत्या २० ऑगस्टला होणारी सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. महापालिकेत विविध पक्षांचे निवडून आलेले १५१ तर नामनिर्देशित ५, असे एकूण १५६ नगरसेवक असून सर्वांना या सभेबाबत तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय अधिकाऱ्यांनाही महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स विभागाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेची माहिती व मार्गदर्शन दिले आहे. २० ऑगस्टला सकाळी ११ वाजता सभा सुरू होणार आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिलीच ऑनलाइन सभा असल्याने या सभेला विशेष महत्त्व आहे. सभेच्या ४५ मिनिटांपूर्वी सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सभेची लिंक पाठविण्यात येणार आहे. प्रथमच ऑनलाइन प्रश्नोत्तरांचा तास होणार आहे. यात अधिकाऱ्यांसोबतच नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचीही कसोटी लागणार आहे. पहिलीच ऑनलाइन सभा असल्याने नगरसेवकांचा गोंधळ उडण्याचीही शक्यता आहे. याच सभेत सत्ताधारी पाणी करवाढ कमी करण्याचाही प्रस्ताव आणणार आहे. आयुक्तांचा याला विरोध आहे.  मोठी बातमी: राष्ट्रवादीच्या या खासदाराचे भाजपमध्ये गेलेल्यांच्या घरवापसीबद्दल मोठे व्यक्तव्य.. म्हणाले..​ त्यामुळे आयुक्त व नगरसेवकांतील संघर्ष ऑनलाइन दिसून येणार आहे. प्रशासनाकडून विविध प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आले आहे. यावर चर्चा होणार आहे. ऑनलाइन चर्चेत नेमके काय घडणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. ऑनलाइन सभेसाठी नगरसेवकांना काय करावे लागणार?  वेबेक्स मीटिंग ॲप प्लेस्टोअरमधून डाउनलोड करावे लागणार.  हेडफोनचा वापर  इंटरनेट व मोबाईल बॅटरीची खात्री करून घ्यावी.  सभेच्या २० मिनिटांपूर्वी उपस्थिती आवश्यक. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2CxcgW2

No comments:

Post a Comment