‘रणवीर’ माझ्या कुटुंबातील सदस्य, शेवटच्या श्‍वासापर्यंत सांभाळणार  औरंगाबाद: ‘रणवीर’ माझ्यासाठी बैल नव्हे, तर माझ्या कुटुंबातील एक सदस्य आहे. माझ्या हृदयात त्याचे स्थान एखाद्या दैवताप्रमाणे आहे. त्याने महाराष्ट्रातील प्रत्येक शंकरपट गाजविला. ‘रणवीर’ म्हटला, की धावपट्टीवर फक्त वेग आणि वेग दिसून यायचा. त्याने मला प्रत्येक शंकरपटात मान, सन्मान मिळून दिला. धावपट्टी दिमाखात पार केल्यानंतर प्रत्येक जण विचायराचा ‘रणवीर’चा मालक कोण आहे? मन भरुन यायचे. आता ‘रणवीर’ म्हातारा झाला तो पळु शकत नाही. पण काहीही झाले तरी त्याला मी विकणार नाही, तो शेवटाचा श्‍वास माझ्या घरातच घेईल... ही भावना आहे संजय पखे यांची. एकेकाळी महाराष्ट्रभर शंकरपट, बैलागाडा शर्यत गाजविणाऱ्या त्यांच्याकडील रणवीर या बैलाचा ते सांभाळ करत आहेत.  संजय पखे (रा. पिसादेवी, ता.औरंगाबाद) यांनी २००४ मध्ये नांदेड येथून सव्वादोन लाख रुपयांना ‘रणवीर’ नावाचा बैल खरेदी केला होता. नंतर ‘रणवीर’ने प्रत्येक शंकरपट गाजविण्यास सुरवात केली. धावपट्टीवर त्याचा वेग वाऱ्यासारखा राहिला. शंकरपटात तो गेला की त्याचा विजय हमखास होता. ३०० फुटांची धावपट्टी तो सहा सेकंदात सहजपणे पार करायचा. १५०० फुटाची धावपट्टी त्याने २० ते २२ सेकंदात पार केली. हेही वाचा- औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी सुनिल चव्हाण त्याच्या शंकरपटातील विजयाने संजय पखेंना अनेक ढाल, विजय मिळवुन दिले. मराठवाडा, मुंबई, विदर्भात प्रत्येक ठिकाणी रणवीर आणि संजय पखे यांचे नाव घेतात. त्यामुळे रणवीरने मला मान, सन्मान आणि राज्यभर नवीन ओळख दिली असे संजय पखे म्हणतात.  आता शंकरपट बंद आहे. रणवीरसुद्धा निवृत्त झाला. तरीही संजय पखे त्याचा सांभाळ करतात. त्यासाठी किती ही खर्च झाला तरी ते मागे हटत नाही. रणवीरसाठी हिरवा चारा, खुराक बंद करत नाहीत. संजय पखे हे मुलाप्रमाणे त्याला सांभाळतात.  रणवीरने मला शंकटपटात नवीन ओळख दिली. आता त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही. त्याचा मी शेवटच्या श्‍वासापर्यंत सांभाळ करेन. त्याला खुराकची कमतरता कधीच भासू देत नाही. तो माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यासोबत माझ्याकडे आणखी दोन बैल आहे त्या बैलाजोडीची किंमती पाच लाखांच्या पुढे आहे.  -संजय पखे, शंकरपट शौकीन  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 17, 2020

‘रणवीर’ माझ्या कुटुंबातील सदस्य, शेवटच्या श्‍वासापर्यंत सांभाळणार  औरंगाबाद: ‘रणवीर’ माझ्यासाठी बैल नव्हे, तर माझ्या कुटुंबातील एक सदस्य आहे. माझ्या हृदयात त्याचे स्थान एखाद्या दैवताप्रमाणे आहे. त्याने महाराष्ट्रातील प्रत्येक शंकरपट गाजविला. ‘रणवीर’ म्हटला, की धावपट्टीवर फक्त वेग आणि वेग दिसून यायचा. त्याने मला प्रत्येक शंकरपटात मान, सन्मान मिळून दिला. धावपट्टी दिमाखात पार केल्यानंतर प्रत्येक जण विचायराचा ‘रणवीर’चा मालक कोण आहे? मन भरुन यायचे. आता ‘रणवीर’ म्हातारा झाला तो पळु शकत नाही. पण काहीही झाले तरी त्याला मी विकणार नाही, तो शेवटाचा श्‍वास माझ्या घरातच घेईल... ही भावना आहे संजय पखे यांची. एकेकाळी महाराष्ट्रभर शंकरपट, बैलागाडा शर्यत गाजविणाऱ्या त्यांच्याकडील रणवीर या बैलाचा ते सांभाळ करत आहेत.  संजय पखे (रा. पिसादेवी, ता.औरंगाबाद) यांनी २००४ मध्ये नांदेड येथून सव्वादोन लाख रुपयांना ‘रणवीर’ नावाचा बैल खरेदी केला होता. नंतर ‘रणवीर’ने प्रत्येक शंकरपट गाजविण्यास सुरवात केली. धावपट्टीवर त्याचा वेग वाऱ्यासारखा राहिला. शंकरपटात तो गेला की त्याचा विजय हमखास होता. ३०० फुटांची धावपट्टी तो सहा सेकंदात सहजपणे पार करायचा. १५०० फुटाची धावपट्टी त्याने २० ते २२ सेकंदात पार केली. हेही वाचा- औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी सुनिल चव्हाण त्याच्या शंकरपटातील विजयाने संजय पखेंना अनेक ढाल, विजय मिळवुन दिले. मराठवाडा, मुंबई, विदर्भात प्रत्येक ठिकाणी रणवीर आणि संजय पखे यांचे नाव घेतात. त्यामुळे रणवीरने मला मान, सन्मान आणि राज्यभर नवीन ओळख दिली असे संजय पखे म्हणतात.  आता शंकरपट बंद आहे. रणवीरसुद्धा निवृत्त झाला. तरीही संजय पखे त्याचा सांभाळ करतात. त्यासाठी किती ही खर्च झाला तरी ते मागे हटत नाही. रणवीरसाठी हिरवा चारा, खुराक बंद करत नाहीत. संजय पखे हे मुलाप्रमाणे त्याला सांभाळतात.  रणवीरने मला शंकटपटात नवीन ओळख दिली. आता त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही. त्याचा मी शेवटच्या श्‍वासापर्यंत सांभाळ करेन. त्याला खुराकची कमतरता कधीच भासू देत नाही. तो माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यासोबत माझ्याकडे आणखी दोन बैल आहे त्या बैलाजोडीची किंमती पाच लाखांच्या पुढे आहे.  -संजय पखे, शंकरपट शौकीन  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/322qFSJ

No comments:

Post a Comment