पाच दिवस चालून तो गावाजवळ आला, आणि काय घडले वाचा  इस्लामपूर (जि. सांगली) : दिवसेंदिवस वाढत चाललेले कोरोना रुग्णांचे आकडे पाहून त्याने अखेर गाव जवळ करण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यातून तो चालतच इस्लामपूरकडे यायला निघाला. आज पाचव्या दिवशी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील केदारवाडी गावाजवळ येताच इस्लामपूर पासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर त्याला चक्कर आली. इस्लामपूरच्या नगराध्यक्षांच्या मदतीने तत्काळ त्याला रुग्णवाहिकेतून इस्लामपुरात आणले आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गेले पाच दिवस हा तरुण पुण्याहून इथपर्यंत चालत आला आहे. अर्जुन शंकर जाधव (वय 30) हा तरुण सहा महिन्यांपूर्वी कामाच्या निमित्ताने पुण्याला गेला. तेथील एका कंपनीत तो चालक म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह चालवतो. त्याचे कुटुंब इस्लामपूरमधील हनुमाननगर येथे वास्तव्यास आहे. तो अधूनमधून इस्लामपूरला ये जा करतो. कोरोना विषाणू संसर्गाच्या विळख्यात पुणे शहर अडकले आहे. कंपन्यांनी कामगारांना घरी जाण्यास सांगितले आहे. परंतु या तरुणाची वेळेत सुटका झाली नाही. जेव्हा झाली तेव्हा वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे अर्जुनने तिथे काही दिवस तसेच काढले. परंतु कोरोनाचा विळखा सैल होण्याची काही लक्षणे दिसेनात आणि होऊ लागलेले हाल काही सहन होईनात म्हणून त्याने स्वतःहून इस्लामपूरकडे चालत जाण्याचा निर्धार केला. पाच दिवसांपूर्वी त्याने पुणे सोडले होते. आज दुपारी अचानक त्याच्या आईच्या फोनवर अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समजले की अर्जुन हा केदारवाडी आणि कासेगावच्या दरम्यान रस्त्यावर बेशुद्ध होऊन पडला आहे. त्याच्या आईने तत्काळ केदारवाडी येथील नात्यातील एका महिलेला संपर्क साधून रस्त्यावर चौकशी करण्यास सांगितले. तर तो रस्त्यावर असल्याचे दिसले. दरम्यान काही लोकांच्या मदतीने त्याच्या आईने नगरसेवक सतीश महाडिक व नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनाही संपर्क साधला. पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांना संपर्क साधून तिकडे रुग्णवाहिका पाठवली. त्यावेळी तेथील काहींनी या तरुणाला एका झाडाखाली झोपवले होते. रुग्णवाहिकेतून या तरुणाला इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती ठीक असल्याचे डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले. हे पण वाचा - ...अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मागितली माफी   हे पण वाचा -  फडणविसांनी पडळकरांना धनगर समाजाला भ्रमित करण्याचे बक्षिस दिले.     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 8, 2020

पाच दिवस चालून तो गावाजवळ आला, आणि काय घडले वाचा  इस्लामपूर (जि. सांगली) : दिवसेंदिवस वाढत चाललेले कोरोना रुग्णांचे आकडे पाहून त्याने अखेर गाव जवळ करण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यातून तो चालतच इस्लामपूरकडे यायला निघाला. आज पाचव्या दिवशी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील केदारवाडी गावाजवळ येताच इस्लामपूर पासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर त्याला चक्कर आली. इस्लामपूरच्या नगराध्यक्षांच्या मदतीने तत्काळ त्याला रुग्णवाहिकेतून इस्लामपुरात आणले आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गेले पाच दिवस हा तरुण पुण्याहून इथपर्यंत चालत आला आहे. अर्जुन शंकर जाधव (वय 30) हा तरुण सहा महिन्यांपूर्वी कामाच्या निमित्ताने पुण्याला गेला. तेथील एका कंपनीत तो चालक म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह चालवतो. त्याचे कुटुंब इस्लामपूरमधील हनुमाननगर येथे वास्तव्यास आहे. तो अधूनमधून इस्लामपूरला ये जा करतो. कोरोना विषाणू संसर्गाच्या विळख्यात पुणे शहर अडकले आहे. कंपन्यांनी कामगारांना घरी जाण्यास सांगितले आहे. परंतु या तरुणाची वेळेत सुटका झाली नाही. जेव्हा झाली तेव्हा वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे अर्जुनने तिथे काही दिवस तसेच काढले. परंतु कोरोनाचा विळखा सैल होण्याची काही लक्षणे दिसेनात आणि होऊ लागलेले हाल काही सहन होईनात म्हणून त्याने स्वतःहून इस्लामपूरकडे चालत जाण्याचा निर्धार केला. पाच दिवसांपूर्वी त्याने पुणे सोडले होते. आज दुपारी अचानक त्याच्या आईच्या फोनवर अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समजले की अर्जुन हा केदारवाडी आणि कासेगावच्या दरम्यान रस्त्यावर बेशुद्ध होऊन पडला आहे. त्याच्या आईने तत्काळ केदारवाडी येथील नात्यातील एका महिलेला संपर्क साधून रस्त्यावर चौकशी करण्यास सांगितले. तर तो रस्त्यावर असल्याचे दिसले. दरम्यान काही लोकांच्या मदतीने त्याच्या आईने नगरसेवक सतीश महाडिक व नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनाही संपर्क साधला. पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांना संपर्क साधून तिकडे रुग्णवाहिका पाठवली. त्यावेळी तेथील काहींनी या तरुणाला एका झाडाखाली झोपवले होते. रुग्णवाहिकेतून या तरुणाला इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती ठीक असल्याचे डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले. हे पण वाचा - ...अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मागितली माफी   हे पण वाचा -  फडणविसांनी पडळकरांना धनगर समाजाला भ्रमित करण्याचे बक्षिस दिले.     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2zoPGwK

No comments:

Post a Comment