औरंगाबादच्या कचरा प्रकल्पांना कोरोनाबाधा औरंगाबाद  : महापालिकेच्या कचराप्रक्रिया प्रकल्पांना कोरोना विषाणूमुळे बाधा झाली आहे. कांचनवाडी व पडेगाव येथील प्रकल्प सुरू करण्यासाठी आतापर्यंत वारंवार घोषणा करण्यात आल्या. मात्र, पदाधिकाऱ्यांची मुदत संपली तरी प्रकल्पांचे काम पूर्ण झालेले नाही. लॉकडाउनमुळे कांचनवाडी येथील काम बंद आहे; तर पडेगाव प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महिनाभराचा वेळ लागणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या कामात महापालिका प्रशासन व्यस्त असल्यामुळे या प्रकल्पांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात निर्माण झालेल्या कचराकोंडीला फेब्रुवारी महिन्यात दोन वर्षे पूर्ण झाली; पण अद्याप प्रश्‍न पूर्णपणे मिटलेला नाही. चिकलठाणा येथील कचराप्रक्रिया प्रकल्पात सध्या रोज दीडशे ते पावणे दोनशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, एवढीच जमेची बाजू आहे. उर्वरित रोज निघणाऱ्या शंभर ते सव्वाशे टन कचऱ्याचे आजही महापालिका डोंगर तयार करत आहे. चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी व हर्सूल येथील प्रकल्पांसाठी राज्य शासनाने १४९ कोटींचा निधी मंजूर केला. त्यातील ७२ कोटी रुपये आतापर्यंत महापालिकेला मिळाले आहेत. त्यानंतरही महापालिकेला चिकलठाणा वगळता इतर तीन प्रकल्पांची कामे पूर्ण करता आलेली नाहीत. पडेगाव व चिकलठाणा येथील प्रकल्पांच्या कामांना सोबतच सुरवात करण्यात आली होती; मात्र वर्षे उलटूनही या प्रकल्पाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जुन्या शहरातील अनेक वॉर्डांचा मिक्स कचरा पडेगावात साठविला जात आहे. या कचऱ्याला वारंवार आग लागत असून, परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. लॉकडाउनमुळे प्रकल्पावर काम करणारे मजूर कमी झाले आहेत. असे असले तरी काम सुरू असून, येत्या महिनाभरात प्रकल्प पूर्ण होईल. त्यानंतर याठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया सुरू होईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले. कांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून गॅस तयार करण्याचा प्रकल्प आहे. याठिकाणी मजूरच नसल्याने कंत्राटदाराने दीड महिन्यापासून काम बंद केले आहे. काम सुरू करण्यासंदर्भात महापालिकेने कंत्राटदाराला पत्र दिले असल्याचे भोंबे यांनी सांगितले.  HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा हर्सूलचा निघेना तोडगा  हर्सूल येथील प्रकल्पाच्या निविदेचा दीड वर्षांपासून घोळ सुरू आहे. सुरवातीला निविदा भरलेल्या कंत्राटदाराने माघार घेतली. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, संबंधित एजन्सीवर नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे स्थायी समितीने निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही निविदा अंतिम करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाने स्थायी समितीने रद्द केलेल्या निविदेचा पुनर्विचार व्हावा, असा प्रस्ताव दिला. त्यावरून शिवसेना-भाजपमध्ये जोरदार वाद झाला. मात्र निविदेवर तोडगा निघाला नाही. आता प्रशासक आस्तिककुमार पांडेय काय निर्णय घेतात, यावर हर्सूल प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, कोरोनामुळे निर्णय घेण्यासाठी त्यांनादेखील वेळ नसल्याचे चित्र आहे.  मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा    ठळक मुद्दे  शहरात सध्या निघणारा कचरा- ३५० टन  चिकलठाण्यात प्रक्रिया- १६५ टन  शासनाकडून मंजूर निधी- १४९ कोटी  आतापर्यंत आलेला निधी-७२ कोटी  पडेगावमध्ये झालेले काम ८५ टक्के  कांचनवाडीत झालेले काम ९० टक्के  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 8, 2020

औरंगाबादच्या कचरा प्रकल्पांना कोरोनाबाधा औरंगाबाद  : महापालिकेच्या कचराप्रक्रिया प्रकल्पांना कोरोना विषाणूमुळे बाधा झाली आहे. कांचनवाडी व पडेगाव येथील प्रकल्प सुरू करण्यासाठी आतापर्यंत वारंवार घोषणा करण्यात आल्या. मात्र, पदाधिकाऱ्यांची मुदत संपली तरी प्रकल्पांचे काम पूर्ण झालेले नाही. लॉकडाउनमुळे कांचनवाडी येथील काम बंद आहे; तर पडेगाव प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महिनाभराचा वेळ लागणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या कामात महापालिका प्रशासन व्यस्त असल्यामुळे या प्रकल्पांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात निर्माण झालेल्या कचराकोंडीला फेब्रुवारी महिन्यात दोन वर्षे पूर्ण झाली; पण अद्याप प्रश्‍न पूर्णपणे मिटलेला नाही. चिकलठाणा येथील कचराप्रक्रिया प्रकल्पात सध्या रोज दीडशे ते पावणे दोनशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, एवढीच जमेची बाजू आहे. उर्वरित रोज निघणाऱ्या शंभर ते सव्वाशे टन कचऱ्याचे आजही महापालिका डोंगर तयार करत आहे. चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी व हर्सूल येथील प्रकल्पांसाठी राज्य शासनाने १४९ कोटींचा निधी मंजूर केला. त्यातील ७२ कोटी रुपये आतापर्यंत महापालिकेला मिळाले आहेत. त्यानंतरही महापालिकेला चिकलठाणा वगळता इतर तीन प्रकल्पांची कामे पूर्ण करता आलेली नाहीत. पडेगाव व चिकलठाणा येथील प्रकल्पांच्या कामांना सोबतच सुरवात करण्यात आली होती; मात्र वर्षे उलटूनही या प्रकल्पाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जुन्या शहरातील अनेक वॉर्डांचा मिक्स कचरा पडेगावात साठविला जात आहे. या कचऱ्याला वारंवार आग लागत असून, परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. लॉकडाउनमुळे प्रकल्पावर काम करणारे मजूर कमी झाले आहेत. असे असले तरी काम सुरू असून, येत्या महिनाभरात प्रकल्प पूर्ण होईल. त्यानंतर याठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया सुरू होईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले. कांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून गॅस तयार करण्याचा प्रकल्प आहे. याठिकाणी मजूरच नसल्याने कंत्राटदाराने दीड महिन्यापासून काम बंद केले आहे. काम सुरू करण्यासंदर्भात महापालिकेने कंत्राटदाराला पत्र दिले असल्याचे भोंबे यांनी सांगितले.  HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा हर्सूलचा निघेना तोडगा  हर्सूल येथील प्रकल्पाच्या निविदेचा दीड वर्षांपासून घोळ सुरू आहे. सुरवातीला निविदा भरलेल्या कंत्राटदाराने माघार घेतली. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, संबंधित एजन्सीवर नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे स्थायी समितीने निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही निविदा अंतिम करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाने स्थायी समितीने रद्द केलेल्या निविदेचा पुनर्विचार व्हावा, असा प्रस्ताव दिला. त्यावरून शिवसेना-भाजपमध्ये जोरदार वाद झाला. मात्र निविदेवर तोडगा निघाला नाही. आता प्रशासक आस्तिककुमार पांडेय काय निर्णय घेतात, यावर हर्सूल प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, कोरोनामुळे निर्णय घेण्यासाठी त्यांनादेखील वेळ नसल्याचे चित्र आहे.  मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा    ठळक मुद्दे  शहरात सध्या निघणारा कचरा- ३५० टन  चिकलठाण्यात प्रक्रिया- १६५ टन  शासनाकडून मंजूर निधी- १४९ कोटी  आतापर्यंत आलेला निधी-७२ कोटी  पडेगावमध्ये झालेले काम ८५ टक्के  कांचनवाडीत झालेले काम ९० टक्के  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fxc6g3

No comments:

Post a Comment