पश्‍चिम घाटातील शोभिवंत माशांविषयी संशोधन उजेडात; तीन नवीन जातीही शोधल्या  पुणे - ब्रिटिशांनी सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी शोधलेल्या शोभिवंत फिलामेंट बार्ब माशांविषयी (खवले मासे) नव्याने उलगडा झाला आहे. हे मासे पश्‍चिम घाटातील ठराविक नद्यांमध्ये आढळत असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा दोन प्रजाती तसेच आणखी तीन नव्या प्रजाती शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डावकिन्शिया आसिमिलिस, डावकिन्शिया लेपिडा या त्या दोन प्रजाती आहेत. तर डावकिन्शिया अप्सरा, डावकिन्शिया क्रासा आणि डावकिन्शिया ऑस्टेलस या तीन प्रजाती नव्याने शोधल्या आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतील उन्मेष कटवटे, आयसर- पुणे येथील डॉ. नीलेश डहाणूकर, केंद्रीय पर्यावरण विभागातील डॉ. मार्क्‍स नाईट, केरळ मत्स्य विद्यापीठातील अनुप के. व्ही. व डॉ. राजीव राघवन यांनी हे संशोधन केले आहे. बीएनएचएसचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी यासाठी सहकार्य केले.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा तब्बल 37 मोहिमा  कटवटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2012 पासून संशोधनास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी पश्‍चिम घाटात 37 मोहिमा केल्या. 75 हून अधिक ठिकाणचे मासे गोळा केले. 250 पेक्षा अधिक डीएनए चाचणी केली. या अभ्यासात त्यांना सीता, सौपर्णिका या कर्नाटकातील नद्यांमध्ये सुंदर मासा आढळला. हा मासा क्वॅरियममध्ये आसिमिलिस बार्ब नावाने प्रसिद्ध आहे. मात्र, त्याचे नाव चुकीचे असल्याचे त्यांना आढळले. पाठीवर मोठी लालभडक रेषा, तोंड आणि ओठ लाल असलेल्या या माशाचे नाव त्यांनी डावकिन्शिया अप्सरा ठेवले. डावकिन्शिया ऑस्टेलस हा हिरवा रंग असलेला मासा केरळमधील चालकुडी, मुवात्तुपुळा या नद्यांत सापडतो. त्याच्या पाठीवरील काळा ठिपका विखुरलेला आहे. नेत्रावती नदीमध्ये डावकिन्शिया क्रासा हा गोल आकार असलेला मासा आढळला.  ---------------------------------  आसिमिलिसच्या संशोधनाविषयी  - थॉमस जेरडॉन यांनी 1849 मध्ये कर्नाटकातील साउथ कॅनरा भागातून डावकिन्शिया आसिमिलिस ही प्रजात शोधली.  - श्रीलंकेतील शास्त्रज्ञ रोहन पेथियागौडा यांनी 2005 मध्ये ही प्रजात कर्नाटकातील नेत्रावती आणि केरळमधील नद्यांमध्ये सापडत असल्याचे सांगितले.  - कटवटे आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासातून ही प्रजात नेत्रावती नदीतच आढळत असल्याचे सिद्ध झाले.  - या माशाच्या शेपटावरील काळा ठिपका आणि मिशांची रचना ही वेगळी आहे. तसेच त्याचा रंग आकर्षक निळा आहे.  --------------------------  लेपिडाच्या संशोधनाविषयी  - ही प्रजात फ्रान्सिस डे या ब्रिटिश सैन्याधिकाऱ्याने शोधून काढली  - दिल्लीतील झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संग्रहालयात त्याचा एक नमुना होता. मात्र तो नष्ट झाला.  - दुसरा नमुना लंडन येथे होता. कटवटे यांनी तेथे जाऊन अभ्यास केला.  - पेथियागौडा यांनी ही प्रजात आसिमिलिस असल्याचे सांगितले. मात्र, ती वेगळी असल्याचे कटवटे यांनी शोधले.  - केरळमधील चालकुडी आणि मुवात्तुपुळा या नद्यांमध्ये ती सापडते.  - तोंडाला असणाऱ्या मिशा, शेपटावरील काळा ठिपका आणि पिवळा रंग यामुळे वेगळी.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 10, 2020

पश्‍चिम घाटातील शोभिवंत माशांविषयी संशोधन उजेडात; तीन नवीन जातीही शोधल्या  पुणे - ब्रिटिशांनी सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी शोधलेल्या शोभिवंत फिलामेंट बार्ब माशांविषयी (खवले मासे) नव्याने उलगडा झाला आहे. हे मासे पश्‍चिम घाटातील ठराविक नद्यांमध्ये आढळत असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा दोन प्रजाती तसेच आणखी तीन नव्या प्रजाती शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डावकिन्शिया आसिमिलिस, डावकिन्शिया लेपिडा या त्या दोन प्रजाती आहेत. तर डावकिन्शिया अप्सरा, डावकिन्शिया क्रासा आणि डावकिन्शिया ऑस्टेलस या तीन प्रजाती नव्याने शोधल्या आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतील उन्मेष कटवटे, आयसर- पुणे येथील डॉ. नीलेश डहाणूकर, केंद्रीय पर्यावरण विभागातील डॉ. मार्क्‍स नाईट, केरळ मत्स्य विद्यापीठातील अनुप के. व्ही. व डॉ. राजीव राघवन यांनी हे संशोधन केले आहे. बीएनएचएसचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी यासाठी सहकार्य केले.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा तब्बल 37 मोहिमा  कटवटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2012 पासून संशोधनास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी पश्‍चिम घाटात 37 मोहिमा केल्या. 75 हून अधिक ठिकाणचे मासे गोळा केले. 250 पेक्षा अधिक डीएनए चाचणी केली. या अभ्यासात त्यांना सीता, सौपर्णिका या कर्नाटकातील नद्यांमध्ये सुंदर मासा आढळला. हा मासा क्वॅरियममध्ये आसिमिलिस बार्ब नावाने प्रसिद्ध आहे. मात्र, त्याचे नाव चुकीचे असल्याचे त्यांना आढळले. पाठीवर मोठी लालभडक रेषा, तोंड आणि ओठ लाल असलेल्या या माशाचे नाव त्यांनी डावकिन्शिया अप्सरा ठेवले. डावकिन्शिया ऑस्टेलस हा हिरवा रंग असलेला मासा केरळमधील चालकुडी, मुवात्तुपुळा या नद्यांत सापडतो. त्याच्या पाठीवरील काळा ठिपका विखुरलेला आहे. नेत्रावती नदीमध्ये डावकिन्शिया क्रासा हा गोल आकार असलेला मासा आढळला.  ---------------------------------  आसिमिलिसच्या संशोधनाविषयी  - थॉमस जेरडॉन यांनी 1849 मध्ये कर्नाटकातील साउथ कॅनरा भागातून डावकिन्शिया आसिमिलिस ही प्रजात शोधली.  - श्रीलंकेतील शास्त्रज्ञ रोहन पेथियागौडा यांनी 2005 मध्ये ही प्रजात कर्नाटकातील नेत्रावती आणि केरळमधील नद्यांमध्ये सापडत असल्याचे सांगितले.  - कटवटे आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासातून ही प्रजात नेत्रावती नदीतच आढळत असल्याचे सिद्ध झाले.  - या माशाच्या शेपटावरील काळा ठिपका आणि मिशांची रचना ही वेगळी आहे. तसेच त्याचा रंग आकर्षक निळा आहे.  --------------------------  लेपिडाच्या संशोधनाविषयी  - ही प्रजात फ्रान्सिस डे या ब्रिटिश सैन्याधिकाऱ्याने शोधून काढली  - दिल्लीतील झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संग्रहालयात त्याचा एक नमुना होता. मात्र तो नष्ट झाला.  - दुसरा नमुना लंडन येथे होता. कटवटे यांनी तेथे जाऊन अभ्यास केला.  - पेथियागौडा यांनी ही प्रजात आसिमिलिस असल्याचे सांगितले. मात्र, ती वेगळी असल्याचे कटवटे यांनी शोधले.  - केरळमधील चालकुडी आणि मुवात्तुपुळा या नद्यांमध्ये ती सापडते.  - तोंडाला असणाऱ्या मिशा, शेपटावरील काळा ठिपका आणि पिवळा रंग यामुळे वेगळी.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WO0HQi

No comments:

Post a Comment