...तरीही सिंधुदुर्गात दक्षतेचा इशारा ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अद्याप एकही कोरोना बाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यातील आरोग्य, जिल्हा परिषद, महसुल, पोलिस व आरटीओ अशी सर्वच यंत्रणा यासाठी प्रयत्न करीत आहे. कोरोना बाधित देशातून आलेल्या पर्यटकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील कोरोना व्हायरस विलीनीकरण कक्षाला आज सायंकाळी भेट दिली. यानंतर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक दालनात पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांच्या समवेत कोल्हापुर येथील आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंत बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश नलावडे आदी उपस्थित होते.  डॉ. चाकूरकर म्हणाले, ""जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात येत असून त्यांच्या प्रवासाविषयीची माहितीही घेण्यात येत आहे. अशा तपासणीमध्ये जर कोणी बाधित क्षेत्रातून आला असल्यास त्यास ताबडतोब निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. तपासणी अंतर्गत जिल्ह्यात तैनात आरोग्य पथकामार्फत आतापर्यंत 816 प्रवाशांची तपासणी केली असून आरोग्य संस्थेमार्फत 517 जणांची तपासणी केली आहे. यामध्ये एकही व्यक्ती कोरोनासदृष्य असल्याचे दिसून आलेले नाही. ज्या व्यक्ती निरीक्षणाखाली ठेवले त्यांच्या हातावर शिक्का मारलेला असून अशा व्यक्तींची ओळख पटवणे सोपे जाणार आहे. याविषयी राज्य शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे.''  ते म्हणाले, ""कोरोना साथ रोगाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाची 10 पथके जिल्ह्याच्या विविध तपासणी नाक्‍यांवर तैनात केली आहेत. कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवली रेल्वेस्थानक व बस स्थानकांवर आरोग्य पथके तैनात केली आहेत. महसूल विभागाकडूनही जिल्ह्याबाहेरील प्रवाशांची माहिती घेण्यात येत आहे. मंडळ अधिकारी स्तरावर ही माहिती घेतली जात आहे. पोलीस प्रशासनातर्फे पोलीस स्टेशन स्तरावरही माहिती घेतली जात असून प्रादेशिक परिवहन विभागाकडून आरोंदा आणि इन्सुली तपासणी नाक्‍यावर राज्या बाहेरून विशेषतः गोवा राज्यातून येणाऱ्या सर्व पर्यटकांची माहिती घेतली जात आहे. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत पातळीवरही परदेशातून तसेच बाधीत क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे. जे प्रवासी बाधीत राज्यातून तसेच परदेशातून आले आहेत त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास व आरोग्य यंत्रणेस दिली जात असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याबाबत सर्वत्या उपायययोजना केल्या आहेत.''  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. बोरसे यांनी जिल्ह्यात भेट देऊन केलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली. कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी केले.  20 जण निरीक्षणाखाली  कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या 20 व्यक्ती निरीक्षणाखाली आहेत. यातील 5 जर्मनीचे नागरिक आहेत. उर्वरित 15 जिल्ह्यातील आहेत. या जर्मनीच्या पाच नागरिकांना रिसॉर्टमध्ये सेवा देणाऱ्या 8 कामगारांची तपासणी केल्याचे सांगितले.    31 मार्चपर्यंतची लग्ने रजिस्टर  जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी आठवडा बाजार बंद केले आहेत. पर्यटक हॉटेल व्यावसायिकांना नवीन बुकिंग न घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच 31 मार्चपर्यंत होणारी लग्ने रजिस्टर करावी. 10 ते 15 नागरिकांनी उपस्थित राहून लग्नाचे विधि करावेत, असेही आवाहन केले आहे.  बचतगटांना मास्कचा ठेका  मंजुलक्ष्मी यांनी, जिल्ह्यात मास्कचा तुटवडा जाणवत आहे. त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी बचत गटांना ठेका देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी उमेद व महिला विकास मंडळ यांच्याशी बोलणे सुरु आहे, असे सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 17, 2020

...तरीही सिंधुदुर्गात दक्षतेचा इशारा ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अद्याप एकही कोरोना बाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यातील आरोग्य, जिल्हा परिषद, महसुल, पोलिस व आरटीओ अशी सर्वच यंत्रणा यासाठी प्रयत्न करीत आहे. कोरोना बाधित देशातून आलेल्या पर्यटकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील कोरोना व्हायरस विलीनीकरण कक्षाला आज सायंकाळी भेट दिली. यानंतर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक दालनात पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांच्या समवेत कोल्हापुर येथील आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंत बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश नलावडे आदी उपस्थित होते.  डॉ. चाकूरकर म्हणाले, ""जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात येत असून त्यांच्या प्रवासाविषयीची माहितीही घेण्यात येत आहे. अशा तपासणीमध्ये जर कोणी बाधित क्षेत्रातून आला असल्यास त्यास ताबडतोब निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. तपासणी अंतर्गत जिल्ह्यात तैनात आरोग्य पथकामार्फत आतापर्यंत 816 प्रवाशांची तपासणी केली असून आरोग्य संस्थेमार्फत 517 जणांची तपासणी केली आहे. यामध्ये एकही व्यक्ती कोरोनासदृष्य असल्याचे दिसून आलेले नाही. ज्या व्यक्ती निरीक्षणाखाली ठेवले त्यांच्या हातावर शिक्का मारलेला असून अशा व्यक्तींची ओळख पटवणे सोपे जाणार आहे. याविषयी राज्य शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे.''  ते म्हणाले, ""कोरोना साथ रोगाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाची 10 पथके जिल्ह्याच्या विविध तपासणी नाक्‍यांवर तैनात केली आहेत. कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवली रेल्वेस्थानक व बस स्थानकांवर आरोग्य पथके तैनात केली आहेत. महसूल विभागाकडूनही जिल्ह्याबाहेरील प्रवाशांची माहिती घेण्यात येत आहे. मंडळ अधिकारी स्तरावर ही माहिती घेतली जात आहे. पोलीस प्रशासनातर्फे पोलीस स्टेशन स्तरावरही माहिती घेतली जात असून प्रादेशिक परिवहन विभागाकडून आरोंदा आणि इन्सुली तपासणी नाक्‍यावर राज्या बाहेरून विशेषतः गोवा राज्यातून येणाऱ्या सर्व पर्यटकांची माहिती घेतली जात आहे. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत पातळीवरही परदेशातून तसेच बाधीत क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे. जे प्रवासी बाधीत राज्यातून तसेच परदेशातून आले आहेत त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास व आरोग्य यंत्रणेस दिली जात असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याबाबत सर्वत्या उपायययोजना केल्या आहेत.''  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. बोरसे यांनी जिल्ह्यात भेट देऊन केलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली. कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी केले.  20 जण निरीक्षणाखाली  कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या 20 व्यक्ती निरीक्षणाखाली आहेत. यातील 5 जर्मनीचे नागरिक आहेत. उर्वरित 15 जिल्ह्यातील आहेत. या जर्मनीच्या पाच नागरिकांना रिसॉर्टमध्ये सेवा देणाऱ्या 8 कामगारांची तपासणी केल्याचे सांगितले.    31 मार्चपर्यंतची लग्ने रजिस्टर  जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी आठवडा बाजार बंद केले आहेत. पर्यटक हॉटेल व्यावसायिकांना नवीन बुकिंग न घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच 31 मार्चपर्यंत होणारी लग्ने रजिस्टर करावी. 10 ते 15 नागरिकांनी उपस्थित राहून लग्नाचे विधि करावेत, असेही आवाहन केले आहे.  बचतगटांना मास्कचा ठेका  मंजुलक्ष्मी यांनी, जिल्ह्यात मास्कचा तुटवडा जाणवत आहे. त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी बचत गटांना ठेका देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी उमेद व महिला विकास मंडळ यांच्याशी बोलणे सुरु आहे, असे सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38YxNBd

No comments:

Post a Comment