महाराष्ट्राचं टाऊन प्लॅनिंग कसं असायला हवं? वाचा पृथ्वीराज चव्हाण यांची मतं राज्यांतर्गत मागासलेपण दूर करून, स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम पिढी निर्माण करण्यावर भर दिला तरच आजची  देशातील आघाडी आपण भविष्यातही कायम राखू, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळचे प्रतिनिधी सचिन शिंदे यांच्याशी बोलताना व्यक्त केला. मुलाखतीचा हा अंश... प्रश्न - महाराष्ट्राने साठ वर्षांत काय कमावले?      उत्तर - मुंबई प्रांतातून एक मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती झाली. त्यावेळी दोन्हीही राज्यांचा विकासाचा निर्देशांक समानच होता. साठ वर्षानंतर तुलना करता, महाराष्ट्र गुजरातच्या फार पु़ढे गेलाय. कोणी गुजरात मॉडेल पुढे केले, तर त्याला अर्थही नाही. बहुतेक सर्व निकषांवर महाराष्ट्र सरासरीवर प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या, अन्नधान्याबाबत एकंदरीत बेरीज केली तरी महाराष्ट्र अव्वलच आहे.   पुढच्या काही दशकांत महाराष्ट्र कुठे हवा?      कोरोनानंतरची स्थिती पाहिली तर जगाचे स्वरूपच बदललेले असेल. राष्ट्रा-राष्ट्रात जीवघेणी स्पर्धा असेल. रोजगार टिकवण्याचे आव्हान असेल. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेविरोधात वाटचाल सुरू होईल. त्यात भारतासारख्या विकसनशील देशाचे नुकसान होईल. प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था वाढण्याऐवजी आकसेल. भारताची वाटचाल उणे सुरू होईल. त्यावेळी राज्यात भौतिक विकासावर मर्यादा येतील. रस्ते, धरणे किंवा विमानतळ अशी कामे तत्पुरती थांबवावी लागतील. आरोग्य व शिक्षणावर भर देण्याचे कारण कोरोनाची दुसरी लाट आली तर त्याला सामोरे जावू शकू काय, याचा अभ्यास व्हावा. सार्वजनिक आरोग्यावर आतापेक्षा कितीतरी पटीने जास्त खर्च करावा लागेल.  प्रगतीच्या वाटेवर आव्हाने कोणती?      शेतीला शाश्वत करणे सरकारची जबाबदारी आहे. पन्नास टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. नागरीकरणाचा प्रश्नही गंभीर आहे. मुंबई, पिंपरी-चिंचवड अशा प्रत्येक महानगरात झोपड्यांचा प्रश्न गंभीर आहे. नियोजनशिवाय झालेल्या नागरीकरणाच्या दुरूस्तीचे मोठे आव्हान आहे. कोरोनासारखा प्रश्न पुन्हा उद्भवला तर त्यातून आपण शाश्वतपणे बाहेर पडू शकणार नाही. त्यासाठी मुंबई-पुण्यावरील ताण कमी करावा लागेल. स्मार्ट सिटी योजनेचा फज्जा उडालाय. प्रत्येक महसुली विभागात दोन ते पाच लाख लोकसंख्येचे नविन औद्योगिक महानगर निर्माण करून तेथे सुनियोजीत टाऊन प्लॅनिंग व लोक राहतील, तेथेच नोकऱ्या किंवा रोजगाराच्या ठिकाणीच राहायची व्यवस्था केली तर महानगरावरील ताण कमी करता येईल.  तुमच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या वाटचालीतील सर्वात महत्वाचे क्षण कोणते?      सामाजिक सौहार्द राज्याने टिकवला आहे. सहकार चळवळ वाढवणे, लोकशाहीसह सत्तेच्या विकेंद्रीकरण टिकवण्यात यश आले. पुरोगामीत्व टिकवून ठेवले. नेतृत्व बदलताना स्थिर सरकार देण्याची परंपरा कायम राहिली आहे. एकूणच महाराष्ट्राने परिपक्व राज्य म्हणून, पुरोगामीत्व जपत, सुधारणा राबवून साधलेली प्रगती महत्वाची आहे. आगामी काळात ही आघाडी टिकवली पाहिजे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 30, 2020

महाराष्ट्राचं टाऊन प्लॅनिंग कसं असायला हवं? वाचा पृथ्वीराज चव्हाण यांची मतं राज्यांतर्गत मागासलेपण दूर करून, स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम पिढी निर्माण करण्यावर भर दिला तरच आजची  देशातील आघाडी आपण भविष्यातही कायम राखू, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळचे प्रतिनिधी सचिन शिंदे यांच्याशी बोलताना व्यक्त केला. मुलाखतीचा हा अंश... प्रश्न - महाराष्ट्राने साठ वर्षांत काय कमावले?      उत्तर - मुंबई प्रांतातून एक मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती झाली. त्यावेळी दोन्हीही राज्यांचा विकासाचा निर्देशांक समानच होता. साठ वर्षानंतर तुलना करता, महाराष्ट्र गुजरातच्या फार पु़ढे गेलाय. कोणी गुजरात मॉडेल पुढे केले, तर त्याला अर्थही नाही. बहुतेक सर्व निकषांवर महाराष्ट्र सरासरीवर प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या, अन्नधान्याबाबत एकंदरीत बेरीज केली तरी महाराष्ट्र अव्वलच आहे.   पुढच्या काही दशकांत महाराष्ट्र कुठे हवा?      कोरोनानंतरची स्थिती पाहिली तर जगाचे स्वरूपच बदललेले असेल. राष्ट्रा-राष्ट्रात जीवघेणी स्पर्धा असेल. रोजगार टिकवण्याचे आव्हान असेल. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेविरोधात वाटचाल सुरू होईल. त्यात भारतासारख्या विकसनशील देशाचे नुकसान होईल. प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था वाढण्याऐवजी आकसेल. भारताची वाटचाल उणे सुरू होईल. त्यावेळी राज्यात भौतिक विकासावर मर्यादा येतील. रस्ते, धरणे किंवा विमानतळ अशी कामे तत्पुरती थांबवावी लागतील. आरोग्य व शिक्षणावर भर देण्याचे कारण कोरोनाची दुसरी लाट आली तर त्याला सामोरे जावू शकू काय, याचा अभ्यास व्हावा. सार्वजनिक आरोग्यावर आतापेक्षा कितीतरी पटीने जास्त खर्च करावा लागेल.  प्रगतीच्या वाटेवर आव्हाने कोणती?      शेतीला शाश्वत करणे सरकारची जबाबदारी आहे. पन्नास टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. नागरीकरणाचा प्रश्नही गंभीर आहे. मुंबई, पिंपरी-चिंचवड अशा प्रत्येक महानगरात झोपड्यांचा प्रश्न गंभीर आहे. नियोजनशिवाय झालेल्या नागरीकरणाच्या दुरूस्तीचे मोठे आव्हान आहे. कोरोनासारखा प्रश्न पुन्हा उद्भवला तर त्यातून आपण शाश्वतपणे बाहेर पडू शकणार नाही. त्यासाठी मुंबई-पुण्यावरील ताण कमी करावा लागेल. स्मार्ट सिटी योजनेचा फज्जा उडालाय. प्रत्येक महसुली विभागात दोन ते पाच लाख लोकसंख्येचे नविन औद्योगिक महानगर निर्माण करून तेथे सुनियोजीत टाऊन प्लॅनिंग व लोक राहतील, तेथेच नोकऱ्या किंवा रोजगाराच्या ठिकाणीच राहायची व्यवस्था केली तर महानगरावरील ताण कमी करता येईल.  तुमच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या वाटचालीतील सर्वात महत्वाचे क्षण कोणते?      सामाजिक सौहार्द राज्याने टिकवला आहे. सहकार चळवळ वाढवणे, लोकशाहीसह सत्तेच्या विकेंद्रीकरण टिकवण्यात यश आले. पुरोगामीत्व टिकवून ठेवले. नेतृत्व बदलताना स्थिर सरकार देण्याची परंपरा कायम राहिली आहे. एकूणच महाराष्ट्राने परिपक्व राज्य म्हणून, पुरोगामीत्व जपत, सुधारणा राबवून साधलेली प्रगती महत्वाची आहे. आगामी काळात ही आघाडी टिकवली पाहिजे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bR6D1u

No comments:

Post a Comment