आयुर्विमा पॉलिसीविषयी A टू Z 1. प्रपोजल फॉर्मचे महत्त्व: प्रपोजल फॉर्म भरताना स्वतःचे आणि कुटुंबियांचे आरोग्य आणि सवयी, पूर्वीच्या पॉलिसी, आर्थिक उत्पन्न याविषयी संपूर्ण सत्य माहिती देणे आवश्यक आहे. यात असत्यतता आढळल्यास पॉलिसी रद्दबातल ठरून भरलेल्या प्रीमियमची रक्कम जप्त होऊ शकते. 2. फ्री लुक पिरियड: पॉलिसी करारातील काही अटी/शर्ती मान्य नसल्यास पॉलिसी मिळाल्या पासून 15  दिवसांच्या काळात पॉलिसी दस्तावेज विमा कंपनीला  परत देऊन आपले भरलेले पैसे आपण परत मिळवू शकता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  3. ग्रेस पिरियड: "ग्रेस पिरियड'मध्ये प्रीमियम न भरल्यास पॉलिसी बंद पडून विमेदाराचे नुकसान होऊ शकते. 4. पॉलिसीचे पुनरुज्जीवन: सर्वसामान्यपणे पॉलिसी बंद पडल्या पासून 5 वर्षाच्या काळात  थकलेले सर्व प्रीमियम व्याजासह भरून आणि प्रकृतिविषयक दाखला, वैद्यकीय तपासणी अहवाल इ. जरूर त्या कागदपत्रांची पूर्तता करून बंद पॉलिसी पुन्हा चालू करता येते. 5. सरेंडर टाळा: पारंपरिक विमा योजनांमध्ये पॉलिसी सरेंडर करणे हे आर्थिक नुकसानीचे ठरते. त्यापेक्षा अल्पकालीन गरजेसाठी पॉलिसीवर कर्ज घेणे आधिक चांगले. युलिप्स प्रकारातील पॉलिसीमध्ये मात्र सामान्यपणे 5 वर्षानंतर सरेंडर चार्ज लागत नाही. त्यामुळे आकर्षक फंड व्हॅल्यू मिळत असेल तर पॉलिसी सरेंडर करणे  नुकसानीचे  ठरत नाही. हेही वाचा : युलिप्स म्हणजे काय?  6. टर्म इन्शुरन्स...आवश्यकच: पॉलिसीचा प्रमुख हेतु "विमा संरक्षण' हा आहे. त्या दृष्टीने अत्यल्प प्रीमियम मध्ये भरघोस  संरक्षण देणारी "टर्म इन्शुरन्स' ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. 7. रायडर्स: मूळ पॉलिसीबरोबर अपघाती फायदा, अपंगत्व फायदा, "क्रिटिकल इलनेस रायडर' असे काही रायडर्स घेऊन आपण परिपूर्ण संरक्षण मिळवू शकतो. 8. प्राप्तिकरात सूट: आयुर्विमा पॉलिसीचे भरलेले प्रीमियम प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80सी नुसार सूट मिळण्यास पात्र ठरतात. शिवाय बोनससह क्लेमपोटी मिळणारी रक्कम कलम 10 (10डी) नुसार करमुक्त असते. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 9.कोलॅटरल: गृहकर्ज घेताना "कोलॅटरल' (ज्यादाची सुरक्षितता) म्हणून आयुर्विमा पॉलिसी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. 10. मृत्युदाव्या विषयी: मृत्यु दाव्याच्यावेळी नॉमिनीने विमा कंपनीस विमेदाराच्या मृत्युविषयी सूचित केल्यानंतर विमा कंपनी जरूर त्या कागदपत्रांची मागणी करते. सामान्यपणे मूळ पॉलिसी, मूळ मृत्यु दाखला आणि नॉमिनीने "डिस्चार्ज फॉर्म'सह भरावयाचा एक छोटा फॉर्म एवढेच कागदपत्र लागतात. ज्यायोगे, क्लेम विनासायास मंजूर होऊन नॉमिनीच्या खात्यावर रक्कम जमा होते. जर विमाधारकाचा मृत्यू पॉलिसी घेतल्यापासून अल्पकाळात झाला असेल तर शेवटच्या आजारात उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे सर्टिफिकेट, हॉस्पिटल रिपोर्ट इ. कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते. अपघाती मृत्यू झाल्यास पंचनामा, एफआयआर, पोस्टमार्टम रिपोर्ट याची आवश्यकता असते. लेखक निवृत्त विमा अधिकारी आणि प्रशिक्षण सल्लागार आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, June 14, 2020

आयुर्विमा पॉलिसीविषयी A टू Z 1. प्रपोजल फॉर्मचे महत्त्व: प्रपोजल फॉर्म भरताना स्वतःचे आणि कुटुंबियांचे आरोग्य आणि सवयी, पूर्वीच्या पॉलिसी, आर्थिक उत्पन्न याविषयी संपूर्ण सत्य माहिती देणे आवश्यक आहे. यात असत्यतता आढळल्यास पॉलिसी रद्दबातल ठरून भरलेल्या प्रीमियमची रक्कम जप्त होऊ शकते. 2. फ्री लुक पिरियड: पॉलिसी करारातील काही अटी/शर्ती मान्य नसल्यास पॉलिसी मिळाल्या पासून 15  दिवसांच्या काळात पॉलिसी दस्तावेज विमा कंपनीला  परत देऊन आपले भरलेले पैसे आपण परत मिळवू शकता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  3. ग्रेस पिरियड: "ग्रेस पिरियड'मध्ये प्रीमियम न भरल्यास पॉलिसी बंद पडून विमेदाराचे नुकसान होऊ शकते. 4. पॉलिसीचे पुनरुज्जीवन: सर्वसामान्यपणे पॉलिसी बंद पडल्या पासून 5 वर्षाच्या काळात  थकलेले सर्व प्रीमियम व्याजासह भरून आणि प्रकृतिविषयक दाखला, वैद्यकीय तपासणी अहवाल इ. जरूर त्या कागदपत्रांची पूर्तता करून बंद पॉलिसी पुन्हा चालू करता येते. 5. सरेंडर टाळा: पारंपरिक विमा योजनांमध्ये पॉलिसी सरेंडर करणे हे आर्थिक नुकसानीचे ठरते. त्यापेक्षा अल्पकालीन गरजेसाठी पॉलिसीवर कर्ज घेणे आधिक चांगले. युलिप्स प्रकारातील पॉलिसीमध्ये मात्र सामान्यपणे 5 वर्षानंतर सरेंडर चार्ज लागत नाही. त्यामुळे आकर्षक फंड व्हॅल्यू मिळत असेल तर पॉलिसी सरेंडर करणे  नुकसानीचे  ठरत नाही. हेही वाचा : युलिप्स म्हणजे काय?  6. टर्म इन्शुरन्स...आवश्यकच: पॉलिसीचा प्रमुख हेतु "विमा संरक्षण' हा आहे. त्या दृष्टीने अत्यल्प प्रीमियम मध्ये भरघोस  संरक्षण देणारी "टर्म इन्शुरन्स' ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. 7. रायडर्स: मूळ पॉलिसीबरोबर अपघाती फायदा, अपंगत्व फायदा, "क्रिटिकल इलनेस रायडर' असे काही रायडर्स घेऊन आपण परिपूर्ण संरक्षण मिळवू शकतो. 8. प्राप्तिकरात सूट: आयुर्विमा पॉलिसीचे भरलेले प्रीमियम प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80सी नुसार सूट मिळण्यास पात्र ठरतात. शिवाय बोनससह क्लेमपोटी मिळणारी रक्कम कलम 10 (10डी) नुसार करमुक्त असते. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 9.कोलॅटरल: गृहकर्ज घेताना "कोलॅटरल' (ज्यादाची सुरक्षितता) म्हणून आयुर्विमा पॉलिसी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. 10. मृत्युदाव्या विषयी: मृत्यु दाव्याच्यावेळी नॉमिनीने विमा कंपनीस विमेदाराच्या मृत्युविषयी सूचित केल्यानंतर विमा कंपनी जरूर त्या कागदपत्रांची मागणी करते. सामान्यपणे मूळ पॉलिसी, मूळ मृत्यु दाखला आणि नॉमिनीने "डिस्चार्ज फॉर्म'सह भरावयाचा एक छोटा फॉर्म एवढेच कागदपत्र लागतात. ज्यायोगे, क्लेम विनासायास मंजूर होऊन नॉमिनीच्या खात्यावर रक्कम जमा होते. जर विमाधारकाचा मृत्यू पॉलिसी घेतल्यापासून अल्पकाळात झाला असेल तर शेवटच्या आजारात उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे सर्टिफिकेट, हॉस्पिटल रिपोर्ट इ. कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते. अपघाती मृत्यू झाल्यास पंचनामा, एफआयआर, पोस्टमार्टम रिपोर्ट याची आवश्यकता असते. लेखक निवृत्त विमा अधिकारी आणि प्रशिक्षण सल्लागार आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3e0Rcok

No comments:

Post a Comment