video : ज्येष्ठ नागरिकांसाठी चार महत्त्वपूर्ण व्यायाम ज्येष्ठ नागरिकांना ते किती स्ट्रॉंग आहेत हे माहीतच नसतं, असं मी म्हटल्यास तुमचा विश्‍वास बसेल का? शरीर किती सुदृढ आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी व्यायाम करण्याचा प्रयत्नच केलेला नसतो. त्यांना वाटतं, आपण ६० वर्षांचे किंवा त्याहून मोठे आहोत, त्यामुळं विशिष्ट व्यायाम करू शकत नाही आणि ते केवळ चालण्यावर अवलंबून असतात. मी डिसेंबरमध्ये आईच्या ६०व्या वाढदिवशी एक परिपूर्ण स्क्वाट तिच्याकडून करून घेतली, तेव्हाच माझ्या आईला माझं म्हणणं पटलं आणि ती खूप खूष झाली. तुम्हालाही तुमच्या क्षमता शोधण्याचा प्रारंभ करण्यास उशीर झालेला नाही.  आपण आज ज्येष्ठांना घरीच करता येतील असे चार व्यायामप्रकार पाहणार आहोत. हे व्यायाम तुमच्यासाठी सुलभ झाल्यावर अधिक आव्हानात्मक व्यायाम पद्धतींचा अवलंब करण्यास घाबरू नका.  दिलेल्या व्यायामांची प्रत्येक बाजूला ५ वेळा किंवा ३० सेकंदांसाठी पुनरावृत्ती करा.  १) Alternating hand-leg raises - हा व्यायाम आपल्या पाठीचे स्नायू बळकट करण्यात मदत करतो.  २) Squats - शरीराच्या एकूण खालच्या भागातील स्नायूंना बळकट करतात. (केवळ ज्यांना गुडघे आणि हिप एन्जुरी असेल त्यांनी खुर्चीवर बसून ‘Knee extention’ करावे.)  ३) Floor cycling - या व्यायामाने स्टॅमिना वाढतो. एक मॅट घ्या, पाठीवर झोपा आणि पायानं सायकलिंग करायला सुरुवात करा. शक्य तितक्या वेगानं सतत आणि एका लयीत सायकलिंग करणं सुरू ठेवा.  ४) ओव्हरहेड डंबेल प्रेस - हा व्यायाम शरीराच्या वरच्या भागातील स्नायूंना बळकट करण्यात मदत करतो.  हे व्यायाम करण्याआधी स्ट्रेचिंग आवश्‍यक आहे. संपूर्ण शरीर नीट स्ट्रेच केल्यास शरीरातील वेदना आणि स्टिफनेस कमी होईल. हे व्यायाम योग्यप्रकारे आणि चांगल्या फॉर्मसह कसे करावेत, हे पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पाहा.  आपण आपल्या कालक्रमानुसारचं वय (chronological age) नियंत्रित करू शकत नाही, परंतु आपण दररोज व्यायाम करून आणि चांगल्या आहाराद्वारे आपलं बायॉलॉजिकल वय नियंत्रित करू शकतो. तेव्हा आजच प्रारंभ करा! आपल्याला काही प्रश्‍न असल्यास माझ्याशी ‘सकाळ’च्या माध्यमातून संपर्क साधा. पुणे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 23, 2020

video : ज्येष्ठ नागरिकांसाठी चार महत्त्वपूर्ण व्यायाम ज्येष्ठ नागरिकांना ते किती स्ट्रॉंग आहेत हे माहीतच नसतं, असं मी म्हटल्यास तुमचा विश्‍वास बसेल का? शरीर किती सुदृढ आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी व्यायाम करण्याचा प्रयत्नच केलेला नसतो. त्यांना वाटतं, आपण ६० वर्षांचे किंवा त्याहून मोठे आहोत, त्यामुळं विशिष्ट व्यायाम करू शकत नाही आणि ते केवळ चालण्यावर अवलंबून असतात. मी डिसेंबरमध्ये आईच्या ६०व्या वाढदिवशी एक परिपूर्ण स्क्वाट तिच्याकडून करून घेतली, तेव्हाच माझ्या आईला माझं म्हणणं पटलं आणि ती खूप खूष झाली. तुम्हालाही तुमच्या क्षमता शोधण्याचा प्रारंभ करण्यास उशीर झालेला नाही.  आपण आज ज्येष्ठांना घरीच करता येतील असे चार व्यायामप्रकार पाहणार आहोत. हे व्यायाम तुमच्यासाठी सुलभ झाल्यावर अधिक आव्हानात्मक व्यायाम पद्धतींचा अवलंब करण्यास घाबरू नका.  दिलेल्या व्यायामांची प्रत्येक बाजूला ५ वेळा किंवा ३० सेकंदांसाठी पुनरावृत्ती करा.  १) Alternating hand-leg raises - हा व्यायाम आपल्या पाठीचे स्नायू बळकट करण्यात मदत करतो.  २) Squats - शरीराच्या एकूण खालच्या भागातील स्नायूंना बळकट करतात. (केवळ ज्यांना गुडघे आणि हिप एन्जुरी असेल त्यांनी खुर्चीवर बसून ‘Knee extention’ करावे.)  ३) Floor cycling - या व्यायामाने स्टॅमिना वाढतो. एक मॅट घ्या, पाठीवर झोपा आणि पायानं सायकलिंग करायला सुरुवात करा. शक्य तितक्या वेगानं सतत आणि एका लयीत सायकलिंग करणं सुरू ठेवा.  ४) ओव्हरहेड डंबेल प्रेस - हा व्यायाम शरीराच्या वरच्या भागातील स्नायूंना बळकट करण्यात मदत करतो.  हे व्यायाम करण्याआधी स्ट्रेचिंग आवश्‍यक आहे. संपूर्ण शरीर नीट स्ट्रेच केल्यास शरीरातील वेदना आणि स्टिफनेस कमी होईल. हे व्यायाम योग्यप्रकारे आणि चांगल्या फॉर्मसह कसे करावेत, हे पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पाहा.  आपण आपल्या कालक्रमानुसारचं वय (chronological age) नियंत्रित करू शकत नाही, परंतु आपण दररोज व्यायाम करून आणि चांगल्या आहाराद्वारे आपलं बायॉलॉजिकल वय नियंत्रित करू शकतो. तेव्हा आजच प्रारंभ करा! आपल्याला काही प्रश्‍न असल्यास माझ्याशी ‘सकाळ’च्या माध्यमातून संपर्क साधा. पुणे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3atsCKg

No comments:

Post a Comment