जिल्हा परिषद शिक्षण सभापतींसह 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा सातारा : खोटा ठराव व बनावट कागदपत्रे तयार करून संस्थेची जागा व विकसकाला एक कोटी रुपये देऊन फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा सहकार बोर्डाच्या संचालकांसह 14 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये माणच्या माजी आमदारांसह सध्याच्या शिक्षण सभापतींचाही समावेश आहे.   विजय हणमंत शिंदे (रा. गोरखपूर, पिरवाडी), विठ्ठल तुकाराम निकम (रा. न्हावी बुद्रुक, ता. कोरेगाव), मधुकर दिनकर नलावडे (रा. वाढे, ता. सातारा), शिवाजीराव संभाजीराव ढमाळ (रा. पारगाव, ता. खंडाळा), महादेव बापू दुधाने (रा. धामणी, ता. पाटण), मानसिंगराव वसंतराव जगदाळे (रा. मसूर, ता. कऱ्हाड), राजेंद्र ऊर्फ विकास दगडू पवार (रा. धामणी, ता. पाटण), (कै.) तुकाराम नामदेव तुपे (रा. इंजबाव, ता. माण), राजाराम बाबूराव कदम (रा. गिरवी, ता. फलटण), रत्नमाल सुदाम निकम (रा. शाहुनगर), सूर्यकांत तुकाराम महामूलकर (रा. दरे बुद्रुक, ता. जावळी), सुनील शशिकांत बाबर (रा. उडतारे, ता. वाई), सुधाकर वामन सावंत (रा. विसापूर, ता. खटाव) व सुनीता बाळासो माने (रा. काळचौंडी, ता. माण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.   याबबात धनंजय सर्जेराव शेडगे (रा. अजिंक्‍य कॉलनी, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दोन ते 14 क्रमांकाच्या संशयितांनी संगनमत करून जिल्हा सहकारी बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग बंद झाल्यानंतर ऐनवेळच्या विषयात मालमत्ता हस्तांतरणाबाबत ठराव (नं. 10 अ व 10 ब) लिहिला. त्याद्वारे पहिल्या (क्रमांक 1) संशयिताला आर्थिक लाभ होईल, अशा पद्धतीने प्रोसिडिंगमध्ये फेरबदल केले. या संशयितांनी खोट्या कागदपत्रावरून, संस्थेची कोणतीही मान्यता नसताना संस्थेच्या रेकॉर्डमध्ये कर्ज काढून, विजय शिंदे यांना व्यावसायिकरीत्या दर्जा न देता विकासक म्हणून एक कोटी रुपये दिले. वास्तविक विकासक हा स्वत: खर्च करून इमारत पूर्ण करतो; परंतु संशयितांनी (क्रमांक दोन ते 14) विजय शिंदे यांना विकासक म्हणून नेमून स्वत:च पैसे देऊन खोटा व बेकायदेशीर विकसन करारनामा व कुलमुखत्यार करून संस्थेची कोट्यवधी रुपयांची जागा त्याच्या ताब्यात दिली. विजय शिंदे यांनी अन्य संशयितांना हाताशी धरून संस्थेच्या इमारतीचा ताबा दिला नाही. सहायक पोलिस निरीक्षक बधे तपास करत आहेत.  Coronavirus : सातारा जिल्ह्यातील प्रत्येकासाठी महत्वपुर्ण बातमी Coronavirus : मुस्लिम समाजाचा संदेश; सर्वांपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 19, 2020

जिल्हा परिषद शिक्षण सभापतींसह 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा सातारा : खोटा ठराव व बनावट कागदपत्रे तयार करून संस्थेची जागा व विकसकाला एक कोटी रुपये देऊन फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा सहकार बोर्डाच्या संचालकांसह 14 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये माणच्या माजी आमदारांसह सध्याच्या शिक्षण सभापतींचाही समावेश आहे.   विजय हणमंत शिंदे (रा. गोरखपूर, पिरवाडी), विठ्ठल तुकाराम निकम (रा. न्हावी बुद्रुक, ता. कोरेगाव), मधुकर दिनकर नलावडे (रा. वाढे, ता. सातारा), शिवाजीराव संभाजीराव ढमाळ (रा. पारगाव, ता. खंडाळा), महादेव बापू दुधाने (रा. धामणी, ता. पाटण), मानसिंगराव वसंतराव जगदाळे (रा. मसूर, ता. कऱ्हाड), राजेंद्र ऊर्फ विकास दगडू पवार (रा. धामणी, ता. पाटण), (कै.) तुकाराम नामदेव तुपे (रा. इंजबाव, ता. माण), राजाराम बाबूराव कदम (रा. गिरवी, ता. फलटण), रत्नमाल सुदाम निकम (रा. शाहुनगर), सूर्यकांत तुकाराम महामूलकर (रा. दरे बुद्रुक, ता. जावळी), सुनील शशिकांत बाबर (रा. उडतारे, ता. वाई), सुधाकर वामन सावंत (रा. विसापूर, ता. खटाव) व सुनीता बाळासो माने (रा. काळचौंडी, ता. माण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.   याबबात धनंजय सर्जेराव शेडगे (रा. अजिंक्‍य कॉलनी, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दोन ते 14 क्रमांकाच्या संशयितांनी संगनमत करून जिल्हा सहकारी बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग बंद झाल्यानंतर ऐनवेळच्या विषयात मालमत्ता हस्तांतरणाबाबत ठराव (नं. 10 अ व 10 ब) लिहिला. त्याद्वारे पहिल्या (क्रमांक 1) संशयिताला आर्थिक लाभ होईल, अशा पद्धतीने प्रोसिडिंगमध्ये फेरबदल केले. या संशयितांनी खोट्या कागदपत्रावरून, संस्थेची कोणतीही मान्यता नसताना संस्थेच्या रेकॉर्डमध्ये कर्ज काढून, विजय शिंदे यांना व्यावसायिकरीत्या दर्जा न देता विकासक म्हणून एक कोटी रुपये दिले. वास्तविक विकासक हा स्वत: खर्च करून इमारत पूर्ण करतो; परंतु संशयितांनी (क्रमांक दोन ते 14) विजय शिंदे यांना विकासक म्हणून नेमून स्वत:च पैसे देऊन खोटा व बेकायदेशीर विकसन करारनामा व कुलमुखत्यार करून संस्थेची कोट्यवधी रुपयांची जागा त्याच्या ताब्यात दिली. विजय शिंदे यांनी अन्य संशयितांना हाताशी धरून संस्थेच्या इमारतीचा ताबा दिला नाही. सहायक पोलिस निरीक्षक बधे तपास करत आहेत.  Coronavirus : सातारा जिल्ह्यातील प्रत्येकासाठी महत्वपुर्ण बातमी Coronavirus : मुस्लिम समाजाचा संदेश; सर्वांपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3be4lbI

No comments:

Post a Comment