...तर इतिहासातील महत्त्वाचा भाग कायमचा मिटू शकतो औरंगाबाद : कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्याच्या प्रक्रियेत संवर्धन करणारा आणि इतिहासकार या दोघांचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ऐतिहासिक महत्त्व लक्षात न घेता संवर्धन केल्यास त्या वास्तूच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग कायमचा मिटू शकतो, असे राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले.  ‘अ रिव्हायव्हल ऑफ आर्कियॉलॉजिकल कॉन्झर्वेशन इन महाराष्ट्र विथ स्पेशल रेफरन्स टू औरंगाबाद’ या विषयावर त्यांनी वेबिनारमधून आपले मत शनिवारी (ता. २५) मांडले. इन्टॅकच्या औरंगाबाद चॅप्टरतर्फे आयोजित या वेबिनारमध्ये शहरातील सर्व वास्तुविशारद, इतिहासप्रेमी आणि संवर्धनशास्त्रात काम करणारे लोक सहभागी होते. संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर... देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्तीचे उदाहरण देताना डॉ. गर्गे यांनी सांगितले, की बाहेरील तटबंदी दुरुस्त करताना एका बुरुजाच्या उभारणीत मातीचा वापर केल्याचे आढळले. संवर्धकाच्या दृष्टीतून हे काम चुन्यात केले गेले असते तर त्या तटबंदीचे आयुष्य वाढले असते. मात्र ऐतिहासिक दृष्टीने विचार केल्यास तटबंदीचा तो भाग हा युद्धजन्य परिस्थितीत तयार झाला असावा. त्यामुळे त्याचे आपले वेगळे महत्त्व असल्याचे सिद्ध होते.  असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर... अजिंठा लेणीतील चैत्याच्या संवर्धनासाठी घडवले गेलेले दगडी खांब पितळखोरा आणि अजिंठा लेणीच्या खडकाची निवड कशी झाली असावी, यावर बोलताना त्यांनी त्यातील फरकही नमूद केले. अजिंठ्याचा दगड निवडताना लेणीचे कोरीव काम खडकाच्या मधोमध होईल, असे पाहिले गेले. वरच्या भागातील खडकाच्या होणाऱ्या नैसर्गिक ऱ्हासाचा आणि खाली वाघूर नदीच्या प्रवाहाचा विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली गेली. मात्र, या गोष्टींचा अभाव पितळखोरा लेणीबाबत स्पष्ट दिसतो, असे डॉ. गर्गे म्हणाले.  मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच अजिंठा लेणीतील चैत्याच्या संवर्धनासाठी घडवले गेलेले दगडी खांब अजिंठ्यातील चित्रांचीच अधिक चर्चा अजिंठा लेणीमध्ये असलेल्या चित्रांच्या संवर्धनाची चर्चा कायम होते. मात्र, येथील दगडी वास्तूंच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने मोठे काम आतापर्यंत केलेले आहे. लेणींमधील दगडी खांबांचे काम कशा पद्धतीने झाले, याचे सादरीकरणही त्यांनी केले. एका खांबाला अनेक भागांमध्ये तयार केले गेले आणि यातील प्रत्येक भागाचे वजन दोन टनांपेक्षा कमी नव्हते. दगड नेण्यासाठी खास यंत्रे उभारावी लागली, असे त्यांनी पुढे सांगितले. INTACH Heritage Conservation Webinar By Tejas Garge History India Ajanta Ellora Daulatabad News Story Feeds https://ift.tt/3eOvmFn - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 25, 2020

...तर इतिहासातील महत्त्वाचा भाग कायमचा मिटू शकतो औरंगाबाद : कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्याच्या प्रक्रियेत संवर्धन करणारा आणि इतिहासकार या दोघांचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ऐतिहासिक महत्त्व लक्षात न घेता संवर्धन केल्यास त्या वास्तूच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग कायमचा मिटू शकतो, असे राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले.  ‘अ रिव्हायव्हल ऑफ आर्कियॉलॉजिकल कॉन्झर्वेशन इन महाराष्ट्र विथ स्पेशल रेफरन्स टू औरंगाबाद’ या विषयावर त्यांनी वेबिनारमधून आपले मत शनिवारी (ता. २५) मांडले. इन्टॅकच्या औरंगाबाद चॅप्टरतर्फे आयोजित या वेबिनारमध्ये शहरातील सर्व वास्तुविशारद, इतिहासप्रेमी आणि संवर्धनशास्त्रात काम करणारे लोक सहभागी होते. संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर... देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्तीचे उदाहरण देताना डॉ. गर्गे यांनी सांगितले, की बाहेरील तटबंदी दुरुस्त करताना एका बुरुजाच्या उभारणीत मातीचा वापर केल्याचे आढळले. संवर्धकाच्या दृष्टीतून हे काम चुन्यात केले गेले असते तर त्या तटबंदीचे आयुष्य वाढले असते. मात्र ऐतिहासिक दृष्टीने विचार केल्यास तटबंदीचा तो भाग हा युद्धजन्य परिस्थितीत तयार झाला असावा. त्यामुळे त्याचे आपले वेगळे महत्त्व असल्याचे सिद्ध होते.  असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर... अजिंठा लेणीतील चैत्याच्या संवर्धनासाठी घडवले गेलेले दगडी खांब पितळखोरा आणि अजिंठा लेणीच्या खडकाची निवड कशी झाली असावी, यावर बोलताना त्यांनी त्यातील फरकही नमूद केले. अजिंठ्याचा दगड निवडताना लेणीचे कोरीव काम खडकाच्या मधोमध होईल, असे पाहिले गेले. वरच्या भागातील खडकाच्या होणाऱ्या नैसर्गिक ऱ्हासाचा आणि खाली वाघूर नदीच्या प्रवाहाचा विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली गेली. मात्र, या गोष्टींचा अभाव पितळखोरा लेणीबाबत स्पष्ट दिसतो, असे डॉ. गर्गे म्हणाले.  मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच अजिंठा लेणीतील चैत्याच्या संवर्धनासाठी घडवले गेलेले दगडी खांब अजिंठ्यातील चित्रांचीच अधिक चर्चा अजिंठा लेणीमध्ये असलेल्या चित्रांच्या संवर्धनाची चर्चा कायम होते. मात्र, येथील दगडी वास्तूंच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने मोठे काम आतापर्यंत केलेले आहे. लेणींमधील दगडी खांबांचे काम कशा पद्धतीने झाले, याचे सादरीकरणही त्यांनी केले. एका खांबाला अनेक भागांमध्ये तयार केले गेले आणि यातील प्रत्येक भागाचे वजन दोन टनांपेक्षा कमी नव्हते. दगड नेण्यासाठी खास यंत्रे उभारावी लागली, असे त्यांनी पुढे सांगितले. INTACH Heritage Conservation Webinar By Tejas Garge History India Ajanta Ellora Daulatabad News Story Feeds https://ift.tt/3eOvmFn


via News Story Feeds https://ift.tt/3bEUXie

No comments:

Post a Comment