Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 7, 2020

कोरोना उपाययोजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ हजारांचा निधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर अज्ञातांकडून हल्ला, प्रकाश आंबेडकर यांचे शांततेचे आवाहन
कोरोना वायरस हवेतूनही पसरतो या दाव्याला WHOचा दुजोरा
आत्मनिर्भर भारत : मेळघाटातलं राहू गाव असं बनलं स्वयंपूर्ण
चिनी अ‍ॅपची अमेरिकेत क्रेझ कमीच

न्यूयॉर्क - भारतातील गल्लीबोळांत चिनी अ‍ॅपचे दिवाने असले तरी या तसेच एकूणच ॲप्सची अमेरिकेत तितकी क्रेझ नाही. विशेष म्हणजे टॉप टेनमध्ये एकही चिनी अ‍ॅप नसून टॉप ट्वेंटीमध्ये केवळ दोनच अ‍ॅप्स आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टीकटॉकची वाढती क्रेझ
    जानेवारी-मार्चमध्ये जगभरात    ३१.५ कोटी
    अमेरिकेतील डाऊनलोडची संख्या     १३ कोटी
    मे महिन्यात भारतातील डाऊनलोड    ६१.१ कोटी
    याच काळात चीनमधील डाऊनलोड     १९.६ कोटी
    याच काळात अमेरिकेतील डाऊनलोड    १६.४ कोटी
    यंदा अमेरिकेतून आलेले उत्पन्न    ५०० दशलक्ष
    टीकटॉक उपलब्ध असलेले देश     १५४
    वापरल्या जाणाऱ्या भाषा     ७५
    अमेरिकी युजर्सकडून व्हिडिओ पोस्ट     ८३ टक्के
    एकूण इंटरनेट युजर्सकडून वापर     ९ टक्के
    अमेरिकी युजरचा रोजचा वापर     ८ वेळा
    प्रत्येक सत्राची किमान वेळ     ५ मिनिट

टिकटॉक, वुइचॅटला पसंती
    स्टॅटीस्टा या सर्वेक्षण संस्थेकडून पाहणी
    टीकटॉक, वुइचॅट या दोन अॅपना पसंती
    टीकटॉक युजर्समध्ये भारतानंतर अमेरिकेचा दुसरा क्रमांक
    भारतात २० कोटी, तर अमेरिकेत४.५ कोटी युजर्स
    अमेरिकेतील टीकटॉक युजर्सच्या संख्येत मात्र उत्तरोत्तर वाढ

चीनकडूनही प्रत्यूत्तर
    एक जुलै रोजी चीन सरकारकडून नवे इंटरनेट धोरण लागू
    चीनमधील अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर अपलोड करण्यासाठी नियंत्रकांची मंजुरी आवश्यक
    गेम डेव्हलपर कंपन्यांना हे बंधनकारक
    गेल्या आठवड्यात दोन दिवसांत चायना अ‍ॅप स्टोअरवरून तब्बल तीन हजार गेम्स अ‍ॅपलला काढून टाकावे लागले
    या धोरणानुसार अ‍ॅपल स्टोअरवरील साडेचार हजार गेम्स काढून टाकणे भाग

News Story Feeds https://ift.tt/3iGu5SQ

चिनी अ‍ॅपची अमेरिकेत क्रेझ कमीच न्यूयॉर्क - भारतातील गल्लीबोळांत चिनी अ‍ॅपचे दिवाने असले तरी या तसेच एकूणच ॲप्सची अमेरिकेत तितकी क्रेझ नाही. विशेष म्हणजे टॉप टेनमध्ये एकही चिनी अ‍ॅप नसून टॉप ट्वेंटीमध्ये केवळ दोनच अ‍ॅप्स आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टीकटॉकची वाढती क्रेझ     जानेवारी-मार्चमध्ये जगभरात    ३१.५ कोटी     अमेरिकेतील डाऊनलोडची संख्या     १३ कोटी     मे महिन्यात भारतातील डाऊनलोड    ६१.१ कोटी     याच काळात चीनमधील डाऊनलोड     १९.६ कोटी     याच काळात अमेरिकेतील डाऊनलोड    १६.४ कोटी     यंदा अमेरिकेतून आलेले उत्पन्न    ५०० दशलक्ष     टीकटॉक उपलब्ध असलेले देश     १५४     वापरल्या जाणाऱ्या भाषा     ७५     अमेरिकी युजर्सकडून व्हिडिओ पोस्ट     ८३ टक्के     एकूण इंटरनेट युजर्सकडून वापर     ९ टक्के     अमेरिकी युजरचा रोजचा वापर     ८ वेळा     प्रत्येक सत्राची किमान वेळ     ५ मिनिट टिकटॉक, वुइचॅटला पसंती     स्टॅटीस्टा या सर्वेक्षण संस्थेकडून पाहणी     टीकटॉक, वुइचॅट या दोन अॅपना पसंती     टीकटॉक युजर्समध्ये भारतानंतर अमेरिकेचा दुसरा क्रमांक     भारतात २० कोटी, तर अमेरिकेत४.५ कोटी युजर्स     अमेरिकेतील टीकटॉक युजर्सच्या संख्येत मात्र उत्तरोत्तर वाढ चीनकडूनही प्रत्यूत्तर     एक जुलै रोजी चीन सरकारकडून नवे इंटरनेट धोरण लागू     चीनमधील अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर अपलोड करण्यासाठी नियंत्रकांची मंजुरी आवश्यक     गेम डेव्हलपर कंपन्यांना हे बंधनकारक     गेल्या आठवड्यात दोन दिवसांत चायना अ‍ॅप स्टोअरवरून तब्बल तीन हजार गेम्स अ‍ॅपलला काढून टाकावे लागले     या धोरणानुसार अ‍ॅपल स्टोअरवरील साडेचार हजार गेम्स काढून टाकणे भाग News Story Feeds https://ift.tt/3iGu5SQ

July 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3faELXw
Read More
अरे बापरे! याठिकाणी तपासणी कीटच उपलब्ध नाही; संशयित परतले घरी

सिंहगडरस्ता - माणिकबागेतील एका सोसायटीतील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १२ नागरिकांना सिंहगड महाविद्यालयातील क्वारंटाइन सेंटरमध्ये घेऊन जाण्यात येत होते. दरम्यान, तेथे तपासणी कीट उपलब्ध नसल्याकारणास्तव त्यांना निम्म्या रस्त्यातून घरी परतावे लागले. ही घटना आज(ता.७) घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माणिकबाग येथील एका सोसायटीत ज्येष्ठ महिलेला संसर्ग झाला होता. महापालिकेच्या वतीने येथे खबरदारीच्या उपाययोजनाही  राबविण्यात आल्या. त्यानंतर ज्येष्ठ महिलेच्या संपर्कात आलेल्या १२ नागरिकांना तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या वाहनामधून  घेऊन जाण्यात आले. त्या वाहनात इतर भागातील नागरिकही उपस्थित होते. मात्र, अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर संबंधित क्वारंटाइन केंद्रात तपासणी कीट उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले. त्यानंतर गाडी माघारी फिरली आणि सर्व कोरोना संशयित नागरिकांना घरी पाठविण्यात आले. या नागरिकांमध्ये काही ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. घडलेल्या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

राज्य सरकारमध्ये खरचं अस्वस्थता आहे का? वाचा शरद पवार यांचं उत्तर

टोलवाटोलवीचा आणखी बळी 
खासगी रुग्णालयातील टोलवाटोलवीमुळे नुकताच एका ज्येष्ठाला जिवाला मुकावे लागले. या घटनेची पुनरावृत्तीचा अनुभव सिंहगड रस्त्यावरील एका कुटुंबाला आला. त्या कुटुंबातील ४५ वर्षीय व्यक्तीला अशाचप्रकारे जीव गमवावा लागला. 

विजय गोसावी (रा. सिंहगड रस्ता, हिंगणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गोसावी यांना अन्ननलीकेचा त्रास होता. त्यांना उपचारासाठी परिसरातील एका खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.  तेथे त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. खर्चाचा अंदाज देण्यात आला. मात्र, ते आपल्या आवाक्‍याबाहेरचे असल्याचे रुग्णाच्या वडिलांनी सांगताच रुग्णालयाकडून उपचारासाठी योग्य ती साधन सामग्री नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर त्यांनी परिसरातील दुसऱ्या मोठ्या खासगी  रुग्णालयात विचारपूस केली. तेथेही त्यांनी रक्कम जमा करण्यास अवधी मागितल्यावर रुग्णासाठी बेडच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कात्रज परिसरातील एका महापालिकेच्या रुग्णालयात गोसावी यांना घेऊन जाण्यात आले. मात्र, तेथेही कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. अखेर त्यांना सोमवारी रात्री उशिरा ससूनमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आज (ता.७) त्यांचा मृत्यू झाला. 

'कोरोना प्रतिबंधासाठी कडक उपाययोजना करा'

हवेलीत २८ रुग्णांची भर 
खडकवासला : हवेलीमध्ये सोमवार (ता.६) अखेर कोरोनाचे नवीन २८ रुग्ण आढळले. त्यातील १७ रुग्ण तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील आहेत. तालुक्‍यातील एकूण रुग्णांची संख्या ५५५ झाली आहे, अशी माहिती  डॉ.सचिन खरात यांनी दिली. 

तालुक्‍यात आतापर्यंत आठ जणांचे मृत्यू झाले आहेत. नांदेड येथे ६, खडकवासल्यामध्ये ४ तर कोंढवे धावडे येथे ३, खानापूर येथे २, नऱ्हे, किरकटवाडी येथे प्रत्येकी एक एक रुग्ण आढळले आहेत. पूर्व भागात उरुळी कांचन येथे ५ रुग्ण सापडले आहेत. हांडेवाडीत २, मांजरी बुद्रूक, तुळापूर, पिंपरी सांडस, बकोरी येथे प्रत्येकी एक एक आढळले आहेत. दिवसभरात तालुक्‍यात नवीन २८ रुग्ण वाढले. एकूण रुग्णांपैकी सध्या २७७ जणांवर उपचार सुरू आहे. तर २७०जण बरे झाले आहेत, असे ही खरात यांनी सांगितले.

रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने  तपासणी यंत्रणाही कमी पडत आहे. तपासणी किट उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. या किटवर तपासणी करण्यासाठी संबंधितांना प्रशिक्षण दिले जात आहे. 
- संभाजी खोत, सहायक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अरे बापरे! याठिकाणी तपासणी कीटच उपलब्ध नाही; संशयित परतले घरी सिंहगडरस्ता - माणिकबागेतील एका सोसायटीतील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १२ नागरिकांना सिंहगड महाविद्यालयातील क्वारंटाइन सेंटरमध्ये घेऊन जाण्यात येत होते. दरम्यान, तेथे तपासणी कीट उपलब्ध नसल्याकारणास्तव त्यांना निम्म्या रस्त्यातून घरी परतावे लागले. ही घटना आज(ता.७) घडली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा माणिकबाग येथील एका सोसायटीत ज्येष्ठ महिलेला संसर्ग झाला होता. महापालिकेच्या वतीने येथे खबरदारीच्या उपाययोजनाही  राबविण्यात आल्या. त्यानंतर ज्येष्ठ महिलेच्या संपर्कात आलेल्या १२ नागरिकांना तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या वाहनामधून  घेऊन जाण्यात आले. त्या वाहनात इतर भागातील नागरिकही उपस्थित होते. मात्र, अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर संबंधित क्वारंटाइन केंद्रात तपासणी कीट उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले. त्यानंतर गाडी माघारी फिरली आणि सर्व कोरोना संशयित नागरिकांना घरी पाठविण्यात आले. या नागरिकांमध्ये काही ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. घडलेल्या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्य सरकारमध्ये खरचं अस्वस्थता आहे का? वाचा शरद पवार यांचं उत्तर टोलवाटोलवीचा आणखी बळी  खासगी रुग्णालयातील टोलवाटोलवीमुळे नुकताच एका ज्येष्ठाला जिवाला मुकावे लागले. या घटनेची पुनरावृत्तीचा अनुभव सिंहगड रस्त्यावरील एका कुटुंबाला आला. त्या कुटुंबातील ४५ वर्षीय व्यक्तीला अशाचप्रकारे जीव गमवावा लागला.  विजय गोसावी (रा. सिंहगड रस्ता, हिंगणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गोसावी यांना अन्ननलीकेचा त्रास होता. त्यांना उपचारासाठी परिसरातील एका खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.  तेथे त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. खर्चाचा अंदाज देण्यात आला. मात्र, ते आपल्या आवाक्‍याबाहेरचे असल्याचे रुग्णाच्या वडिलांनी सांगताच रुग्णालयाकडून उपचारासाठी योग्य ती साधन सामग्री नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर त्यांनी परिसरातील दुसऱ्या मोठ्या खासगी  रुग्णालयात विचारपूस केली. तेथेही त्यांनी रक्कम जमा करण्यास अवधी मागितल्यावर रुग्णासाठी बेडच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कात्रज परिसरातील एका महापालिकेच्या रुग्णालयात गोसावी यांना घेऊन जाण्यात आले. मात्र, तेथेही कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. अखेर त्यांना सोमवारी रात्री उशिरा ससूनमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आज (ता.७) त्यांचा मृत्यू झाला.  'कोरोना प्रतिबंधासाठी कडक उपाययोजना करा' हवेलीत २८ रुग्णांची भर  खडकवासला : हवेलीमध्ये सोमवार (ता.६) अखेर कोरोनाचे नवीन २८ रुग्ण आढळले. त्यातील १७ रुग्ण तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील आहेत. तालुक्‍यातील एकूण रुग्णांची संख्या ५५५ झाली आहे, अशी माहिती  डॉ.सचिन खरात यांनी दिली.  तालुक्‍यात आतापर्यंत आठ जणांचे मृत्यू झाले आहेत. नांदेड येथे ६, खडकवासल्यामध्ये ४ तर कोंढवे धावडे येथे ३, खानापूर येथे २, नऱ्हे, किरकटवाडी येथे प्रत्येकी एक एक रुग्ण आढळले आहेत. पूर्व भागात उरुळी कांचन येथे ५ रुग्ण सापडले आहेत. हांडेवाडीत २, मांजरी बुद्रूक, तुळापूर, पिंपरी सांडस, बकोरी येथे प्रत्येकी एक एक आढळले आहेत. दिवसभरात तालुक्‍यात नवीन २८ रुग्ण वाढले. एकूण रुग्णांपैकी सध्या २७७ जणांवर उपचार सुरू आहे. तर २७०जण बरे झाले आहेत, असे ही खरात यांनी सांगितले. रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने  तपासणी यंत्रणाही कमी पडत आहे. तपासणी किट उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. या किटवर तपासणी करण्यासाठी संबंधितांना प्रशिक्षण दिले जात आहे.  - संभाजी खोत, सहायक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gBnx5Z
Read More
अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले कायमस्वरूपी रुग्णालय उभारणे गरजेचे!

मुंबई - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात मोकळ्या मैदानांवर आधुनिक उपचार सुविधांयुक्त रुग्णालयांची निर्मिती केली आहे. ऑक्‍सिजन तसेच आयसीयूदेखील उभारले आहेत. ही सुविधा तात्पुरती असली, तरी आता पुढचे पाऊल म्हणून मुंबई आणि परिसरासाठी सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले कायमस्वरूपी रुग्णालय तयार करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सिडकोच्या साह्याने मुलुंड येथे १६५० खाटांचे रुग्णालय, मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहिसर येथे ९५५ खाटांचे रुग्णालय; तर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नमन समूहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्स आणि बीकेसी येथे ६०० खाटांच्या कोरोना उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते.

अजित पवारांनी दिली मोठी बातमी; राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील 10 हजार जागा भरणार

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वप्रथम मोकळ्या मैदानांवरील रुग्णालये ही संकल्पना आणली. त्यातही अशा मोकळ्या जागेवरील रुग्णालयांमध्ये आयसीयू सुरू करण्याची विक्रमी कामगिरी राज्याने देशासमोर ठेवली आहे. या सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा तात्पुरत्या असल्या, तरी त्यांचा दर्जा राखला गेला आहे. त्याची उभारणीही एखाद्या कायमस्वरूपी रुग्णालयाइतकीच भक्कमपणे झाली आहे. यासर्व सोयी अवाक्‌ करणाऱ्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाबरोबरचे युद्ध आपण नक्कीच जिंकू; मात्र कायमस्वरूपी सोय होण्यासाठी रुग्ग्णालयाचे काम हाती घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले कायमस्वरूपी रुग्णालय उभारणे गरजेचे! मुंबई - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात मोकळ्या मैदानांवर आधुनिक उपचार सुविधांयुक्त रुग्णालयांची निर्मिती केली आहे. ऑक्‍सिजन तसेच आयसीयूदेखील उभारले आहेत. ही सुविधा तात्पुरती असली, तरी आता पुढचे पाऊल म्हणून मुंबई आणि परिसरासाठी सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले कायमस्वरूपी रुग्णालय तयार करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सिडकोच्या साह्याने मुलुंड येथे १६५० खाटांचे रुग्णालय, मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहिसर येथे ९५५ खाटांचे रुग्णालय; तर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नमन समूहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्स आणि बीकेसी येथे ६०० खाटांच्या कोरोना उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. अजित पवारांनी दिली मोठी बातमी; राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील 10 हजार जागा भरणार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वप्रथम मोकळ्या मैदानांवरील रुग्णालये ही संकल्पना आणली. त्यातही अशा मोकळ्या जागेवरील रुग्णालयांमध्ये आयसीयू सुरू करण्याची विक्रमी कामगिरी राज्याने देशासमोर ठेवली आहे. या सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा तात्पुरत्या असल्या, तरी त्यांचा दर्जा राखला गेला आहे. त्याची उभारणीही एखाद्या कायमस्वरूपी रुग्णालयाइतकीच भक्कमपणे झाली आहे. यासर्व सोयी अवाक्‌ करणाऱ्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाबरोबरचे युद्ध आपण नक्कीच जिंकू; मात्र कायमस्वरूपी सोय होण्यासाठी रुग्ग्णालयाचे काम हाती घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31PPLWG
Read More
आयटी कंपन्यांच्या 'या' नव्या फंड्यामुळे 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना फटका

पिंपरी : आयटीयन्सना अचानकपणे कामावरून कमी केल्यानंतर अनेक जण त्याबाबत दाद मागण्यासाठी थेट कामगार आयुक्‍तालय गाठतात. त्यानंतर कर्मचारी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये कामगार आयुक्‍तांकडे सुनावणी, निर्णय कर्मचाऱ्यांच्या विरोधात लागला, की पुन्हा कामगार न्यायालयात दावा दाखल होणार, यातून मार्ग काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची नोकरी शाबूत ठेवायची. मात्र, त्यांना काम आणि पगार द्यायचा नाही, असा फंडा काही आयटी कंपन्यांनी सुरू केल्यामुळे आयटीयन्सना नव्या चिंतेनं ग्रासलं आहे. आयटी कंपन्यांकडून सुरू केलेल्या या नव्या प्रकाराचा आतापर्यंत सुमारे दीड हजार जणांना फटका बसला असून, त्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्याचं समोर आलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

वस्तुस्थिती काय ?

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यानंतर आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली. काही जणांनी आपल्याकडं प्रोजेक्‍ट नसल्याचे कारण सांगत कर्मचाऱ्यांना सक्‍तीने रजेवर जाण्याचा सल्ला दिला, तर काहींनी अचानकपणे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. दरम्यान, हे प्रकार वाढू लागल्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांनी संघटनांच्या माध्यमातून कामगार आयुक्‍तांकडे दाद मागितली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं, तर कायदेशीर त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आता काही जणांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याऐवजी 'नो वर्क, नो पे' असे सूत्र राबवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नोकरी जरी हातात असली, तरी काम नाही आणि पगारही नाही, अशा अवस्थेत जगायचे कसे, असा सवाल आयटीयन्सना पडला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'काम नाही आणि पगार नाही', अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या आयटीयन्सनी नवीन नोकरी शोधण्यास सुरुवात केली आहे. नवी नोकरी मिळाल्यानंतर त्याठिकाणी जुन्या कंपनीमधील अुनभव आणि रिलीव्हींग लेटर द्यावे लागते. त्यामुळे सध्या आपल्याला होत असणाऱ्या त्रासाची दाद कंपनीच्या व्यवस्थापनाकडे कशी मागायची, असा सवाल त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सध्या कोरोनाच्या वातावरणामुळे नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध नसल्याने त्यांना आहे, त्याठिकाणी अडकून पडावे लागत आहे. दरम्यान, अशा प्रकारांमुळे आयटीयन्सचे नोकरीच्या ठिकाणी काम आणि पगार या दोन्ही गोष्टी बंद असल्यामुळे दैनंदिन गरजा, कर्जाचे हप्ते, आजारपणाचा खर्च असे प्रश्‍न कसे सोडवायचे, अशी चिंता सतावत असल्याची खंत अनेक आयटी अभियंत्यांनी व्यक्‍त केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयटी कर्मचाऱ्यांना पगार आणि काम न देण्याचे सूत्र काही आयटी कंपन्या राबवत आहेत. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. यामुळे कर्मचारी भविष्यात आपणहून नोकरी सोडून जातील, अशी अपेक्षा त्यांना आहे. कंपन्यांकडून राबवण्यात येत असणारी ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. यासंदर्भात आमच्याकडे तक्रारी आल्या असून, त्यावर मार्ग काढण्यासाठी कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे दाद मागणार असल्याचे नॅशनल इन्फरमेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेटचे सरचिटणीस हरप्रित सलुजा यांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आयटी कंपन्यांच्या 'या' नव्या फंड्यामुळे 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना फटका पिंपरी : आयटीयन्सना अचानकपणे कामावरून कमी केल्यानंतर अनेक जण त्याबाबत दाद मागण्यासाठी थेट कामगार आयुक्‍तालय गाठतात. त्यानंतर कर्मचारी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये कामगार आयुक्‍तांकडे सुनावणी, निर्णय कर्मचाऱ्यांच्या विरोधात लागला, की पुन्हा कामगार न्यायालयात दावा दाखल होणार, यातून मार्ग काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची नोकरी शाबूत ठेवायची. मात्र, त्यांना काम आणि पगार द्यायचा नाही, असा फंडा काही आयटी कंपन्यांनी सुरू केल्यामुळे आयटीयन्सना नव्या चिंतेनं ग्रासलं आहे. आयटी कंपन्यांकडून सुरू केलेल्या या नव्या प्रकाराचा आतापर्यंत सुमारे दीड हजार जणांना फटका बसला असून, त्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्याचं समोर आलं आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    वस्तुस्थिती काय ? कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यानंतर आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली. काही जणांनी आपल्याकडं प्रोजेक्‍ट नसल्याचे कारण सांगत कर्मचाऱ्यांना सक्‍तीने रजेवर जाण्याचा सल्ला दिला, तर काहींनी अचानकपणे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. दरम्यान, हे प्रकार वाढू लागल्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांनी संघटनांच्या माध्यमातून कामगार आयुक्‍तांकडे दाद मागितली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं, तर कायदेशीर त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आता काही जणांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याऐवजी 'नो वर्क, नो पे' असे सूत्र राबवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नोकरी जरी हातात असली, तरी काम नाही आणि पगारही नाही, अशा अवस्थेत जगायचे कसे, असा सवाल आयटीयन्सना पडला आहे.  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 'काम नाही आणि पगार नाही', अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या आयटीयन्सनी नवीन नोकरी शोधण्यास सुरुवात केली आहे. नवी नोकरी मिळाल्यानंतर त्याठिकाणी जुन्या कंपनीमधील अुनभव आणि रिलीव्हींग लेटर द्यावे लागते. त्यामुळे सध्या आपल्याला होत असणाऱ्या त्रासाची दाद कंपनीच्या व्यवस्थापनाकडे कशी मागायची, असा सवाल त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सध्या कोरोनाच्या वातावरणामुळे नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध नसल्याने त्यांना आहे, त्याठिकाणी अडकून पडावे लागत आहे. दरम्यान, अशा प्रकारांमुळे आयटीयन्सचे नोकरीच्या ठिकाणी काम आणि पगार या दोन्ही गोष्टी बंद असल्यामुळे दैनंदिन गरजा, कर्जाचे हप्ते, आजारपणाचा खर्च असे प्रश्‍न कसे सोडवायचे, अशी चिंता सतावत असल्याची खंत अनेक आयटी अभियंत्यांनी व्यक्‍त केली. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आयटी कर्मचाऱ्यांना पगार आणि काम न देण्याचे सूत्र काही आयटी कंपन्या राबवत आहेत. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. यामुळे कर्मचारी भविष्यात आपणहून नोकरी सोडून जातील, अशी अपेक्षा त्यांना आहे. कंपन्यांकडून राबवण्यात येत असणारी ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. यासंदर्भात आमच्याकडे तक्रारी आल्या असून, त्यावर मार्ग काढण्यासाठी कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे दाद मागणार असल्याचे नॅशनल इन्फरमेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेटचे सरचिटणीस हरप्रित सलुजा यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z7LhJ5
Read More
"रिसोर्ट घेता का रिसोर्ट', का आली ही वेळ...

नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानंतर बंद केलेले निसर्ग पर्यटन सुरू केले आहे. जिल्हाबंदी, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांनी निसर्ग पर्यटनाकडे पाठ फिरवलेली आहे. त्यामुळेच निसर्गाच्या सानिध्यात उभारलेले हॉटेल्स व रिसोर्ट अनेक व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरोनाची लस निघाल्याशिवाय या पर्यटनाला "बुस्ट' मिळणे अवघड असल्याने काही होम स्टे आणि रिसोर्ट संचालकांनी जंगलातील "प्रॉपर्टी' विकायला काढल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

 

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर 19 मार्चपासून राज्यातील निसर्ग पर्यटनावर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून सलग 105 दिवस राज्यातील अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प कुलूपबंद होते. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांचा रोजगार हिरावला आहे. टूरिस्ट गाईड, जिप्सी चालक, हॉटेल्स, रिसोर्ट आणि होमसह इतरही स्थानिक उद्योगांना या बंदीचा फटका बसला. विदर्भातील ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्प व टिपेश्वर अभयारण्याजवळील या व्यावसायिकांनी आपल्या उपजीविकेचे कारण पुढे करून बफरमधील पर्यटनाला परवानगी देण्याची मागणी केली होती. 

सहा महिन्यात गमावले बारा वाघ, या जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू, वाचा स्पेशल रिपोर्ट 

वनमंत्री संजय राठोड यांनी जंगल भ्रमंती सुरू करण्याचे निर्देश वन विभागाला दिले. त्यानंतर एक जुलैपासून ताडोबा-अंधारी बफर, पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सुरू करण्यात आलेत. उमरेड-कऱ्हांडलानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वारावरुन पर्यटन बंद करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली. रिसोर्ट व हॉटेल संचालकांनी पिपारिया येथील ग्राम पंचायतीने पत्र देऊन हॉटेल सुरू करु नयेत असे निर्देश दिलेले आहेत. राहण्याची सोय नसल्याने पर्यटकांनी या प्रकल्पाकडे पाठ फिरवलेली आहे. 

पक्षीप्रेमींना सुखद धक्‍का; भंडारा, गोंदियात या पक्ष्यांचे झाले आगमन 

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 13 प्रवेशद्वारांवरून पर्यटन सुरू झालेले आहे. जिल्हा बंदी काढण्यात आलेली नसल्याने इतर जिल्ह्यातील पर्यटकांना पर्यटनाकरिता पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पोलिसांकडून पर्यटनासाठी परवानगी मिळणे कठीण आहे. त्यामुळे ताडोबामधील पर्यटनाला अद्यापही हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. 

 

ताडोबातील 70 टक्के पर्यटक हे नागपूरसह विदर्भातील असतात. जिल्हाबंदीमुळे "त्या' पर्यटकांना निर्ग पर्यटनाला जाण्याची इच्छा असली तरी त्यावर निर्बंध आलेले आहे. जंगलातील रिसोर्ट व हॉटेलचा उन्हाळ्यातील महत्त्वाचा व्यवसाय यंदा हातून गेला. पुढेही कोरोना लसीचा शोध लागल्याशिवाय या व्यवसायाला बुस्ट मिळण्याची शक्‍यता धुसर आहे. परिणामी, हॉटेल व रिसोर्ट व्यावसायिकांना पुढील पाच महिने तरी पर्यटकांची वाट पहावी लागणार आहे. उन्हाळ्याच्या पर्यटनाच्या व्यवसायावर या रिसोर्ट व हॉटेल संचालकांकडे आर्थिक पाठबळ मिळत होते. यंदा उन्हाळ्याचा पूर्णच काळ टाळेबंदीत गेल्याने काही रिसोर्ट व होम स्टे संचालकांसमोर आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी आपली प्रॉपर्टी विकायला काढल्या आहेत. 

उन्हाळ्याचा मुख्य व्यवयास हातून गेला 
उन्हाळ्यातील पर्यटनाचा मुख्य व्यवसायच यंदा टाळेबंदीमुळे हातून गेला आहे. यात लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असले तरी पुढील पर्यटन व्यवसाय चांगला होईल या आशेवर रिसोर्टचा व्यवसाय सुरू ठेवणार आहे. हॉटेलमधील कामगारही कामावर असले तरी त्यांची संख्या कमी झालेली आहे. मात्र, ताडोबा, पेंचमधील काही रिसोर्ट व होम स्टे व्यावसायिकांनी आपली प्रॉपर्टी विकायला काढली आहे. 
स्वानंद सोनी, सृष्टी रिसोर्ट, पेंच प्रकल्प  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"रिसोर्ट घेता का रिसोर्ट', का आली ही वेळ... नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानंतर बंद केलेले निसर्ग पर्यटन सुरू केले आहे. जिल्हाबंदी, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांनी निसर्ग पर्यटनाकडे पाठ फिरवलेली आहे. त्यामुळेच निसर्गाच्या सानिध्यात उभारलेले हॉटेल्स व रिसोर्ट अनेक व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरोनाची लस निघाल्याशिवाय या पर्यटनाला "बुस्ट' मिळणे अवघड असल्याने काही होम स्टे आणि रिसोर्ट संचालकांनी जंगलातील "प्रॉपर्टी' विकायला काढल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.    देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर 19 मार्चपासून राज्यातील निसर्ग पर्यटनावर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून सलग 105 दिवस राज्यातील अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प कुलूपबंद होते. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांचा रोजगार हिरावला आहे. टूरिस्ट गाईड, जिप्सी चालक, हॉटेल्स, रिसोर्ट आणि होमसह इतरही स्थानिक उद्योगांना या बंदीचा फटका बसला. विदर्भातील ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्प व टिपेश्वर अभयारण्याजवळील या व्यावसायिकांनी आपल्या उपजीविकेचे कारण पुढे करून बफरमधील पर्यटनाला परवानगी देण्याची मागणी केली होती.  सहा महिन्यात गमावले बारा वाघ, या जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू, वाचा स्पेशल रिपोर्ट  वनमंत्री संजय राठोड यांनी जंगल भ्रमंती सुरू करण्याचे निर्देश वन विभागाला दिले. त्यानंतर एक जुलैपासून ताडोबा-अंधारी बफर, पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सुरू करण्यात आलेत. उमरेड-कऱ्हांडलानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वारावरुन पर्यटन बंद करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली. रिसोर्ट व हॉटेल संचालकांनी पिपारिया येथील ग्राम पंचायतीने पत्र देऊन हॉटेल सुरू करु नयेत असे निर्देश दिलेले आहेत. राहण्याची सोय नसल्याने पर्यटकांनी या प्रकल्पाकडे पाठ फिरवलेली आहे.  पक्षीप्रेमींना सुखद धक्‍का; भंडारा, गोंदियात या पक्ष्यांचे झाले आगमन  ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 13 प्रवेशद्वारांवरून पर्यटन सुरू झालेले आहे. जिल्हा बंदी काढण्यात आलेली नसल्याने इतर जिल्ह्यातील पर्यटकांना पर्यटनाकरिता पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पोलिसांकडून पर्यटनासाठी परवानगी मिळणे कठीण आहे. त्यामुळे ताडोबामधील पर्यटनाला अद्यापही हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.    ताडोबातील 70 टक्के पर्यटक हे नागपूरसह विदर्भातील असतात. जिल्हाबंदीमुळे "त्या' पर्यटकांना निर्ग पर्यटनाला जाण्याची इच्छा असली तरी त्यावर निर्बंध आलेले आहे. जंगलातील रिसोर्ट व हॉटेलचा उन्हाळ्यातील महत्त्वाचा व्यवसाय यंदा हातून गेला. पुढेही कोरोना लसीचा शोध लागल्याशिवाय या व्यवसायाला बुस्ट मिळण्याची शक्‍यता धुसर आहे. परिणामी, हॉटेल व रिसोर्ट व्यावसायिकांना पुढील पाच महिने तरी पर्यटकांची वाट पहावी लागणार आहे. उन्हाळ्याच्या पर्यटनाच्या व्यवसायावर या रिसोर्ट व हॉटेल संचालकांकडे आर्थिक पाठबळ मिळत होते. यंदा उन्हाळ्याचा पूर्णच काळ टाळेबंदीत गेल्याने काही रिसोर्ट व होम स्टे संचालकांसमोर आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी आपली प्रॉपर्टी विकायला काढल्या आहेत.  उन्हाळ्याचा मुख्य व्यवयास हातून गेला  उन्हाळ्यातील पर्यटनाचा मुख्य व्यवसायच यंदा टाळेबंदीमुळे हातून गेला आहे. यात लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असले तरी पुढील पर्यटन व्यवसाय चांगला होईल या आशेवर रिसोर्टचा व्यवसाय सुरू ठेवणार आहे. हॉटेलमधील कामगारही कामावर असले तरी त्यांची संख्या कमी झालेली आहे. मात्र, ताडोबा, पेंचमधील काही रिसोर्ट व होम स्टे व्यावसायिकांनी आपली प्रॉपर्टी विकायला काढली आहे.  स्वानंद सोनी, सृष्टी रिसोर्ट, पेंच प्रकल्प   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZL8q37
Read More
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - अशोक चव्हाण

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - अशोक चव्हाण

July 07, 2020 0 Comments
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात या विधेयकाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, न्यायालयाने त्यांना कोणताही दि...
Read More
मशिन्सची खरेदी थांबविण्याचा केंद्राला आदेश; पुणेकर उद्योजकाचीही याचिका

पुणे - मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्वदेशीचा गाजावाजा करणाऱ्या केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाला दिल्ली उच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. हे मंत्रालय खरेदी करीत असलेल्या मशिन्समध्ये स्थानिक उद्योगांना डावलून परदेशातील कंपन्यांना पायघड्या घातल्या जात आहेत, याबद्दल उद्योजकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने केंद्राला खरेदी तूर्त थांबविण्याचा आदेश दिला आहे. पुण्यातील एका उद्योजकानेही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ आणि कंपन्यांना मशिन टूल्स पुरविण्यासाठी केंद्र सरकारने देशात १५ टूल रूम आणि ट्रेनिंग सेंटर तयार केले. त्यासाठी १०० कोटी रुपयांची विविध मशिन टूल्स आणि मेजरिंग मशिन्स खरेदी करण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने निविदा मागविल्या. त्यातील अटी परदेशातील कंपन्यांना पूरक असून देशातील एकही लघु आणि मध्यम उद्योग त्यात पात्र ठरणार नाही, अशा पद्धतीने त्या तयार केल्या आहेत. याबाबत महाराष्ट्रातील उद्योजकांनी लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांना तीन वेळा साकडे घातले आहे. तसेच, राजकोटमधील मॅकपॉवर, बंगळूरमधील भारत फ्रिटज वॉर्नर (बीएफडब्ल्यू) आणि पुण्यातील ॲक्‍युरेट गेजिंग अँड इन्स्ट्रुमेंट्‌स या कंपन्यांनी संबंधित मंत्रालयाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यात मॅकपॉवरच्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादरीकरणाचा आदेश दिला असून तो पर्यंत मशिन्सची खरेदी करू नये, असा आदेश सोमवारी दिला. अन्य दोन याचिकांवरील सुनावणी प्रलंबित आहे. 

अजित पवारांनी दिली मोठी बातमी; राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील 10 हजार जागा भरणार

मंत्रीस्तरावरून हालचाली गरजेच्या
केंद्रीय मंत्री गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील कंपन्यांची मशिन टूल्स अमेरिका, जर्मनी, इटली व रशियालाही निर्यात होत आहेत. त्यामुळे भारतीय उद्योगांना मदत करण्यासाठी मंत्रिस्तरावरूनच हालचाली होणे गरजेचे आहे. भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या मशिन टूल्सच्या दर्जाबद्दल काही संशय असेल तर, सेंट्रल टूल्स मशिन इन्स्टिट्यूट (सीएमटीआय), नॅशनल फिजिकल लॅब (एनपीएल) आणि इंडियन मशिन टूल मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन (आयएमटीएमए) यांची संयुक्त समिती स्थापन करून खात्री करून घ्यावी.

गोंधळात गोंधळ! आता या मनोरुग्णाकडे कुठून आला पीपीई किट? रस्त्यावर मुक्त वावर...

देशातील कंपन्यांची उत्पादने पाश्‍चिमात्य देशांच्या तुलनेत चांगल्या दर्जाची असून त्यांची किंमतही कमी आहे. देशातील लघु व मध्यम उद्योजक सुमारे १४०० प्रकारची मशिन टूल्स जीई, कावासाकी, बार्क अँड व्हिएसएससी, वोक्‍सवॅगन, टाटा, बोश्‍च आदी राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना पुरवीत आहेत. 
- विक्रम साळुंखे, ॲक्‍युरेट गेजिंग अँड इन्स्ट्रुमेंट्‌स कंपनी, पुणे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मशिन्सची खरेदी थांबविण्याचा केंद्राला आदेश; पुणेकर उद्योजकाचीही याचिका पुणे - मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्वदेशीचा गाजावाजा करणाऱ्या केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाला दिल्ली उच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. हे मंत्रालय खरेदी करीत असलेल्या मशिन्समध्ये स्थानिक उद्योगांना डावलून परदेशातील कंपन्यांना पायघड्या घातल्या जात आहेत, याबद्दल उद्योजकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने केंद्राला खरेदी तूर्त थांबविण्याचा आदेश दिला आहे. पुण्यातील एका उद्योजकानेही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ आणि कंपन्यांना मशिन टूल्स पुरविण्यासाठी केंद्र सरकारने देशात १५ टूल रूम आणि ट्रेनिंग सेंटर तयार केले. त्यासाठी १०० कोटी रुपयांची विविध मशिन टूल्स आणि मेजरिंग मशिन्स खरेदी करण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने निविदा मागविल्या. त्यातील अटी परदेशातील कंपन्यांना पूरक असून देशातील एकही लघु आणि मध्यम उद्योग त्यात पात्र ठरणार नाही, अशा पद्धतीने त्या तयार केल्या आहेत. याबाबत महाराष्ट्रातील उद्योजकांनी लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांना तीन वेळा साकडे घातले आहे. तसेच, राजकोटमधील मॅकपॉवर, बंगळूरमधील भारत फ्रिटज वॉर्नर (बीएफडब्ल्यू) आणि पुण्यातील ॲक्‍युरेट गेजिंग अँड इन्स्ट्रुमेंट्‌स या कंपन्यांनी संबंधित मंत्रालयाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यात मॅकपॉवरच्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादरीकरणाचा आदेश दिला असून तो पर्यंत मशिन्सची खरेदी करू नये, असा आदेश सोमवारी दिला. अन्य दोन याचिकांवरील सुनावणी प्रलंबित आहे.  अजित पवारांनी दिली मोठी बातमी; राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील 10 हजार जागा भरणार मंत्रीस्तरावरून हालचाली गरजेच्या केंद्रीय मंत्री गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील कंपन्यांची मशिन टूल्स अमेरिका, जर्मनी, इटली व रशियालाही निर्यात होत आहेत. त्यामुळे भारतीय उद्योगांना मदत करण्यासाठी मंत्रिस्तरावरूनच हालचाली होणे गरजेचे आहे. भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या मशिन टूल्सच्या दर्जाबद्दल काही संशय असेल तर, सेंट्रल टूल्स मशिन इन्स्टिट्यूट (सीएमटीआय), नॅशनल फिजिकल लॅब (एनपीएल) आणि इंडियन मशिन टूल मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन (आयएमटीएमए) यांची संयुक्त समिती स्थापन करून खात्री करून घ्यावी. गोंधळात गोंधळ! आता या मनोरुग्णाकडे कुठून आला पीपीई किट? रस्त्यावर मुक्त वावर... देशातील कंपन्यांची उत्पादने पाश्‍चिमात्य देशांच्या तुलनेत चांगल्या दर्जाची असून त्यांची किंमतही कमी आहे. देशातील लघु व मध्यम उद्योजक सुमारे १४०० प्रकारची मशिन टूल्स जीई, कावासाकी, बार्क अँड व्हिएसएससी, वोक्‍सवॅगन, टाटा, बोश्‍च आदी राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना पुरवीत आहेत.  - विक्रम साळुंखे, ॲक्‍युरेट गेजिंग अँड इन्स्ट्रुमेंट्‌स कंपनी, पुणे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZMC9bV
Read More
"देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी'

पवनी : फिरत्या चाकावर ओल्या मातीला हाताने आकार देऊन कुंभार नानाविध भांडी तयार करतो. त्याच हाताने मातीतून देवाच्या सर्वांगसुंदर मूर्ती घडविल्या जातात. या पारंपरिक व्यवसायावरच शेकडो कुटुंबाच्या घरातील दोनवेळची चूल पेटते. परंतु, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या व्यवसायाला मोठी झळ बसली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेली होरपळ संपलेली नाही. त्यामुळे उद्विग्न होऊन "देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या या जिवाची आग लागू दे तुझ्या उरी' अशी आर्त साद मूर्ती घडविणारे कारागीर देवाला घालत आहेत.

कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसायसुद्धा त्यातून सुटलेला नाही. दररोज कष्ट करून, घाम गाळून राबणाऱ्या लोकांच्या या व्यवसायाची टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे वाट लागली. मार्च महिन्यापासून उन्हाळा सुरू होतो. चार महिन्यांच्या कालावधीत माठ, सुरई, घागर ही थंड पाण्याची भांडी विकली जातात. याच काळात लग्नसराई असते. वैवाहिक कार्यक्रमासाठी कुंभारांकडून खास घंगाळ व मातीची भांडी तयार करवून घेतली जातात. परंतु, लॉकडाऊनच्या काळात हा धंदा पूर्णपणे बुडाला.

मातीचे तयार माठ न विकले गेल्याने कुंभारवाडीत हजारो रुपयांचा माल पडून आहे. माल ठेवायला जागा नाही. वर्षभर हे नाजूक सामान सांभाळून ठेवणे जोखमीचे काम आहे. माठ फुटल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. आता कुंभारांची उरलीसुरली भिस्त कान्होबा, गणेशोत्सव, नवरात्र व दिवाळीवर अवलंबून आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवावरही नियंत्रण येणार आहे. त्यामुळे ही मंडळी घरगुती प्रतिष्ठापनेसाठी तयार होणाऱ्या मूर्ती घडविण्याच्या तयारीला लागले आहेत.

पोळा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव महिन्याभरावर आहे. निदान या काळात तरी आतापर्यंत झालेले नुकसान देवाच्या कृपेने भरून निघेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. घरगुती गणेश मूर्ती, श्रीकृष्ण, गोपिका, यांच्या मूर्ती बनविण्यात कुंभार समाज बांधव व्यस्त झाले आहेत. टाळेबंदीमुळे चार फुटांच्या वर मूर्ती बसविण्यास गणेशोत्सव मंडळांना मनाई आहे. त्यामुळे शहरातील मोठे मूर्तिकारसुद्धा घरगुती लहान मूर्ती तयार करण्यात सारी मगरळ व निराशा झटकून कामाला लागले आहेत.

 

श्रमाचे मिळेना मोल

शहरातील नेताजी वॉर्डात वरवाडे व खडसे हे कुंभार समाजाचे कुटुंब मातीची मडकी, भांडी, दिवे, कुंडी व देवदेवतांच्या मूर्ती तयार करतात. महागाईच्या काळात मातीचे साहित्य विकणे कठीण झाले आहे. मेहनत जास्त आणि मिळकत कमी असा प्रकार आहे. शहरालगतच्या तलावातून कुंभार उन्हाळ्यातच माती आणून ठेवतात. तलावात पाणी राहत असल्याने माती मिळत नाही. काही खासगी जागेवरून माती आणली जाते. मात्र, मनाई केल्याने तोही मार्ग बंद झाल्याचे प्रतिभा वरवाडे यांनी सांगितले. मातीची भांडी भट्टीत तापविली जातात. त्यासाठी काड्या विकत घ्याव्या लागतात. उत्पादन खर्च अधिक आणि मोल कमी अशा अडचणींमुळे नव्या पिढीतील तरुण व्यवसायापासून दुरावल्याचे वसंता वरवाडे यांनी सांगितले.

अवश्य वाचा- रेल्वेतून पार्सल पाठवताय्‌ जरा सावध व्हा, हे प्रकार वाढले

घरगुती मूर्ती घडविण्यावर भर
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात पाच ते दहा मोठ्या मूर्तींची ऑर्डर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त होते. आतापर्यंत एकच ऑर्डर आली. परंतु, कोरोना व लॉकडाउनमुळे यावेळी ही शक्‍यता फारच कमी आहे. त्यामुळे यंदा घरगुती गणेश व कान्होबा यांच्या मूर्ती घडविण्यावर भर आहे.
-प्रभाकर आरमोरीकर, मूर्तिकार, आझाद चौक

पुढील सणासुदीवर वर्षभराचे अर्थकारण
यावर्षी कोरोना व लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही आपले पोट कसे भरतो ते आम्हालाच ठाऊक. माझी तीन मुलेसुद्धा याच व्यवसायात आहेत. अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. वृद्ध असूनही कोणापुढे मदतीसाठी हात पसरले नाहीत. पुढील काळात देवांच्या सणाला सुरुवात होत आहे. आता त्यावरच आमचा पुढचा रोजगार अवलंबून आहे.
-राजाराम वरवाडे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी' पवनी : फिरत्या चाकावर ओल्या मातीला हाताने आकार देऊन कुंभार नानाविध भांडी तयार करतो. त्याच हाताने मातीतून देवाच्या सर्वांगसुंदर मूर्ती घडविल्या जातात. या पारंपरिक व्यवसायावरच शेकडो कुटुंबाच्या घरातील दोनवेळची चूल पेटते. परंतु, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या व्यवसायाला मोठी झळ बसली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेली होरपळ संपलेली नाही. त्यामुळे उद्विग्न होऊन "देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या या जिवाची आग लागू दे तुझ्या उरी' अशी आर्त साद मूर्ती घडविणारे कारागीर देवाला घालत आहेत. कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसायसुद्धा त्यातून सुटलेला नाही. दररोज कष्ट करून, घाम गाळून राबणाऱ्या लोकांच्या या व्यवसायाची टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे वाट लागली. मार्च महिन्यापासून उन्हाळा सुरू होतो. चार महिन्यांच्या कालावधीत माठ, सुरई, घागर ही थंड पाण्याची भांडी विकली जातात. याच काळात लग्नसराई असते. वैवाहिक कार्यक्रमासाठी कुंभारांकडून खास घंगाळ व मातीची भांडी तयार करवून घेतली जातात. परंतु, लॉकडाऊनच्या काळात हा धंदा पूर्णपणे बुडाला. मातीचे तयार माठ न विकले गेल्याने कुंभारवाडीत हजारो रुपयांचा माल पडून आहे. माल ठेवायला जागा नाही. वर्षभर हे नाजूक सामान सांभाळून ठेवणे जोखमीचे काम आहे. माठ फुटल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. आता कुंभारांची उरलीसुरली भिस्त कान्होबा, गणेशोत्सव, नवरात्र व दिवाळीवर अवलंबून आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवावरही नियंत्रण येणार आहे. त्यामुळे ही मंडळी घरगुती प्रतिष्ठापनेसाठी तयार होणाऱ्या मूर्ती घडविण्याच्या तयारीला लागले आहेत. पोळा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव महिन्याभरावर आहे. निदान या काळात तरी आतापर्यंत झालेले नुकसान देवाच्या कृपेने भरून निघेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. घरगुती गणेश मूर्ती, श्रीकृष्ण, गोपिका, यांच्या मूर्ती बनविण्यात कुंभार समाज बांधव व्यस्त झाले आहेत. टाळेबंदीमुळे चार फुटांच्या वर मूर्ती बसविण्यास गणेशोत्सव मंडळांना मनाई आहे. त्यामुळे शहरातील मोठे मूर्तिकारसुद्धा घरगुती लहान मूर्ती तयार करण्यात सारी मगरळ व निराशा झटकून कामाला लागले आहेत.   श्रमाचे मिळेना मोल शहरातील नेताजी वॉर्डात वरवाडे व खडसे हे कुंभार समाजाचे कुटुंब मातीची मडकी, भांडी, दिवे, कुंडी व देवदेवतांच्या मूर्ती तयार करतात. महागाईच्या काळात मातीचे साहित्य विकणे कठीण झाले आहे. मेहनत जास्त आणि मिळकत कमी असा प्रकार आहे. शहरालगतच्या तलावातून कुंभार उन्हाळ्यातच माती आणून ठेवतात. तलावात पाणी राहत असल्याने माती मिळत नाही. काही खासगी जागेवरून माती आणली जाते. मात्र, मनाई केल्याने तोही मार्ग बंद झाल्याचे प्रतिभा वरवाडे यांनी सांगितले. मातीची भांडी भट्टीत तापविली जातात. त्यासाठी काड्या विकत घ्याव्या लागतात. उत्पादन खर्च अधिक आणि मोल कमी अशा अडचणींमुळे नव्या पिढीतील तरुण व्यवसायापासून दुरावल्याचे वसंता वरवाडे यांनी सांगितले. अवश्य वाचा- रेल्वेतून पार्सल पाठवताय्‌ जरा सावध व्हा, हे प्रकार वाढले घरगुती मूर्ती घडविण्यावर भर दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात पाच ते दहा मोठ्या मूर्तींची ऑर्डर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त होते. आतापर्यंत एकच ऑर्डर आली. परंतु, कोरोना व लॉकडाउनमुळे यावेळी ही शक्‍यता फारच कमी आहे. त्यामुळे यंदा घरगुती गणेश व कान्होबा यांच्या मूर्ती घडविण्यावर भर आहे. -प्रभाकर आरमोरीकर, मूर्तिकार, आझाद चौक पुढील सणासुदीवर वर्षभराचे अर्थकारण यावर्षी कोरोना व लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही आपले पोट कसे भरतो ते आम्हालाच ठाऊक. माझी तीन मुलेसुद्धा याच व्यवसायात आहेत. अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. वृद्ध असूनही कोणापुढे मदतीसाठी हात पसरले नाहीत. पुढील काळात देवांच्या सणाला सुरुवात होत आहे. आता त्यावरच आमचा पुढचा रोजगार अवलंबून आहे. -राजाराम वरवाडे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ce0bEQ
Read More
महाविद्यालयांची ग्रंथालयेही होणार आता ऑनलाइन

पुणे - कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण अनिवार्य झाले असताना महाविद्यालये, विद्यापीठांच्या ग्रंथालयांमध्येही बदल होत आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांना जास्तीत जास्त ऑनलाइन ई साहित्य देण्यासाठी प्रयत्न सुरू असून ग्रंथपालांना प्रशिक्षण देऊन सज्ज केले जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उच्च शिक्षणात अभ्यासक्रमासह जास्तीत जास्त पुस्तकांचा संदर्भ घेऊन त्यातून ज्ञान घेण्यास महत्त्व असते.  यासाठी पुस्तके, शोधनिबंध, लेखमाला यांचा आधार घेतला जातो. ‘कोरोना’मुळे मार्चपासून महाविद्यालये, विद्यापीठे बंद आहेत. आता नवीन वर्षात अभ्यासक्रम शिकविण्यासाठी ऑनलाइन क्‍लासचा पर्याय समोर येत आहे. बहुतांश विद्यार्थी हे दुसऱ्या शहरात शिकत असल्याने व ते आता गावाकडे आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी ग्रंथालयात जाणे आवश्‍यक आहे.

राज्य सरकारमध्ये खरचं अस्वस्थता आहे का? वाचा शरद पवार यांचं उत्तर

तसेच अभ्यासासाठी साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे महाविद्यालये व विद्यापीठातील ग्रंथालयांना ऑनलाइन पोर्टलचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाने लॉकडॉउनमध्ये यासाठी काम केले. तसेच विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना घरातून ऑनलाइन पुस्तके, जर्नल्स उपलब्ध व्हावीत, यासाठी लॉग ईनद्वारे ॲक्‍सेसही दिला होता.

वीजग्राहकांनी एका महिन्यात भरले तब्बल एवढे कोटी

ग्रंथपालांना प्रशिक्षण
भविष्यात ग्रंथालयांचे काम ऑनलाइन चालणार असल्याने विद्यीपाठ अनुदान आयोग (यूजीसी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यीपीठ आणि सेंट व्हिसेंट वाणिज्य महाविद्यालयाने दोन आठवड्यांचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम घेतला. त्यात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम, ई सामग्री आणि वाड:मय चौर्य, शैक्षणिक व्हिडिओ संपादन, इ सामग्री निर्मितीसाठी ब्रॉडकास्टिंग सॉफ्टवेअर, योग्य संदर्भ पुस्तक देणे यासह अन्यबाबींचे प्रशिक्षण दिले. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, केरळ,  पश्‍चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड, गुजरात, तेलंगणासह अन्य राज्यांतून ३६७ ग्रंथपालांनी भाग घेतला होता. 

कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल होत असताना ग्रंथालयातही बदल होणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने ग्रंथपालांना प्रशिक्षण दिले. पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयातही ऑनलाइन सामग्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली आहे. त्याचाही लाभ विद्यार्थी, प्राध्यापकांना होणार आहे.
- डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय जर्नल्स, इ बुक, यासह कॅपीराईटमुक्त पुस्तके, हस्तलिखिते विद्यार्थी, प्राध्यापकांना ऑनलाइन दिली आहेत. यामध्ये ८ हजार जर्नल्स, ९ हजार पेक्षा ई बुक्‍सचा समावेश आहे.
- नागेश लोंढे, सहाय्यक ग्रंथपाल, जयकर ग्रंथालय

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महाविद्यालयांची ग्रंथालयेही होणार आता ऑनलाइन पुणे - कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण अनिवार्य झाले असताना महाविद्यालये, विद्यापीठांच्या ग्रंथालयांमध्येही बदल होत आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांना जास्तीत जास्त ऑनलाइन ई साहित्य देण्यासाठी प्रयत्न सुरू असून ग्रंथपालांना प्रशिक्षण देऊन सज्ज केले जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा उच्च शिक्षणात अभ्यासक्रमासह जास्तीत जास्त पुस्तकांचा संदर्भ घेऊन त्यातून ज्ञान घेण्यास महत्त्व असते.  यासाठी पुस्तके, शोधनिबंध, लेखमाला यांचा आधार घेतला जातो. ‘कोरोना’मुळे मार्चपासून महाविद्यालये, विद्यापीठे बंद आहेत. आता नवीन वर्षात अभ्यासक्रम शिकविण्यासाठी ऑनलाइन क्‍लासचा पर्याय समोर येत आहे. बहुतांश विद्यार्थी हे दुसऱ्या शहरात शिकत असल्याने व ते आता गावाकडे आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी ग्रंथालयात जाणे आवश्‍यक आहे. राज्य सरकारमध्ये खरचं अस्वस्थता आहे का? वाचा शरद पवार यांचं उत्तर तसेच अभ्यासासाठी साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे महाविद्यालये व विद्यापीठातील ग्रंथालयांना ऑनलाइन पोर्टलचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाने लॉकडॉउनमध्ये यासाठी काम केले. तसेच विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना घरातून ऑनलाइन पुस्तके, जर्नल्स उपलब्ध व्हावीत, यासाठी लॉग ईनद्वारे ॲक्‍सेसही दिला होता. वीजग्राहकांनी एका महिन्यात भरले तब्बल एवढे कोटी ग्रंथपालांना प्रशिक्षण भविष्यात ग्रंथालयांचे काम ऑनलाइन चालणार असल्याने विद्यीपाठ अनुदान आयोग (यूजीसी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यीपीठ आणि सेंट व्हिसेंट वाणिज्य महाविद्यालयाने दोन आठवड्यांचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम घेतला. त्यात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम, ई सामग्री आणि वाड:मय चौर्य, शैक्षणिक व्हिडिओ संपादन, इ सामग्री निर्मितीसाठी ब्रॉडकास्टिंग सॉफ्टवेअर, योग्य संदर्भ पुस्तक देणे यासह अन्यबाबींचे प्रशिक्षण दिले. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, केरळ,  पश्‍चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड, गुजरात, तेलंगणासह अन्य राज्यांतून ३६७ ग्रंथपालांनी भाग घेतला होता.  कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल होत असताना ग्रंथालयातही बदल होणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने ग्रंथपालांना प्रशिक्षण दिले. पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयातही ऑनलाइन सामग्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली आहे. त्याचाही लाभ विद्यार्थी, प्राध्यापकांना होणार आहे. - डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय जर्नल्स, इ बुक, यासह कॅपीराईटमुक्त पुस्तके, हस्तलिखिते विद्यार्थी, प्राध्यापकांना ऑनलाइन दिली आहेत. यामध्ये ८ हजार जर्नल्स, ९ हजार पेक्षा ई बुक्‍सचा समावेश आहे. - नागेश लोंढे, सहाय्यक ग्रंथपाल, जयकर ग्रंथालय News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Zax9z0
Read More