Inspiration जंगलात जाऊन पक्षी व माकडांची भूक भागवतो हा शिक्षक (व्हिडिओ) पुसद (जि. यवतमाळ) : मुक्या प्राणीमात्रांनाही तहान-भूक असते. कोरोनाच्या काळात हातावर पोट असणाऱ्या माणसांचीच दैना होत आहे, तर भूतदयेचे काय ? असा प्रश्न मनात सहजच डोकावतो. परंतु, पुसद येथील सर्पमित्र व निसर्गप्रेमी कलाशिक्षक राजेश आंबेकर लॉकडाऊनच्या काळातही प्रत्यक्ष खंडाळा जंगलात जाऊन पक्षी तसेच माकडांची तहान-भूक भागवीत आहे. सवनावरून बेलोरा येथील श्री शिवाजी विद्यालयात बदली झाल्यानंतर गेल्या तीन वर्षापासून राजेश आंबेकर पुसद- बेलोरा ये-जा करतात. वाटेत माळपठारावरील खंडाळा घाट लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात माळपठारावरील पाण्याचे स्त्रोत आटल्याने पक्षी व वन्यजीवांची मोठी तगमग होते. अशावेळी या मुक्या जीवांची तहान भागवण्यासाठी राजेश आंबेकर  पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. शाळेतील शिक्षकांच्या कारमध्ये पाण्याच्या कॅन घेऊन ते माकडांना पाणी पाजतात. शिवाय सोबत चवळी, भेंडी, टोमॅटो, केळी खायला देतात. लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद. त्यामुळे बेलोरा ये-जा बंद. घराबाहेर पडणेही मुश्किल. मग खंडाळा घाटातील माकडांची तहानभूक कशी भागवणार? यावर आंबेकरांना चैन पडेना. त्यांनी तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांची भेट घेतली व वन्यप्राण्यांच्या सेवेसाठी त्यांना वाहतूक पास मिळाली. गेल्या दीड महिन्यापासून ते स्वतः आपली कार घेऊन खंडाळा घाटात दररोज सकाळी जातात, तेव्हा झाडावर वाट पाहत बसलेली माकडे आंबेकरांच्या सभोवती गोळा होतात. सोबत आणलेले खाद्यपदार्थ खात, कॅन मधील पाणी पिऊन तृप्त होतात. आंबेकरांच्या भूतदयेला त्यांच्या पत्नी ज्योती व मुले यश व अजिंक्य आनंदाने सोबत देतात. राजेश आंबेकर हे सर्पमित्र असून गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांनी लोकांच्या राहत्या घरी निघालेल्या सापांना पकडून जीवदान दिले आहे. शिवाय ते शाळांमधून सर्पांची मनातील भीती दूर सारत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करीत आहेत. पशुपक्ष्यांवर त्यांचे निर्वाज्य प्रेम आहे. माकडांसोबतच त्यांनी पक्षांसाठी खंडाळा घाटात रस्त्याच्या कडेला झाडांवर पाणी पात्र ठेवले असून नित्यनेमाने त्यात पाणी टाकतात. तहानेने व्याकुळ झालेले पक्षी तसेच झाडांवरील खारुताई आपली तहान भागवतात. पुसद शहरातील मोती नगर उद्यानातील झाडांवर त्यांनी पाणीपात्र ठेवल्याने तहान भागविण्यासाठी व्याकूळ पक्षी गर्दी करतात. लॉकडाऊनच्या काळात पुसद शहरातील भटक्या कुत्र्यांची व गाईगुरांची भुकेमुळे दैना होत आहे. आंबेकर यांच्या संवेदनशील मनाने या बाबीची दखल घेतली. गाईंसाठी वैरण व भटक्या कुत्र्यांसाठी पोळ्या देऊन त्यांनी भूतदयेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. - मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन शिथिल करण्याची हिंमत दाखवावी : देवेंद्र फडणवीस    प्राणीमात्रांवर दया करा, ही संतांची शिकवण मला लहानपणापासून भावली. त्याचेच अनुकरण करताना आज समाधान वाटते. भुकेलेल्यांना अन्न व तहानलेल्या प्राणिमात्रांना पाणी पाजतांना निसर्गाच्या कृतज्ञतेची भावना मनात जोपासतो. गेली पंचवीस वर्ष या सेवेत कुटुंबीयांनी साथ दिली. विद्यार्थ्यांना घडवताना हा माझा छंद मनाला आनंद देतो. - राजेश आंबेकर, कलाशिक्षक, पुसद News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, May 12, 2020

Inspiration जंगलात जाऊन पक्षी व माकडांची भूक भागवतो हा शिक्षक (व्हिडिओ) पुसद (जि. यवतमाळ) : मुक्या प्राणीमात्रांनाही तहान-भूक असते. कोरोनाच्या काळात हातावर पोट असणाऱ्या माणसांचीच दैना होत आहे, तर भूतदयेचे काय ? असा प्रश्न मनात सहजच डोकावतो. परंतु, पुसद येथील सर्पमित्र व निसर्गप्रेमी कलाशिक्षक राजेश आंबेकर लॉकडाऊनच्या काळातही प्रत्यक्ष खंडाळा जंगलात जाऊन पक्षी तसेच माकडांची तहान-भूक भागवीत आहे. सवनावरून बेलोरा येथील श्री शिवाजी विद्यालयात बदली झाल्यानंतर गेल्या तीन वर्षापासून राजेश आंबेकर पुसद- बेलोरा ये-जा करतात. वाटेत माळपठारावरील खंडाळा घाट लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात माळपठारावरील पाण्याचे स्त्रोत आटल्याने पक्षी व वन्यजीवांची मोठी तगमग होते. अशावेळी या मुक्या जीवांची तहान भागवण्यासाठी राजेश आंबेकर  पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. शाळेतील शिक्षकांच्या कारमध्ये पाण्याच्या कॅन घेऊन ते माकडांना पाणी पाजतात. शिवाय सोबत चवळी, भेंडी, टोमॅटो, केळी खायला देतात. लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद. त्यामुळे बेलोरा ये-जा बंद. घराबाहेर पडणेही मुश्किल. मग खंडाळा घाटातील माकडांची तहानभूक कशी भागवणार? यावर आंबेकरांना चैन पडेना. त्यांनी तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांची भेट घेतली व वन्यप्राण्यांच्या सेवेसाठी त्यांना वाहतूक पास मिळाली. गेल्या दीड महिन्यापासून ते स्वतः आपली कार घेऊन खंडाळा घाटात दररोज सकाळी जातात, तेव्हा झाडावर वाट पाहत बसलेली माकडे आंबेकरांच्या सभोवती गोळा होतात. सोबत आणलेले खाद्यपदार्थ खात, कॅन मधील पाणी पिऊन तृप्त होतात. आंबेकरांच्या भूतदयेला त्यांच्या पत्नी ज्योती व मुले यश व अजिंक्य आनंदाने सोबत देतात. राजेश आंबेकर हे सर्पमित्र असून गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांनी लोकांच्या राहत्या घरी निघालेल्या सापांना पकडून जीवदान दिले आहे. शिवाय ते शाळांमधून सर्पांची मनातील भीती दूर सारत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करीत आहेत. पशुपक्ष्यांवर त्यांचे निर्वाज्य प्रेम आहे. माकडांसोबतच त्यांनी पक्षांसाठी खंडाळा घाटात रस्त्याच्या कडेला झाडांवर पाणी पात्र ठेवले असून नित्यनेमाने त्यात पाणी टाकतात. तहानेने व्याकुळ झालेले पक्षी तसेच झाडांवरील खारुताई आपली तहान भागवतात. पुसद शहरातील मोती नगर उद्यानातील झाडांवर त्यांनी पाणीपात्र ठेवल्याने तहान भागविण्यासाठी व्याकूळ पक्षी गर्दी करतात. लॉकडाऊनच्या काळात पुसद शहरातील भटक्या कुत्र्यांची व गाईगुरांची भुकेमुळे दैना होत आहे. आंबेकर यांच्या संवेदनशील मनाने या बाबीची दखल घेतली. गाईंसाठी वैरण व भटक्या कुत्र्यांसाठी पोळ्या देऊन त्यांनी भूतदयेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. - मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन शिथिल करण्याची हिंमत दाखवावी : देवेंद्र फडणवीस    प्राणीमात्रांवर दया करा, ही संतांची शिकवण मला लहानपणापासून भावली. त्याचेच अनुकरण करताना आज समाधान वाटते. भुकेलेल्यांना अन्न व तहानलेल्या प्राणिमात्रांना पाणी पाजतांना निसर्गाच्या कृतज्ञतेची भावना मनात जोपासतो. गेली पंचवीस वर्ष या सेवेत कुटुंबीयांनी साथ दिली. विद्यार्थ्यांना घडवताना हा माझा छंद मनाला आनंद देतो. - राजेश आंबेकर, कलाशिक्षक, पुसद News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Wr67ll

No comments:

Post a Comment