अबब...सिंधुदुर्गातील `त्या` दहा लाख कोंबड्यांचे करायचे काय? कणकवली (सिंधुदुर्ग) - "कोरोना' व्हायरसच्या अफवेमुळे जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मवर गंडांतर आले असून पोल्ट्री व्यावसायिकांकडे तब्बल 10 लाख कोंबड्या पडून आहेत. जिल्ह्यातील चिकन विक्रेते वीस रूपये दराने देखील या कोंबड्या घ्यायला तयार नाहीत. दुसरीकडे पोल्ट्रीतील कोंबड्या जगविण्यासाठी हजारो रूपये खर्च येतोय. त्यामुळे पोल्ट्रीतील या कोंबड्यांचे करायचे काय? असा प्रश्‍न पोल्ट्री व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे.  सिंधुदुर्गातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला पूरक म्हणून पोल्ट्री उद्योगाकडे धाव घेतली. गेल्या पंधरा-वीस वर्षात प्रामुख्याने माणगांव खोऱ्यात पोल्ट्री व्यवसाय बहरला. जिल्ह्यात 12 ते 15 लाखापर्यंत पक्षी निर्माण होऊ लागले. जिल्ह्यातच चिकनला मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याने पोल्ट्री फॉर्मस आणि या उद्योगाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशा सुमारे एक हजार कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. जिल्ह्यात जवळपास 1000 ते 1200 छोटे मोठे पोल्ट्री फॉर्मस आहेत.  साधारणतः 40 ते 45 दिवसांत एक किलोचा पक्षी तयार करण्यासाठी प्रत्येक पक्ष्यामागे पोल्ट्रीधारकाला 60 ते 65 रुपये खर्च येत होता. या पक्ष्याला बाजारात 80 ते 90 रुपये प्रति पक्षीप्रमाणे दर मिळत होता. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत हे सारे सुरळीत सुरू होते. मात्र मार्च महिना सुरू होताच कोरोना व्हायरस मांसाहारातून पसरत असल्याची अफवा पसरली आणि जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योगाला घरघर सुरू झाली.  परजिल्ह्यातील विक्रेत्यांमुळे कोंडी  कोकणच्या तुलनेत विदर्भ, मराठवाड्यात कोरोनाची अफवा फेब्रुवारीत सुरू झाली. त्यामुळे तेथील चिकनचे दर 10 रुपयापर्यंत खाली आले. त्यापाठोपाठ पश्‍चिम महाराष्ट्रातही चिकनचे दर घसरले. कोल्हापूर, सांगली येथील चिकन व्यापाऱ्यांनी तर अवघ्या पाच ते दहा रूपये किलो दराने कोंबड्या सिंधुदुर्गात आणून विकण्यास प्रारंभ केला. त्यामुळे सिंधुदुर्गातील पोल्ट्री उद्योजकांकडील चिकनची मागणी अचानकपणे थांबली. जिल्हाबाहेर देखील चिकनला मागणी नसल्याने इथल्या पोल्ट्रीधारकांची पुरती कोंडी झाली आहे.  विक्रेते-उत्पादकांत समन्वय आवश्‍यक  मांसाहारातून कोरोना व्हायरस पसरत असल्याची अफवा असली तरी जिल्ह्यातील चिकन खवैय्यांवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. जेथे जेथे चिकनचे सेल लागत आहेत, तेथे चिकन खरेदीसाठी खवैय्यांच्या उडया पडत आहेत. त्यामुळे चिकनला ग्राहकांकडून अजूनही मागणी आहे. या अनुषंगाने माणगांव येथील पोल्ट्री उद्योजक कृष्णा धुरी यांनी जिल्ह्यातील बाजारपेठांत अल्प किंमतीत कोंबड्या उपलब्ध करून दिल्या. त्याला ग्राहकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला. याचधर्तीवर जिल्ह्यात उत्पादीत होणाऱ्या कोंबड्या जिल्ह्यातील चिकन विक्रेत्यांनी खरेदी केल्या, तरी सिंधुदुर्गातील पोल्ट्री व्यवसाय तग धरू शकतो; मात्र असा समन्वय घडवून आणण्यामध्ये कुठल्याही राजकीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतलेला नाही. किंबहुना तशी यंत्रणा देखील शासकीय पातळीवर नसल्याने जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायाला घरघर लागली आहे.  उद्योजकांच्या रोजगारावर संक्रांत  सिंधुदुर्गातील जवळपास 1000 ते 1200 पोल्ट्रीधारकांच्या माध्यमातून महिन्याला 10 ते 12 कोटींची उलाढाल होत होती. मात्र परजिल्ह्यातील चिकन व्यापाऱ्यांनी दहा रूपये किलोपर्यंत चिकनचे दर खाली आणल्याने जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योगाची उलाढाल ठप्प झाली असून या पोल्ट्री उद्योजकांवर संक्रांत आली आहे. निव्वळ पोल्ट्रीवरच चरितार्थ असणाऱ्या अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली असून आता कुठला उद्योग करायचा असाही प्रश्‍न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.  सिंधुदुर्गात 10 ते 12 कोटींची उलाढाल असलेला पोल्ट्री व्यवसाय आज कोरोना अफवेमुळे ठप्प झाला आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासनाने किमान मदतीचा हात देणे आवश्‍यक आहे. सद्यःस्थितीत ठप्प पडलेल्या या उद्यागोवर शेकडो कुटुंबांचा चरितार्थ अवलंबून आहे याचा शासनाने विचार करायला हवा.  - कृष्णा धुरी, पोल्ट्री उद्योजक माणगाव  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 13, 2020

अबब...सिंधुदुर्गातील `त्या` दहा लाख कोंबड्यांचे करायचे काय? कणकवली (सिंधुदुर्ग) - "कोरोना' व्हायरसच्या अफवेमुळे जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मवर गंडांतर आले असून पोल्ट्री व्यावसायिकांकडे तब्बल 10 लाख कोंबड्या पडून आहेत. जिल्ह्यातील चिकन विक्रेते वीस रूपये दराने देखील या कोंबड्या घ्यायला तयार नाहीत. दुसरीकडे पोल्ट्रीतील कोंबड्या जगविण्यासाठी हजारो रूपये खर्च येतोय. त्यामुळे पोल्ट्रीतील या कोंबड्यांचे करायचे काय? असा प्रश्‍न पोल्ट्री व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे.  सिंधुदुर्गातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला पूरक म्हणून पोल्ट्री उद्योगाकडे धाव घेतली. गेल्या पंधरा-वीस वर्षात प्रामुख्याने माणगांव खोऱ्यात पोल्ट्री व्यवसाय बहरला. जिल्ह्यात 12 ते 15 लाखापर्यंत पक्षी निर्माण होऊ लागले. जिल्ह्यातच चिकनला मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याने पोल्ट्री फॉर्मस आणि या उद्योगाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशा सुमारे एक हजार कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. जिल्ह्यात जवळपास 1000 ते 1200 छोटे मोठे पोल्ट्री फॉर्मस आहेत.  साधारणतः 40 ते 45 दिवसांत एक किलोचा पक्षी तयार करण्यासाठी प्रत्येक पक्ष्यामागे पोल्ट्रीधारकाला 60 ते 65 रुपये खर्च येत होता. या पक्ष्याला बाजारात 80 ते 90 रुपये प्रति पक्षीप्रमाणे दर मिळत होता. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत हे सारे सुरळीत सुरू होते. मात्र मार्च महिना सुरू होताच कोरोना व्हायरस मांसाहारातून पसरत असल्याची अफवा पसरली आणि जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योगाला घरघर सुरू झाली.  परजिल्ह्यातील विक्रेत्यांमुळे कोंडी  कोकणच्या तुलनेत विदर्भ, मराठवाड्यात कोरोनाची अफवा फेब्रुवारीत सुरू झाली. त्यामुळे तेथील चिकनचे दर 10 रुपयापर्यंत खाली आले. त्यापाठोपाठ पश्‍चिम महाराष्ट्रातही चिकनचे दर घसरले. कोल्हापूर, सांगली येथील चिकन व्यापाऱ्यांनी तर अवघ्या पाच ते दहा रूपये किलो दराने कोंबड्या सिंधुदुर्गात आणून विकण्यास प्रारंभ केला. त्यामुळे सिंधुदुर्गातील पोल्ट्री उद्योजकांकडील चिकनची मागणी अचानकपणे थांबली. जिल्हाबाहेर देखील चिकनला मागणी नसल्याने इथल्या पोल्ट्रीधारकांची पुरती कोंडी झाली आहे.  विक्रेते-उत्पादकांत समन्वय आवश्‍यक  मांसाहारातून कोरोना व्हायरस पसरत असल्याची अफवा असली तरी जिल्ह्यातील चिकन खवैय्यांवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. जेथे जेथे चिकनचे सेल लागत आहेत, तेथे चिकन खरेदीसाठी खवैय्यांच्या उडया पडत आहेत. त्यामुळे चिकनला ग्राहकांकडून अजूनही मागणी आहे. या अनुषंगाने माणगांव येथील पोल्ट्री उद्योजक कृष्णा धुरी यांनी जिल्ह्यातील बाजारपेठांत अल्प किंमतीत कोंबड्या उपलब्ध करून दिल्या. त्याला ग्राहकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला. याचधर्तीवर जिल्ह्यात उत्पादीत होणाऱ्या कोंबड्या जिल्ह्यातील चिकन विक्रेत्यांनी खरेदी केल्या, तरी सिंधुदुर्गातील पोल्ट्री व्यवसाय तग धरू शकतो; मात्र असा समन्वय घडवून आणण्यामध्ये कुठल्याही राजकीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतलेला नाही. किंबहुना तशी यंत्रणा देखील शासकीय पातळीवर नसल्याने जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायाला घरघर लागली आहे.  उद्योजकांच्या रोजगारावर संक्रांत  सिंधुदुर्गातील जवळपास 1000 ते 1200 पोल्ट्रीधारकांच्या माध्यमातून महिन्याला 10 ते 12 कोटींची उलाढाल होत होती. मात्र परजिल्ह्यातील चिकन व्यापाऱ्यांनी दहा रूपये किलोपर्यंत चिकनचे दर खाली आणल्याने जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योगाची उलाढाल ठप्प झाली असून या पोल्ट्री उद्योजकांवर संक्रांत आली आहे. निव्वळ पोल्ट्रीवरच चरितार्थ असणाऱ्या अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली असून आता कुठला उद्योग करायचा असाही प्रश्‍न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.  सिंधुदुर्गात 10 ते 12 कोटींची उलाढाल असलेला पोल्ट्री व्यवसाय आज कोरोना अफवेमुळे ठप्प झाला आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासनाने किमान मदतीचा हात देणे आवश्‍यक आहे. सद्यःस्थितीत ठप्प पडलेल्या या उद्यागोवर शेकडो कुटुंबांचा चरितार्थ अवलंबून आहे याचा शासनाने विचार करायला हवा.  - कृष्णा धुरी, पोल्ट्री उद्योजक माणगाव  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2TOz21t

No comments:

Post a Comment