मॉन्सून शनिवारपर्यंत अंदमानात; यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज पुणे - बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात उद्या (ता.१३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळणार आहे. शनिवारपर्यंत (ता.१६) मॉन्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर डेरेदाखल होण्यास पोषक स्थिती असल्याची माहिती हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या मॉन्सून आगमनाच्या संभाव्य तारखांच्या नवीन वेळापत्रकानुसार मॉन्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होण्याची शक्यता आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  दक्षिण अंदमान समुद्र, सुमात्राच्या किनाऱ्यालगतच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, उद्या (ता.१३) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकणार असून, शनिवारपर्यंत (ता.१६) ही प्रणाली अधिक तीव्र होणार आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर मॉन्सूनचे आगमन होण्यास ही स्थिती पोषक ठरणार आहे. दिर्घकालीन सर्वसामान्य वेळेनुसार मॉन्सून २० मेपर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होत बहुतांशी भाग व्यापतो. यंदा सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस आधीच मॉन्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षी १८ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर संपुर्ण अंदमान बेटे व्यापण्यास ३० मे उजाडला होता.  मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून हंगामाचा सुधारित दिर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.  यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज  यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १५ एप्रिल रोजी जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामाच्या सुरवातीला एल-निनो स्थिती सर्वसामान्य राहणार असून, शेवटच्या टप्प्यात ला-निना स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 11, 2020

मॉन्सून शनिवारपर्यंत अंदमानात; यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज पुणे - बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात उद्या (ता.१३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळणार आहे. शनिवारपर्यंत (ता.१६) मॉन्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर डेरेदाखल होण्यास पोषक स्थिती असल्याची माहिती हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या मॉन्सून आगमनाच्या संभाव्य तारखांच्या नवीन वेळापत्रकानुसार मॉन्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होण्याची शक्यता आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  दक्षिण अंदमान समुद्र, सुमात्राच्या किनाऱ्यालगतच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, उद्या (ता.१३) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकणार असून, शनिवारपर्यंत (ता.१६) ही प्रणाली अधिक तीव्र होणार आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर मॉन्सूनचे आगमन होण्यास ही स्थिती पोषक ठरणार आहे. दिर्घकालीन सर्वसामान्य वेळेनुसार मॉन्सून २० मेपर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होत बहुतांशी भाग व्यापतो. यंदा सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस आधीच मॉन्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षी १८ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर संपुर्ण अंदमान बेटे व्यापण्यास ३० मे उजाडला होता.  मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून हंगामाचा सुधारित दिर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.  यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज  यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १५ एप्रिल रोजी जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामाच्या सुरवातीला एल-निनो स्थिती सर्वसामान्य राहणार असून, शेवटच्या टप्प्यात ला-निना स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bn5xt9

No comments:

Post a Comment