पुणे जिल्ह्यात अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक खुले होणार; कधी ते वाचा सविस्तर पुणे - लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्यामुळे बांधकामे सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील उद्योगही आता सुरू झाले आहेत. तसेच, आयटी देखील आता प्रत्यक्ष सुरू होण्याच्या मार्गावर आहे. येत्या चार दिवसांत या क्षेत्रांना गती मिळण्याची चिन्हे आहेत. वाहन दुरुस्ती, मोबाईल विक्री व दुरुस्ती, बांधकाम साहित्य आदींची दुकानेही काही प्रमाणात सुरू होत असल्यामुळे अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक खुले होऊ लागले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  टोकन पद्धत, ॲपला चालना किराणा दुकानदाराला व्हॉटस्‌ॲपवरून यादी पाठविली की तो त्यानुसार माल तयार करणार, दिलेल्या वेळेला ग्राहकाने येऊन पैसे द्यायचे आणि माल घेऊन जायचा, या पद्धतीने शहरात आता किराणा माल खरेदी सुरू झाली आहे. तसेच मद्यविक्रीसाठीही टोकन पद्धत सुरू झाली आहे. आयआयटी मुंबईनेही यासाठी ॲप तयार केले आहे. वाहतुकीचा संभ्रम कायम सर्वसामान्यांना पेट्रोलही मिळू लागले आहे. त्यातच दुचाकीवर एकजण आणि मोटारीत चालकाशिवाय दोघांना परवानगी दिली आहे. दुकानांत खरेदी करण्यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी वेळ दिली आहे. मात्र, तरी देखील पोलिस वाहनचालकांवर कारवाई करीत असल्याच्याही तक्रारी आहेत. हिंजवडी ‘आयटी’ला झळाळी आयटीमध्ये सुमारे ३३ टक्के कर्मचारी संख्येवर कंपन्या सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. प्रमुख कंपन्यांनी आता ३३ टक्के कर्मचाऱ्यांची यादी तयार करून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांचे पोलिसांकडून पास मिळाल्यावर कामकाज सुरू होईल, असे हिंजवडी आयटी असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. उद्योग  पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अत्यावश्‍यक सेवांशी संबंधित उद्योगांना परवानगी आहे. ही दोन्ही शहरे ‘रेड झोन’मध्ये असल्यामुळे उद्योग सुरू करण्यास परवानगी नाही. जिल्ह्यात सोमवारपासून ४० टक्के उद्योग सुरू होतील. बांधकाम  महापालिकेने बांधकामे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. स्टील, वाळू, सिमेंटच्या वाहतुकीची व्यावसायिकांना प्रतीक्षा आहे. उपलब्ध मनुष्यबळावर कामे सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. काय सुरू; काय बंद? वाहन विक्रीला परवानगी नाही. परंतु, वाहन दुरुस्तीला महापालिकेने परवानगी दिली आहे. मात्र, महापालिका पातळीवर त्यात संभ्रम निर्माण झाला आहे. परवानगीची प्रक्रिया सोमवारपासून सुरळीत होईल.  मोबाईल विक्री व दुरुस्ती, हार्डवेअर, प्लंबिंग, भांड्यांची दुकाने, संगणक साहित्य, कपडे, डेअरी उत्पादने, बांधकाम साहित्य आदींची दुकाने विशिष्ट दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सातदरम्यान खुली राहणार आहेत.  खासगी कार्यालये पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास महापालिका क्षेत्रात परवानगी दिली आहे.  शिक्षण संस्था, खासगी क्‍लास, मॉल, मंगल कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट आदींना बंदी कायम आहे. नियम बंधनकारक दोन व्यक्तींमध्ये दीड मीटर अंतर मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर प्रत्येक व्यक्तीला बंधनकारक कामाच्या ठिकाणी दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण गरजेचे कामगारांची वाहतूक स्वतंत्रपणे, वाहनाच्या निम्या क्षमतेने शहरातील बांधकामे सुरू करायची आहेत. अनेक व्यावसायिक त्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्टील, वाळू, सिमेंट आदींचा पुरवठा सुरळीत झाला, तर सोमवारपासून किमान ५० टक्के बांधकामे सुरू होतील. - अखिल अग्रवाल, पदाधिकारी, क्रेडाई पुणे आणि पिंपरीमध्ये ‘रेड झोन’ असल्यामुळे परिसरातील उद्योग सुरू करता येणार नाहीत. मात्र, जिल्ह्यात उद्योग बऱ्यापैकी सुरू झाले आहेत. सोमवारपासून अनेक उद्योग नियमित होतील. - सदाशिव सुरवसे, उद्योग सहसंचालक दुकानांच्या ठरवून दिलेल्या वेळांचे नागरिकांनी पालन करावे म्हणून पोलिस प्रयत्न करीत आहेत. स्थानिक पोलिसांनी कोठेही स्वतंत्रपणे निर्णय घेतलेले नाहीत.  - डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 8, 2020

पुणे जिल्ह्यात अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक खुले होणार; कधी ते वाचा सविस्तर पुणे - लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्यामुळे बांधकामे सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील उद्योगही आता सुरू झाले आहेत. तसेच, आयटी देखील आता प्रत्यक्ष सुरू होण्याच्या मार्गावर आहे. येत्या चार दिवसांत या क्षेत्रांना गती मिळण्याची चिन्हे आहेत. वाहन दुरुस्ती, मोबाईल विक्री व दुरुस्ती, बांधकाम साहित्य आदींची दुकानेही काही प्रमाणात सुरू होत असल्यामुळे अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक खुले होऊ लागले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  टोकन पद्धत, ॲपला चालना किराणा दुकानदाराला व्हॉटस्‌ॲपवरून यादी पाठविली की तो त्यानुसार माल तयार करणार, दिलेल्या वेळेला ग्राहकाने येऊन पैसे द्यायचे आणि माल घेऊन जायचा, या पद्धतीने शहरात आता किराणा माल खरेदी सुरू झाली आहे. तसेच मद्यविक्रीसाठीही टोकन पद्धत सुरू झाली आहे. आयआयटी मुंबईनेही यासाठी ॲप तयार केले आहे. वाहतुकीचा संभ्रम कायम सर्वसामान्यांना पेट्रोलही मिळू लागले आहे. त्यातच दुचाकीवर एकजण आणि मोटारीत चालकाशिवाय दोघांना परवानगी दिली आहे. दुकानांत खरेदी करण्यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी वेळ दिली आहे. मात्र, तरी देखील पोलिस वाहनचालकांवर कारवाई करीत असल्याच्याही तक्रारी आहेत. हिंजवडी ‘आयटी’ला झळाळी आयटीमध्ये सुमारे ३३ टक्के कर्मचारी संख्येवर कंपन्या सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. प्रमुख कंपन्यांनी आता ३३ टक्के कर्मचाऱ्यांची यादी तयार करून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांचे पोलिसांकडून पास मिळाल्यावर कामकाज सुरू होईल, असे हिंजवडी आयटी असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. उद्योग  पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अत्यावश्‍यक सेवांशी संबंधित उद्योगांना परवानगी आहे. ही दोन्ही शहरे ‘रेड झोन’मध्ये असल्यामुळे उद्योग सुरू करण्यास परवानगी नाही. जिल्ह्यात सोमवारपासून ४० टक्के उद्योग सुरू होतील. बांधकाम  महापालिकेने बांधकामे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. स्टील, वाळू, सिमेंटच्या वाहतुकीची व्यावसायिकांना प्रतीक्षा आहे. उपलब्ध मनुष्यबळावर कामे सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. काय सुरू; काय बंद? वाहन विक्रीला परवानगी नाही. परंतु, वाहन दुरुस्तीला महापालिकेने परवानगी दिली आहे. मात्र, महापालिका पातळीवर त्यात संभ्रम निर्माण झाला आहे. परवानगीची प्रक्रिया सोमवारपासून सुरळीत होईल.  मोबाईल विक्री व दुरुस्ती, हार्डवेअर, प्लंबिंग, भांड्यांची दुकाने, संगणक साहित्य, कपडे, डेअरी उत्पादने, बांधकाम साहित्य आदींची दुकाने विशिष्ट दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सातदरम्यान खुली राहणार आहेत.  खासगी कार्यालये पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास महापालिका क्षेत्रात परवानगी दिली आहे.  शिक्षण संस्था, खासगी क्‍लास, मॉल, मंगल कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट आदींना बंदी कायम आहे. नियम बंधनकारक दोन व्यक्तींमध्ये दीड मीटर अंतर मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर प्रत्येक व्यक्तीला बंधनकारक कामाच्या ठिकाणी दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण गरजेचे कामगारांची वाहतूक स्वतंत्रपणे, वाहनाच्या निम्या क्षमतेने शहरातील बांधकामे सुरू करायची आहेत. अनेक व्यावसायिक त्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्टील, वाळू, सिमेंट आदींचा पुरवठा सुरळीत झाला, तर सोमवारपासून किमान ५० टक्के बांधकामे सुरू होतील. - अखिल अग्रवाल, पदाधिकारी, क्रेडाई पुणे आणि पिंपरीमध्ये ‘रेड झोन’ असल्यामुळे परिसरातील उद्योग सुरू करता येणार नाहीत. मात्र, जिल्ह्यात उद्योग बऱ्यापैकी सुरू झाले आहेत. सोमवारपासून अनेक उद्योग नियमित होतील. - सदाशिव सुरवसे, उद्योग सहसंचालक दुकानांच्या ठरवून दिलेल्या वेळांचे नागरिकांनी पालन करावे म्हणून पोलिस प्रयत्न करीत आहेत. स्थानिक पोलिसांनी कोठेही स्वतंत्रपणे निर्णय घेतलेले नाहीत.  - डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bc3b01

No comments:

Post a Comment