कोरोना उद्रेकातही पुणेकरांचे मोठ्या प्रमाणावर रक्‍तदान पुणे - कोरोना उद्रेकाच्या आव्हानात पुणेकर रक्‍तदात्याच्या सजगतेमुळे कोणत्याही गरजूंना एक थेंबही रक्त कमी पडले नाही, असा निष्कर्ष रक्तपेढ्यांनी काढला आहे. एका कॉलवर हे रक्तदाते दिवस-रात्र न बघता रक्तदानासाठी धावून आले. जागतिक रक्तदाता दिन रविवारी (ता. १४) आहे, त्यानिमित्त पुण्यातील रक्तदानाची माहिती रक्तपेढ्यांनी दिली, त्या आधारावर हा निष्कर्ष निघाला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कोरोनाला न घाबरता केले रक्तदान लॉकडाउनमुळे एप्रिलमध्ये रक्तदान शिबिरे होत नव्हती. परंतु, कोरोनाला न घाबरता त्यांनी रक्तदान केले. काही जणांना पोलिसांनी हटकलेही होते; पण ते रक्तपेढीपर्यंत आले आणि त्यांनी रक्तदान केल्याची काही उदाहरणे आहेत, अशी निरीक्षणे रक्तपेढ्यांनी नोंदविली.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रक्ताचा तुटवडा जाणवला नाही इतर शहरांमध्ये रक्तदानासाठी आवाहन करावे लागले. पण, पुण्यातील रक्तपेढीत रक्त नाही, अशी वेळ कधीच आली नाही. एखाद्या रक्तपेढीत विशिष्ट गटाचे रक्त नसेल तर ते दुसऱ्या पेढीतून तातडीने पोचविले गेले. पण, रुग्णाच्या नातेवाइकांना रक्तासाठी खूप धडपड करावी लागली नाही. सावळागोंधळ, पुण्यात आणखी एका महिलेच्या स्वॅबचे रिपोर्ट परस्परविरोधी    कमी झालेली मागणी कोरोनामुळे शस्त्रक्रिया कमी झाल्या. त्यामुळे रक्ताची एकूण मागणी २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाली. पण, आपत्कालीन स्थितीतील रुग्ण, प्रसूती आणि थॅलिसेमियाचे रुग्णांना नियमित रक्तपुरवठा सुरू ठेवणे आवश्‍यक होते. एप्रिल-मे या दरम्यान एका रक्तपेढीतून २५ ते ३० रक्ताच्या पिशव्या दिल्या जात होत्या. आता हे प्रमाण ४० पिशव्यांपर्यंत वाढले आहे.  पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...! असा ठेवला रक्तसाठा रक्तदान शिबिरे बंद होती. त्यामुळे रक्‍तसाठ्याचे मोठे आव्हान रक्‍तपेढ्यांसमोर होते. दात्यांना बाहेर पडता येत नव्हते. अशा परिस्थितीत दात्याला बोलावणे, त्यांना मोबाईलवर पत्र पाठविणे. पोलिसांनी अडविले तर त्या पत्राची त्यांना मदत होत असे. रक्‍तदाते एका फोननंतर वेळेत रक्तपेढीत असायचे. त्यामुळे त्यांना खास प्रमाणपत्र देऊन गौरविले.  कोरोनामुळे जामीनावर सुटलेल्या कैद्यांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी! २५ हजार पिशव्या रक्तसंकलन पुण्यात लॉकडाउनच्या ७३ दिवसांमध्ये २५ हजार ३४८ रक्तपिशव्या संकलित केल्या. यातील सर्वाधिक संकलन मेमध्ये झाले. या ३१ दिवसांमध्ये ११ हजार ९८३ पिशव्या रक्तसंकलित केल्याची माहिती रक्तपेढ्यांमधून मिळाली. छोटी शिबिरे लॉकडाउन ४.० नंतर रक्तपेढ्यांनी छोटी शिबिरे सुरू केली. चार खाटांवर एका वेळी चौघांचे रक्तदान करता येईल, अशी व्यवस्था केली. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकाला वेळ दिली. कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची खबरदारी संस्थांनी घेतली होती. पुणेकर रक्तदात्यांनी, शिबिर आयोजकांनी रक्ताची टंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली. पुण्यातील रक्तदात्यांनी सुरक्षित आणि नियम पाळून रक्तदान केले. त्यामुळे पुण्यात रक्ताची टंचाई भासली नाही. - डॉ. शंकर मुगावे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक लॉकडाउनमध्ये गरजेप्रमाणे रक्त उपलब्ध करण्याचे आव्हान मोठे होते. प्रत्येकाने काळाची गरज ओळखून रक्तदान केले. त्यामुळे पुण्यातील रुग्णांना रक्त कमी पडले नाही. - डॉ. अतुल कुलकर्णी, कार्यकारी संचालक, जनकल्याण रक्तपेढी News Story Feeds https://ift.tt/2MUCXpp - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 13, 2020

कोरोना उद्रेकातही पुणेकरांचे मोठ्या प्रमाणावर रक्‍तदान पुणे - कोरोना उद्रेकाच्या आव्हानात पुणेकर रक्‍तदात्याच्या सजगतेमुळे कोणत्याही गरजूंना एक थेंबही रक्त कमी पडले नाही, असा निष्कर्ष रक्तपेढ्यांनी काढला आहे. एका कॉलवर हे रक्तदाते दिवस-रात्र न बघता रक्तदानासाठी धावून आले. जागतिक रक्तदाता दिन रविवारी (ता. १४) आहे, त्यानिमित्त पुण्यातील रक्तदानाची माहिती रक्तपेढ्यांनी दिली, त्या आधारावर हा निष्कर्ष निघाला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कोरोनाला न घाबरता केले रक्तदान लॉकडाउनमुळे एप्रिलमध्ये रक्तदान शिबिरे होत नव्हती. परंतु, कोरोनाला न घाबरता त्यांनी रक्तदान केले. काही जणांना पोलिसांनी हटकलेही होते; पण ते रक्तपेढीपर्यंत आले आणि त्यांनी रक्तदान केल्याची काही उदाहरणे आहेत, अशी निरीक्षणे रक्तपेढ्यांनी नोंदविली.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रक्ताचा तुटवडा जाणवला नाही इतर शहरांमध्ये रक्तदानासाठी आवाहन करावे लागले. पण, पुण्यातील रक्तपेढीत रक्त नाही, अशी वेळ कधीच आली नाही. एखाद्या रक्तपेढीत विशिष्ट गटाचे रक्त नसेल तर ते दुसऱ्या पेढीतून तातडीने पोचविले गेले. पण, रुग्णाच्या नातेवाइकांना रक्तासाठी खूप धडपड करावी लागली नाही. सावळागोंधळ, पुण्यात आणखी एका महिलेच्या स्वॅबचे रिपोर्ट परस्परविरोधी    कमी झालेली मागणी कोरोनामुळे शस्त्रक्रिया कमी झाल्या. त्यामुळे रक्ताची एकूण मागणी २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाली. पण, आपत्कालीन स्थितीतील रुग्ण, प्रसूती आणि थॅलिसेमियाचे रुग्णांना नियमित रक्तपुरवठा सुरू ठेवणे आवश्‍यक होते. एप्रिल-मे या दरम्यान एका रक्तपेढीतून २५ ते ३० रक्ताच्या पिशव्या दिल्या जात होत्या. आता हे प्रमाण ४० पिशव्यांपर्यंत वाढले आहे.  पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...! असा ठेवला रक्तसाठा रक्तदान शिबिरे बंद होती. त्यामुळे रक्‍तसाठ्याचे मोठे आव्हान रक्‍तपेढ्यांसमोर होते. दात्यांना बाहेर पडता येत नव्हते. अशा परिस्थितीत दात्याला बोलावणे, त्यांना मोबाईलवर पत्र पाठविणे. पोलिसांनी अडविले तर त्या पत्राची त्यांना मदत होत असे. रक्‍तदाते एका फोननंतर वेळेत रक्तपेढीत असायचे. त्यामुळे त्यांना खास प्रमाणपत्र देऊन गौरविले.  कोरोनामुळे जामीनावर सुटलेल्या कैद्यांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी! २५ हजार पिशव्या रक्तसंकलन पुण्यात लॉकडाउनच्या ७३ दिवसांमध्ये २५ हजार ३४८ रक्तपिशव्या संकलित केल्या. यातील सर्वाधिक संकलन मेमध्ये झाले. या ३१ दिवसांमध्ये ११ हजार ९८३ पिशव्या रक्तसंकलित केल्याची माहिती रक्तपेढ्यांमधून मिळाली. छोटी शिबिरे लॉकडाउन ४.० नंतर रक्तपेढ्यांनी छोटी शिबिरे सुरू केली. चार खाटांवर एका वेळी चौघांचे रक्तदान करता येईल, अशी व्यवस्था केली. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकाला वेळ दिली. कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची खबरदारी संस्थांनी घेतली होती. पुणेकर रक्तदात्यांनी, शिबिर आयोजकांनी रक्ताची टंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली. पुण्यातील रक्तदात्यांनी सुरक्षित आणि नियम पाळून रक्तदान केले. त्यामुळे पुण्यात रक्ताची टंचाई भासली नाही. - डॉ. शंकर मुगावे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक लॉकडाउनमध्ये गरजेप्रमाणे रक्त उपलब्ध करण्याचे आव्हान मोठे होते. प्रत्येकाने काळाची गरज ओळखून रक्तदान केले. त्यामुळे पुण्यातील रुग्णांना रक्त कमी पडले नाही. - डॉ. अतुल कुलकर्णी, कार्यकारी संचालक, जनकल्याण रक्तपेढी News Story Feeds https://ift.tt/2MUCXpp


via News Story Feeds https://ift.tt/2YwxqKV

No comments:

Post a Comment