Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 18, 2020

LIVE: दिल्ली और उत्तर भारत के कुछ हिस्सों में भारी बारिश, असम में बाढ़ से तबाही https://ift.tt/2ZJvhNY
कोरोना से बिगड़े हालात, भारत में शुरू हुआ वायरस का कम्युनिटी स्प्रेडः IMA https://ift.tt/2DUjGD3
नए म्यूजिक वीडियो को लेकर एक्साइटेड सिद्धार्थ, बताया कब होगा रिलीज https://ift.tt/2WBQIyt
कोरोना: टीव्ही मालिकांचे नवे एपिसोड्स ऑन एअर, कसं आहे पडद्यामागचं न्यू नॉर्मल?
अफगाणी महिलांना चारचौघांत स्वतःचं नाव सांगण्यासाठी का करावा लागतोय संघर्ष?
‘अमेरिकेच्या निवडणुकीत चीन, रशियाचा हस्तक्षेप’

वॉशिंग्टन - अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीन आणि रशियाकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप  डेमोक्रॅटिक पक्षाचे संभावित उमेदवार जो बाइडन यांनी शनिवारी केला. निवडणुकीसाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी बाइडन यांनी एक डिजिटल कार्यक्रम घेतला.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या वेळी त्यांनी हा धक्कादायक आरोप केला. गुप्तचर यंत्रणांकडून याबाबत आपल्याला माहिती मिळाल्याचे सांगत त्यांनी कोणतेही पुरावे देण्यास टाळले.
रशिया आणि चीन या दोन्ही देशांकडून अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही देशांकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. व्हाइट हाउस आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदने मात्र बाइडेन यांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या वेळी त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही आरोप केले. ट्रम्प डाक विभागाच्या व्यवहारांवर निर्बंध घालू शकतात. त्यामुळे टपाली मतदान होऊ नये, असे ते म्हणाले.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘अमेरिकेच्या निवडणुकीत चीन, रशियाचा हस्तक्षेप’ वॉशिंग्टन - अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीन आणि रशियाकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप  डेमोक्रॅटिक पक्षाचे संभावित उमेदवार जो बाइडन यांनी शनिवारी केला. निवडणुकीसाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी बाइडन यांनी एक डिजिटल कार्यक्रम घेतला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या वेळी त्यांनी हा धक्कादायक आरोप केला. गुप्तचर यंत्रणांकडून याबाबत आपल्याला माहिती मिळाल्याचे सांगत त्यांनी कोणतेही पुरावे देण्यास टाळले. रशिया आणि चीन या दोन्ही देशांकडून अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही देशांकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. व्हाइट हाउस आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदने मात्र बाइडेन यांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या वेळी त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही आरोप केले. ट्रम्प डाक विभागाच्या व्यवहारांवर निर्बंध घालू शकतात. त्यामुळे टपाली मतदान होऊ नये, असे ते म्हणाले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fHztmX
Read More
तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवतीचा पोलिसाने केला विनयभंग

नागपूर : फेसबुकवर अश्‍लील मॅसेज येत असल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका युवतीला चक्‍क पोलिस कर्मचाऱ्यानेच शारीरिक संबंधाची मागणी करीत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटून युवतीने पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. या प्रकरणाची नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी गांभीर्याने दखल घेतली. पोलिस कर्मचारी तुलाराम चटप याच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 25 वर्षीय युवती ही अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या फेसबुक पानावर अश्‍लील संदेश मिळाले. याविरुद्ध तिने 9 जुलैला अरोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ती तक्रार सायबर सेलकडे वर्ग केली. तिने चौकशी केली असता अरोलीच्या ठाणेदारांनी पुढील तपास सायबर सेलकडून होत असल्याची माहिती दिली. 

तिने 14 जुलैला नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल कक्ष गाठले. त्या ठिकाणी तिची भेट पोलिस शिपाई तुलाराम चटप याच्याशी झाली. त्याने तिची मदत करण्याच्या निमित्ताने गुरुवार, 16 जुलैला संध्याकाळी ग्रामीण पोलिस मुख्यालय परिसरातील आपल्या शासकीय निवासस्थानी बोलवले. त्या ठिकाणी दुसरे कार्यालय असावे, या भावनेतून पीडित महिला त्याच्या घरी पोहोचली. 

आरोपीने गुन्ह्याचा छडा लावून तिला दिलासा देण्याकरिता तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार दिला असता त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ती कशीबशी त्याच्या तावडीतून सुटली व अधीक्षक कार्यालय गाठले. या घटनेची माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब तिला कपिलनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पाठवले व आरोपी शिपायाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. अधीक्षकांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने चटप याला कपिलनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. 

हेही वाचा : आईपासून विभक्‍त झालेली बिबट्याची पिल्ले गोरेवाड्यात 

आयुक्‍तांनी दाखवावी तत्परता 
शहर पोलिस दलातील पाच पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर बलात्कार आणि विनयभंगासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक तर मोठ्या पदावर अधिकारी आहे. त्याची फक्‍त बदली करून प्रकरण शांत करण्यात आले. तर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने थेट आपल्या विवाहित असलेल्या प्रियकराला पोलिस प्रशिक्षण केंद्रात सोबत ठेवले होते. अधीक्षक राकेश ओलाप्रमाणे पोलिस आयुक्‍तांनी तत्परता दाखविण्याची गरज आहे. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवतीचा पोलिसाने केला विनयभंग नागपूर : फेसबुकवर अश्‍लील मॅसेज येत असल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका युवतीला चक्‍क पोलिस कर्मचाऱ्यानेच शारीरिक संबंधाची मागणी करीत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटून युवतीने पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. या प्रकरणाची नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी गांभीर्याने दखल घेतली. पोलिस कर्मचारी तुलाराम चटप याच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई केली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 25 वर्षीय युवती ही अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या फेसबुक पानावर अश्‍लील संदेश मिळाले. याविरुद्ध तिने 9 जुलैला अरोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ती तक्रार सायबर सेलकडे वर्ग केली. तिने चौकशी केली असता अरोलीच्या ठाणेदारांनी पुढील तपास सायबर सेलकडून होत असल्याची माहिती दिली.  तिने 14 जुलैला नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल कक्ष गाठले. त्या ठिकाणी तिची भेट पोलिस शिपाई तुलाराम चटप याच्याशी झाली. त्याने तिची मदत करण्याच्या निमित्ताने गुरुवार, 16 जुलैला संध्याकाळी ग्रामीण पोलिस मुख्यालय परिसरातील आपल्या शासकीय निवासस्थानी बोलवले. त्या ठिकाणी दुसरे कार्यालय असावे, या भावनेतून पीडित महिला त्याच्या घरी पोहोचली.  आरोपीने गुन्ह्याचा छडा लावून तिला दिलासा देण्याकरिता तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार दिला असता त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ती कशीबशी त्याच्या तावडीतून सुटली व अधीक्षक कार्यालय गाठले. या घटनेची माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब तिला कपिलनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पाठवले व आरोपी शिपायाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. अधीक्षकांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने चटप याला कपिलनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.  हेही वाचा : आईपासून विभक्‍त झालेली बिबट्याची पिल्ले गोरेवाड्यात  आयुक्‍तांनी दाखवावी तत्परता  शहर पोलिस दलातील पाच पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर बलात्कार आणि विनयभंगासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक तर मोठ्या पदावर अधिकारी आहे. त्याची फक्‍त बदली करून प्रकरण शांत करण्यात आले. तर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने थेट आपल्या विवाहित असलेल्या प्रियकराला पोलिस प्रशिक्षण केंद्रात सोबत ठेवले होते. अधीक्षक राकेश ओलाप्रमाणे पोलिस आयुक्‍तांनी तत्परता दाखविण्याची गरज आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Wvbv6E
Read More
डोनाल्ड ट्रम्प यांना गर्विष्ठ आणि अज्ञानी संबोधणाऱ्या पुस्तकाच्या पहिल्याच दिवशी तब्बल एवढ्या प्रती विकल्या गेल्या

न्यूयॉर्क - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गर्विष्ठ आणि अज्ञानी संबोधणाऱ्या पुस्तकाची पहिल्याच दिवशी तडाखेबंद विक्री झाली. पुतणी मेरी हिने लिहीलेल्या पुस्तकाच्या जवळपास साडेनऊ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टू मच अँड नेव्हर इनफ - हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस मॅन असे पुस्तकाचे नाव आहे. डोनाल्ड यांचे सर्वांत मोठे बंधू फ्रेड यांची ती मुलगी आहे. ती मानसशास्त्रज्ञ आहे. ट्रम्प हे आत्मपूजक आहेत आणि याबाबतीत त्यांनी इतके टोक गाठले आहे की चिकित्सात्मक उपचार द्यावे लागण्याच्या स्थिती त्यांनी निर्माण केली आहे, असा उल्लेख केला आहे.

नेपाळ काही सुधरेना; भारतासोबत पुन्हा काढली खुसपट

दरम्यान, हे पुस्तक म्हणजे असत्य गोष्टींचे संकलन आहे, अशी प्रतिक्रिया व्हाइट हाऊसतर्फे देण्यात आली. डोनाल्ड यांचे लहान भाऊ रॉबर्ट प्रकाशन रोखण्यासाठी न्यायालयात गेले होते. २००१ मध्ये मेरीच्या आजोबांच्या संपत्तीची वाटणी झाल्यानंतर एक करार झाला होता. त्यानुसार कौटुंबिक व काही बाबी उघड करायच्या नाहीत असे ठरले होते. मेरी पुस्तकाद्वारे या कराराचा भंग करीत असल्याचा युक्तिवाद त्यांच्या अर्जात करण्यात आला होता, मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. हे पुस्तक सायमन अँड शुस्टर पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. पारंपरिक कागदी स्वरुपासह प्रकाशनपूर्व नोंदणी, ध्वनीफीत तसेच डिजीटल मिळून साडे नऊ लाख प्रतींची विक्री या कंपनीच्या इतिहासात विक्रमी ठरली. फक्त अमेरिकेसाठी आणखी प्रती छापल्या जाणार असून एकूण आकडा १.१५ दशलक्ष होईल. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांत अॅमेझॉनवरही पुस्तकाची सर्वाधिक विक्री झाली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

डोनाल्ड ट्रम्प यांना गर्विष्ठ आणि अज्ञानी संबोधणाऱ्या पुस्तकाच्या पहिल्याच दिवशी तब्बल एवढ्या प्रती विकल्या गेल्या न्यूयॉर्क - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गर्विष्ठ आणि अज्ञानी संबोधणाऱ्या पुस्तकाची पहिल्याच दिवशी तडाखेबंद विक्री झाली. पुतणी मेरी हिने लिहीलेल्या पुस्तकाच्या जवळपास साडेनऊ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टू मच अँड नेव्हर इनफ - हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस मॅन असे पुस्तकाचे नाव आहे. डोनाल्ड यांचे सर्वांत मोठे बंधू फ्रेड यांची ती मुलगी आहे. ती मानसशास्त्रज्ञ आहे. ट्रम्प हे आत्मपूजक आहेत आणि याबाबतीत त्यांनी इतके टोक गाठले आहे की चिकित्सात्मक उपचार द्यावे लागण्याच्या स्थिती त्यांनी निर्माण केली आहे, असा उल्लेख केला आहे. नेपाळ काही सुधरेना; भारतासोबत पुन्हा काढली खुसपट दरम्यान, हे पुस्तक म्हणजे असत्य गोष्टींचे संकलन आहे, अशी प्रतिक्रिया व्हाइट हाऊसतर्फे देण्यात आली. डोनाल्ड यांचे लहान भाऊ रॉबर्ट प्रकाशन रोखण्यासाठी न्यायालयात गेले होते. २००१ मध्ये मेरीच्या आजोबांच्या संपत्तीची वाटणी झाल्यानंतर एक करार झाला होता. त्यानुसार कौटुंबिक व काही बाबी उघड करायच्या नाहीत असे ठरले होते. मेरी पुस्तकाद्वारे या कराराचा भंग करीत असल्याचा युक्तिवाद त्यांच्या अर्जात करण्यात आला होता, मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. हे पुस्तक सायमन अँड शुस्टर पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. पारंपरिक कागदी स्वरुपासह प्रकाशनपूर्व नोंदणी, ध्वनीफीत तसेच डिजीटल मिळून साडे नऊ लाख प्रतींची विक्री या कंपनीच्या इतिहासात विक्रमी ठरली. फक्त अमेरिकेसाठी आणखी प्रती छापल्या जाणार असून एकूण आकडा १.१५ दशलक्ष होईल. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांत अॅमेझॉनवरही पुस्तकाची सर्वाधिक विक्री झाली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eD2A9n
Read More
केमिकल वेस्ट टैंक की सफाई के दौरान जहरीली गैस का रिसाव, 4 मजदूरों की मौत https://ift.tt/30mY4qw
जगभरातील अनेक बड्या लोकांची ट्विटर अकाउंट हॅक होऊन त्यातून बिटकॉइन गैरव्यवहार

नवी दिल्ली - सायबर हल्लेखोरांनी ट्विटर कंपनीच्याच काही निवडक कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्या गोपनीय माहितीचा वापर केला, असा दावा या कंपनीने केला. जगभरातील अनेक बड्या लोकांची ट्विटर अकाउंट हॅक होऊन त्यातून बिटकॉइन गैरव्यवहार झाल्याने खळबळ माजली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सायबर हल्लेखोरांनी बराक ओबामा, बिल गेट्स, एलॉन मस्क, जेफ बेझोस अशा दिग्गज लोकांचे ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावरून खोट्या पोस्ट केल्या होत्या. त्यात बिटकॉईनची गुंतवणूक करून तिप्पट परतावा देण्याचे आश्वासन होते. या बड्या नावांवर विश्वास ठेवून अनेकांनी बिटकॉईन गुंतवले आणि ते फसले. यानंतर ट्विटर कंपनीने हल्ल्याचे विश्लेषण करत एक निवेदन आज प्रसिद्ध केले आहे.  काही कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून हा हल्ला झाल्याचे कंपनीने सांगितले असले तरी अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने माहिती जाहीर केलेली नाही. 

असा केला हल्ला

सोशल इंजिनिअरिंगच्या एका योजनेद्वारे काही कर्मचाऱ्यांवर जाळे

त्यांच्याकडील गोपनीय माहितीचा वापर

त्याद्वारे १३० प्रभावशाली व्यक्तींचे ट्विटर अकाउंट हॅक केले

काही अकाउंटचे पासवर्ड बदलून त्याद्वारेही बनावट पोस्ट

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जगभरातील अनेक बड्या लोकांची ट्विटर अकाउंट हॅक होऊन त्यातून बिटकॉइन गैरव्यवहार नवी दिल्ली - सायबर हल्लेखोरांनी ट्विटर कंपनीच्याच काही निवडक कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्या गोपनीय माहितीचा वापर केला, असा दावा या कंपनीने केला. जगभरातील अनेक बड्या लोकांची ट्विटर अकाउंट हॅक होऊन त्यातून बिटकॉइन गैरव्यवहार झाल्याने खळबळ माजली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सायबर हल्लेखोरांनी बराक ओबामा, बिल गेट्स, एलॉन मस्क, जेफ बेझोस अशा दिग्गज लोकांचे ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावरून खोट्या पोस्ट केल्या होत्या. त्यात बिटकॉईनची गुंतवणूक करून तिप्पट परतावा देण्याचे आश्वासन होते. या बड्या नावांवर विश्वास ठेवून अनेकांनी बिटकॉईन गुंतवले आणि ते फसले. यानंतर ट्विटर कंपनीने हल्ल्याचे विश्लेषण करत एक निवेदन आज प्रसिद्ध केले आहे.  काही कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून हा हल्ला झाल्याचे कंपनीने सांगितले असले तरी अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने माहिती जाहीर केलेली नाही.  असा केला हल्ला सोशल इंजिनिअरिंगच्या एका योजनेद्वारे काही कर्मचाऱ्यांवर जाळे त्यांच्याकडील गोपनीय माहितीचा वापर त्याद्वारे १३० प्रभावशाली व्यक्तींचे ट्विटर अकाउंट हॅक केले काही अकाउंटचे पासवर्ड बदलून त्याद्वारेही बनावट पोस्ट Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZHG9M6
Read More
Video : कुटुंबाप्रमाणे जपलेली मांजरे कोरोनामुळे बेघर

पिंपरी - घरी मांजरी पाळण्याचा छंद गेल्या ३४ वर्षांपासून चिंचवड येथील एका ७० वर्षीय आजींनी जोपासला. मांजरांना हक्काचं घर आणि प्रेम मिळवून देणाऱ्या आजी, अशी त्यांची परिसरात ओळख आहे. मांजरांवर त्या दरमहा तीन हजार रुपये खर्च करत. मात्र, कोरोनाविषयी चुकीचा समज आणि कोरोना झाल्यास समाज काय म्हणेल, या भीतीने त्यांनी 12 मांजरे दूर सोडून दिली. आता त्यांच्यात अपराधी भावना निर्माण होऊन मांजराच्या काळजीने त्या रडून आकांत करीत आहेत. माणसांना भावना तरी व्यक्त करता येतात. पण मुक्‍या प्राण्यांचं काय, अशाच एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या एका प्रसंगातून गेलेल्या संवेदनशील आजी म्हणजे गीता शशिकांत तोरो. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिंचवडगाव-लक्ष्मीनगरमध्ये तोरो आजी त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. मुळातच आजींना लहानपणापासून मांजरी पाळण्याचा छंद होता. त्यांना पती शशिकांत यांची साथ मिळाल्याने गेल्या 34 वर्षांपासून त्यांनी स्वच्छंदीपणे छंद जोपासला. त्यांच्या कुटुंबात मनूताई, काळू, स्विटू, काळ्या-बाळ्या, सोनू, मोनू, मण्या अशी त्यापैकी काहींची नावे असलेली मांजरे आनंदाने नांदत. त्या पुण्यातून दरमहा तीन हजार रुपये खर्चून ‘कॅटफूड’ आणत. आठवड्यातून एकदा सर्व मांजरींना स्वच्छ अंघोळ, केस-नख कापत. त्यांचे प्रजनन व आरोग्य, आहार, स्वच्छता करायच्या. या सर्व मांजरांची निवासी खोलीची दिवसातून दोनदा स्वच्छ केली जायची. दिवसातून तीनवेळा त्यांची भांडी घासत. 

दरवाजा बंद राहिल्यावर बाहेर गेल्यावर मांजरांचे हाल होऊ नये, म्हणून त्यांनी खास मुख्य दरवाजा आणि सेफ्टी डोअरला छोटासा दरवाजा काढला. मांजरे तिथूनच ये-जा करत. ती त्यांच्या कुंटुबातील सदस्यच होती, अशाप्रकारे त्यांची काळजी घ्यायच्या. आजींनी त्यांच्या प्रत्येक हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. ‘फोटो अल्बम’ आणि ‘वॉलफ्रेम’मधून त्यांनी जपल्या आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे दोन-तीन मांजरी होत्या. नंतर त्या पिल्लांच्याच आजी बनल्या. महिन्यातून एकदा त्यांना लस द्यायच्या. एवढी काळजी माणसंदेखील माणसांची घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे अवघे आयुष्य त्यांनी 40 ते 45 मांजरासोबत जीवन जगल्या.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज 580 जणांना डिस्चार्ज, तर एवढ्या जणांचा मृत्यू

मात्र, आता कोरोनामुळे माणसं माणसांना विसरली आहेत. कुत्र्या-मांजरामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचा समज-गैरसमज. शेजारच्यांनी सांगितले, की या मांजरीमुळे तुम्हाला झाल्यास काय करणार, तुम्ही या वयात कुठे जाणार, असे म्हटल्यावर त्यांच्या मनात भीतीचे काहूर माजले. काळजावर दगड ठेवून त्यांनी नऊ पिलांसह त्यांची आई आणि दोन मोठ्या मांजरींना दूर सोडून दिल्यावर घर खायला उठले. कुठेतरी त्यांच्याशी निर्दयपणे वागल्याची अपराधीपणाची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. आजही त्या काळजीपोटी रडून आकांत करत आहेत.

मावळातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट; तळेगावातील संख्या चिंताजनक

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : कुटुंबाप्रमाणे जपलेली मांजरे कोरोनामुळे बेघर पिंपरी - घरी मांजरी पाळण्याचा छंद गेल्या ३४ वर्षांपासून चिंचवड येथील एका ७० वर्षीय आजींनी जोपासला. मांजरांना हक्काचं घर आणि प्रेम मिळवून देणाऱ्या आजी, अशी त्यांची परिसरात ओळख आहे. मांजरांवर त्या दरमहा तीन हजार रुपये खर्च करत. मात्र, कोरोनाविषयी चुकीचा समज आणि कोरोना झाल्यास समाज काय म्हणेल, या भीतीने त्यांनी 12 मांजरे दूर सोडून दिली. आता त्यांच्यात अपराधी भावना निर्माण होऊन मांजराच्या काळजीने त्या रडून आकांत करीत आहेत. माणसांना भावना तरी व्यक्त करता येतात. पण मुक्‍या प्राण्यांचं काय, अशाच एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या एका प्रसंगातून गेलेल्या संवेदनशील आजी म्हणजे गीता शशिकांत तोरो.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चिंचवडगाव-लक्ष्मीनगरमध्ये तोरो आजी त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. मुळातच आजींना लहानपणापासून मांजरी पाळण्याचा छंद होता. त्यांना पती शशिकांत यांची साथ मिळाल्याने गेल्या 34 वर्षांपासून त्यांनी स्वच्छंदीपणे छंद जोपासला. त्यांच्या कुटुंबात मनूताई, काळू, स्विटू, काळ्या-बाळ्या, सोनू, मोनू, मण्या अशी त्यापैकी काहींची नावे असलेली मांजरे आनंदाने नांदत. त्या पुण्यातून दरमहा तीन हजार रुपये खर्चून ‘कॅटफूड’ आणत. आठवड्यातून एकदा सर्व मांजरींना स्वच्छ अंघोळ, केस-नख कापत. त्यांचे प्रजनन व आरोग्य, आहार, स्वच्छता करायच्या. या सर्व मांजरांची निवासी खोलीची दिवसातून दोनदा स्वच्छ केली जायची. दिवसातून तीनवेळा त्यांची भांडी घासत.  दरवाजा बंद राहिल्यावर बाहेर गेल्यावर मांजरांचे हाल होऊ नये, म्हणून त्यांनी खास मुख्य दरवाजा आणि सेफ्टी डोअरला छोटासा दरवाजा काढला. मांजरे तिथूनच ये-जा करत. ती त्यांच्या कुंटुबातील सदस्यच होती, अशाप्रकारे त्यांची काळजी घ्यायच्या. आजींनी त्यांच्या प्रत्येक हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. ‘फोटो अल्बम’ आणि ‘वॉलफ्रेम’मधून त्यांनी जपल्या आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे दोन-तीन मांजरी होत्या. नंतर त्या पिल्लांच्याच आजी बनल्या. महिन्यातून एकदा त्यांना लस द्यायच्या. एवढी काळजी माणसंदेखील माणसांची घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे अवघे आयुष्य त्यांनी 40 ते 45 मांजरासोबत जीवन जगल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये आज 580 जणांना डिस्चार्ज, तर एवढ्या जणांचा मृत्यू मात्र, आता कोरोनामुळे माणसं माणसांना विसरली आहेत. कुत्र्या-मांजरामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचा समज-गैरसमज. शेजारच्यांनी सांगितले, की या मांजरीमुळे तुम्हाला झाल्यास काय करणार, तुम्ही या वयात कुठे जाणार, असे म्हटल्यावर त्यांच्या मनात भीतीचे काहूर माजले. काळजावर दगड ठेवून त्यांनी नऊ पिलांसह त्यांची आई आणि दोन मोठ्या मांजरींना दूर सोडून दिल्यावर घर खायला उठले. कुठेतरी त्यांच्याशी निर्दयपणे वागल्याची अपराधीपणाची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. आजही त्या काळजीपोटी रडून आकांत करत आहेत. मावळातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट; तळेगावातील संख्या चिंताजनक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32vbnba
Read More

Friday, July 17, 2020

कौटुंबिक हिंसाचारास केवळ महिलाच नाही तर पुरुषांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे; म्हणून...

पुणे - कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसह पुरुषांवरील अन्याय दूर करत, त्यांना वैद्यकीय सेवा आणि विधी विषयक माहिती पुरवत गेल्या सहा महिन्यात महिला सहायक कक्षामार्फत (भरोसा सेल) ३३४  तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. पती किंवा सासरच्या व्यक्ती सासूरवास करतात, पती नांदवत नाही, तसेच पत्नी किंवा तिच्या घरच्यांकडून त्रास होत असल्याच्या ७९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कौटुंबिक हिंसाचार झाल्यानंतर त्यातून तात्काळ दिलासा मिळावा, यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या अंतर्गत कक्षाचे कामकाज चालते. कक्षांतर्गत पोलिस मदत, महिला हेल्पलाईन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधीविषयक सेवा, मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, पिडीत महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण सेवा तक्रारदारांना पुरवण्यात येतात.

लोणीकरांनो आतातरी काळजी घ्या, आपल्या बेपर्वाईमुळे कोरोना पुन्हा वाढतोय...

‘भरोसा सेल’च्या माध्यमातून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांना त्यांच्या तक्रारीबाबत समुपदेशकांच्या माध्यमातून मदत केली. महिला सहायता कक्षाच्या माध्यमातून पती-पत्नीचे तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यातील किरकोळ वाद मिटावे, हा यामागील प्रमुख हेतू असतो. जानेवारी ते जून अखेरीस कक्षात ७९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील ३३४ प्रकरणे मार्गी लावण्यात आली आहेत.
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

डॉक्टर, मला श्वसनाचा खुप त्रास होतोय, बेड मिळेल का? हवेलीमधील परिस्थिती

पुरूषांच्या १६० तक्रारी
कौटुंबिक हिंसाचारास केवळ महिला बळी पडत नसून, पुरुषांनादेखील पत्नी किंवा तिच्या कुटुंबियांचा त्रास सहन करावा लागत आहे. जून अखेरीस अशा १६० तक्रारी दाखल झाल्या आहेत. क्षुल्लक कारणांवरून बोलणे, अवास्तव अपेक्षा बाळगणे, पतीच्या घरच्यावरून वाद करणे असे या तक्रारींचे स्वरूप आहे.

येथे मागता येते  मदत
अन्याय झालेली व्यक्ती पोलिस आयुक्त कार्यालयात अर्ज करू शकते. तसेच पुढील हेल्पलाइनवर त्यांना योग्य ती मदत केली जाते.
महिला हेल्पलाईन नंबर - १०९१
कक्षाचा नंबर -  ०२० - २६१२५२५२

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/3hcmdH2

कौटुंबिक हिंसाचारास केवळ महिलाच नाही तर पुरुषांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे; म्हणून... पुणे - कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसह पुरुषांवरील अन्याय दूर करत, त्यांना वैद्यकीय सेवा आणि विधी विषयक माहिती पुरवत गेल्या सहा महिन्यात महिला सहायक कक्षामार्फत (भरोसा सेल) ३३४  तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. पती किंवा सासरच्या व्यक्ती सासूरवास करतात, पती नांदवत नाही, तसेच पत्नी किंवा तिच्या घरच्यांकडून त्रास होत असल्याच्या ७९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कौटुंबिक हिंसाचार झाल्यानंतर त्यातून तात्काळ दिलासा मिळावा, यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या अंतर्गत कक्षाचे कामकाज चालते. कक्षांतर्गत पोलिस मदत, महिला हेल्पलाईन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधीविषयक सेवा, मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, पिडीत महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण सेवा तक्रारदारांना पुरवण्यात येतात. लोणीकरांनो आतातरी काळजी घ्या, आपल्या बेपर्वाईमुळे कोरोना पुन्हा वाढतोय... ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांना त्यांच्या तक्रारीबाबत समुपदेशकांच्या माध्यमातून मदत केली. महिला सहायता कक्षाच्या माध्यमातून पती-पत्नीचे तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यातील किरकोळ वाद मिटावे, हा यामागील प्रमुख हेतू असतो. जानेवारी ते जून अखेरीस कक्षात ७९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील ३३४ प्रकरणे मार्गी लावण्यात आली आहेत. - बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा डॉक्टर, मला श्वसनाचा खुप त्रास होतोय, बेड मिळेल का? हवेलीमधील परिस्थिती पुरूषांच्या १६० तक्रारी कौटुंबिक हिंसाचारास केवळ महिला बळी पडत नसून, पुरुषांनादेखील पत्नी किंवा तिच्या कुटुंबियांचा त्रास सहन करावा लागत आहे. जून अखेरीस अशा १६० तक्रारी दाखल झाल्या आहेत. क्षुल्लक कारणांवरून बोलणे, अवास्तव अपेक्षा बाळगणे, पतीच्या घरच्यावरून वाद करणे असे या तक्रारींचे स्वरूप आहे. येथे मागता येते  मदत अन्याय झालेली व्यक्ती पोलिस आयुक्त कार्यालयात अर्ज करू शकते. तसेच पुढील हेल्पलाइनवर त्यांना योग्य ती मदत केली जाते. महिला हेल्पलाईन नंबर - १०९१ कक्षाचा नंबर -  ०२० - २६१२५२५२ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/3hcmdH2

July 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jpTkcy
Read More
नागपुरातील नाले कुणी केले गायब ? वाचा

नागपूर : पावसाळ्यातच नव्हे तर वर्षभर सांडपाणी वाहून नेणारे शहरातील 43 टक्के नाले गायब झाल्याचे निरीक्षण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोंदविले. अनेक अतिक्रमणधारकांनी नाल्यावर घरे बांधली तर काहींनी नाल्यांमध्येच बांधकाम केले. बिल्डरांनीही नाल्याची जागा कवेत घेतली. त्यामुळे शहरातील 97 नाले दिसेनासे झाले आहेत. 

मुसळधार पावसामुळे नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमीच घरांत पाणी शिरते. नाला आणि गडरलाइनवर असलेले अतिक्रमण हे सर्वांत मोठे कारण असून लवकरच अशा अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

नाले तसेच सिवेज लाइनवरील अतिक्रमणाच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. यावरून आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आणि अन्य अधिकाऱ्यांची एक समिती बनवून याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. या समितीने मांडले वास्तव धक्कादायक असून शहरातील 227 नाल्यांपैकी केवळ 130 नाले शिल्लक आहेत.

अतिक्रमण तसेच पक्के बांधकामामुळे सिवेज लाइन दुरुस्तीची कामे करण्यात अडथळे निर्माण होत आहे. शहरात सिवेज लाइनवर सुमारे 275 पेक्षा अधिक ठिकाणी पक्के घर बांधणे, वऱ्हांडा बांधकाम नागरिकांनी केले आहे. यामुळे तुंबलेल्या सिवेज लाइनची दुरुस्ती होत नसून घाण पाणी बाहेर रस्त्यावर व घरांत शिरत आहे.

'हनी ट्रॅप' प्रकरणासंबंधी गृहमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, वाचा काय आहे प्रकरण...

नाल्यात 70 पेक्षा अधिक भागांमध्ये कॉंक्रीटचे स्तंभ उभारणे, स्लॅब टाकणे, नाल्याकाठी सोसायटी उभारणाऱ्या बिल्डरने नाल्याची भिंत उंच करणे, नाल्याची जागा बळकावून आत बांधकाम करणे आणि नाल्याचा प्रवाह वळविणे, असे गंभीर प्रकार केले आहेत. 

आयुक्तांचा कारवाईचा इशारा 
नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरत आहे. त्यामुळे सिवेज लाइन, नाल्यांवर अतिक्रमण संबंधितांनी तातडीने काढावे, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.  
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपुरातील नाले कुणी केले गायब ? वाचा नागपूर : पावसाळ्यातच नव्हे तर वर्षभर सांडपाणी वाहून नेणारे शहरातील 43 टक्के नाले गायब झाल्याचे निरीक्षण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोंदविले. अनेक अतिक्रमणधारकांनी नाल्यावर घरे बांधली तर काहींनी नाल्यांमध्येच बांधकाम केले. बिल्डरांनीही नाल्याची जागा कवेत घेतली. त्यामुळे शहरातील 97 नाले दिसेनासे झाले आहेत.  मुसळधार पावसामुळे नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमीच घरांत पाणी शिरते. नाला आणि गडरलाइनवर असलेले अतिक्रमण हे सर्वांत मोठे कारण असून लवकरच अशा अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. नाले तसेच सिवेज लाइनवरील अतिक्रमणाच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. यावरून आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आणि अन्य अधिकाऱ्यांची एक समिती बनवून याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. या समितीने मांडले वास्तव धक्कादायक असून शहरातील 227 नाल्यांपैकी केवळ 130 नाले शिल्लक आहेत. अतिक्रमण तसेच पक्के बांधकामामुळे सिवेज लाइन दुरुस्तीची कामे करण्यात अडथळे निर्माण होत आहे. शहरात सिवेज लाइनवर सुमारे 275 पेक्षा अधिक ठिकाणी पक्के घर बांधणे, वऱ्हांडा बांधकाम नागरिकांनी केले आहे. यामुळे तुंबलेल्या सिवेज लाइनची दुरुस्ती होत नसून घाण पाणी बाहेर रस्त्यावर व घरांत शिरत आहे. 'हनी ट्रॅप' प्रकरणासंबंधी गृहमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, वाचा काय आहे प्रकरण... नाल्यात 70 पेक्षा अधिक भागांमध्ये कॉंक्रीटचे स्तंभ उभारणे, स्लॅब टाकणे, नाल्याकाठी सोसायटी उभारणाऱ्या बिल्डरने नाल्याची भिंत उंच करणे, नाल्याची जागा बळकावून आत बांधकाम करणे आणि नाल्याचा प्रवाह वळविणे, असे गंभीर प्रकार केले आहेत.  आयुक्तांचा कारवाईचा इशारा  नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरत आहे. त्यामुळे सिवेज लाइन, नाल्यांवर अतिक्रमण संबंधितांनी तातडीने काढावे, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eDzJBV
Read More