‘मास्क’साठी कोणी डॉक्‍टरांकडे फिरकेना पुणे - डॉक्‍टरांच्या चिठ्ठीवरच ‘एन ९५’ मास्क विक्री करण्याचा सरकारचा आदेश पुण्यात फक्त कागदावरच असल्याचे दिसून आले. कोणीही रुग्ण मास्क मिळावा म्हणून डॉक्‍टरांकडे फिरकला नाही. तसेच, मास्क विक्री आता औषध दुकानांसह सर्वत्र सुरू झाल्याचे दिसले. त्यामुळे मास्कच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) प्रयत्नांनाही मर्यादा आल्याचे स्पष्ट झाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय राज्यात ‘एन ९५’ मास्कची विक्री करण्यावर बंदी घालणारा आदेश ‘एफडीए’ने गुरुवारी दिला. मास्कसह वैयक्तिक सुरक्षिततेसाठी अत्यावश्‍यक साहित्यांची (पीपीई किट्‌स) बेसुमार दराने होणारी विक्री रोखणे हा आदेशामागचा मुख्य उद्देश आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होत आहे, याची माहिती बाजारपेठेतून घेतली असता हा  निष्कर्ष निघाला.  इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘आदेश निघाल्यापासून नागरिक किंवा रुग्ण ‘एन ९५’ मास्कची चिठ्ठी द्यावी म्हणून दवाखान्यात आला नाही.’’ ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट’चे (सीएपीडी) सचिव अनिल बेलकर म्हणाले, ‘‘पुण्यातील औषधांच्या मुख्य बाजारपेठेत मास्क विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. मात्र, अद्यापपर्यंत कोणताही ग्राहक डॉक्‍टरांची चिठ्ठी घेऊन मास्क खरेदीसाठी आलेला नाही. त्यामुळे एकही मास्क औषधाच्या चिठ्ठीवर पुण्यातून विक्री झालेला नाही. चिठ्ठीवर मास्कची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याचे आम्ही स्वागत करू. औषध दुकानांशिवाय इतर दुकानांमधूनही इतर मास्कसह ‘एन ९५’ प्रकारच्या मास्कची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.’’ सरकारने मास्कचा समावेश ‘ड्रग्ज लायसन्स’मध्ये करावा. त्यातून त्याच्या किमतीही नियंत्रणात राहतील. तसेच, इतर फक्त औषध दुकानांमधून डॉक्‍टरांच्या चिठ्ठीवरच त्याची विक्री करता येईल, असेही  त्यांनी सांगितले.  ‘एफडीए’चे सहायक आयुक्त राज चौधरी म्हणाले, ‘‘मास्कची साठेबाजी होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या भागात कसून तपासण्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवार पेठ, लष्कर भाग, टिळक रस्ता, उपनगरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी या तपासण्या करण्यात आल्या. यासाठी मास्कच्या घाऊक विक्रेत्यांच्या दोन बैठकाही घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये साठेबाजी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मास्क हे औषध नाही. त्यामुळे त्याची विक्री औषध परवान्याने होत नाही. काही ठिकाणी मास्कवर छापील किमतीही दिसल्या नाहीत.’’ मास्कच्या साठेबाजीला प्रतिबंध करण्यासाठी तपासणी सुरू केली आहे. मास्कचा तुटवडा होणार नाही, याची काळजी घेण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच, मास्कवरील ‘एमआरपी’पेक्षा जास्त किमती विक्री न करण्याचे सांगितले आहे. तसेच, मास्क आवश्‍यक त्या रुग्णांनाच देण्याचेही बैठक घेऊन सांगण्यात आले आहे. - एस. बी. पाटील, सहआयुक्त, पुणे विभाग, अन्न व औषध प्रशासन.  पुण्यातील साठा  ‘एन ९५’ मास्क  - १५ हजार ८०० तीनपदरी मास्क  - २४ हजार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 8, 2020

‘मास्क’साठी कोणी डॉक्‍टरांकडे फिरकेना पुणे - डॉक्‍टरांच्या चिठ्ठीवरच ‘एन ९५’ मास्क विक्री करण्याचा सरकारचा आदेश पुण्यात फक्त कागदावरच असल्याचे दिसून आले. कोणीही रुग्ण मास्क मिळावा म्हणून डॉक्‍टरांकडे फिरकला नाही. तसेच, मास्क विक्री आता औषध दुकानांसह सर्वत्र सुरू झाल्याचे दिसले. त्यामुळे मास्कच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) प्रयत्नांनाही मर्यादा आल्याचे स्पष्ट झाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय राज्यात ‘एन ९५’ मास्कची विक्री करण्यावर बंदी घालणारा आदेश ‘एफडीए’ने गुरुवारी दिला. मास्कसह वैयक्तिक सुरक्षिततेसाठी अत्यावश्‍यक साहित्यांची (पीपीई किट्‌स) बेसुमार दराने होणारी विक्री रोखणे हा आदेशामागचा मुख्य उद्देश आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होत आहे, याची माहिती बाजारपेठेतून घेतली असता हा  निष्कर्ष निघाला.  इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘आदेश निघाल्यापासून नागरिक किंवा रुग्ण ‘एन ९५’ मास्कची चिठ्ठी द्यावी म्हणून दवाखान्यात आला नाही.’’ ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट’चे (सीएपीडी) सचिव अनिल बेलकर म्हणाले, ‘‘पुण्यातील औषधांच्या मुख्य बाजारपेठेत मास्क विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. मात्र, अद्यापपर्यंत कोणताही ग्राहक डॉक्‍टरांची चिठ्ठी घेऊन मास्क खरेदीसाठी आलेला नाही. त्यामुळे एकही मास्क औषधाच्या चिठ्ठीवर पुण्यातून विक्री झालेला नाही. चिठ्ठीवर मास्कची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याचे आम्ही स्वागत करू. औषध दुकानांशिवाय इतर दुकानांमधूनही इतर मास्कसह ‘एन ९५’ प्रकारच्या मास्कची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.’’ सरकारने मास्कचा समावेश ‘ड्रग्ज लायसन्स’मध्ये करावा. त्यातून त्याच्या किमतीही नियंत्रणात राहतील. तसेच, इतर फक्त औषध दुकानांमधून डॉक्‍टरांच्या चिठ्ठीवरच त्याची विक्री करता येईल, असेही  त्यांनी सांगितले.  ‘एफडीए’चे सहायक आयुक्त राज चौधरी म्हणाले, ‘‘मास्कची साठेबाजी होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या भागात कसून तपासण्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवार पेठ, लष्कर भाग, टिळक रस्ता, उपनगरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी या तपासण्या करण्यात आल्या. यासाठी मास्कच्या घाऊक विक्रेत्यांच्या दोन बैठकाही घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये साठेबाजी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मास्क हे औषध नाही. त्यामुळे त्याची विक्री औषध परवान्याने होत नाही. काही ठिकाणी मास्कवर छापील किमतीही दिसल्या नाहीत.’’ मास्कच्या साठेबाजीला प्रतिबंध करण्यासाठी तपासणी सुरू केली आहे. मास्कचा तुटवडा होणार नाही, याची काळजी घेण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच, मास्कवरील ‘एमआरपी’पेक्षा जास्त किमती विक्री न करण्याचे सांगितले आहे. तसेच, मास्क आवश्‍यक त्या रुग्णांनाच देण्याचेही बैठक घेऊन सांगण्यात आले आहे. - एस. बी. पाटील, सहआयुक्त, पुणे विभाग, अन्न व औषध प्रशासन.  पुण्यातील साठा  ‘एन ९५’ मास्क  - १५ हजार ८०० तीनपदरी मास्क  - २४ हजार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3aGsdV8

No comments:

Post a Comment