बँक ठेवीदारांत अस्वस्थता, काय असतील कारणे? देवगड (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे एकीकडे उद्योग व्यवसाय कोलमडले असताना आता बॅंकाचे ठेवीचे व्याजदर दिवसेंदिवस खाली येत असल्याने ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. कर्जदारांना प्राधान्य देण्याच्या नादात ठेवीदारांच्या व्याजदरात कपात करण्यात येत असल्याने ठेवीदार आता गुंतवणूकीच्या अन्य मार्गाकडे वळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सोन्याच्या गुंतवणूकीकडे ठेवीदार वळण्याची शक्‍यता आहे.  आयुष्याच्या भविष्याची तरतुद म्हणून ठेवींकडे पाहिले जाते. नोकरदार, पेन्शनर्स मंडळी निवृत्तीनंतरची मिळालेली पुंजी ठेवीच्या स्वरूपात बॅंकामध्ये गुंतवून त्याच्या येणाऱ्या व्याजाच्या रक्‍कमेवर गुजराण करतात. सुरक्षितता म्हणून राष्ट्रीय बॅंकाकडे ठेव ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकजण ठेवी ठेवतात म्हणून कर्जदारांना त्यावरून पतपुरवठा होत असल्याने ठेवीदार बॅंकाची रक्‍तवाहिनी मानली जाते. कोरोनामुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून आता त्याची झळ ठेवीदारांनाही बसू लागली आहे. एकेकाळी सुमारे दहा टक्‍के दरापर्यंत मिळणारा ठेवींचा व्याजदर आता सुमारे सव्वा पाच टक्‍यापर्यंत खाली आला आहे. तर कर्जाच्या व्याजाचे दरही झपाट्याने खाली येत असल्याने त्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्जदारांचे लाड पुरवण्यात ठेवीदारांचा गळा आवळला जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ठेवीदारांमधून उमटत आहेत. जानेवारीमध्ये कर्जाचा व्याजदर सुमारे 8.60 टक्‍के होता. त्यामध्ये घट होऊन 7.45 टक्‍के आणि आता 7.05 टक्‍केवर आला आहे. तर ठेवीवरील व्याजाच्या दरातही मोठी घसरण होत गेल्या वर्षभरात सुमारे एक टक्‍याने दर खाली आले आहेत. ठेवीवरील मिळणारे व्याज कमी झाल्याने अनेकांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. ज्येष्ठांना याचा मोठी फटका बसला आहे. व्याजदरामध्ये वेळीच सुधारणा झाली नसल्यास गुंतवणूकीचा पर्यायी मार्ग अवलंबण्याची शक्‍यता ठेवीदारांमध्ये चर्चिली जात आहे. बॅंकानी आपले पतधोरण बदलून ठेवीदारांचा विचार करावा, अशी मागणी आहे.  जानेवारीमध्ये कर्जाचा व्याजदर सुमारे 8.60 टक्‍के होता. त्यानंतर अलिकडे 7.45 टक्‍के होऊन सध्या 7.05 टक्‍के इतका आहे. ठेवीवरील व्याजदर 6.25 टक्‍यावरून आता 5.25 टक्‍के झाला आहे. बचत खात्याच्या व्याजाचा दर 3.50 टक्‍केवरून 2.75 टक्‍के झाला आहे.  - सागर मोरे, शाखाधिकारी, बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा जामसंडे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, June 16, 2020

बँक ठेवीदारांत अस्वस्थता, काय असतील कारणे? देवगड (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे एकीकडे उद्योग व्यवसाय कोलमडले असताना आता बॅंकाचे ठेवीचे व्याजदर दिवसेंदिवस खाली येत असल्याने ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. कर्जदारांना प्राधान्य देण्याच्या नादात ठेवीदारांच्या व्याजदरात कपात करण्यात येत असल्याने ठेवीदार आता गुंतवणूकीच्या अन्य मार्गाकडे वळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सोन्याच्या गुंतवणूकीकडे ठेवीदार वळण्याची शक्‍यता आहे.  आयुष्याच्या भविष्याची तरतुद म्हणून ठेवींकडे पाहिले जाते. नोकरदार, पेन्शनर्स मंडळी निवृत्तीनंतरची मिळालेली पुंजी ठेवीच्या स्वरूपात बॅंकामध्ये गुंतवून त्याच्या येणाऱ्या व्याजाच्या रक्‍कमेवर गुजराण करतात. सुरक्षितता म्हणून राष्ट्रीय बॅंकाकडे ठेव ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकजण ठेवी ठेवतात म्हणून कर्जदारांना त्यावरून पतपुरवठा होत असल्याने ठेवीदार बॅंकाची रक्‍तवाहिनी मानली जाते. कोरोनामुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून आता त्याची झळ ठेवीदारांनाही बसू लागली आहे. एकेकाळी सुमारे दहा टक्‍के दरापर्यंत मिळणारा ठेवींचा व्याजदर आता सुमारे सव्वा पाच टक्‍यापर्यंत खाली आला आहे. तर कर्जाच्या व्याजाचे दरही झपाट्याने खाली येत असल्याने त्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्जदारांचे लाड पुरवण्यात ठेवीदारांचा गळा आवळला जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ठेवीदारांमधून उमटत आहेत. जानेवारीमध्ये कर्जाचा व्याजदर सुमारे 8.60 टक्‍के होता. त्यामध्ये घट होऊन 7.45 टक्‍के आणि आता 7.05 टक्‍केवर आला आहे. तर ठेवीवरील व्याजाच्या दरातही मोठी घसरण होत गेल्या वर्षभरात सुमारे एक टक्‍याने दर खाली आले आहेत. ठेवीवरील मिळणारे व्याज कमी झाल्याने अनेकांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. ज्येष्ठांना याचा मोठी फटका बसला आहे. व्याजदरामध्ये वेळीच सुधारणा झाली नसल्यास गुंतवणूकीचा पर्यायी मार्ग अवलंबण्याची शक्‍यता ठेवीदारांमध्ये चर्चिली जात आहे. बॅंकानी आपले पतधोरण बदलून ठेवीदारांचा विचार करावा, अशी मागणी आहे.  जानेवारीमध्ये कर्जाचा व्याजदर सुमारे 8.60 टक्‍के होता. त्यानंतर अलिकडे 7.45 टक्‍के होऊन सध्या 7.05 टक्‍के इतका आहे. ठेवीवरील व्याजदर 6.25 टक्‍यावरून आता 5.25 टक्‍के झाला आहे. बचत खात्याच्या व्याजाचा दर 3.50 टक्‍केवरून 2.75 टक्‍के झाला आहे.  - सागर मोरे, शाखाधिकारी, बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा जामसंडे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3dcR9o5

No comments:

Post a Comment