पिंपळे सौदागरमधील 'ही' सोसायटी देतेय गरजूंना घरचं जेवणं... पिंपरी : कोणाच्याही आर्थिक मदतीशिवाय पिंपळे सौदागर येथील रोझ आयकॉन सोसायटीच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून रोज 300 ते 400 गरीब आणि गरजूंना भोजन देण्यात येत आहे. त्याद्वारे सोसायटीतील रहिवाशांनी एक सामाजिक जाणिवेचा आदर्श समाजापुढे घालून दिला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लॉकडाउनमुळे भल्याभल्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा लोकांसह अनेक कामगारांचीही विविध संस्था जेवणाची सोय करीत आहेत. मात्र, या गरिबांना दररोज घरचे जेवण मिळणे अवघड आहे. रोझ आयकॉन सोसायटीतील सभासद त्यासाठी झटून योगदान देत आहेत. या सोसायटीचे अध्यक्ष रवी मुंडे यांनी याबाबत माहिती दिली. सोसायटीत एक हजार तीन सदनिका आहेत. लॉकडाउनमुळे गरीब आणि गरजू लोकांचे हातचे काम गेले आहे. परिणामी वेतन होत नसल्याने अशा कुटुंबांपुढे जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी अनेक संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला आहे. यापैकी बऱ्याच संस्था सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा उपयोग गरिबांना अन्न शिजवून देण्यासाठी करीत आहेत.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा घरचा डबा  गरीब आणि गरजू लोकांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण दिले जाते. मात्र, या सोसायटीच्या घरातील महिला कुटुंबातील सदस्य संख्येपेक्षा दोन डबे जास्त बनवितात. हे डबे एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोचविले जातात. त्यासाठी सोसायटीने प्रतिनग पाच ते सात रुपये या दराने रेडिमेड एकदा वापरता येण्याजोगे डबे विकत घेतले आहेत. या डब्यांमध्ये हे जेवण भरण्यात येते.  रोझ आयकॉनचे वेगळेपण  सोसायटीतील 200 सदनिकाधारक टप्प्याटप्प्याने या उपक्रमात सहभागी होतात. त्यामुळे पहिल्यांदा सहभागी झालेले सदनिकाधारक पाचव्या दिवशी पुन्हा सहभागी होतात. त्यामुळे कोणावरही ताण येत नाही आणि कामही होते.  परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष हांडे आणि त्यांचे एक सहकारी असे दोघेजण हे डबे घेऊन रोज परिसरातील पदपथांवर राहणाऱ्या लोकांना वाटतात. तसेच स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शहरातील गरिबांपर्यंत डबे पोचविण्यात येतात.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  साधारणपणे सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन-तीन वाजेपर्यंत गरजूंपर्यंत अन्न पोचविण्यात येते. आतापर्यंत गेल्या दोन महिन्यात सुमारे 17 हजार जणांना अशा पद्धतीने जेवणाचे डबे (टिफिन) दिले आहेत.  - रवी मुंडे, अध्यक्ष, रोझ आयकॉन सोसायटी, पिंपळे सौदागर   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 24, 2020

पिंपळे सौदागरमधील 'ही' सोसायटी देतेय गरजूंना घरचं जेवणं... पिंपरी : कोणाच्याही आर्थिक मदतीशिवाय पिंपळे सौदागर येथील रोझ आयकॉन सोसायटीच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून रोज 300 ते 400 गरीब आणि गरजूंना भोजन देण्यात येत आहे. त्याद्वारे सोसायटीतील रहिवाशांनी एक सामाजिक जाणिवेचा आदर्श समाजापुढे घालून दिला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लॉकडाउनमुळे भल्याभल्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा लोकांसह अनेक कामगारांचीही विविध संस्था जेवणाची सोय करीत आहेत. मात्र, या गरिबांना दररोज घरचे जेवण मिळणे अवघड आहे. रोझ आयकॉन सोसायटीतील सभासद त्यासाठी झटून योगदान देत आहेत. या सोसायटीचे अध्यक्ष रवी मुंडे यांनी याबाबत माहिती दिली. सोसायटीत एक हजार तीन सदनिका आहेत. लॉकडाउनमुळे गरीब आणि गरजू लोकांचे हातचे काम गेले आहे. परिणामी वेतन होत नसल्याने अशा कुटुंबांपुढे जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी अनेक संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला आहे. यापैकी बऱ्याच संस्था सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा उपयोग गरिबांना अन्न शिजवून देण्यासाठी करीत आहेत.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा घरचा डबा  गरीब आणि गरजू लोकांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण दिले जाते. मात्र, या सोसायटीच्या घरातील महिला कुटुंबातील सदस्य संख्येपेक्षा दोन डबे जास्त बनवितात. हे डबे एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोचविले जातात. त्यासाठी सोसायटीने प्रतिनग पाच ते सात रुपये या दराने रेडिमेड एकदा वापरता येण्याजोगे डबे विकत घेतले आहेत. या डब्यांमध्ये हे जेवण भरण्यात येते.  रोझ आयकॉनचे वेगळेपण  सोसायटीतील 200 सदनिकाधारक टप्प्याटप्प्याने या उपक्रमात सहभागी होतात. त्यामुळे पहिल्यांदा सहभागी झालेले सदनिकाधारक पाचव्या दिवशी पुन्हा सहभागी होतात. त्यामुळे कोणावरही ताण येत नाही आणि कामही होते.  परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष हांडे आणि त्यांचे एक सहकारी असे दोघेजण हे डबे घेऊन रोज परिसरातील पदपथांवर राहणाऱ्या लोकांना वाटतात. तसेच स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शहरातील गरिबांपर्यंत डबे पोचविण्यात येतात.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  साधारणपणे सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन-तीन वाजेपर्यंत गरजूंपर्यंत अन्न पोचविण्यात येते. आतापर्यंत गेल्या दोन महिन्यात सुमारे 17 हजार जणांना अशा पद्धतीने जेवणाचे डबे (टिफिन) दिले आहेत.  - रवी मुंडे, अध्यक्ष, रोझ आयकॉन सोसायटी, पिंपळे सौदागर   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2LXFVIZ

No comments:

Post a Comment