राज्यात दीड कोटी विद्यार्थ्यांना ‘टिलीमिली’ मालिकेचा लाभ पुणे - राज्यातील जवळपास दीड कोटी विद्यार्थ्यांनी जुलैपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू झालेल्या ‘टिलीमिली’ मालिकेचा लाभ घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत या मालिकेद्वारे शिक्षण पोचविले जात आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चमध्ये लागू केलेल्या टाळेबंदीपासून राज्यातील शाळा बंद आहेत. या काळातही घरोघरी दर्जेदार शालेय शिक्षण पोचविण्यासाठी एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनने या मालिकेची निर्मिती केली असून ही मालिका सह्याद्री वाहिनीवर निःशुल्क दाखविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रयोगशील शिक्षणात भरीव कार्य केलेल्या ग्राममंगल व इतर नामांकित संस्था व तज्ज्ञांचा सक्रिय सहभाग आहे. अनलॉक 4 : राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी 'ई-पास' सक्ती रद्द; जाणून घ्या इतर सर्व नियमावली ‘बालभारती’च्या पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित ही मालिका आहे. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नाहीत. घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतिनिष्ठ उपक्रमांतून मुलांना शैक्षणिक अनुभव घेऊ दिले जातात. त्यांच्याभोवती छोट्या-छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जात आहे, असे फाउंडेशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर उदय पंचपोर यांनी सांगितले. आठही इयत्तांचे मिळून पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमाचे एकूण ४८० एपिसोड्‌स असलेली ही मालिका रविवार वगळता रोज प्रसारित होत आहे. मला मुख्यमंत्री करण्यात प्रणबदांची महत्वाची भूमिका; पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्या आठवणी ‘सह्याद्री’ वाहिनीवर ‘टिलीमिली’च्या प्रसारणाचे दैनंदिन वेळापत्रक (रविवार वगळून) इयत्ता पहिली ते चौथीचे २८ सप्टेंबरपर्यंतचे वेळापत्रक  वेळ : इयत्ता सकाळी - ७.३० ते ८.३० : चौथी सकाळी - ९ ते १० : तिसरी सकाळी - १० ते ११ : दुसरी सकाळी - ११.३० ते दुपारी १२.३० : पहिली Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 31, 2020

राज्यात दीड कोटी विद्यार्थ्यांना ‘टिलीमिली’ मालिकेचा लाभ पुणे - राज्यातील जवळपास दीड कोटी विद्यार्थ्यांनी जुलैपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू झालेल्या ‘टिलीमिली’ मालिकेचा लाभ घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत या मालिकेद्वारे शिक्षण पोचविले जात आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चमध्ये लागू केलेल्या टाळेबंदीपासून राज्यातील शाळा बंद आहेत. या काळातही घरोघरी दर्जेदार शालेय शिक्षण पोचविण्यासाठी एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनने या मालिकेची निर्मिती केली असून ही मालिका सह्याद्री वाहिनीवर निःशुल्क दाखविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रयोगशील शिक्षणात भरीव कार्य केलेल्या ग्राममंगल व इतर नामांकित संस्था व तज्ज्ञांचा सक्रिय सहभाग आहे. अनलॉक 4 : राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी 'ई-पास' सक्ती रद्द; जाणून घ्या इतर सर्व नियमावली ‘बालभारती’च्या पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित ही मालिका आहे. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नाहीत. घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतिनिष्ठ उपक्रमांतून मुलांना शैक्षणिक अनुभव घेऊ दिले जातात. त्यांच्याभोवती छोट्या-छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जात आहे, असे फाउंडेशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर उदय पंचपोर यांनी सांगितले. आठही इयत्तांचे मिळून पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमाचे एकूण ४८० एपिसोड्‌स असलेली ही मालिका रविवार वगळता रोज प्रसारित होत आहे. मला मुख्यमंत्री करण्यात प्रणबदांची महत्वाची भूमिका; पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्या आठवणी ‘सह्याद्री’ वाहिनीवर ‘टिलीमिली’च्या प्रसारणाचे दैनंदिन वेळापत्रक (रविवार वगळून) इयत्ता पहिली ते चौथीचे २८ सप्टेंबरपर्यंतचे वेळापत्रक  वेळ : इयत्ता सकाळी - ७.३० ते ८.३० : चौथी सकाळी - ९ ते १० : तिसरी सकाळी - १० ते ११ : दुसरी सकाळी - ११.३० ते दुपारी १२.३० : पहिली Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32I65aD

No comments:

Post a Comment