प्रक्रियायुक्त काजू थेट ग्राहकांपर्यंत; शेतकऱ्यांना मिळणार एवढा फायदा  रत्नागिरी - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हापूसचे मार्केटिंग आणि वितरणात येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी आत्मा विभागाकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली होती. त्यातून राज्यभरातील एक लाख ग्राहकांचा डाटा तयार झाला आहे. त्याचा उपयोग रत्नागिरीत उत्पादित होणार्‍या व प्रक्रिया केल्या जाणार्‍या काजूसाठी केला जाणार आहे. स्वतःच काजू प्रक्रिया करून घेऊन त्याचे मार्केटिंग या माध्यमातून करण्याचा निर्णय आत्माने केला आहे. शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना राबविण्यात सध्या चांगल्याप्रकारे यश आले आहे.  ऐन आंबा हंगामात आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री करता आली असून अनेक छोट्या बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर ग्राहकांचा डाटाही प्रत्येक बागायतदाराने तयार केला आहे. याच संधीतून आत्मा विभागाने राज्यभरातून मागणी केलेल्या ग्राहकांचा डाटा एकत्रित केला आहे. त्याचा उपयोग अन्य उत्पादनांच्या विक्रीसाठी केला जाणार आहे. त्यातून शेतकर्‍याला फायदा होईल असे नियोजन सुरू झाले आहे. सध्या काजू बीला कमी दर मिळत आहे. त्यामुळे तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकर्‍यांनी स्वतः बी प्रक्रिया करून घेतली तर आत्मामार्फत त्यांना ग्राहक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामध्ये शेतकरी गट, बचत गट यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उसगाव येथील एका गटाने त्यासाठी तयारी दर्शवली असून दोन टन काजू बीवर ते प्रक्रिया करणार आहेत. आत्मा विभागाकडून केलेल्या अभ्यासानुसार एक टन काजू बी प्रक्रिया करण्यासाठी 30 हजार रुपये खर्च येतो. त्यातून अडीचशे किलो प्रक्रियायुक्त काजू मिळतो. एका किलोला काजूगरासाठी 800 ते 1100 रुपये दर मिळतो. कोकणातील काजू गरांना बाजारात चांगली मागणीही आहे. एका टनातून शेतकर्‍याला किमान अडीच लाख रुपये मिळू शकतात. खर्च वजा जाता 70 टक्के नफा यामधून मिळू शकतो. तयार झालेला काजू विक्रीसाठी थेट यंत्रणाही उपलब्ध असल्यामुळे शेतकरी गटांना याचा फायदा चांगल्याप्रकारे मिळणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितिवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांना दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. हे पण वाचा - ...अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मागितली माफी   हे पण वाचा - कुटुंब नियोजनावर असा झाला आहे कोरोनाचा परिणाम!   शेतकरी गटांनी तयारी दर्शविल्यामुळे प्रक्रियायुक्त काजूला ग्राहक उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबरोबरच रत्नागिरीतील गटांनी उत्पादित केलेला रेड राईस, ब्लॅक राईस, हळद, मिरी, कोकमचीही विक्री याच माध्यमातून केली जाणार आहे. -जी. बी. काळे, प्रकल्प संचालक, आत्मा   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 8, 2020

प्रक्रियायुक्त काजू थेट ग्राहकांपर्यंत; शेतकऱ्यांना मिळणार एवढा फायदा  रत्नागिरी - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हापूसचे मार्केटिंग आणि वितरणात येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी आत्मा विभागाकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली होती. त्यातून राज्यभरातील एक लाख ग्राहकांचा डाटा तयार झाला आहे. त्याचा उपयोग रत्नागिरीत उत्पादित होणार्‍या व प्रक्रिया केल्या जाणार्‍या काजूसाठी केला जाणार आहे. स्वतःच काजू प्रक्रिया करून घेऊन त्याचे मार्केटिंग या माध्यमातून करण्याचा निर्णय आत्माने केला आहे. शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना राबविण्यात सध्या चांगल्याप्रकारे यश आले आहे.  ऐन आंबा हंगामात आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री करता आली असून अनेक छोट्या बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर ग्राहकांचा डाटाही प्रत्येक बागायतदाराने तयार केला आहे. याच संधीतून आत्मा विभागाने राज्यभरातून मागणी केलेल्या ग्राहकांचा डाटा एकत्रित केला आहे. त्याचा उपयोग अन्य उत्पादनांच्या विक्रीसाठी केला जाणार आहे. त्यातून शेतकर्‍याला फायदा होईल असे नियोजन सुरू झाले आहे. सध्या काजू बीला कमी दर मिळत आहे. त्यामुळे तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकर्‍यांनी स्वतः बी प्रक्रिया करून घेतली तर आत्मामार्फत त्यांना ग्राहक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामध्ये शेतकरी गट, बचत गट यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उसगाव येथील एका गटाने त्यासाठी तयारी दर्शवली असून दोन टन काजू बीवर ते प्रक्रिया करणार आहेत. आत्मा विभागाकडून केलेल्या अभ्यासानुसार एक टन काजू बी प्रक्रिया करण्यासाठी 30 हजार रुपये खर्च येतो. त्यातून अडीचशे किलो प्रक्रियायुक्त काजू मिळतो. एका किलोला काजूगरासाठी 800 ते 1100 रुपये दर मिळतो. कोकणातील काजू गरांना बाजारात चांगली मागणीही आहे. एका टनातून शेतकर्‍याला किमान अडीच लाख रुपये मिळू शकतात. खर्च वजा जाता 70 टक्के नफा यामधून मिळू शकतो. तयार झालेला काजू विक्रीसाठी थेट यंत्रणाही उपलब्ध असल्यामुळे शेतकरी गटांना याचा फायदा चांगल्याप्रकारे मिळणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितिवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांना दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. हे पण वाचा - ...अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मागितली माफी   हे पण वाचा - कुटुंब नियोजनावर असा झाला आहे कोरोनाचा परिणाम!   शेतकरी गटांनी तयारी दर्शविल्यामुळे प्रक्रियायुक्त काजूला ग्राहक उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबरोबरच रत्नागिरीतील गटांनी उत्पादित केलेला रेड राईस, ब्लॅक राईस, हळद, मिरी, कोकमचीही विक्री याच माध्यमातून केली जाणार आहे. -जी. बी. काळे, प्रकल्प संचालक, आत्मा   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Lc5m9p

No comments:

Post a Comment