'कुणी घर घेता का घर', पिंपरी-चिंचवड शहरातील स्थिती पिंपरी : शहरात काही दिवसांपूर्वी चांगल्या परिसरात घर भाड्याने मिळणे कठीण होते. तसेच, भाडेतत्त्वावरील घरांचे दरही गगनाला भिडले होते. बॅचलर मुलांनाही खोल्या भाड्याने मिळणे कठीण होते. मात्र, लॉकडाउनमुळे सर्व परिस्थिती बदलली आहे. सोशल मीडियावर ‘घर भाड्याने देणे आहे’, अशा जाहिराती आता व्हायरल झाल्या आहेत. घराच्या गेटवर प्रथमच ‘फ्लॅट भाड्याने देणे आहे’, अशी पाटी लावण्याची वेळ घरमालकांवर आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   औद्योगिकनगरीत रोजगारासाठी व नोकरीनिमित्त भाडेतत्त्वावर घर घेणारा मोठा वर्ग आहे. आयटीयन्सनीही स्वतंत्र भाडेतत्वावर घर घेऊन संसार थाटला होता. मात्र, आता त्यांच्यावरही फ्लॅट खाली करण्याची वेळ आली आहे. एकत्र कुटुंबात किंवा छोटे घर घेण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. पहिल्या लॉकडाउननंतर मोठा वर्ग शहरातून स्थलांतरित झाला. तसेच, सिंगल रूममध्ये राहणारे परप्रांतीय देखील गावी परतले. गावठाण भागातील पत्र्याच्या खोल्याही रिकाम्या झाल्या. त्यांचे भाडे जेमतेम दोन ते तीन हजार रुपये होते. सिंगल रूम ते थ्री बीएचके घरांना दहा ते पंधरा टक्के भाडे सवलत देऊनही घरे भाड्याने घेत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भाड्यात सूट  स्वतंत्र घर, बाल्कनी, दुचाकी व चारचाकीसाठी पार्किंग, २४ तास पाणी अशा सुविधायुक्त घर भाड्याने मिळणे पंचाईत होती. सध्या अशा घरांची जाहिरात करूनही गेल्या तीन महिन्यांपासून भाडेतत्त्वावरील घरे रिकामी आहेत. त्यामुळे एका घरमालाकाचे लाखोंचे नुकसान झाले. वन बीएचके घरांसाठी वीस ते तीस हजार आणि टू बीएचके घरांसाठी तीस ते चाळीस हजार रुपये अनामत रक्कम भाडेकरूंकडून कराराद्वारे घेतली जात होती. सध्या या रकमेतही सूट दिली जात आहे. काही व्यावसायिकांनी केवळ गुंतवणूक म्हणून फ्लॅट खरेदी केले.    मध्यस्थीलाही फटका  या व्यवसायात मध्यस्थीची मोठी कमाई होत होती. मात्र, त्यांनाही आता फटका बसला आहे. तसेच, त्यांचे कमीशन देणेही भाडेकरूंना परवडत नाही. त्यामुळे नागरिक स्वत:च फ्लॅट पाहत आहेत. काही ब्रोकर भाडेतत्त्वावर देण्यासाठी फ्लॅटचे फोटो व्हायरल करीत आहेत. मात्र, तेही विकले गेले नाही. वाकड, हिंजवडी, पिंपळे सौदागर या परिसरातील फ्लॅटचे दर ‘जैसे थे’ असल्याची वस्तुस्थिती आहे.  देसी रूमिस, ओएलएक्‍स, व्हॉट्सऍप व फेसबुकच्या विविध ग्रुपवर फ्लॅटची जाहिरात केली. नेहमीच्या तुलनेत भाडे कमी करून मागितले जात आहे. सर्व सुविधा असलेले घर तीन महिन्यांपासून रिकामे आहे. पूर्वी एक महिनादेखील खोल्या रिकाम्या राहिल्या नाहीत. जाहिरात करावी लागली नाही.  - जीवन पवार, घरमालक, कासारवाडी   पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा Edited by : Shivnandan Baviskar News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, August 6, 2020

'कुणी घर घेता का घर', पिंपरी-चिंचवड शहरातील स्थिती पिंपरी : शहरात काही दिवसांपूर्वी चांगल्या परिसरात घर भाड्याने मिळणे कठीण होते. तसेच, भाडेतत्त्वावरील घरांचे दरही गगनाला भिडले होते. बॅचलर मुलांनाही खोल्या भाड्याने मिळणे कठीण होते. मात्र, लॉकडाउनमुळे सर्व परिस्थिती बदलली आहे. सोशल मीडियावर ‘घर भाड्याने देणे आहे’, अशा जाहिराती आता व्हायरल झाल्या आहेत. घराच्या गेटवर प्रथमच ‘फ्लॅट भाड्याने देणे आहे’, अशी पाटी लावण्याची वेळ घरमालकांवर आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   औद्योगिकनगरीत रोजगारासाठी व नोकरीनिमित्त भाडेतत्त्वावर घर घेणारा मोठा वर्ग आहे. आयटीयन्सनीही स्वतंत्र भाडेतत्वावर घर घेऊन संसार थाटला होता. मात्र, आता त्यांच्यावरही फ्लॅट खाली करण्याची वेळ आली आहे. एकत्र कुटुंबात किंवा छोटे घर घेण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. पहिल्या लॉकडाउननंतर मोठा वर्ग शहरातून स्थलांतरित झाला. तसेच, सिंगल रूममध्ये राहणारे परप्रांतीय देखील गावी परतले. गावठाण भागातील पत्र्याच्या खोल्याही रिकाम्या झाल्या. त्यांचे भाडे जेमतेम दोन ते तीन हजार रुपये होते. सिंगल रूम ते थ्री बीएचके घरांना दहा ते पंधरा टक्के भाडे सवलत देऊनही घरे भाड्याने घेत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भाड्यात सूट  स्वतंत्र घर, बाल्कनी, दुचाकी व चारचाकीसाठी पार्किंग, २४ तास पाणी अशा सुविधायुक्त घर भाड्याने मिळणे पंचाईत होती. सध्या अशा घरांची जाहिरात करूनही गेल्या तीन महिन्यांपासून भाडेतत्त्वावरील घरे रिकामी आहेत. त्यामुळे एका घरमालाकाचे लाखोंचे नुकसान झाले. वन बीएचके घरांसाठी वीस ते तीस हजार आणि टू बीएचके घरांसाठी तीस ते चाळीस हजार रुपये अनामत रक्कम भाडेकरूंकडून कराराद्वारे घेतली जात होती. सध्या या रकमेतही सूट दिली जात आहे. काही व्यावसायिकांनी केवळ गुंतवणूक म्हणून फ्लॅट खरेदी केले.    मध्यस्थीलाही फटका  या व्यवसायात मध्यस्थीची मोठी कमाई होत होती. मात्र, त्यांनाही आता फटका बसला आहे. तसेच, त्यांचे कमीशन देणेही भाडेकरूंना परवडत नाही. त्यामुळे नागरिक स्वत:च फ्लॅट पाहत आहेत. काही ब्रोकर भाडेतत्त्वावर देण्यासाठी फ्लॅटचे फोटो व्हायरल करीत आहेत. मात्र, तेही विकले गेले नाही. वाकड, हिंजवडी, पिंपळे सौदागर या परिसरातील फ्लॅटचे दर ‘जैसे थे’ असल्याची वस्तुस्थिती आहे.  देसी रूमिस, ओएलएक्‍स, व्हॉट्सऍप व फेसबुकच्या विविध ग्रुपवर फ्लॅटची जाहिरात केली. नेहमीच्या तुलनेत भाडे कमी करून मागितले जात आहे. सर्व सुविधा असलेले घर तीन महिन्यांपासून रिकामे आहे. पूर्वी एक महिनादेखील खोल्या रिकाम्या राहिल्या नाहीत. जाहिरात करावी लागली नाही.  - जीवन पवार, घरमालक, कासारवाडी   पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा Edited by : Shivnandan Baviskar News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gH63G4

No comments:

Post a Comment