आधीच लॉकडाउनने छोटे उद्योग कोलमडले, त्यात आता पिळवणूकही सुरू पिंपरी : आधी मंदीचे वातावरण त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे लागलेला लॉकडाउन या दुहेरी संकटात सापडलेल्या लघुउद्योजकांसमोर आता नवीन समस्या उभी राहिली आहे. उद्योगांनी उत्पादन सुरू केले असले, तरी त्यांना सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या लघुउद्योजकांना पाच ते दहा टक्‍यांपर्यंत दर कमी करण्याची अट टाकली आहे. काहींनी तर स्वतःच दर ठरविले आहेत. परिणामी दोन महिन्यांपासून काम बंद असणाऱ्या लघुउद्योजकांचे आर्थिक गणित विस्कटले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण या भागांतील अनेक लघुउद्योजकांना याचा सामना करावा लागत आहे. मोठ्या उद्योगांकडून टाकण्यात आलेल्या या अटीमुळे काही लघुउद्योजकांनी कच्च्या मालाचा पुरवठा करणे थांबवले आहे. लॉकडाउनमुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन ठप्प झाले होते. आता उद्योग पुन्हा सुरू झाले असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या उद्योगांनी खर्चामध्ये बचतीचे धोरण अवलंबले आहे. त्यामधे प्रशासकीय खर्च कमी करणे, कर्मचाऱ्यांचे पगार, उत्पादन प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती अशा अनेक बाबींचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तसेच खर्चात काटकसर करण्यासाठी लघुउद्योजकांकडून येणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात (डिस्काउंट) देण्याची सूचना करण्यात येत आहे. त्यातच परराज्यांतील लघुउद्योजक आता मोठ्या उद्योगांशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे मोठे उद्योग जुन्या पुरवठादारांकडे सूट मागू लागले आहेत. काही लघुउद्योजकांनी मोठ्या कंपन्याना आवश्‍यक असणारे सुटे भाग तयार करण्यासाठीचे डाय आणि टुलिंग करून ठेवले आहे. मात्र, त्याची रक्‍कम अनेकांनी दिलेली नसल्यामुळे लघुउद्योजक हैराण झाले आहेत. त्यात डिस्काउंटच्या अटीमुळे ते आर्थिक कात्रीत सापडले आहेत.  तर काम करणे अवघड होईल  दोन महिन्यांपासून उद्योग बंद होते. त्यामध्ये आता कच्च्या मालाचा पुरवठा करताना डिस्काउंटची अट मान्य केली तर काम करणे अवघड होणार असल्याची प्रतिक्रिया लघुउद्योजकांनी दिली. बाहेरगावी गेलेले कामगार अद्याप परतले नसल्यामुळे आधीच मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. दरात सवलतीच्या सुचनेमुळे आर्थिक गणित बिघडू शकते. अनेक लघुउद्योजकांनी मशिनरी अपग्रेड करण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. काहीजणांनी व्यवसायाचा विस्तार केला आहे. त्यामुळे दरामध्ये सवलत दिल्यास काम करायचे कसे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची संख्या :  पिंपरी-चिंचवड : ११, ०००  तळेगाव : ४० ते ५०  चाकण : ४००० ते ५०००  लॉकडाउनपूर्वी केलेल्या कामाची थकित रक्‍कम अद्याप न मिळाल्यामुळे काम करणे अवघड होत आहे. सरकारने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. ही रक्‍कम एक महिन्याच्या आत मिळेल, यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करायला हवीत. रक्‍कम वेळेत मिळाली तर आर्थिक घडी नीट बसेल.  - महेश महाजन, उद्योजक, तळेगाव दाभाडे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, June 3, 2020

आधीच लॉकडाउनने छोटे उद्योग कोलमडले, त्यात आता पिळवणूकही सुरू पिंपरी : आधी मंदीचे वातावरण त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे लागलेला लॉकडाउन या दुहेरी संकटात सापडलेल्या लघुउद्योजकांसमोर आता नवीन समस्या उभी राहिली आहे. उद्योगांनी उत्पादन सुरू केले असले, तरी त्यांना सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या लघुउद्योजकांना पाच ते दहा टक्‍यांपर्यंत दर कमी करण्याची अट टाकली आहे. काहींनी तर स्वतःच दर ठरविले आहेत. परिणामी दोन महिन्यांपासून काम बंद असणाऱ्या लघुउद्योजकांचे आर्थिक गणित विस्कटले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण या भागांतील अनेक लघुउद्योजकांना याचा सामना करावा लागत आहे. मोठ्या उद्योगांकडून टाकण्यात आलेल्या या अटीमुळे काही लघुउद्योजकांनी कच्च्या मालाचा पुरवठा करणे थांबवले आहे. लॉकडाउनमुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन ठप्प झाले होते. आता उद्योग पुन्हा सुरू झाले असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या उद्योगांनी खर्चामध्ये बचतीचे धोरण अवलंबले आहे. त्यामधे प्रशासकीय खर्च कमी करणे, कर्मचाऱ्यांचे पगार, उत्पादन प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती अशा अनेक बाबींचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तसेच खर्चात काटकसर करण्यासाठी लघुउद्योजकांकडून येणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात (डिस्काउंट) देण्याची सूचना करण्यात येत आहे. त्यातच परराज्यांतील लघुउद्योजक आता मोठ्या उद्योगांशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे मोठे उद्योग जुन्या पुरवठादारांकडे सूट मागू लागले आहेत. काही लघुउद्योजकांनी मोठ्या कंपन्याना आवश्‍यक असणारे सुटे भाग तयार करण्यासाठीचे डाय आणि टुलिंग करून ठेवले आहे. मात्र, त्याची रक्‍कम अनेकांनी दिलेली नसल्यामुळे लघुउद्योजक हैराण झाले आहेत. त्यात डिस्काउंटच्या अटीमुळे ते आर्थिक कात्रीत सापडले आहेत.  तर काम करणे अवघड होईल  दोन महिन्यांपासून उद्योग बंद होते. त्यामध्ये आता कच्च्या मालाचा पुरवठा करताना डिस्काउंटची अट मान्य केली तर काम करणे अवघड होणार असल्याची प्रतिक्रिया लघुउद्योजकांनी दिली. बाहेरगावी गेलेले कामगार अद्याप परतले नसल्यामुळे आधीच मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. दरात सवलतीच्या सुचनेमुळे आर्थिक गणित बिघडू शकते. अनेक लघुउद्योजकांनी मशिनरी अपग्रेड करण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. काहीजणांनी व्यवसायाचा विस्तार केला आहे. त्यामुळे दरामध्ये सवलत दिल्यास काम करायचे कसे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची संख्या :  पिंपरी-चिंचवड : ११, ०००  तळेगाव : ४० ते ५०  चाकण : ४००० ते ५०००  लॉकडाउनपूर्वी केलेल्या कामाची थकित रक्‍कम अद्याप न मिळाल्यामुळे काम करणे अवघड होत आहे. सरकारने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. ही रक्‍कम एक महिन्याच्या आत मिळेल, यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करायला हवीत. रक्‍कम वेळेत मिळाली तर आर्थिक घडी नीट बसेल.  - महेश महाजन, उद्योजक, तळेगाव दाभाडे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2U8FOPh

No comments:

Post a Comment