`त्या` एक लाख पासेसबाबत पालकमंत्री सामंत म्हणाले.... कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोरोनाबाबत कोणीही राजकारण करू नये, शासनाच्या विरोधात चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. लॉकडाउनबाबत 3 मे नंतरच राज्यशासन निर्णय घेईल. एक लाख पासेस मी द्यायला सांगितले नाही. ही चुकीची माहिती असून संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी रितसर पास घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   पालकमंत्री सामंत यांनी आज एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. श्री. सामंत म्हणाले, ""सिंधुदुर्गात कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आलेली मुलगी आजोबांच्या अंतिम विधीसाठी आली होती. याबाबत कोणीही राजकारण करू नये. माझ्या गाडीतून चाकरमानी आलेत असा चुकीचा संदेश पसरवला जात आहे. मुंबईकरांमध्ये चुकीची माहिती दिली जात आहे. सोशल मीडियावर असणाऱ्या बातम्यांवर कोणीही विश्‍वास ठेवू नये. जेव्हा मुंबईकरांना आणण्याबाबत शासनाचा निर्णय होईल तेव्हाच मी निर्णय घेईन. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर यापुढे पोलिस निश्‍चितच कडक कारवाई करतील. आता केंद्राने परप्रांतीय मजुरांना आणण्याचा निर्णय घेतला आहे. जे विद्यार्थी मुंबईत अडकलेत त्यांना चांगल्या दर्जाचे गेस्ट हाऊस दिले जाईल. हे विद्यार्थी व पालक माझ्या संपर्कात आहेत. दोन्ही जिल्ह्यातील 34 मुलींची यादी माझ्याकडे आहे. आमदार नाईक व संदेश पारकर यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. भविष्यात पासधारक जिल्ह्यात कसे कमी येतील ते पाहणे महत्त्वाचे आहे.''  लांबणीवर पडणाऱ्या परीक्षाबाबत ते म्हणाले, ""यूजीसीने एक परिपत्रक पाठवून प्रथम व द्वितीय शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने या परीक्षा 1 ते 15 जुलैपर्यंत संपायला हव्यात. तसेच बारावी प्रथम वर्ष 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.''  या वेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा बॅंकेचे चेअरमन सतीश सावंत, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा युवा नेते संदेश पारकर, अमरसेन सावंत, अतुल बंगे, संजय भोगटे, राजन नाईक, अवधुत मालणकर, नगरसेवक सचिन काळप, संतोष शिरसाट, सुशील चिंदरकर, राजू गवंडे आदी उपस्थित होते.  अपूर्ण कामे ठेवणारे काळ्या यादीत  श्री. सामंत म्हणाले, ""जिल्ह्यात विकासकामे सुरू करण्यात आली असून कामांची यादी देण्याचे आदेश बांधकाम अभियंता यांना देण्यात आले आहेत. पाच, सहा वर्ष एकच काम घेऊन ती कामे अर्धवट ठेवत असतील अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाका असे आदेशही मी दिले आहेत.''    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 30, 2020

`त्या` एक लाख पासेसबाबत पालकमंत्री सामंत म्हणाले.... कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोरोनाबाबत कोणीही राजकारण करू नये, शासनाच्या विरोधात चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. लॉकडाउनबाबत 3 मे नंतरच राज्यशासन निर्णय घेईल. एक लाख पासेस मी द्यायला सांगितले नाही. ही चुकीची माहिती असून संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी रितसर पास घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   पालकमंत्री सामंत यांनी आज एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. श्री. सामंत म्हणाले, ""सिंधुदुर्गात कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आलेली मुलगी आजोबांच्या अंतिम विधीसाठी आली होती. याबाबत कोणीही राजकारण करू नये. माझ्या गाडीतून चाकरमानी आलेत असा चुकीचा संदेश पसरवला जात आहे. मुंबईकरांमध्ये चुकीची माहिती दिली जात आहे. सोशल मीडियावर असणाऱ्या बातम्यांवर कोणीही विश्‍वास ठेवू नये. जेव्हा मुंबईकरांना आणण्याबाबत शासनाचा निर्णय होईल तेव्हाच मी निर्णय घेईन. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर यापुढे पोलिस निश्‍चितच कडक कारवाई करतील. आता केंद्राने परप्रांतीय मजुरांना आणण्याचा निर्णय घेतला आहे. जे विद्यार्थी मुंबईत अडकलेत त्यांना चांगल्या दर्जाचे गेस्ट हाऊस दिले जाईल. हे विद्यार्थी व पालक माझ्या संपर्कात आहेत. दोन्ही जिल्ह्यातील 34 मुलींची यादी माझ्याकडे आहे. आमदार नाईक व संदेश पारकर यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. भविष्यात पासधारक जिल्ह्यात कसे कमी येतील ते पाहणे महत्त्वाचे आहे.''  लांबणीवर पडणाऱ्या परीक्षाबाबत ते म्हणाले, ""यूजीसीने एक परिपत्रक पाठवून प्रथम व द्वितीय शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने या परीक्षा 1 ते 15 जुलैपर्यंत संपायला हव्यात. तसेच बारावी प्रथम वर्ष 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.''  या वेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा बॅंकेचे चेअरमन सतीश सावंत, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा युवा नेते संदेश पारकर, अमरसेन सावंत, अतुल बंगे, संजय भोगटे, राजन नाईक, अवधुत मालणकर, नगरसेवक सचिन काळप, संतोष शिरसाट, सुशील चिंदरकर, राजू गवंडे आदी उपस्थित होते.  अपूर्ण कामे ठेवणारे काळ्या यादीत  श्री. सामंत म्हणाले, ""जिल्ह्यात विकासकामे सुरू करण्यात आली असून कामांची यादी देण्याचे आदेश बांधकाम अभियंता यांना देण्यात आले आहेत. पाच, सहा वर्ष एकच काम घेऊन ती कामे अर्धवट ठेवत असतील अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाका असे आदेशही मी दिले आहेत.''    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WdjPqN

No comments:

Post a Comment