...म्हणून सिंधुदुर्गातील खवय्यांवर आली चिकन चिकन म्हणण्याची वेळ सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अफवांमुळे उद्ध्‌वस्त झालेला ब्रॉयलर कोंबडी विक्रीचा पोल्ट्री व्यवसाय सावरण्याच्या स्थितीत आहे. ब्रॉयलरला सध्या मागणी वाढली आहे; मात्र असलेला मालाची वाहतुक करणे कठीण बनल्याने चिकनचा तुटवडा सध्या सर्वत्र जाणवत आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पोल्ट्री व्यावसाईकांना प्रशासनाने संचारबंदीत वाहतुक परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.  कोरोना या विषाणुबाबत सोशल मिडीयावरुन अनेक अफवा उठवल्या गेल्या. यात नुकसान अनेकांना झाले. चीनमध्ये या विषाणुने थैमान घालण्यास सुरवात केली होती त्यावेळी सोशल मिडीयावर अफवाचा महापुर होता. याचा फटका मासे आणि ब्रॉयलर विक्रीला झाला. लोकांनी ब्रॉयलर पाठ फिरवली आणि हे व्यावसाईक रस्त्यावर आले. कोणी चिकनला विचारत नसल्याने अक्षरक्षः पोल्ट्रीमध्ये असलेल्या कोंबड्यांना खाद्य देणेच सोडून दिले. काहिंनी कवडीमोल किंमतीने विक्री केली. एकुणच या परिस्थितीत जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाईक आर्थिक ओझ्याखाली दाबला गेला. अनेकांनी कर्ज घेऊन व्यवसाय उभे केले होते. ते आज कर्जाच्या खाईत ढकलले गेले; मात्र आज स्थिती वेगळी आहे. कोरोना हा आजार ब्रॉयलरमुळे होत नसल्याचा दाखला आरोग्य विभाग तसेच डॉक्‍टरकडून देण्यात आला होता. शिवाय कोरोना या आजाराशी मुकाबला करण्यासाठी अंगात प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी मांस आवश्‍यक असल्याचे डॉक्‍टराकडून सांगण्यात आल्यामुळे हळूहळू ब्रॉयलर चिकनला मागणी वाढत आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता मागच्या पंधरा दिवसापर्यंत ब्रॉयलर चिकनकडे लोकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे बकरा मटन विक्रीला मोठी मागणी आली होती; मात्र आज स्थिती वेगळी आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ब्रॉयलरला मोठी मागणी वाढली आहे; मात्र अनेकांच्या पोल्ट्री रिकामी असल्याने ब्रॉयलर चिकनच तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात ब्रॉयलर चिकन मार्केट संचारबंदीच्या काळात बंद असल्याने ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसाईकाकडे शहरातील नागरिकांनी धाव घेत खरेदी सुरू केली. त्यामुळे काही व्यावसाईकांकडे शिल्लक असलेली कोंबडी संपल्याने आता "चिकन, चिकन' म्हणण्याची वेळ खवय्यांवर आली आहे. संचार बंदी असल्याने सर्वच दळणवळण बंद आहे, काहींनी आर्थिक संकटातही आपल्या पोल्ट्री सुरु ठेवल्या आहेत आज त्याच्याकडे ब्रॉयलर कोंबडी उपलब्ध आहेत; मात्र ती विक्रेत्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांना वाहतुक परवानगी नाही. संचारबदीत वाहतुकीवरही निर्बंध असल्याने त्यांना असलेली कोंबडी बाहेर काढण्यास प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यास ही कोंबडी विक्री करण्यास त्यांना मदत मिळणार आहे. आज अनेकजण घरातच अडकून आहेत. मासेसुद्धा मिळत नसल्याने ब्रॉयलरला मागणी वाढली तरी उत्पादनच नसल्याने सर्वत्र तुटवडा भासत आहे. पंचवीस, पन्नास, ऐंशी रुपयावर आलेले चिकन एकदम दोन दिवसात एकशे वीस रुपयावर आले आहे; मात्र वाहतुक ठप्प असल्याने घाटमाथ्यावरुनही कोंबडी येणे अशक्‍य झाले आहे.  ग्रामीण भागाचा विचार करता अनेकांनी गावठी, सुरती कोंबड्याच्या पोल्ट्री उघडल्या होत्या. या पोल्ट्री व्यावसायिकांना चांगला भाव आला असुन अनेकांनी पर्याय म्हणुन या कोंबड्याचे चिकन खाणे पसंत केले आहे. कोंबड्याना मागणी आहे; मात्र वाहतुक ठप्प असल्याने खाद्य मिळणे कठीण बनले आहे.  कोंबड्या आहेत; मात्र त्या विक्रेत्यांपर्यत पोहचविणे किंवा आमच्यापर्यंत येऊन त्या घेऊन जाणे संचारबंदीमुळे कठीण बनले आहे. असलेल्या कोंबडीना खाद्यही मिळत नाही. शिल्लक खाद्य पुरवून वापरले जात आहे. त्यामुळे कोंबडीचे वजन घटत आहे. आज पोल्ट्री व्यवसाय वाहतुकीला परवानगी दिल्यास संकटात सापडलेल्या व्यवसाय सावरेल.  - सुरेश शिर्के, शिरशिंगे, पोल्ट्री व्यावसाईक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 29, 2020

...म्हणून सिंधुदुर्गातील खवय्यांवर आली चिकन चिकन म्हणण्याची वेळ सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अफवांमुळे उद्ध्‌वस्त झालेला ब्रॉयलर कोंबडी विक्रीचा पोल्ट्री व्यवसाय सावरण्याच्या स्थितीत आहे. ब्रॉयलरला सध्या मागणी वाढली आहे; मात्र असलेला मालाची वाहतुक करणे कठीण बनल्याने चिकनचा तुटवडा सध्या सर्वत्र जाणवत आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पोल्ट्री व्यावसाईकांना प्रशासनाने संचारबंदीत वाहतुक परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.  कोरोना या विषाणुबाबत सोशल मिडीयावरुन अनेक अफवा उठवल्या गेल्या. यात नुकसान अनेकांना झाले. चीनमध्ये या विषाणुने थैमान घालण्यास सुरवात केली होती त्यावेळी सोशल मिडीयावर अफवाचा महापुर होता. याचा फटका मासे आणि ब्रॉयलर विक्रीला झाला. लोकांनी ब्रॉयलर पाठ फिरवली आणि हे व्यावसाईक रस्त्यावर आले. कोणी चिकनला विचारत नसल्याने अक्षरक्षः पोल्ट्रीमध्ये असलेल्या कोंबड्यांना खाद्य देणेच सोडून दिले. काहिंनी कवडीमोल किंमतीने विक्री केली. एकुणच या परिस्थितीत जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाईक आर्थिक ओझ्याखाली दाबला गेला. अनेकांनी कर्ज घेऊन व्यवसाय उभे केले होते. ते आज कर्जाच्या खाईत ढकलले गेले; मात्र आज स्थिती वेगळी आहे. कोरोना हा आजार ब्रॉयलरमुळे होत नसल्याचा दाखला आरोग्य विभाग तसेच डॉक्‍टरकडून देण्यात आला होता. शिवाय कोरोना या आजाराशी मुकाबला करण्यासाठी अंगात प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी मांस आवश्‍यक असल्याचे डॉक्‍टराकडून सांगण्यात आल्यामुळे हळूहळू ब्रॉयलर चिकनला मागणी वाढत आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता मागच्या पंधरा दिवसापर्यंत ब्रॉयलर चिकनकडे लोकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे बकरा मटन विक्रीला मोठी मागणी आली होती; मात्र आज स्थिती वेगळी आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ब्रॉयलरला मोठी मागणी वाढली आहे; मात्र अनेकांच्या पोल्ट्री रिकामी असल्याने ब्रॉयलर चिकनच तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात ब्रॉयलर चिकन मार्केट संचारबंदीच्या काळात बंद असल्याने ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसाईकाकडे शहरातील नागरिकांनी धाव घेत खरेदी सुरू केली. त्यामुळे काही व्यावसाईकांकडे शिल्लक असलेली कोंबडी संपल्याने आता "चिकन, चिकन' म्हणण्याची वेळ खवय्यांवर आली आहे. संचार बंदी असल्याने सर्वच दळणवळण बंद आहे, काहींनी आर्थिक संकटातही आपल्या पोल्ट्री सुरु ठेवल्या आहेत आज त्याच्याकडे ब्रॉयलर कोंबडी उपलब्ध आहेत; मात्र ती विक्रेत्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांना वाहतुक परवानगी नाही. संचारबदीत वाहतुकीवरही निर्बंध असल्याने त्यांना असलेली कोंबडी बाहेर काढण्यास प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यास ही कोंबडी विक्री करण्यास त्यांना मदत मिळणार आहे. आज अनेकजण घरातच अडकून आहेत. मासेसुद्धा मिळत नसल्याने ब्रॉयलरला मागणी वाढली तरी उत्पादनच नसल्याने सर्वत्र तुटवडा भासत आहे. पंचवीस, पन्नास, ऐंशी रुपयावर आलेले चिकन एकदम दोन दिवसात एकशे वीस रुपयावर आले आहे; मात्र वाहतुक ठप्प असल्याने घाटमाथ्यावरुनही कोंबडी येणे अशक्‍य झाले आहे.  ग्रामीण भागाचा विचार करता अनेकांनी गावठी, सुरती कोंबड्याच्या पोल्ट्री उघडल्या होत्या. या पोल्ट्री व्यावसायिकांना चांगला भाव आला असुन अनेकांनी पर्याय म्हणुन या कोंबड्याचे चिकन खाणे पसंत केले आहे. कोंबड्याना मागणी आहे; मात्र वाहतुक ठप्प असल्याने खाद्य मिळणे कठीण बनले आहे.  कोंबड्या आहेत; मात्र त्या विक्रेत्यांपर्यत पोहचविणे किंवा आमच्यापर्यंत येऊन त्या घेऊन जाणे संचारबंदीमुळे कठीण बनले आहे. असलेल्या कोंबडीना खाद्यही मिळत नाही. शिल्लक खाद्य पुरवून वापरले जात आहे. त्यामुळे कोंबडीचे वजन घटत आहे. आज पोल्ट्री व्यवसाय वाहतुकीला परवानगी दिल्यास संकटात सापडलेल्या व्यवसाय सावरेल.  - सुरेश शिर्के, शिरशिंगे, पोल्ट्री व्यावसाईक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WQItzh

No comments:

Post a Comment