चिंताजनक..शेकडो चालक बेरोजगार, कर्जाचे थकले हप्ते कणकवली (सिंधुदुर्ग) - अर्थचक्र गतीमान करण्यात वाहतूक व्यवस्था किंवा वाहतूक क्षेत्र महत्वाची भूमिका बजावते; मात्र कोरोनामुळे वाहतूक व्यवसाय डबघाईला आला आहे. माल वाहतूक काही प्रमाणात सुरू असली तरी प्रवासी वाहतूक अजूनही ठप्प आहे. यात सहा आसनी रिक्षांसह पर्यटकांची ने-आण करणाऱ्या छोट्या मोठ्या वाहनांवरील शेकडो चालक बेरोजगार तर गाड्यांचे मालक कर्जबाजारी झाले आहेत. जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक क्षेत्रातील बहुतांश वाहनांचे कर्ज हप्ते मार्च महिन्यापासून थकले आहेत.  सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांनी कर्ज उचलून पर्यटन वाहतूक व्यवसायात उडी घेतली होती. जिल्हांतर्गत तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात इथले वाहन चालक पर्यटकांना घेऊन जात होते. कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाले. त्यानंतर वाहतूक क्षेत्राची चाके थांबली.  एसटी, रेल्वेचे उत्पन्न बुडाले  लॉकडाउनमधील निर्बंधाचा मोठा फटका एस. टी. महामंडळाला बसला असून प्रतिदिनी दोन लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तर रेल्वे सेवाही ठप्प असल्याने कोकण रेल्वेचे उत्पन्न बुडाले आहे. तालुका मुख्यालय ते गावापर्यंत प्रवासी ने-आण करणाऱ्या सहा आसनी रिक्षा आणि त्यावर अवलंबून असणारे शेकडो चालक-मालकांनाही सध्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.  पर्यटक वाहतूकदारही अडचणीत  पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेले छोटे-मोठे वाहन व्यावसायिक देखील कोरोना संकटामुळे प्रचंड अडचणीत आले आहेत. मार्च पासून कर्ज हप्ते थकीत राहिले आहेत. तसेच वाहनांचा इन्शुरन्स, परमिट यासाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्‍न पर्यटन वाहतूकदारांना पडला आहे. यंदाच्या दिवाळीपर्यंत पर्यटन व्यवसाय सुरू होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे सहा ते आठ महिन्यापर्यंत वाहन कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्‍न या व्यावसायिकांपुढे आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता आली असली तरी पेट्रोल डिझेलची दरवाढ सातत्याने होत आहे. तसेच सिमेंट आणि स्टील दरवाढीमुळे घरबांधणी, निवासी आणि वाणिज्य संकुलांची कामे सहा महिन्यांसाठी पुढे ढकलली आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या वाहनातून माल वाहतूक करणारे व्यावसायिक देखील अडचणीत आले आहेत.  एस. टी. आणि रेल्वे गाड्यातून येणाऱ्या - जाणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून तीन आसनी रिक्षांनाही मोठ्या प्रमाणात व्यवसाय मिळतो; मात्र या दोन्ही सेवा ठप्प असल्याने सद्यःस्थितीत तीन आसनी रिक्षा व्यवसाय डबघाईला आला आहे. यंदाचा मे महिन्याचा हंगाम गेला आता दिवाळी पर्यंतही या व्यवसायाला चालना मिळण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.  - प्रमोद रहाटे, तीन आसनी रिक्षा चालक  कोरोनाचा विषाणू पूर्णतः नाहीसा होईपर्यंत सहा आसनी रिक्षा व्यवसाय पुन्हा सुरू होणे कठीण झाले आहे. त्याबरोबर या व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची हप्तेही वाढत चालले आहेत. ज्यांची शेती आहे त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नाही. पण याच व्यवसायावर रोटी रोटी असणाऱ्या आणि उत्पन्नाचे अन्य साधन नसलेल्या कुटुंबाची परिस्थिती मात्र अत्यंत हलाखीची झाली आहे.  - मंगेश गावडे, सहा आसनी रिक्षा व्यावसायिक  कोरोनामुळे यंदाचा उन्हाळी हंगाम तोट्यात गेला. तर वर्षा पर्यटनासाठीही पर्यटक बाहेर पडण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे तब्बल सहा ते आठ महिने पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प राहणार असल्याने वाहन कर्ज कसे फेडायचे? तसेच कुटुंब कसे चालवायचे? असा प्रश्‍न वाहतूक व्यावसायिकांपुढे आहे.  - उत्तम राणे, सातरल - वाहन चालक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, June 14, 2020

चिंताजनक..शेकडो चालक बेरोजगार, कर्जाचे थकले हप्ते कणकवली (सिंधुदुर्ग) - अर्थचक्र गतीमान करण्यात वाहतूक व्यवस्था किंवा वाहतूक क्षेत्र महत्वाची भूमिका बजावते; मात्र कोरोनामुळे वाहतूक व्यवसाय डबघाईला आला आहे. माल वाहतूक काही प्रमाणात सुरू असली तरी प्रवासी वाहतूक अजूनही ठप्प आहे. यात सहा आसनी रिक्षांसह पर्यटकांची ने-आण करणाऱ्या छोट्या मोठ्या वाहनांवरील शेकडो चालक बेरोजगार तर गाड्यांचे मालक कर्जबाजारी झाले आहेत. जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक क्षेत्रातील बहुतांश वाहनांचे कर्ज हप्ते मार्च महिन्यापासून थकले आहेत.  सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांनी कर्ज उचलून पर्यटन वाहतूक व्यवसायात उडी घेतली होती. जिल्हांतर्गत तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात इथले वाहन चालक पर्यटकांना घेऊन जात होते. कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाले. त्यानंतर वाहतूक क्षेत्राची चाके थांबली.  एसटी, रेल्वेचे उत्पन्न बुडाले  लॉकडाउनमधील निर्बंधाचा मोठा फटका एस. टी. महामंडळाला बसला असून प्रतिदिनी दोन लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तर रेल्वे सेवाही ठप्प असल्याने कोकण रेल्वेचे उत्पन्न बुडाले आहे. तालुका मुख्यालय ते गावापर्यंत प्रवासी ने-आण करणाऱ्या सहा आसनी रिक्षा आणि त्यावर अवलंबून असणारे शेकडो चालक-मालकांनाही सध्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.  पर्यटक वाहतूकदारही अडचणीत  पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेले छोटे-मोठे वाहन व्यावसायिक देखील कोरोना संकटामुळे प्रचंड अडचणीत आले आहेत. मार्च पासून कर्ज हप्ते थकीत राहिले आहेत. तसेच वाहनांचा इन्शुरन्स, परमिट यासाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्‍न पर्यटन वाहतूकदारांना पडला आहे. यंदाच्या दिवाळीपर्यंत पर्यटन व्यवसाय सुरू होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे सहा ते आठ महिन्यापर्यंत वाहन कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्‍न या व्यावसायिकांपुढे आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता आली असली तरी पेट्रोल डिझेलची दरवाढ सातत्याने होत आहे. तसेच सिमेंट आणि स्टील दरवाढीमुळे घरबांधणी, निवासी आणि वाणिज्य संकुलांची कामे सहा महिन्यांसाठी पुढे ढकलली आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या वाहनातून माल वाहतूक करणारे व्यावसायिक देखील अडचणीत आले आहेत.  एस. टी. आणि रेल्वे गाड्यातून येणाऱ्या - जाणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून तीन आसनी रिक्षांनाही मोठ्या प्रमाणात व्यवसाय मिळतो; मात्र या दोन्ही सेवा ठप्प असल्याने सद्यःस्थितीत तीन आसनी रिक्षा व्यवसाय डबघाईला आला आहे. यंदाचा मे महिन्याचा हंगाम गेला आता दिवाळी पर्यंतही या व्यवसायाला चालना मिळण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.  - प्रमोद रहाटे, तीन आसनी रिक्षा चालक  कोरोनाचा विषाणू पूर्णतः नाहीसा होईपर्यंत सहा आसनी रिक्षा व्यवसाय पुन्हा सुरू होणे कठीण झाले आहे. त्याबरोबर या व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची हप्तेही वाढत चालले आहेत. ज्यांची शेती आहे त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नाही. पण याच व्यवसायावर रोटी रोटी असणाऱ्या आणि उत्पन्नाचे अन्य साधन नसलेल्या कुटुंबाची परिस्थिती मात्र अत्यंत हलाखीची झाली आहे.  - मंगेश गावडे, सहा आसनी रिक्षा व्यावसायिक  कोरोनामुळे यंदाचा उन्हाळी हंगाम तोट्यात गेला. तर वर्षा पर्यटनासाठीही पर्यटक बाहेर पडण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे तब्बल सहा ते आठ महिने पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प राहणार असल्याने वाहन कर्ज कसे फेडायचे? तसेच कुटुंब कसे चालवायचे? असा प्रश्‍न वाहतूक व्यावसायिकांपुढे आहे.  - उत्तम राणे, सातरल - वाहन चालक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XYGsRU

No comments:

Post a Comment