Video : ‘मैत्री’च्या कार्यासाठी ‘रद्दीतून सद्दी’ सोसायटीतील सर्व सभासदांनी दरमहा घरातील रद्दी संकलित करून, तिच्या मोबदल्यात मिळणारे पैसे सामाजिक कार्यासाठी द्यायचे ठरवले तर? ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीचा अर्थ उलगडून दाखवणारा हा उपक्रम पुण्यातील काही ठिकाणी राबवला जात आहे. मेळघाट परिसरात काम करणाऱ्या ‘मैत्री’ या स्वयंसेवी संस्थेला ‘रद्दीतून सद्दी’ या  उपक्रमातून अनेक नागरिक मदत करत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मैत्री संस्थेत पदाधिकाऱ्यांची उतरंड नाही. सगळेच स्वयंसेवक. ज्येष्ठ स्वयंसेवक जयश्री शिदोरे म्हणाल्या, ‘‘रद्दीतून निधी जमविण्याची सुरुवात चौदा वर्षांपूर्वी झाली. कोणालाही सहज सहभागी होता येईल, असा ‘रद्दीतून सद्दी’ हा उपक्रम काही सोसायट्यांमध्ये सुरू झाला. ठरलेल्या दिवसाच्या आठवडाभर आधी नोटीस बोर्डवर सूचना लावली जाते. विशिष्ट वेळी रद्दी संकलित करून टेंपोत भरून डेपोत पाठवली जाते. तिच्यातून मिळणारे पैसे मैत्री संस्थेकडे जमा होतात. याची पावती संबंधित सोसायटीला दिली जाते. बारावी ऑनलाईन व्हेरिफिकेशनचा उडाला बोजवारा; पालकांच्या तक्रारींचा पाऊस सुरुवात करताना विनिता ताटके यांच्याकडे वीस रुपयेच जमले होते. हळूहळू लोकांमध्ये माहिती पसरत गेल्यावर अनेक सोसायट्या, बंगले, कार्यालयांकडून प्रतिसाद मिळू लागला. या सर्वांना मैत्री संस्थेच्या कार्याची, उपक्रमांची माहिती करून दिली जाते. त्यांच्या निधीचा विनियोग कोणत्या स्वरूपाच्या कार्यासाठी केला जातो, हे त्यांनी जाणून घ्यावं, हा उद्देश त्यामागे आहे. कोथरूडमधील बारा व सिंहगड रस्त्यावरील आठ-नऊ सोसायट्या यात सहभागी आहेत. नांदेड सिटीतील पवार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या घरातील रद्दी जमवली जाते.  - ट्विटर वापरताय? तर जरा दमानं घ्या; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा!​ लहानग्यांचाही उपक्रमात सहभाग कोथरूडमधील राहुल टॉवर्स सोसायटीतील दिनेश वैद्य यांनी सांगितलं की, तेरा वर्षांपासून आमच्या सोसायटीत ‘रद्दीतून सद्दी’ हा उपक्रम चालतो. महिन्यातील शेवटच्या रविवारी शिस्तबद्ध पद्धतीने केवळ पन्नास मिनिटांत सुमारे सहाशे ते आठशे किलो रद्दी जमवली जाते. लहान मुलंही यात उत्साहाने सहभागी होतात. प्रत्येक घरी आदल्या दिवशी रात्री दोरी पुरवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कुटुंबीयांनी बंडल बांधून बाहेर ठेवलेलं असतं. स्वयंसेवक हे बंडल टेंपोत भरून डेपोकडे नेतात. या उपक्रमात सहभागी होण्यात आम्हाला आनंद वाटतो. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 17, 2020

Video : ‘मैत्री’च्या कार्यासाठी ‘रद्दीतून सद्दी’ सोसायटीतील सर्व सभासदांनी दरमहा घरातील रद्दी संकलित करून, तिच्या मोबदल्यात मिळणारे पैसे सामाजिक कार्यासाठी द्यायचे ठरवले तर? ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीचा अर्थ उलगडून दाखवणारा हा उपक्रम पुण्यातील काही ठिकाणी राबवला जात आहे. मेळघाट परिसरात काम करणाऱ्या ‘मैत्री’ या स्वयंसेवी संस्थेला ‘रद्दीतून सद्दी’ या  उपक्रमातून अनेक नागरिक मदत करत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मैत्री संस्थेत पदाधिकाऱ्यांची उतरंड नाही. सगळेच स्वयंसेवक. ज्येष्ठ स्वयंसेवक जयश्री शिदोरे म्हणाल्या, ‘‘रद्दीतून निधी जमविण्याची सुरुवात चौदा वर्षांपूर्वी झाली. कोणालाही सहज सहभागी होता येईल, असा ‘रद्दीतून सद्दी’ हा उपक्रम काही सोसायट्यांमध्ये सुरू झाला. ठरलेल्या दिवसाच्या आठवडाभर आधी नोटीस बोर्डवर सूचना लावली जाते. विशिष्ट वेळी रद्दी संकलित करून टेंपोत भरून डेपोत पाठवली जाते. तिच्यातून मिळणारे पैसे मैत्री संस्थेकडे जमा होतात. याची पावती संबंधित सोसायटीला दिली जाते. बारावी ऑनलाईन व्हेरिफिकेशनचा उडाला बोजवारा; पालकांच्या तक्रारींचा पाऊस सुरुवात करताना विनिता ताटके यांच्याकडे वीस रुपयेच जमले होते. हळूहळू लोकांमध्ये माहिती पसरत गेल्यावर अनेक सोसायट्या, बंगले, कार्यालयांकडून प्रतिसाद मिळू लागला. या सर्वांना मैत्री संस्थेच्या कार्याची, उपक्रमांची माहिती करून दिली जाते. त्यांच्या निधीचा विनियोग कोणत्या स्वरूपाच्या कार्यासाठी केला जातो, हे त्यांनी जाणून घ्यावं, हा उद्देश त्यामागे आहे. कोथरूडमधील बारा व सिंहगड रस्त्यावरील आठ-नऊ सोसायट्या यात सहभागी आहेत. नांदेड सिटीतील पवार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या घरातील रद्दी जमवली जाते.  - ट्विटर वापरताय? तर जरा दमानं घ्या; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा!​ लहानग्यांचाही उपक्रमात सहभाग कोथरूडमधील राहुल टॉवर्स सोसायटीतील दिनेश वैद्य यांनी सांगितलं की, तेरा वर्षांपासून आमच्या सोसायटीत ‘रद्दीतून सद्दी’ हा उपक्रम चालतो. महिन्यातील शेवटच्या रविवारी शिस्तबद्ध पद्धतीने केवळ पन्नास मिनिटांत सुमारे सहाशे ते आठशे किलो रद्दी जमवली जाते. लहान मुलंही यात उत्साहाने सहभागी होतात. प्रत्येक घरी आदल्या दिवशी रात्री दोरी पुरवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कुटुंबीयांनी बंडल बांधून बाहेर ठेवलेलं असतं. स्वयंसेवक हे बंडल टेंपोत भरून डेपोकडे नेतात. या उपक्रमात सहभागी होण्यात आम्हाला आनंद वाटतो. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30hQEou

No comments:

Post a Comment