पिंपरी महापालिकेत 'नो एंट्री' पिंपरी - वार मंगळवार... स्थळ महापालिका मुख्यालय... वेळ सकाळी नऊ ते दहा... प्रसंग कर्मचारी व अधिकारी कार्यालयात येऊ लागले. आवाराच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा कर्मचारी नेहमीप्रमाणे तैनात, तोंडाला मास्क लावलेले. पण, सर्वसामान्य नागरिकांना आत येण्यास मनाई करीत होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जात होता. हीच स्थिती मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळही होती. येणाऱ्या नागरिकांची नोंद करणारे सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे नोंदवही घेऊन बसलेले होते. काही जण एक मीटरपेक्षा अधिक अंतर ठेवून उभे होते. ‘चारपेक्षा जास्त जण जवळजवळ थांबू नका,’ अशा सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या जात होत्या. ‘मास्क लावा, ओळखपत्र दाखवा,’ असे सांगत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात होता. त्यांच्यासाठी प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सोय केलेली होती. ‘नागरिकांना प्रवेश बंद’ अशी सूचना लावलेली होती. ‘आज कोण भेटायला येणार आहे?’ अशा व्यक्तींची यादी विभागप्रमुखांनी सुरक्षारक्षकांकडे दिलेली होती. त्याची खातरजमा करून व संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच नागरिकांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे नेहमी गजबजाट असलेल्या महापालिका भवनात फक्त आणि फक्त अधिकारी, कर्मचारी आणि मोजकेच नगरसेवक दिसत होते. - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (ता. १६) सायंकाळी ‘कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणे व त्याचा प्रसार टाळण्यासाठी महापालिका मुख्य कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद’ करण्याबाबतचा आदेश प्रशासन विभागाला दिला. त्याची अंमलबजावणी मंगळवारी (ता. १७) सकाळपासून सुरू झाली. त्याबाबतच्या आदेशात म्हटले आहे की, महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणे आवश्‍यक आहे. महापालिकेत दैनंदिन व वैयक्तिक कामासाठी नागरिक, संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, समाजसेवक, ठेकेदार, त्यांच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यांना ३१ मार्चपर्यंत प्रवेश बंद करणे आवश्‍यक आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत अथवा कामकाजाच्या आवश्‍यकतेनुसार नागरिकांना मुख्य कार्यालयात येणे आवश्‍यक असल्यास प्रवेश देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा विभागाने संबंधितांना प्रवेश द्यावा. अटी व शर्ती     विभागप्रमुखांची लेखी परवानगी किंवा पास असावा     तोंडाला मास्क लावलेले असावे     मुख्यालयातील स्वच्छतागृहात जाऊन सॅनिटायझरचा वापर करावा किंवा साबन अथवा हॅंडवॉशने हात धुऊन अधिकाऱ्यांना भेटावे     काम झाल्यानंतर तत्काळ कार्यालय सोडावे     महापालिका, क्षेत्रीय व अन्य विभागांना पाठवावयाचे अत्यंत तातडीचे टपाल केवळ संबंधित विभागाच्या ई-मेलद्वारे पाठवावे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 17, 2020

पिंपरी महापालिकेत 'नो एंट्री' पिंपरी - वार मंगळवार... स्थळ महापालिका मुख्यालय... वेळ सकाळी नऊ ते दहा... प्रसंग कर्मचारी व अधिकारी कार्यालयात येऊ लागले. आवाराच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा कर्मचारी नेहमीप्रमाणे तैनात, तोंडाला मास्क लावलेले. पण, सर्वसामान्य नागरिकांना आत येण्यास मनाई करीत होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जात होता. हीच स्थिती मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळही होती. येणाऱ्या नागरिकांची नोंद करणारे सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे नोंदवही घेऊन बसलेले होते. काही जण एक मीटरपेक्षा अधिक अंतर ठेवून उभे होते. ‘चारपेक्षा जास्त जण जवळजवळ थांबू नका,’ अशा सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या जात होत्या. ‘मास्क लावा, ओळखपत्र दाखवा,’ असे सांगत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात होता. त्यांच्यासाठी प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सोय केलेली होती. ‘नागरिकांना प्रवेश बंद’ अशी सूचना लावलेली होती. ‘आज कोण भेटायला येणार आहे?’ अशा व्यक्तींची यादी विभागप्रमुखांनी सुरक्षारक्षकांकडे दिलेली होती. त्याची खातरजमा करून व संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच नागरिकांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे नेहमी गजबजाट असलेल्या महापालिका भवनात फक्त आणि फक्त अधिकारी, कर्मचारी आणि मोजकेच नगरसेवक दिसत होते. - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (ता. १६) सायंकाळी ‘कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणे व त्याचा प्रसार टाळण्यासाठी महापालिका मुख्य कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद’ करण्याबाबतचा आदेश प्रशासन विभागाला दिला. त्याची अंमलबजावणी मंगळवारी (ता. १७) सकाळपासून सुरू झाली. त्याबाबतच्या आदेशात म्हटले आहे की, महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणे आवश्‍यक आहे. महापालिकेत दैनंदिन व वैयक्तिक कामासाठी नागरिक, संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, समाजसेवक, ठेकेदार, त्यांच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यांना ३१ मार्चपर्यंत प्रवेश बंद करणे आवश्‍यक आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत अथवा कामकाजाच्या आवश्‍यकतेनुसार नागरिकांना मुख्य कार्यालयात येणे आवश्‍यक असल्यास प्रवेश देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा विभागाने संबंधितांना प्रवेश द्यावा. अटी व शर्ती     विभागप्रमुखांची लेखी परवानगी किंवा पास असावा     तोंडाला मास्क लावलेले असावे     मुख्यालयातील स्वच्छतागृहात जाऊन सॅनिटायझरचा वापर करावा किंवा साबन अथवा हॅंडवॉशने हात धुऊन अधिकाऱ्यांना भेटावे     काम झाल्यानंतर तत्काळ कार्यालय सोडावे     महापालिका, क्षेत्रीय व अन्य विभागांना पाठवावयाचे अत्यंत तातडीचे टपाल केवळ संबंधित विभागाच्या ई-मेलद्वारे पाठवावे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2UsKz5V

No comments:

Post a Comment