साहेब! पोट भरायचे की, कर्ज फेडायचे; बँकांमुळे नव्हे तर यांच्यामुळे ‘त्या’ महिलांची वाढली चिंता खामगाव (जि.बुलडाणा) : गरीब व मध्यम वर्गियांना कर्ज देण्यासाठी बँका उभ्या करीत नाही. त्‍यामुळे या वर्गातील लोकांना आपल्‍या अत्‍यावश्‍यक गरजा म्‍हणा किंवा काही छोटा मोठा व्‍यवसाय, काही वस्तू घ्यायच्‍या असल्‍यास मायक्रोफायनान्‍स कंपनींच्‍या पायऱ्या चढव्‍या लागतात. सध्या प्रत्‍येक गावात हे मायक्रोफायनान्‍सचे लोण पसरले आहे.  ज्‍यांनी कर्ज घेतले त्‍यांच्‍याकडून या कर्जाची नियमित फेड देखील केली जात होती. मात्र लॉकडाउनच्‍या मागील तीन महिन्‍यात सरकारच्‍या निदर्शनाप्रमाणे या कंपन्‍यांकडून ही वसुली थांबवण्यात आली होती. परंतु आता थोडी शिथिलता मिळताच कंपनीच्‍या कर्मचाऱ्यांकडून कर्ज वसुली सुरू झाली आहे. परंतु, ग्रामीण भागात हाताला कामच नसल्‍याने साहेब... पोट भरायचे की, कर्ज फेडायचे असा सवाल महिला या कंपन्‍यांच्‍या अधिकाऱ्यांना विचारत आहेत. आवश्‍यक वाचा - पेशव्यांनी मुघलांकडे वाशीमचा हा नजराणा देण्याची घातली होती अट  गाव, खेडे, तालुका, जिल्‍हा अशा प्रत्‍येक ठिकाणी महिला बचत गट तयार करण्यात आलेले आहेत. असे एकही गाव शोधून सापडणार नाहीत, जिथे बचतगट नसेल, कर्ज घेण्यासह परतफेड करण्यात महिलांनी विश्‍वास संपादित केला आहे. त्‍यामुळे महिला बचतगटांना कर्ज देण्यासाठी मायक्राे फायनान्‍स कपंन्‍या सरसावल्‍या आहेत. या कंपन्‍यांनी महिलांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप केले. जिल्ह्यात कर्ज वाटप करणाऱ्या बऱ्याच कंपन्‍या कार्यरत आहेत.  हेही वाचा - सहा महिन्यापूर्वीच घेतला होता त्यांनी आसरा, अन् घरमालकाचाच काढला काटा मार्च महिन्‍यात लॉकडाउन जाहीर झाल्‍यामुळे उद्योगधंदे बंद झालेत. महिला व पुरुष कुणाच्‍याही हाताला काम मिळाले नाही. जमा होते ते सर्व पैसे तीन महिने बसुन कुटुंबाच्‍या उदरनिर्वाहात खर्च झाले. आता काही प्रमाणात शिथिलता मिळाली असली तरी मजुरांच्‍या हाताला काम नाही. त्‍यातच मायक्रो फायनान्‍स कंपन्‍या वसुलीसाठी बचत गटाच्‍या महिलांशी संपर्क साधत आहेत.  शहरी भागात बऱ्यापैकी वसुली जमा होत आहे. मात्र ग्रामीण भागातील महिला सर्वाधिक चिंतित आहेत. आता वेळेवर कर्जाचे हप्‍ते न भरल्‍यास पुढे कर्ज मिळण्यास अडचण जाईल, असे कर्मचारी सांगत आहेत.  थकीत हप्‍त्‍यांचे समायोजन मार्च महिन्‍यांपासून थकीत असलेले हप्‍ते वाढवून मिळतील अशा आशेत बचत गटाच्‍या महिला होत्‍या. परंतु काही कंपन्‍यांनी असे न करता त्‍या हप्‍त्‍यांची रक्‍कम  शिल्‍लक असलेल्‍या हप्‍त्‍यांमध्ये विभागजित केली आहे. तसेच या थकीत हप्‍त्‍यांचे समायोजन करताना 35 टक्‍क्‍यांच्‍यावर  व्‍याजाची आकारणी केली जात आहे. ही आकारणी हप्‍त्‍यांवर नसून मूळ रकमेवर आहे. त्‍यामुळे आता नियमित भरण्यात येत असलेल्‍या हप्‍त्‍यांच्‍या रकमेमध्ये आणखी वाढ होणार आहे.  सोशल डिस्‍टन्‍सिंगवर प्रश्‍नचिन्‍ह ठरलेल्‍या दिवशी कर्मचारी बचत गटांच्‍या महिलांची मिटिंग घेतात. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्‍थिती राहते. जागेच्‍या अभावामुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्‍टन्‍सिंगचे पालन होत  नाही. या मिटिंगमधून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 6, 2020

साहेब! पोट भरायचे की, कर्ज फेडायचे; बँकांमुळे नव्हे तर यांच्यामुळे ‘त्या’ महिलांची वाढली चिंता खामगाव (जि.बुलडाणा) : गरीब व मध्यम वर्गियांना कर्ज देण्यासाठी बँका उभ्या करीत नाही. त्‍यामुळे या वर्गातील लोकांना आपल्‍या अत्‍यावश्‍यक गरजा म्‍हणा किंवा काही छोटा मोठा व्‍यवसाय, काही वस्तू घ्यायच्‍या असल्‍यास मायक्रोफायनान्‍स कंपनींच्‍या पायऱ्या चढव्‍या लागतात. सध्या प्रत्‍येक गावात हे मायक्रोफायनान्‍सचे लोण पसरले आहे.  ज्‍यांनी कर्ज घेतले त्‍यांच्‍याकडून या कर्जाची नियमित फेड देखील केली जात होती. मात्र लॉकडाउनच्‍या मागील तीन महिन्‍यात सरकारच्‍या निदर्शनाप्रमाणे या कंपन्‍यांकडून ही वसुली थांबवण्यात आली होती. परंतु आता थोडी शिथिलता मिळताच कंपनीच्‍या कर्मचाऱ्यांकडून कर्ज वसुली सुरू झाली आहे. परंतु, ग्रामीण भागात हाताला कामच नसल्‍याने साहेब... पोट भरायचे की, कर्ज फेडायचे असा सवाल महिला या कंपन्‍यांच्‍या अधिकाऱ्यांना विचारत आहेत. आवश्‍यक वाचा - पेशव्यांनी मुघलांकडे वाशीमचा हा नजराणा देण्याची घातली होती अट  गाव, खेडे, तालुका, जिल्‍हा अशा प्रत्‍येक ठिकाणी महिला बचत गट तयार करण्यात आलेले आहेत. असे एकही गाव शोधून सापडणार नाहीत, जिथे बचतगट नसेल, कर्ज घेण्यासह परतफेड करण्यात महिलांनी विश्‍वास संपादित केला आहे. त्‍यामुळे महिला बचतगटांना कर्ज देण्यासाठी मायक्राे फायनान्‍स कपंन्‍या सरसावल्‍या आहेत. या कंपन्‍यांनी महिलांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप केले. जिल्ह्यात कर्ज वाटप करणाऱ्या बऱ्याच कंपन्‍या कार्यरत आहेत.  हेही वाचा - सहा महिन्यापूर्वीच घेतला होता त्यांनी आसरा, अन् घरमालकाचाच काढला काटा मार्च महिन्‍यात लॉकडाउन जाहीर झाल्‍यामुळे उद्योगधंदे बंद झालेत. महिला व पुरुष कुणाच्‍याही हाताला काम मिळाले नाही. जमा होते ते सर्व पैसे तीन महिने बसुन कुटुंबाच्‍या उदरनिर्वाहात खर्च झाले. आता काही प्रमाणात शिथिलता मिळाली असली तरी मजुरांच्‍या हाताला काम नाही. त्‍यातच मायक्रो फायनान्‍स कंपन्‍या वसुलीसाठी बचत गटाच्‍या महिलांशी संपर्क साधत आहेत.  शहरी भागात बऱ्यापैकी वसुली जमा होत आहे. मात्र ग्रामीण भागातील महिला सर्वाधिक चिंतित आहेत. आता वेळेवर कर्जाचे हप्‍ते न भरल्‍यास पुढे कर्ज मिळण्यास अडचण जाईल, असे कर्मचारी सांगत आहेत.  थकीत हप्‍त्‍यांचे समायोजन मार्च महिन्‍यांपासून थकीत असलेले हप्‍ते वाढवून मिळतील अशा आशेत बचत गटाच्‍या महिला होत्‍या. परंतु काही कंपन्‍यांनी असे न करता त्‍या हप्‍त्‍यांची रक्‍कम  शिल्‍लक असलेल्‍या हप्‍त्‍यांमध्ये विभागजित केली आहे. तसेच या थकीत हप्‍त्‍यांचे समायोजन करताना 35 टक्‍क्‍यांच्‍यावर  व्‍याजाची आकारणी केली जात आहे. ही आकारणी हप्‍त्‍यांवर नसून मूळ रकमेवर आहे. त्‍यामुळे आता नियमित भरण्यात येत असलेल्‍या हप्‍त्‍यांच्‍या रकमेमध्ये आणखी वाढ होणार आहे.  सोशल डिस्‍टन्‍सिंगवर प्रश्‍नचिन्‍ह ठरलेल्‍या दिवशी कर्मचारी बचत गटांच्‍या महिलांची मिटिंग घेतात. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्‍थिती राहते. जागेच्‍या अभावामुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्‍टन्‍सिंगचे पालन होत  नाही. या मिटिंगमधून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XEdkiJ

No comments:

Post a Comment