परदेशातून आयात होणाऱ्या उत्पादनांना पर्यायी उत्पादने होताहेत तयार पिंपरी - केंद्रसरकारने आत्मनिर्भर योजना जाहीर केली. मात्र पाच वर्षांपूर्वी लघुउद्योग भारती या संघटनेने यासंदर्भात काम सुरू केले. त्याअंतर्गत परदेशातून आयात होणाऱ्या संरक्षण, इलेक्‍ट्रॉनिक, अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) अशा विविध उत्पादनांना पर्यायी उत्पादने तयार करण्यात येत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संघटनेची 2015 मध्ये नागपूर येथे बैठक झाली होती. या बैठकीत परदेशातून देशात आयात होणाऱ्या विविध उत्पादनांना कोणती पर्यायी उत्पादने देशात तयार करता येतील, या विषयी चर्चा झाली. त्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांत तातडीने देशपातळीवर यासंदर्भात प्रत्यक्षात उत्पादित करता येणाऱ्या उत्पादनांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात येऊन अंमलबजावणीही सुरू झाली आहे. संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि राज्याचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे याबाबत माहिती दिली. भांडी घासण्यासाठी वापरण्यात येणारे मेटल स्क्रबरही चीनमधून आयात करण्यात येत होते. मात्र हे स्क्रबर आता देशातच तयार करण्यात येत आहेत. चीनमधून आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांशीही याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती चीनच्याच किमतीत हे स्क्रबर त्यांना देण्यात आले. त्यामुळे त्याला मागणीही वाढली. तसेच आयात होणाऱ्या लहान मुलांची अनेक प्रकारची खेळणी आता देशातच तयार होत आहेत.  अरे काय सांगू राव! मुलगी तर पसंत आहे, पण... कसे साध्य झाले  संघटनेने प्रथम परदेशांमधून कोणत्या वस्तू आयात होतात त्याची यादी केली. त्यापैकी तातडीने कोणत्या वस्तू देशातच निर्माण होऊ शकतात याची चाचपणी केली. त्यानंतर यासंदर्भात उद्योजकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविले. त्यांना आवश्‍यक ते सहकार्य, मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रसंगी बॅंक कर्जाची समस्या सोडविण्यात आली. आणखी वाचा - पुण्यात रेड झोनमधील शाळांसाठी नवी नियमावली स्वदेशी उत्पादनांना मागणीत वाढ  चीनमधून एखादी वस्तू आयात करताना संबंधित मालाच्या एकूण मागणीचे पैसे 40 दिवस आधी भरावे लागतात. तेवढ्या रकमेवर बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याजही वाढते. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या नफ्यावरही परिणाम होत असे. मात्र स्वदेशी उत्पादनांमुळे पैसे दिल्यावर तातडीने माल चीनच्याच दरात किंवा काही माल चीनपेक्षा कमी दरात देण्यास सुरवात झाली. 2017 मध्ये कोल्हापूर येथील महिलांना दिवाळीत लावण्यात येणाऱ्या इलेक्‍ट्रिकच्या माळा बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या महिलांनी हे कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे चीनपेक्षा कमी खर्चात दीपमाळा (इलेक्‍ट्रिक माळा) बनविण्यात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होऊ लागली.  आणखी वाचा - पुण्यातील या भागात तीन दिवस संचारबंदी केंद्र सरकारकडून प्रोत्साहन  केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून ज्या वस्तू परदेशातून सध्या आयात होतात अशा वस्तूंना देशातच पर्यायी वस्तू तयार करता येतील का यासंबंधीची यादीच उद्योजकांच्या संघटनांना पाठविण्यात आली आहे. त्यावरही संघटनेने काम सुरू केले आहे.  स्वदेशी उत्पादनांचा फायदा  स्वदेशी उत्पादनामुळे देशातंर्गत रोजगारही वाढेल. वस्तूंच्या आयातीसाठी देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होत असते. तसेच आयातीसाठीच्या परकीय चलनाची बचत होऊन अमेरिकन डॉलरच्या तुलने भारतीय रुपयाचे मूल्य वाढेल.  लॉकडाउनचा तर फटका आहेच, मात्र पिंपरीकर झाले 'या' कारणामुळे हैराण * आयातपर्यायी वस्तूंचे उत्पादक - 500  * आयातपर्यायी वस्तूंचे होत असलेले उत्पादन - 500  सोने आणि क्रूड ऑइल आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तू या तीन बाबींवर देशाचे परकीय चलन सर्वांत जास्त प्रमाणात खर्च होते. केंद्र सरकारने इलेक्‍ट्रॉनिक उद्योगांसाठी 22 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन वर्षांत अधिक आयात पर्यायी उत्पादने देशात विकसित होणे अपेक्षित आहे. त्यासाठी लॉकडाऊनमुळे रोजगार गेलेल्या घरकाम करणाऱ्या महिलांना संघटनेच्या वतीने प्रशिक्षित करण्याचा मानस आहे.  - रवींद्र सोनवणे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, लघुउद्योग भारती संघटना - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, June 17, 2020

परदेशातून आयात होणाऱ्या उत्पादनांना पर्यायी उत्पादने होताहेत तयार पिंपरी - केंद्रसरकारने आत्मनिर्भर योजना जाहीर केली. मात्र पाच वर्षांपूर्वी लघुउद्योग भारती या संघटनेने यासंदर्भात काम सुरू केले. त्याअंतर्गत परदेशातून आयात होणाऱ्या संरक्षण, इलेक्‍ट्रॉनिक, अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) अशा विविध उत्पादनांना पर्यायी उत्पादने तयार करण्यात येत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संघटनेची 2015 मध्ये नागपूर येथे बैठक झाली होती. या बैठकीत परदेशातून देशात आयात होणाऱ्या विविध उत्पादनांना कोणती पर्यायी उत्पादने देशात तयार करता येतील, या विषयी चर्चा झाली. त्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांत तातडीने देशपातळीवर यासंदर्भात प्रत्यक्षात उत्पादित करता येणाऱ्या उत्पादनांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात येऊन अंमलबजावणीही सुरू झाली आहे. संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि राज्याचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे याबाबत माहिती दिली. भांडी घासण्यासाठी वापरण्यात येणारे मेटल स्क्रबरही चीनमधून आयात करण्यात येत होते. मात्र हे स्क्रबर आता देशातच तयार करण्यात येत आहेत. चीनमधून आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांशीही याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती चीनच्याच किमतीत हे स्क्रबर त्यांना देण्यात आले. त्यामुळे त्याला मागणीही वाढली. तसेच आयात होणाऱ्या लहान मुलांची अनेक प्रकारची खेळणी आता देशातच तयार होत आहेत.  अरे काय सांगू राव! मुलगी तर पसंत आहे, पण... कसे साध्य झाले  संघटनेने प्रथम परदेशांमधून कोणत्या वस्तू आयात होतात त्याची यादी केली. त्यापैकी तातडीने कोणत्या वस्तू देशातच निर्माण होऊ शकतात याची चाचपणी केली. त्यानंतर यासंदर्भात उद्योजकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविले. त्यांना आवश्‍यक ते सहकार्य, मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रसंगी बॅंक कर्जाची समस्या सोडविण्यात आली. आणखी वाचा - पुण्यात रेड झोनमधील शाळांसाठी नवी नियमावली स्वदेशी उत्पादनांना मागणीत वाढ  चीनमधून एखादी वस्तू आयात करताना संबंधित मालाच्या एकूण मागणीचे पैसे 40 दिवस आधी भरावे लागतात. तेवढ्या रकमेवर बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याजही वाढते. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या नफ्यावरही परिणाम होत असे. मात्र स्वदेशी उत्पादनांमुळे पैसे दिल्यावर तातडीने माल चीनच्याच दरात किंवा काही माल चीनपेक्षा कमी दरात देण्यास सुरवात झाली. 2017 मध्ये कोल्हापूर येथील महिलांना दिवाळीत लावण्यात येणाऱ्या इलेक्‍ट्रिकच्या माळा बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या महिलांनी हे कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे चीनपेक्षा कमी खर्चात दीपमाळा (इलेक्‍ट्रिक माळा) बनविण्यात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होऊ लागली.  आणखी वाचा - पुण्यातील या भागात तीन दिवस संचारबंदी केंद्र सरकारकडून प्रोत्साहन  केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून ज्या वस्तू परदेशातून सध्या आयात होतात अशा वस्तूंना देशातच पर्यायी वस्तू तयार करता येतील का यासंबंधीची यादीच उद्योजकांच्या संघटनांना पाठविण्यात आली आहे. त्यावरही संघटनेने काम सुरू केले आहे.  स्वदेशी उत्पादनांचा फायदा  स्वदेशी उत्पादनामुळे देशातंर्गत रोजगारही वाढेल. वस्तूंच्या आयातीसाठी देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होत असते. तसेच आयातीसाठीच्या परकीय चलनाची बचत होऊन अमेरिकन डॉलरच्या तुलने भारतीय रुपयाचे मूल्य वाढेल.  लॉकडाउनचा तर फटका आहेच, मात्र पिंपरीकर झाले 'या' कारणामुळे हैराण * आयातपर्यायी वस्तूंचे उत्पादक - 500  * आयातपर्यायी वस्तूंचे होत असलेले उत्पादन - 500  सोने आणि क्रूड ऑइल आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तू या तीन बाबींवर देशाचे परकीय चलन सर्वांत जास्त प्रमाणात खर्च होते. केंद्र सरकारने इलेक्‍ट्रॉनिक उद्योगांसाठी 22 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन वर्षांत अधिक आयात पर्यायी उत्पादने देशात विकसित होणे अपेक्षित आहे. त्यासाठी लॉकडाऊनमुळे रोजगार गेलेल्या घरकाम करणाऱ्या महिलांना संघटनेच्या वतीने प्रशिक्षित करण्याचा मानस आहे.  - रवींद्र सोनवणे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, लघुउद्योग भारती संघटना - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2YI85ha

No comments:

Post a Comment