प्राचीन पाऊलखुणा ५ : हिंजवडीच्या हनुमान मंदिरात मध्ययुगीन स्मृतीशिळा पिंपरी - हिंजवडी गावठाणातील हनुमान मंदिराबाहेर ४ ते ५ वृंदावन प्रकारातील स्मृतीशिळा आहेत. त्या मध्ययुगीन काळातील असून काही जमिनीखाली गाडल्या गेल्या आहेत. यातील काही शिळा झिजलेल्या अवस्थेत असून जुन्या अवशेषाचे संवर्धन होणे गरजेचं असल्याचे अभ्यासक प्रणव पाटील यांनी सांगितले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा येथील हनुमानासह भैरवाची काळ्या रंगातील प्राचीन मूर्ती आहे. तसेच गावातील टेकडीवर श्री म्हातोबाचे मूळ मंदिर आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले हे ग्रामदैवत दगडी बांधकामातील आहे. श्री म्हातोबाचे मूळ स्थान मुळशी तालुक्‍यातील बारपे या गावातील होते. त्यानंतर जांभूळकर ग्रामस्थांसोबत ते हिंजवडीत आले. वाकड येथील शिलालेखात असा उल्लेख आहे की, पूर्वी यात्रेच्या वेळी भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय होत नव्हती. त्यामुळे मूळ दैवत वाकडला गेल्यानंतरही हे मंदिर हिंजवडीत बांधले गेले. हिंजवडी येथे मंदिराच्या आवारात जांभूळकर घराण्याच्या मूळ पुरुषाचे स्मृतीशिल्प आहे. चैत्र पौर्णिमेला येथे यात्रा भरते. हिंजवडीमधून बगाड वाकड येथील श्री म्हातोबा मंदिरात आणले जाते. यात्रेवेळी बगाडाचा मान आजही जांभूळकर परिवाराला आहे. हिंजवडीचे ग्रामस्थ आजही पायी चालत जाऊन मुळशीतील जंगलात जाऊन बगाडासाठी लाकूड घेऊन येतात. गावामध्ये येईपर्यंत ते जमिनीला टेकविले जात नाही. दरवर्षी बगाडाला नवीन लाकूड लावले जाते. त्यानंतर वाजत गाजत बगाड गोल फिरवून वाकडकडे रवाना होते. आजही ही प्रथा या भागात कायम आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात रुग्णांची संख्या सहाशेच्या जवळ असे पडले हिंजवडी गावाला नाव हिवंजा म्हणजे कोळी. अभ्यासकांच्या मते कोळी लोकांची येथे वस्ती असावी म्हणून हिवंजा वाडीवरून हिंजवडी नाव पडल्याची आख्यायिका प्रचलित आहे. आयटी पार्कमधील आयटीयन्सची आजही या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते. डोंगराच्या कुशीत वसलेले हे मंदिर सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेते. ध्यानधारणेसाठी येथे स्वतंत्र कक्ष आहे. जवळच कंपन्यांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. त्यामुळे मंदिर परिसर अतिशय विलोभनीय वाटतो. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 6, 2020

प्राचीन पाऊलखुणा ५ : हिंजवडीच्या हनुमान मंदिरात मध्ययुगीन स्मृतीशिळा पिंपरी - हिंजवडी गावठाणातील हनुमान मंदिराबाहेर ४ ते ५ वृंदावन प्रकारातील स्मृतीशिळा आहेत. त्या मध्ययुगीन काळातील असून काही जमिनीखाली गाडल्या गेल्या आहेत. यातील काही शिळा झिजलेल्या अवस्थेत असून जुन्या अवशेषाचे संवर्धन होणे गरजेचं असल्याचे अभ्यासक प्रणव पाटील यांनी सांगितले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा येथील हनुमानासह भैरवाची काळ्या रंगातील प्राचीन मूर्ती आहे. तसेच गावातील टेकडीवर श्री म्हातोबाचे मूळ मंदिर आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले हे ग्रामदैवत दगडी बांधकामातील आहे. श्री म्हातोबाचे मूळ स्थान मुळशी तालुक्‍यातील बारपे या गावातील होते. त्यानंतर जांभूळकर ग्रामस्थांसोबत ते हिंजवडीत आले. वाकड येथील शिलालेखात असा उल्लेख आहे की, पूर्वी यात्रेच्या वेळी भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय होत नव्हती. त्यामुळे मूळ दैवत वाकडला गेल्यानंतरही हे मंदिर हिंजवडीत बांधले गेले. हिंजवडी येथे मंदिराच्या आवारात जांभूळकर घराण्याच्या मूळ पुरुषाचे स्मृतीशिल्प आहे. चैत्र पौर्णिमेला येथे यात्रा भरते. हिंजवडीमधून बगाड वाकड येथील श्री म्हातोबा मंदिरात आणले जाते. यात्रेवेळी बगाडाचा मान आजही जांभूळकर परिवाराला आहे. हिंजवडीचे ग्रामस्थ आजही पायी चालत जाऊन मुळशीतील जंगलात जाऊन बगाडासाठी लाकूड घेऊन येतात. गावामध्ये येईपर्यंत ते जमिनीला टेकविले जात नाही. दरवर्षी बगाडाला नवीन लाकूड लावले जाते. त्यानंतर वाजत गाजत बगाड गोल फिरवून वाकडकडे रवाना होते. आजही ही प्रथा या भागात कायम आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात रुग्णांची संख्या सहाशेच्या जवळ असे पडले हिंजवडी गावाला नाव हिवंजा म्हणजे कोळी. अभ्यासकांच्या मते कोळी लोकांची येथे वस्ती असावी म्हणून हिवंजा वाडीवरून हिंजवडी नाव पडल्याची आख्यायिका प्रचलित आहे. आयटी पार्कमधील आयटीयन्सची आजही या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते. डोंगराच्या कुशीत वसलेले हे मंदिर सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेते. ध्यानधारणेसाठी येथे स्वतंत्र कक्ष आहे. जवळच कंपन्यांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. त्यामुळे मंदिर परिसर अतिशय विलोभनीय वाटतो. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gxoH2n

No comments:

Post a Comment