चिंताजनक! जागतिक महासत्ता असलेल्या देशाची अशी स्थिती बांदा (सिंधुदुर्ग) - "कोरोना'च्या जगव्यापी प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटका जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसला आहे. "कोरोना'ने येथे हाहाकार माजविला आहे. या देशातील परिस्थिती चिंताजनक असून येथील सरकार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. लॉकडाउनमुळे देशातील 90 टक्के व्यवहार बंद असल्याचे येथील स्वरूप महादेव सावंत यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. ते नोकरीनिमित्त 6 वर्षांपासून लॉस एंजिल्स शहरात स्थायिक आहेत.  श्री. सावंत हे इंजिनिअर असून तेथील जॉन्सन अँड जॉन्सन या औषध कंपनीत मशीन डिझाईनचे काम करतात. लॉकडाउनमुळे ते 6 आठवड्यांपासून घरीच थांबून काम करत आहेत. जगातील सर्व लोकांना कायमच अमेरिकेचे आकर्षण राहिले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक अमेरिकेला भेट देतात. "कोरोना'मुळे सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद आहेत. लॉकडाउन असल्याने शहरातील सर्व रस्ते सुनेसुने आहेत. "सकाळ'शी बोलताना अमेरिकेतील कोरोनाची भयावह परिस्थिती त्यांनी कथन केली. ते म्हणाले, ""चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण जग व्यापले आहे. या जगव्यापी जैविक संकटात 90 टक्के देशातील लोक बाधित झाले आहेत. जागतिक महासत्ता असलेल्या व जगातील सर्वाधिक मजबूत प्रशासन व आरोग्य यंत्रणा असलेल्या अमेरिकेला कोरोनाच्या महामारीने पुरते ग्रासले आहे. अमेरिकेत दररोज हजारोंच्या पटीत लोकांचे बळी जात आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा जगप्रसिद्ध न्यूयॉर्क शहराला बसला आहे. 21 जानेवारीला अमेरिकेत पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यानंतर सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. आजच्या स्थितीत संपूर्ण अमेरिकेत 7 लाखांहून अधिक लोक हे कोरोनाबाधित आहेत. कोरोनामुळे जगातील सर्वाधिक बळी हे अमेरिकेत गेले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचा आकडा हा वाढतच असल्याने अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेने गुडघे टेकले आहेत.''  श्री. सावंत म्हणाले, ""केवळ जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठीच घराबाहेर पडण्याची मुभा आहे; मात्र खरेदीसाठी दुकानाबाहेर तासन्‌ तास वाट पाहावी लागते. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येते. दोन व्यक्तींमध्ये 6 फुटांचे अंतर ठेवूनच खरेदी करण्यात येते. गरजेहून अधिक साठा करून ठेवण्यासही मज्जाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्नरत आहे; मात्र कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच असल्याने येथील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. अमेरिकेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे सर्वांना बंधनकारक आहे. काही ठराविक ऑनलाईन शॉपिंग ऍप सेवा पुरवितात. त्यादेखील सेवा देण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी घेतात. सॅनिटायझर, मास्क व ग्लोव्हजचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे.''  ते पुढे म्हणाले, ""न्यूयॉर्क शहर सर्वाधिक बाधित असल्याने त्या ठिकाणी घराबाहेर पडण्यासाठी 14 दिवस क्‍वारंटाईन करून घेणे बंधनकारक आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे. सरकारने 4 व्यक्ती असलेल्या कुटुंबाला साडेतीन हजार डॉलर्स (भारतीय चलनात 2 लाख 69 हजार 500 रुपये) एकरकमी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांसाठी 19 अब्ज डॉलर्सची मदत प्रशासन करणार आहे. त्यातील 16 अब्ज डॉलर्सची मदत थेट हस्तांतरित केली जाणार असून 3 अब्ज डॉलर्स भोजन साहित्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. रुग्णांच्या सेवेसाठी नवीन रुग्णालये उभी केली आहेत. न्यूयॉर्कमधील एका हॉटेलचे रुग्णालयात रूपांतर केले असून यामध्ये 3 हजार खाटांची सोय आहे.  कोरोनावर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही. सोशल डिस्टन्सिंग या एकमेव मार्ग आहे. भारतात लोकसंख्येची घनता अधिक असल्याने घरी राहणे हा एकमेव पर्याय आहे. सर्वांनी काटेकोरपणे सूचनांचे पालन करावे. पोलिस, डॉक्‍टर, आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र राबत आहे. त्यांच्या कार्याचा आदर करून सर्वांनी सहकार्य केले तर निश्‍चितच कोरोनावर मात करू शकतो.  - स्वरूप सावंत, लॉस अँजेलीस, अमेरिका (मूळ रा. बांदा).  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 23, 2020

चिंताजनक! जागतिक महासत्ता असलेल्या देशाची अशी स्थिती बांदा (सिंधुदुर्ग) - "कोरोना'च्या जगव्यापी प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटका जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसला आहे. "कोरोना'ने येथे हाहाकार माजविला आहे. या देशातील परिस्थिती चिंताजनक असून येथील सरकार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. लॉकडाउनमुळे देशातील 90 टक्के व्यवहार बंद असल्याचे येथील स्वरूप महादेव सावंत यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. ते नोकरीनिमित्त 6 वर्षांपासून लॉस एंजिल्स शहरात स्थायिक आहेत.  श्री. सावंत हे इंजिनिअर असून तेथील जॉन्सन अँड जॉन्सन या औषध कंपनीत मशीन डिझाईनचे काम करतात. लॉकडाउनमुळे ते 6 आठवड्यांपासून घरीच थांबून काम करत आहेत. जगातील सर्व लोकांना कायमच अमेरिकेचे आकर्षण राहिले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक अमेरिकेला भेट देतात. "कोरोना'मुळे सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद आहेत. लॉकडाउन असल्याने शहरातील सर्व रस्ते सुनेसुने आहेत. "सकाळ'शी बोलताना अमेरिकेतील कोरोनाची भयावह परिस्थिती त्यांनी कथन केली. ते म्हणाले, ""चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण जग व्यापले आहे. या जगव्यापी जैविक संकटात 90 टक्के देशातील लोक बाधित झाले आहेत. जागतिक महासत्ता असलेल्या व जगातील सर्वाधिक मजबूत प्रशासन व आरोग्य यंत्रणा असलेल्या अमेरिकेला कोरोनाच्या महामारीने पुरते ग्रासले आहे. अमेरिकेत दररोज हजारोंच्या पटीत लोकांचे बळी जात आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा जगप्रसिद्ध न्यूयॉर्क शहराला बसला आहे. 21 जानेवारीला अमेरिकेत पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यानंतर सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. आजच्या स्थितीत संपूर्ण अमेरिकेत 7 लाखांहून अधिक लोक हे कोरोनाबाधित आहेत. कोरोनामुळे जगातील सर्वाधिक बळी हे अमेरिकेत गेले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचा आकडा हा वाढतच असल्याने अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेने गुडघे टेकले आहेत.''  श्री. सावंत म्हणाले, ""केवळ जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठीच घराबाहेर पडण्याची मुभा आहे; मात्र खरेदीसाठी दुकानाबाहेर तासन्‌ तास वाट पाहावी लागते. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येते. दोन व्यक्तींमध्ये 6 फुटांचे अंतर ठेवूनच खरेदी करण्यात येते. गरजेहून अधिक साठा करून ठेवण्यासही मज्जाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्नरत आहे; मात्र कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच असल्याने येथील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. अमेरिकेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे सर्वांना बंधनकारक आहे. काही ठराविक ऑनलाईन शॉपिंग ऍप सेवा पुरवितात. त्यादेखील सेवा देण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी घेतात. सॅनिटायझर, मास्क व ग्लोव्हजचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे.''  ते पुढे म्हणाले, ""न्यूयॉर्क शहर सर्वाधिक बाधित असल्याने त्या ठिकाणी घराबाहेर पडण्यासाठी 14 दिवस क्‍वारंटाईन करून घेणे बंधनकारक आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे. सरकारने 4 व्यक्ती असलेल्या कुटुंबाला साडेतीन हजार डॉलर्स (भारतीय चलनात 2 लाख 69 हजार 500 रुपये) एकरकमी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांसाठी 19 अब्ज डॉलर्सची मदत प्रशासन करणार आहे. त्यातील 16 अब्ज डॉलर्सची मदत थेट हस्तांतरित केली जाणार असून 3 अब्ज डॉलर्स भोजन साहित्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. रुग्णांच्या सेवेसाठी नवीन रुग्णालये उभी केली आहेत. न्यूयॉर्कमधील एका हॉटेलचे रुग्णालयात रूपांतर केले असून यामध्ये 3 हजार खाटांची सोय आहे.  कोरोनावर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही. सोशल डिस्टन्सिंग या एकमेव मार्ग आहे. भारतात लोकसंख्येची घनता अधिक असल्याने घरी राहणे हा एकमेव पर्याय आहे. सर्वांनी काटेकोरपणे सूचनांचे पालन करावे. पोलिस, डॉक्‍टर, आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र राबत आहे. त्यांच्या कार्याचा आदर करून सर्वांनी सहकार्य केले तर निश्‍चितच कोरोनावर मात करू शकतो.  - स्वरूप सावंत, लॉस अँजेलीस, अमेरिका (मूळ रा. बांदा).  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2S0XL1c

No comments:

Post a Comment