चिंताजनक : खटाव पाठाेपाठ माणमध्येही कोरोनाची धडक; कऱ्हाड नव्वदीत औंध/कऱ्हाड ः कऱ्हाड तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या आज आणखी तीनने वाढली. एक रुग्ण हा मलकापूरच्या अहिल्यानगरातील, तर एक वनवासाचीतील बाधिताच्या निकट सहवासातील आहे. तिसरा हा कऱ्हाड तालुक्‍यातीलच आहे. चाैथा बाधित हा खरशिंगेतील तरुण, पाचवा रुग्ण हा विरळी (ता. माण) येथील रहिवाशी आहे. या बाधितांच्या माध्यमातून दुष्काळी माण व खटाव तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव झाला. रात्री उशिरा आलेल्या अहवालांमुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 124 झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात चार कोरोनाग्रस्तांची भर पडली. अहमदाबादवरुन आलेल्या 25 वर्षीय तरुणाला 11 मे रोजी दहिवडीतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. रात्री त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यापाठाेपाठ कराड येथील निकट सहवासातील 75 वर्षीय महिलेचा रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आला. सध्या जिल्ह्यात 87 बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  औंध ः कोरोनाला "नॉट आऊट' म्हणणाऱ्या दुष्काळी खटाव तालुक्‍याला कोरोनाने अखेर क्‍लिन बोल्ड केले. खरशिंगे (ता. खटाव) येथील 21 वर्षांच्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने औंध परिसरासह संपूर्ण खटाव तालुक्‍याची चिंता वाढली आहे.  संबंधित बाधित तरुण हा आई-वडिलांसह ठाण्यातून पोलिसांना चकवा देत दोन दुचाकीवरून गावी खरशिंगेला आला होता. त्यानंतर त्या कुटुंबाला औंध रोडवरील गावानजीकच असणाऱ्या त्यांच्या घरात होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. या कुटुंबातील वडिलांना थोडा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी दुचाकीवरून सातारा गाठले. सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून कुटुंबातील तिघांचे स्वॅब घेण्यात आले. त्रास होणाऱ्या व्यक्तीचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर त्यांच्या संपर्कातील 21 वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  या घटनेमुळे औंध, खरशिंगेसह परिसर हादरून गेला आहे. संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या 23 जणांना प्रशासनाने क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. संपूर्ण खरशिंगे गाव सील करण्यात आले आहे. प्रशासनातर्फे खरशिंगे येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. बंदोबस्तासाठी पोलिस तळ ठोकून आहेत.    कऱ्हाड ः कऱ्हाड तालुक्‍यात वनवासमाची, आगाशिवनगर- मलकापुरातील कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. मलकापूरच्या अहिल्यानगरातील आणखी एका युवकाला कोरोना बाधा झाल्याचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यानंतर सायंकाळी वनवासमाचीतील आणखी एका निकट सहवासीत बाधिताची भर पडली. त्यामुळे कऱ्हाड तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या 89 वर पोचली. कऱ्हाड तालुक्‍यात तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्या घटली आहे. एरव्ही दोन आकड्यात येणारी बाधितांची संख्या सायंकाळी फक्त दोनवर आली आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्‍याला दिलासा मिळाला आहे. परंतु रात्री उशिरा कराड येथील कोरोना बाधित रुग्णाची निकट सहवासीत 75 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. परिणामी कऱ्हाड तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या 90 वर पाेचली.  दरम्यान, येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील सहा आणि कृष्णा हॉस्पिटलमधील 41 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालयातील 133, तर कृष्णा रुग्णालयातील 22 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.  जावली :  लॉकडाऊनला कंटाळून इंजिनिअर तरूणाची मुंबईत आत्महत्या सातारा : वाईन शॉप उघडणार; टाेकन सिस्टीमने मिळणार दारु News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, May 12, 2020

चिंताजनक : खटाव पाठाेपाठ माणमध्येही कोरोनाची धडक; कऱ्हाड नव्वदीत औंध/कऱ्हाड ः कऱ्हाड तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या आज आणखी तीनने वाढली. एक रुग्ण हा मलकापूरच्या अहिल्यानगरातील, तर एक वनवासाचीतील बाधिताच्या निकट सहवासातील आहे. तिसरा हा कऱ्हाड तालुक्‍यातीलच आहे. चाैथा बाधित हा खरशिंगेतील तरुण, पाचवा रुग्ण हा विरळी (ता. माण) येथील रहिवाशी आहे. या बाधितांच्या माध्यमातून दुष्काळी माण व खटाव तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव झाला. रात्री उशिरा आलेल्या अहवालांमुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 124 झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात चार कोरोनाग्रस्तांची भर पडली. अहमदाबादवरुन आलेल्या 25 वर्षीय तरुणाला 11 मे रोजी दहिवडीतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. रात्री त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यापाठाेपाठ कराड येथील निकट सहवासातील 75 वर्षीय महिलेचा रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आला. सध्या जिल्ह्यात 87 बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  औंध ः कोरोनाला "नॉट आऊट' म्हणणाऱ्या दुष्काळी खटाव तालुक्‍याला कोरोनाने अखेर क्‍लिन बोल्ड केले. खरशिंगे (ता. खटाव) येथील 21 वर्षांच्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने औंध परिसरासह संपूर्ण खटाव तालुक्‍याची चिंता वाढली आहे.  संबंधित बाधित तरुण हा आई-वडिलांसह ठाण्यातून पोलिसांना चकवा देत दोन दुचाकीवरून गावी खरशिंगेला आला होता. त्यानंतर त्या कुटुंबाला औंध रोडवरील गावानजीकच असणाऱ्या त्यांच्या घरात होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. या कुटुंबातील वडिलांना थोडा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी दुचाकीवरून सातारा गाठले. सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून कुटुंबातील तिघांचे स्वॅब घेण्यात आले. त्रास होणाऱ्या व्यक्तीचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर त्यांच्या संपर्कातील 21 वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  या घटनेमुळे औंध, खरशिंगेसह परिसर हादरून गेला आहे. संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या 23 जणांना प्रशासनाने क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. संपूर्ण खरशिंगे गाव सील करण्यात आले आहे. प्रशासनातर्फे खरशिंगे येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. बंदोबस्तासाठी पोलिस तळ ठोकून आहेत.    कऱ्हाड ः कऱ्हाड तालुक्‍यात वनवासमाची, आगाशिवनगर- मलकापुरातील कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. मलकापूरच्या अहिल्यानगरातील आणखी एका युवकाला कोरोना बाधा झाल्याचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यानंतर सायंकाळी वनवासमाचीतील आणखी एका निकट सहवासीत बाधिताची भर पडली. त्यामुळे कऱ्हाड तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या 89 वर पोचली. कऱ्हाड तालुक्‍यात तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्या घटली आहे. एरव्ही दोन आकड्यात येणारी बाधितांची संख्या सायंकाळी फक्त दोनवर आली आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्‍याला दिलासा मिळाला आहे. परंतु रात्री उशिरा कराड येथील कोरोना बाधित रुग्णाची निकट सहवासीत 75 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. परिणामी कऱ्हाड तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या 90 वर पाेचली.  दरम्यान, येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील सहा आणि कृष्णा हॉस्पिटलमधील 41 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालयातील 133, तर कृष्णा रुग्णालयातील 22 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.  जावली :  लॉकडाऊनला कंटाळून इंजिनिअर तरूणाची मुंबईत आत्महत्या सातारा : वाईन शॉप उघडणार; टाेकन सिस्टीमने मिळणार दारु News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2YXzrBJ

No comments:

Post a Comment