बैल गेला अन् झोपा केला...! ‘बैल गेला अन् झोपा केला’ या प्रचलित म्हणीसारखीच काहीशी गत औरंगाबादच्या प्रशासनाची झाली आहे. याला कारणही तसेच आहे म्हणा! शहराला पाच-पाच उच्चपदस्थ अधिकारी आहेत, तरीही शहरातील कोरोनाबाधितांची संख्या (आता या संख्येचा केव्हाच आकडा झाला आहे) आटोक्यात असताना पाहिजे तशी कठोर भूमिका त्यांच्याकडून घेतली गेली नाही. आता अचानकच महापूर आल्यावर जशी अवस्था होते तशीच ‘कोरोनाकंपा’ने शहराची केली आहे. आजघडीला औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा १३० वर गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.    औरंगाबाद शहर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. शहराच्या मुख्यालयी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंगल ही ‘हम पाँच... पम... पम...’ पाचजणांची टीम शहरातच वास्तव्यास असूनही कोरोनाकंपाला वेळीच आळा का घालू शकली नाही, असा प्रश्न आता औरंगाबादकरांकडून विचारला जातोय. आरोग्य विभागाकडून येणारे तासा-तासाचे अन् दैनंदिन अपडेट्सचे कागदी घोडे नाचविण्यात आणि पुढ्यात आलेला पांढरा कागद काळा करण्याचे तर काम या पाचजणांनी केले नाही ना? असा सवालही आता औरंगाबादवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. पाणी डोक्यावर चाललंय याची दाहकता ‘सकाळ’ने वारंवार ‘शहरनामा’ या सदरातून दाखवून दिली होती. ‘आओ - जाओ’ला ब्रेक लावायची गरज असल्याचेही निदर्शनास आणून दिले. परंतु प्रत्येक गोष्टीला ‘लाइटली’ घेण्याची सवय आता सर्वांनाच नडली. आता पाणी नाका-तोंडात गेल्यावर प्रशासनाची आणि पोलिसांची जी केविलवाणी धडपड सुरू आहे ते पाहता बैल गेला आणि झोपा केला ही म्हणच तंतोतंत लागू पडते, असे म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको.    सोनिया गांधी म्हणाल्या, सर्व उद्योगांना विशेष पॅकेज द्या प्रशासन आणि पोलिसच जबाबदार?  कोरोनाबाधितांचा आकडा आता १३० वर गेला असून प्रशासन आणि पोलिसांच्या नरमाईमुळे ही गंभीर परिस्थिती उद्‍भवली असून याला जबाबदार प्रशासन आणि पोलिसच तर नाहीत ना, अशी कुजबूजही आता शहरात ठिकठिकाणी सुरू आहे. चूक कुणाची? चुकीचे खापर फोडण्याची कदाचित ही योग्य वेळ नसेलही; परंतु नेमका कुणाच्या निष्काळजीपणामुळे आणि कुणी मवाळ भूमिका घेतल्यामुळे शहरात ‘कोरोनाकंप’ झाला याची केवळ शहानिशा नव्हे, तर निवृत्त न्यायमूर्तींमार्फत उच्चस्तरीय चौकशी मात्र निश्चितच झाली पाहिजे, अशा संतप्त प्रतिक्रियाही औरंगाबादवासीयांकडून व्यक्त केल्या जात आहेत.  HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा   आधीच कठोर उपाययोजना केल्या असत्या तर...?  मुख्यालयी तळ ठोकून असलेल्या या पाच अधिकाऱ्यांनी एकमेकांशी खरोखरच समन्वय साधला असता तर कदाचित कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली असती. मात्र, कुठे माशी शिंकली किंवा या पाचपैकी कुणाचा इगो आडवा आला, हे देवच जाणो. आता मात्र काही अधिकाऱ्यांचे चमकोगिरी करणारे संदेश, आवाहन करणारे व्हिडिओ व्हायरल केले जात असून औरंगाबादवासीयांचा आम्हाला किती पुळका आहे हे दाखविण्यासाठी स्पर्धाच लागल्याची कुजबूजही सुरू आहे. अजूनही वेळ गेली नाही. या पाचजणांनी पाच मिनिटे शांतपणे विचार करून ‘कोरोनाकंपा’ला थोपविण्यासाठी आणखी कोणत्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत यावर एकत्र यायला हवे, अशी सार्वत्रिक भावना आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, April 29, 2020

बैल गेला अन् झोपा केला...! ‘बैल गेला अन् झोपा केला’ या प्रचलित म्हणीसारखीच काहीशी गत औरंगाबादच्या प्रशासनाची झाली आहे. याला कारणही तसेच आहे म्हणा! शहराला पाच-पाच उच्चपदस्थ अधिकारी आहेत, तरीही शहरातील कोरोनाबाधितांची संख्या (आता या संख्येचा केव्हाच आकडा झाला आहे) आटोक्यात असताना पाहिजे तशी कठोर भूमिका त्यांच्याकडून घेतली गेली नाही. आता अचानकच महापूर आल्यावर जशी अवस्था होते तशीच ‘कोरोनाकंपा’ने शहराची केली आहे. आजघडीला औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा १३० वर गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.    औरंगाबाद शहर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. शहराच्या मुख्यालयी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंगल ही ‘हम पाँच... पम... पम...’ पाचजणांची टीम शहरातच वास्तव्यास असूनही कोरोनाकंपाला वेळीच आळा का घालू शकली नाही, असा प्रश्न आता औरंगाबादकरांकडून विचारला जातोय. आरोग्य विभागाकडून येणारे तासा-तासाचे अन् दैनंदिन अपडेट्सचे कागदी घोडे नाचविण्यात आणि पुढ्यात आलेला पांढरा कागद काळा करण्याचे तर काम या पाचजणांनी केले नाही ना? असा सवालही आता औरंगाबादवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. पाणी डोक्यावर चाललंय याची दाहकता ‘सकाळ’ने वारंवार ‘शहरनामा’ या सदरातून दाखवून दिली होती. ‘आओ - जाओ’ला ब्रेक लावायची गरज असल्याचेही निदर्शनास आणून दिले. परंतु प्रत्येक गोष्टीला ‘लाइटली’ घेण्याची सवय आता सर्वांनाच नडली. आता पाणी नाका-तोंडात गेल्यावर प्रशासनाची आणि पोलिसांची जी केविलवाणी धडपड सुरू आहे ते पाहता बैल गेला आणि झोपा केला ही म्हणच तंतोतंत लागू पडते, असे म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको.    सोनिया गांधी म्हणाल्या, सर्व उद्योगांना विशेष पॅकेज द्या प्रशासन आणि पोलिसच जबाबदार?  कोरोनाबाधितांचा आकडा आता १३० वर गेला असून प्रशासन आणि पोलिसांच्या नरमाईमुळे ही गंभीर परिस्थिती उद्‍भवली असून याला जबाबदार प्रशासन आणि पोलिसच तर नाहीत ना, अशी कुजबूजही आता शहरात ठिकठिकाणी सुरू आहे. चूक कुणाची? चुकीचे खापर फोडण्याची कदाचित ही योग्य वेळ नसेलही; परंतु नेमका कुणाच्या निष्काळजीपणामुळे आणि कुणी मवाळ भूमिका घेतल्यामुळे शहरात ‘कोरोनाकंप’ झाला याची केवळ शहानिशा नव्हे, तर निवृत्त न्यायमूर्तींमार्फत उच्चस्तरीय चौकशी मात्र निश्चितच झाली पाहिजे, अशा संतप्त प्रतिक्रियाही औरंगाबादवासीयांकडून व्यक्त केल्या जात आहेत.  HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा   आधीच कठोर उपाययोजना केल्या असत्या तर...?  मुख्यालयी तळ ठोकून असलेल्या या पाच अधिकाऱ्यांनी एकमेकांशी खरोखरच समन्वय साधला असता तर कदाचित कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली असती. मात्र, कुठे माशी शिंकली किंवा या पाचपैकी कुणाचा इगो आडवा आला, हे देवच जाणो. आता मात्र काही अधिकाऱ्यांचे चमकोगिरी करणारे संदेश, आवाहन करणारे व्हिडिओ व्हायरल केले जात असून औरंगाबादवासीयांचा आम्हाला किती पुळका आहे हे दाखविण्यासाठी स्पर्धाच लागल्याची कुजबूजही सुरू आहे. अजूनही वेळ गेली नाही. या पाचजणांनी पाच मिनिटे शांतपणे विचार करून ‘कोरोनाकंपा’ला थोपविण्यासाठी आणखी कोणत्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत यावर एकत्र यायला हवे, अशी सार्वत्रिक भावना आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/35g0RUo

No comments:

Post a Comment