कोरोनाबाधित निम्मे रूग्ण बरे;पुण्यात सापडलेल्या पहिल्या रूग्णाला दोन महिने पूर्ण पुणे - पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा पाच हजारांच्या घरात पोचला आहे. नव्या रुग्णांचे आकडे पुढे येताच साऱ्यांच्या पोटात गोळा येतोय; पण आजवर सापडलेल्या रुग्णांपैकी निम्मेच नव्हे त्याहून अधिक म्हणजे, सुमारे 53.32 टक्के रुग्ण ठणठणीत झाल्याचा अहवाल आहे तर 41.34 टक्के रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गंभीर बाब आहे; ती 5.31 मृत्यूदराची. पुण्यात नऊ मार्चला पहिला रुग्ण सापडल्यानंतर तो 25 मार्चला बरा झाला आणि त्यांना घरीही सोडले आहे. बरे झालेल्या पहिल्या रुग्णाला घरी सोडून, सोमवारी दोन महिने पूर्ण झाले. त्यानिमित्त कोरोनाच्या संसर्गाची स्थिती, प्रत्यक्ष रुग्ण संख्या, बरे होणाऱ्यांचे प्रमाण आणि मृतांची आकडे याचा घेतलेला हा आढावा.....  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  दांपत्यावर यशस्वी उपचार  दुबईहून परतलेल्या सिंहगड रस्त्यावरील एका दाम्पत्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न होताच, महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यानंतर या दोघांना पहिले तीन दिवस स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर 9 ते 25 मार्च या कालावधीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शेवटी 25 मार्चला दोन्ही रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली आणि तिचा अहवाल निगेटिव्ह आला. तेव्हा, त्यांना घरी सोडण्यात आले.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वडिल व मुलीचे कामकाज सुरू  पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची पत्नी आणि मुलीलाही कोरोनाची लागण झाली होती. हे तिघे बरे होऊन, आज दोन महिने झाली आहेत. त्यातील वडील आणि मुलीने गेल्या सव्वा महिन्यांपासून आपापली रोजची कामे सुरू केली आहेत. मुलगी एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर काम करीत असल्याने तिने "वर्क फॉर्म होम'ची मागणी केली. त्यानुसार ती काम करीत आहे. तिच्या वडिलांनीही पूर्वीप्रमाणे आपल्या कामात वेग घेतला आहे. या काळात रोज चांगला आहार, व्यायाम आणि वाचन केल्याचे हे कुटुंब सांगत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बरे होण्यात ज्येष्ठही आघाडीवर  नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची आकडेवारी पुढे येत आहे. मात्र, जुन्या रुग्णांमधील बहुतांशी रुग्ण बरे होत असल्याचेही दिसून येत आहे. सुरवातीला ज्येष्ठ नागरिक बरे नसल्याचा सूर होता; परंतु, गेल्या महिनाभरात अगदी 65 वर्षांचे रुग्ण बरे झाल्याची यादी ससून रुग्णालयाने प्रसिद्ध केली होती. विशेषतः 50 ते 65 वर्षे वयोगटातील सात रुग्णांना एकाच दिवशी घरी सोडण्यात आले होते. त्यातील तीन रुग्ण अगदी व्हेंटिलेटरवर ठेवले होते.  रुग्णांवर असे होतात उपचार  कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णासाठी निश्‍चित प्रभावी ठरेल, असे एकही औषध सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णाला असलेल्या लक्षणांच्या आधारावर उपचार करण्यावर जगभरातील डॉक्‍टर भर देतात. लक्षणे नसणारे, सौम्य लक्षणे असणारे, जोखमीचे, मध्य लक्षणे, गंभीर आणि अत्यवस्थ प्रकारात रुग्णांची वर्गवारी केली जाते.  त्यानुसार रुग्णांवर उपचार करण्यात येतात. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्विन देऊन बरे करता येते. पण, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी प्रतिजैविकांचाही वापर करावा लागतो. मध्यम लक्षणांच्या काही रुग्णांमध्ये या दोन्हीबरोबरच स्टिरॉईडचाही उपयोग केला जातो. गंभीर आणि अत्यवस्थ रुग्णांमध्ये उच्च प्रतीची प्रतिजैविके, हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्विन देण्यावर भर दिला जातो.  रुग्णाचे लवकर अचूक निदान, योग्य प्रमाणात ऑक्‍सिजन आणि प्रभावी उपचाराची निवड या माध्यमातून सध्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येतो.  कोरोनाच्या रुग्णांवर वेळेत आणि योग्य उपचार केले जात असल्याने ते बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी भीती बाळगू नये. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची प्रकृती चांगली आहे. त्यातील सर्वच रुग्ण पूर्णपणे बरे आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.  -डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका  पुण्यातील कोरोनाचे रुग्ण  4 हजार 782  बरे झालेले रुग्ण  2 हजार 550 (53.32)  उपचार सुरू असलेले रुग्ण  1 हजार 977 (41.34)  मृत्यू झालेले रुग्ण  254 (5.31)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 25, 2020

कोरोनाबाधित निम्मे रूग्ण बरे;पुण्यात सापडलेल्या पहिल्या रूग्णाला दोन महिने पूर्ण पुणे - पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा पाच हजारांच्या घरात पोचला आहे. नव्या रुग्णांचे आकडे पुढे येताच साऱ्यांच्या पोटात गोळा येतोय; पण आजवर सापडलेल्या रुग्णांपैकी निम्मेच नव्हे त्याहून अधिक म्हणजे, सुमारे 53.32 टक्के रुग्ण ठणठणीत झाल्याचा अहवाल आहे तर 41.34 टक्के रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गंभीर बाब आहे; ती 5.31 मृत्यूदराची. पुण्यात नऊ मार्चला पहिला रुग्ण सापडल्यानंतर तो 25 मार्चला बरा झाला आणि त्यांना घरीही सोडले आहे. बरे झालेल्या पहिल्या रुग्णाला घरी सोडून, सोमवारी दोन महिने पूर्ण झाले. त्यानिमित्त कोरोनाच्या संसर्गाची स्थिती, प्रत्यक्ष रुग्ण संख्या, बरे होणाऱ्यांचे प्रमाण आणि मृतांची आकडे याचा घेतलेला हा आढावा.....  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  दांपत्यावर यशस्वी उपचार  दुबईहून परतलेल्या सिंहगड रस्त्यावरील एका दाम्पत्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न होताच, महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यानंतर या दोघांना पहिले तीन दिवस स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर 9 ते 25 मार्च या कालावधीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शेवटी 25 मार्चला दोन्ही रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली आणि तिचा अहवाल निगेटिव्ह आला. तेव्हा, त्यांना घरी सोडण्यात आले.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वडिल व मुलीचे कामकाज सुरू  पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची पत्नी आणि मुलीलाही कोरोनाची लागण झाली होती. हे तिघे बरे होऊन, आज दोन महिने झाली आहेत. त्यातील वडील आणि मुलीने गेल्या सव्वा महिन्यांपासून आपापली रोजची कामे सुरू केली आहेत. मुलगी एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर काम करीत असल्याने तिने "वर्क फॉर्म होम'ची मागणी केली. त्यानुसार ती काम करीत आहे. तिच्या वडिलांनीही पूर्वीप्रमाणे आपल्या कामात वेग घेतला आहे. या काळात रोज चांगला आहार, व्यायाम आणि वाचन केल्याचे हे कुटुंब सांगत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बरे होण्यात ज्येष्ठही आघाडीवर  नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची आकडेवारी पुढे येत आहे. मात्र, जुन्या रुग्णांमधील बहुतांशी रुग्ण बरे होत असल्याचेही दिसून येत आहे. सुरवातीला ज्येष्ठ नागरिक बरे नसल्याचा सूर होता; परंतु, गेल्या महिनाभरात अगदी 65 वर्षांचे रुग्ण बरे झाल्याची यादी ससून रुग्णालयाने प्रसिद्ध केली होती. विशेषतः 50 ते 65 वर्षे वयोगटातील सात रुग्णांना एकाच दिवशी घरी सोडण्यात आले होते. त्यातील तीन रुग्ण अगदी व्हेंटिलेटरवर ठेवले होते.  रुग्णांवर असे होतात उपचार  कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णासाठी निश्‍चित प्रभावी ठरेल, असे एकही औषध सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णाला असलेल्या लक्षणांच्या आधारावर उपचार करण्यावर जगभरातील डॉक्‍टर भर देतात. लक्षणे नसणारे, सौम्य लक्षणे असणारे, जोखमीचे, मध्य लक्षणे, गंभीर आणि अत्यवस्थ प्रकारात रुग्णांची वर्गवारी केली जाते.  त्यानुसार रुग्णांवर उपचार करण्यात येतात. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्विन देऊन बरे करता येते. पण, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी प्रतिजैविकांचाही वापर करावा लागतो. मध्यम लक्षणांच्या काही रुग्णांमध्ये या दोन्हीबरोबरच स्टिरॉईडचाही उपयोग केला जातो. गंभीर आणि अत्यवस्थ रुग्णांमध्ये उच्च प्रतीची प्रतिजैविके, हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्विन देण्यावर भर दिला जातो.  रुग्णाचे लवकर अचूक निदान, योग्य प्रमाणात ऑक्‍सिजन आणि प्रभावी उपचाराची निवड या माध्यमातून सध्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येतो.  कोरोनाच्या रुग्णांवर वेळेत आणि योग्य उपचार केले जात असल्याने ते बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी भीती बाळगू नये. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची प्रकृती चांगली आहे. त्यातील सर्वच रुग्ण पूर्णपणे बरे आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.  -डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका  पुण्यातील कोरोनाचे रुग्ण  4 हजार 782  बरे झालेले रुग्ण  2 हजार 550 (53.32)  उपचार सुरू असलेले रुग्ण  1 हजार 977 (41.34)  मृत्यू झालेले रुग्ण  254 (5.31)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36vdvj3

No comments:

Post a Comment