देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी वापरलेली करनी औरंगाबादेत !  औरंगाबाद : जुन्या वस्तू हा ऐक कालांतराने महत्वपुर्ण दस्ताएवज बनतो, ऐतिहासिक ठेवा बनतो. तो जेंव्हा कधी हाती लागतो तेंव्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरतो. असाच एक ठेवा मराठवाड्यात ज्ञानगंगा आणणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नागसेन वन परिसराशी संबंधित. स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित हा ठेवा आहे.हा ठेवा त्यावेळच्या प्रसंगांच्या आठवणी करून देतो आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यात शिक्षणाची गंगोत्री आणली. त्यावेळी औरंगाबाद शहरात शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय होते तेही इंटरपर्यंतचेच. पुढील उच्चशिक्षणासाठी हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठात जावे लागायचे. हैद्राबादला सर्वांनाच शिक्षणासाठी जाणे शक्य नव्हते तिथे शोषित, वंचित मागास घटकातील विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी हैद्राबादला जाणे फार दूरची गोष्ट. औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवन परिसरात मिलींद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलींद महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य एम. ए. वाहुळ यांनी या नागसेवन परिसरातील वास्तूशी संबंधित ठेवा जपला आहे. प्राचार्य वाहुळ म्हणाले, २३ ऑगस्ट १९५८ रोजी या शहरात दोन महत्वपुर्ण कार्यक्रम झाले होते. पहिला तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाची स्थापना आणि दुसरा होता पुर्वीचे मिलिंद रंगमंदिर तर आजचे सुभेदार रामजी आंबेडकर सभागृहाची पायाभरणी. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शहरात वरील दोन कार्यक्रम होते. मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा शहरातील शिक्षण संस्थांपैकी पहिलेच मोठे रंगमंदिर बांधले जाणार होते आणि त्याच्या पायाभरणीसाठी प्रधानमंत्री नेहरू आले होते. त्यांचे उघड्या जीपमधून नागसेनवन परिसरात आगमन झाले त्यांनी रंगमंदिराची पायाभरणी केली त्या घटनेचा मी साक्षीदार आहे. पुढे मी मिलींद महाविद्यालयाचा प्राचार्य झाले त्यावेळी जुना कचरा काढत असताना पंडित नेहरूंनी पायाभरणीची सुरूवात करताना पायाच्या दगडामध्ये ज्या करनीने (थापी) सिमेंट टाकले होते ती करनी सापडली. या करनीवर त्या समारंभाचा, पंडित नेहरू यांचा आणि तारखेचा उल्लेख करण्यात आलेला आहे हा खूप महत्वाचा ठेवा असल्याने तो माझ्या संग्रहात जतन करून ठेवलेली असल्याचे श्री. वाहुळ यांनी सांगीतले.  महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 24, 2020

देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी वापरलेली करनी औरंगाबादेत !  औरंगाबाद : जुन्या वस्तू हा ऐक कालांतराने महत्वपुर्ण दस्ताएवज बनतो, ऐतिहासिक ठेवा बनतो. तो जेंव्हा कधी हाती लागतो तेंव्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरतो. असाच एक ठेवा मराठवाड्यात ज्ञानगंगा आणणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नागसेन वन परिसराशी संबंधित. स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित हा ठेवा आहे.हा ठेवा त्यावेळच्या प्रसंगांच्या आठवणी करून देतो आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यात शिक्षणाची गंगोत्री आणली. त्यावेळी औरंगाबाद शहरात शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय होते तेही इंटरपर्यंतचेच. पुढील उच्चशिक्षणासाठी हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठात जावे लागायचे. हैद्राबादला सर्वांनाच शिक्षणासाठी जाणे शक्य नव्हते तिथे शोषित, वंचित मागास घटकातील विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी हैद्राबादला जाणे फार दूरची गोष्ट. औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवन परिसरात मिलींद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलींद महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य एम. ए. वाहुळ यांनी या नागसेवन परिसरातील वास्तूशी संबंधित ठेवा जपला आहे. प्राचार्य वाहुळ म्हणाले, २३ ऑगस्ट १९५८ रोजी या शहरात दोन महत्वपुर्ण कार्यक्रम झाले होते. पहिला तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाची स्थापना आणि दुसरा होता पुर्वीचे मिलिंद रंगमंदिर तर आजचे सुभेदार रामजी आंबेडकर सभागृहाची पायाभरणी. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शहरात वरील दोन कार्यक्रम होते. मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा शहरातील शिक्षण संस्थांपैकी पहिलेच मोठे रंगमंदिर बांधले जाणार होते आणि त्याच्या पायाभरणीसाठी प्रधानमंत्री नेहरू आले होते. त्यांचे उघड्या जीपमधून नागसेनवन परिसरात आगमन झाले त्यांनी रंगमंदिराची पायाभरणी केली त्या घटनेचा मी साक्षीदार आहे. पुढे मी मिलींद महाविद्यालयाचा प्राचार्य झाले त्यावेळी जुना कचरा काढत असताना पंडित नेहरूंनी पायाभरणीची सुरूवात करताना पायाच्या दगडामध्ये ज्या करनीने (थापी) सिमेंट टाकले होते ती करनी सापडली. या करनीवर त्या समारंभाचा, पंडित नेहरू यांचा आणि तारखेचा उल्लेख करण्यात आलेला आहे हा खूप महत्वाचा ठेवा असल्याने तो माझ्या संग्रहात जतन करून ठेवलेली असल्याचे श्री. वाहुळ यांनी सांगीतले.  महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36sj7ul

No comments:

Post a Comment