आरोग्यसेविका वेळेत पोचल्याने बाळ अन्‌ बाळंतीण सुखरूप उमरगा (जि. उस्मानाबाद) : आरोग्य सेवा सर्वदूर असल्या तरी ग्रामीण भागात तांडा, शेतवस्तीत राहणाऱ्या कुटुंबांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या लेकीला कळा सुरू झाल्यानंतर रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. आशा कार्यकर्तीला माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात संपर्क साधल्याने आरोग्यसेविका वेळेत पोचल्याने दोन तासांपासून कळा सोसणाऱ्या त्या लेकीची नॉर्मल प्रसूती झाली. एका गोंडस मुलीला तिने जन्म दिला. ही घटना आहे तालुक्यातील कुन्हाळी-त्रिकोळी रस्त्यालगतच्या शिवारातील बळिराम कदेरे यांच्या शेतातील. एक महिन्यापासून लॉकडाउन सुरू असल्याने ग्रामीण भागातील शेतवस्ती, तांडा येथील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी धावपळ करावी लागत आहे. विशेषतः गर्भवती मातांना प्रसूतिपूर्व तपासणी, तसेच प्रसूतीसाठी घेऊन जाण्यासाठी ऐनवेळी अडचणी येत आहेत. आरोग्य विभागाच्या वाहनाची सोय असली तरी लॉकडाउनमुळे काही गावांत रस्ते बंद असल्याने कठीणप्रसंगी वेळेत पोचणे शक्य होत नाही. मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा नांदेड जिल्ह्यातील केशव वाघमारे हे कुटुंबासह उमरगा येथील बळिराम कदेरे यांची शेती गेल्या तीन वर्षांपासून बटईने करीत आहेत. त्यांची मुलगी सरिता प्रशांत गाडे (रा. किल्लारी, ह. मु. पर्वती पायथा, पुणे) ही दीड महिन्यापूर्वी किल्लारी येथे आली होती. प्रसूतीसाठी आठ दिवसांपूर्वी ती आई-वडिलाकडे आली होती. बुधवारी (ता. २२) सायंकाळी तिला कळा सुरू झाल्या. पण तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी वाहन नव्हते. वडील केशव यांनी त्रिकोळीच्या आशा कार्यकर्ती संपदा कांबळे यांना रात्री आठ वाजता फोन केला. त्यांनी नाईचाकूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहनचालक विजय ठाकूर यांना फोन केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया टिके यांचे मार्गदर्शन घेऊन आरोग्यसेविका एन. सी. गोस्वामी, मंगल माने वाहनातून तातडीने निघाले. मधल्या मार्गाने अंतर कमी होते; मात्र लॉकडाउनच्या काळात रस्त्यावर मातीचे ढिगारे असल्याने कासारशिर्सीवरून कुन्हाळी गावाजवळील मार्गाने वाहन त्रिकोळीकडे निघाले. शेतात वाहन जात नसल्याने दीड किलोमीटर अंतर पायी जावे लागले; रात्री साडेनऊ वाजता आरोग्यसेविका तेथे पोचल्या. त्यावेळी वीजपुरवठा खंडित झाला होता. वेदना असह्य होत असल्याने व्याकूळ झालेल्या लेकीला आई उषाबाई धीर देत होत्या. काही क्षणांत तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आरोग्यसेविकांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले. प्रसूतीनंतर त्यांनी दोन तास प्रसूत माता व नवजात मुलीवर उपचार केले. त्यानंतर रात्री बारा वाजता आरोग्यसेविका, आशा कार्यकर्ती तेथून परत निघाल्या. अनेक अडचणी असतानाही त्या शेतात पोचल्याने सरिताला वेळेत उपचार मिळाल्याने बाळ अन्‌ बाळंतीण सुखरूप आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 25, 2020

आरोग्यसेविका वेळेत पोचल्याने बाळ अन्‌ बाळंतीण सुखरूप उमरगा (जि. उस्मानाबाद) : आरोग्य सेवा सर्वदूर असल्या तरी ग्रामीण भागात तांडा, शेतवस्तीत राहणाऱ्या कुटुंबांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या लेकीला कळा सुरू झाल्यानंतर रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. आशा कार्यकर्तीला माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात संपर्क साधल्याने आरोग्यसेविका वेळेत पोचल्याने दोन तासांपासून कळा सोसणाऱ्या त्या लेकीची नॉर्मल प्रसूती झाली. एका गोंडस मुलीला तिने जन्म दिला. ही घटना आहे तालुक्यातील कुन्हाळी-त्रिकोळी रस्त्यालगतच्या शिवारातील बळिराम कदेरे यांच्या शेतातील. एक महिन्यापासून लॉकडाउन सुरू असल्याने ग्रामीण भागातील शेतवस्ती, तांडा येथील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी धावपळ करावी लागत आहे. विशेषतः गर्भवती मातांना प्रसूतिपूर्व तपासणी, तसेच प्रसूतीसाठी घेऊन जाण्यासाठी ऐनवेळी अडचणी येत आहेत. आरोग्य विभागाच्या वाहनाची सोय असली तरी लॉकडाउनमुळे काही गावांत रस्ते बंद असल्याने कठीणप्रसंगी वेळेत पोचणे शक्य होत नाही. मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा नांदेड जिल्ह्यातील केशव वाघमारे हे कुटुंबासह उमरगा येथील बळिराम कदेरे यांची शेती गेल्या तीन वर्षांपासून बटईने करीत आहेत. त्यांची मुलगी सरिता प्रशांत गाडे (रा. किल्लारी, ह. मु. पर्वती पायथा, पुणे) ही दीड महिन्यापूर्वी किल्लारी येथे आली होती. प्रसूतीसाठी आठ दिवसांपूर्वी ती आई-वडिलाकडे आली होती. बुधवारी (ता. २२) सायंकाळी तिला कळा सुरू झाल्या. पण तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी वाहन नव्हते. वडील केशव यांनी त्रिकोळीच्या आशा कार्यकर्ती संपदा कांबळे यांना रात्री आठ वाजता फोन केला. त्यांनी नाईचाकूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहनचालक विजय ठाकूर यांना फोन केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया टिके यांचे मार्गदर्शन घेऊन आरोग्यसेविका एन. सी. गोस्वामी, मंगल माने वाहनातून तातडीने निघाले. मधल्या मार्गाने अंतर कमी होते; मात्र लॉकडाउनच्या काळात रस्त्यावर मातीचे ढिगारे असल्याने कासारशिर्सीवरून कुन्हाळी गावाजवळील मार्गाने वाहन त्रिकोळीकडे निघाले. शेतात वाहन जात नसल्याने दीड किलोमीटर अंतर पायी जावे लागले; रात्री साडेनऊ वाजता आरोग्यसेविका तेथे पोचल्या. त्यावेळी वीजपुरवठा खंडित झाला होता. वेदना असह्य होत असल्याने व्याकूळ झालेल्या लेकीला आई उषाबाई धीर देत होत्या. काही क्षणांत तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आरोग्यसेविकांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले. प्रसूतीनंतर त्यांनी दोन तास प्रसूत माता व नवजात मुलीवर उपचार केले. त्यानंतर रात्री बारा वाजता आरोग्यसेविका, आशा कार्यकर्ती तेथून परत निघाल्या. अनेक अडचणी असतानाही त्या शेतात पोचल्याने सरिताला वेळेत उपचार मिळाल्याने बाळ अन्‌ बाळंतीण सुखरूप आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Y266pn

No comments:

Post a Comment