धक्कादायक : जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच संसर्गाची ठिकाणे औरंगाबाद : मुंबई, ठाणे, पुण्याप्रमाणेच औरंगाबाद शहरही कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. दर दिवशी रुग्णांचा वाढता आकडा हा प्रत्येकाची चिंता वाढवणारा आहे. दीड महिन्यापूर्वी पन्नासच्या आसपास असलेला हा आकडा आता साडेआठशेच्या घरात पोचला आहे. दिवसाकाठी होणारी वाढ ही समूह संसर्गाप्रमाणे होत आहे. हा संसर्ग आता जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या ठिकाणावरून म्हणजेच किराणा, भाजीपाला, दूध डेअरी येथून मोठ्याप्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच काही उदाहरणे समोर आल्याने प्रशासनाला या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.  शहरात दर दिवशी ५० हून कोरोनाबाधितांची संख्या नव्याने वाढत आहे. लॉकडाऊनचा योग्य वापर न करणे, बाजारपेठेत सोशल डिस्टन्सचा नियम तोडणे, सुरक्षा साधनांचा वापर न करणे विशेष म्हणजे प्रशासनाने दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करणे ही कारणेही रुग्णांची वाढ होण्यास कारणीभूत आहे.  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही...    काही उदाहरणे  भावसिंगपुरा व रामनगर या दोन्ही भागात किराणा दुकानदारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे. यातच बाजार समितीमधील एक किराणा व्यापारी कोरोनाबाधीत आढळला. त्याच्या संपर्कात काम करणारे पाच ते सात कामगार व पाचशेहून अधिक लोक आल्याची माहिती समोर आली. त्याचबरोबर पुंडलिक नगर मधील एक भाजीविक्रेत्यास लागण झाली. अशाच प्रकारे शहरातील गल्लोगल्लीत असलेले किराणा दुकानदार व भाजी विक्रेते, दूध डेरीवाले यांनी सुरक्षितता न बाळगल्यास संसर्ग झपाट्याने वाढेल.  औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना   दुकानदार, ग्राहकही ‘कॅज्युअल’  शहरातील जुना मोंढा आणि बाजार समितीमधील जाधववाडी या दोन ठिकाणी दररोज पाच ते सात हजार लोक खरेदीसाठी येतात. यात जुन्या मोंढ्यात व जाधववाडीत वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. फिजीकल डिस्टन्स कोणत्याही दुकानासमोर पाळले जात नाही. दुकानातील कामगार तसेच हमाल हॅन्ड ग्लोजचा वापर करत नाही. दुकान मालकही त्यांना सुविधा देत नाही. त्यामुळे येथे येणारा ग्राहकही कॅज्युअली घेतो.  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी...  जाधववाडी व जुना मोंढ्यातील प्रत्येक दुकानात सुरक्षा साधनांचा वापर सक्तीचा करावा  मोंढ्यात काही व्यापाऱ्यांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून किराणा घरपोचची सुविधा सुरू केली.  अशाच प्रकारे शहरातील सर्व किराणा दुकानदारांनी या सुविधेचा अवलंब करावा.  भाजी मार्केटमधील होलसेल विक्रेत्यांना फिजीकल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करावे.  सुरक्षा साधनांचा वापर न करणाऱ्या ग्राहकांना त्यांनी परत पाठवावे.  बाजार समिती व महापालिका प्रशासनानेही या व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवून वेळोवेळी सूचना द्याव्यात  शहरावर नजर  चार ते पाच हजार छोटे-मोठे किराणा दुकाने  पाचशे ते सातशे धान्य विक्रीची दुकाने  ४०० ते ५०० छोटे-मोठे दूध डेअरीचालक  १० ते १५ हजार भाजीपाला विक्रेते (हातगाडी)  ३० ते ४० छोटे-मोठे मॉल्स आणि सुपर शॉपी    महापालिकेकडील नोंदणीकृत किराणा दुकानदार, औषध विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात हे काम आम्ही करणार आहोत.  - आस्तिककुमार पांडेय, प्रशासक, महापालिका  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 15, 2020

धक्कादायक : जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच संसर्गाची ठिकाणे औरंगाबाद : मुंबई, ठाणे, पुण्याप्रमाणेच औरंगाबाद शहरही कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. दर दिवशी रुग्णांचा वाढता आकडा हा प्रत्येकाची चिंता वाढवणारा आहे. दीड महिन्यापूर्वी पन्नासच्या आसपास असलेला हा आकडा आता साडेआठशेच्या घरात पोचला आहे. दिवसाकाठी होणारी वाढ ही समूह संसर्गाप्रमाणे होत आहे. हा संसर्ग आता जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या ठिकाणावरून म्हणजेच किराणा, भाजीपाला, दूध डेअरी येथून मोठ्याप्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच काही उदाहरणे समोर आल्याने प्रशासनाला या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.  शहरात दर दिवशी ५० हून कोरोनाबाधितांची संख्या नव्याने वाढत आहे. लॉकडाऊनचा योग्य वापर न करणे, बाजारपेठेत सोशल डिस्टन्सचा नियम तोडणे, सुरक्षा साधनांचा वापर न करणे विशेष म्हणजे प्रशासनाने दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करणे ही कारणेही रुग्णांची वाढ होण्यास कारणीभूत आहे.  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही...    काही उदाहरणे  भावसिंगपुरा व रामनगर या दोन्ही भागात किराणा दुकानदारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे. यातच बाजार समितीमधील एक किराणा व्यापारी कोरोनाबाधीत आढळला. त्याच्या संपर्कात काम करणारे पाच ते सात कामगार व पाचशेहून अधिक लोक आल्याची माहिती समोर आली. त्याचबरोबर पुंडलिक नगर मधील एक भाजीविक्रेत्यास लागण झाली. अशाच प्रकारे शहरातील गल्लोगल्लीत असलेले किराणा दुकानदार व भाजी विक्रेते, दूध डेरीवाले यांनी सुरक्षितता न बाळगल्यास संसर्ग झपाट्याने वाढेल.  औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना   दुकानदार, ग्राहकही ‘कॅज्युअल’  शहरातील जुना मोंढा आणि बाजार समितीमधील जाधववाडी या दोन ठिकाणी दररोज पाच ते सात हजार लोक खरेदीसाठी येतात. यात जुन्या मोंढ्यात व जाधववाडीत वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. फिजीकल डिस्टन्स कोणत्याही दुकानासमोर पाळले जात नाही. दुकानातील कामगार तसेच हमाल हॅन्ड ग्लोजचा वापर करत नाही. दुकान मालकही त्यांना सुविधा देत नाही. त्यामुळे येथे येणारा ग्राहकही कॅज्युअली घेतो.  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी...  जाधववाडी व जुना मोंढ्यातील प्रत्येक दुकानात सुरक्षा साधनांचा वापर सक्तीचा करावा  मोंढ्यात काही व्यापाऱ्यांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून किराणा घरपोचची सुविधा सुरू केली.  अशाच प्रकारे शहरातील सर्व किराणा दुकानदारांनी या सुविधेचा अवलंब करावा.  भाजी मार्केटमधील होलसेल विक्रेत्यांना फिजीकल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करावे.  सुरक्षा साधनांचा वापर न करणाऱ्या ग्राहकांना त्यांनी परत पाठवावे.  बाजार समिती व महापालिका प्रशासनानेही या व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवून वेळोवेळी सूचना द्याव्यात  शहरावर नजर  चार ते पाच हजार छोटे-मोठे किराणा दुकाने  पाचशे ते सातशे धान्य विक्रीची दुकाने  ४०० ते ५०० छोटे-मोठे दूध डेअरीचालक  १० ते १५ हजार भाजीपाला विक्रेते (हातगाडी)  ३० ते ४० छोटे-मोठे मॉल्स आणि सुपर शॉपी    महापालिकेकडील नोंदणीकृत किराणा दुकानदार, औषध विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात हे काम आम्ही करणार आहोत.  - आस्तिककुमार पांडेय, प्रशासक, महापालिका  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/364v8pG

No comments:

Post a Comment