Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 4, 2020

स्मार्ट पार्किंगची कुणी लावली वाट?

नागपूर : राज्यातील पहिल्या स्मार्ट पार्किंग प्रकल्पाला उदासिनतेचे ग्रहण लागले असून महापालिका वाहतूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे चांगल्या प्रकल्पाची 'वाट' लागली आहे. प्रकल्प पूर्ण होऊन दोन वर्षे झाली. परंतु आयुक्त व पदाधिकाऱ्यांतील वादाने पार्किंगची अडचण दूर करणाऱ्या या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले असून चांगल्या सुविधेपासून नागपूरकरांना वंचित राहावे लागत आहे. 

रामदासपेठेतील वर्दळीच्या सेंट्रल बाजार रोडवर काचीपुरा चौक ते हॉटेल तुली इम्पेरिअलपर्यंतच्या पाचशे मीटर अंतरात स्मार्ट पार्किंग तयार करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पहिली स्मार्ट पार्किंग नागपुरात व्हावी, या हेतूने 140 कोटींचा स्मार्ट ऍन्ड सेफ सिटी प्रकल्प मंजूर केला होता. यात पार्किंगसह स्मार्ट स्ट्रिटचाही समावेश होता.

नागपूर स्मार्ट सिटी ऍन्ड डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने स्मार्ट ऍन्ड सेफ सिटीअंतर्गत एलऍन्डटी कंपनीला स्मार्ट पार्किंग तयार करण्याचे काम देण्यात आले होते. सीटीटीव्ही कॅमेरे, पार्किंगस्थळी सेंसर, प्रवेशद्वारावर संगणकीय प्रणालीयुक्त सुविधा या पार्किंगच्या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या एसपीव्ही कंपनी हा प्रकल्प महापालिकेच्या वाहतूक विभागाकडे सुपूर्द केला.

वाहतूक विभागाने स्मार्ट पार्किंगच्या संचालनासाठी एका एजन्सीची नियुक्ती करणे अपेक्षित होते. परंतु दोन वर्षे होत असून पालिकेच्या वाहतुक विभागाने या प्रकल्पाचे बारा वाजवल्याचे चित्र आहे. आयुक्त तुकाराम मुंढे आल्यानंतर पार्किंग सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु स्मार्ट सिटीवरून सत्ताधारी व आयुक्त यांच्यातील वादाने शहरातील विकास कामे ठप्प झालीच, शिवाय एका चांगल्या प्रकल्पाचीही वाताहत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सत्ताधारी आता कसे घेरणार तुकाराम मुंढेंना?मनपाची सभा आता होणार व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे

एकीकडे महापालिकेला उत्पन्न नसल्याने विकास कामांच्या फाईल्स आयुक्तांनी रोखल्या आहेत. मात्र, त्याचवेळी महापालिकेच्या उत्पन्नात भर घालण्याची क्षमता असलेल्या प्रकल्प सुरू करण्याकडे आयुक्तांचेही दुर्लक्ष होत आहे. 

अतिक्रमणाचा धोका 
सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने स्मार्ट पार्किंगमधील अतिक्रमण गायब झाले. परंतु लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे पुन्हा दुकानदारांचे अतिक्रमण होण्याची शक्‍यता आहे. कोरोनाच्या आगमनापूर्वी स्मार्ट पार्किंगच्या वसुलीसाठी तयार करण्यात आलेले स्टॉल येथील चहाटपरीवाल्यांसाठी सोयीचे झाले होते. भविष्यातही अशीच स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. 

पालिकेच्या उत्पन्नालाही फटका 
स्मार्ट पार्किंगमध्ये 85 कार पार्किंगसाठी जागा निश्‍चित करण्यात आल्याचे पालिकेतील सुत्राने नमुद केले. एवढेच नव्हे दुचाकी वाहनांनाही पार्किंगसाठी स्थान देण्यात येणार आहे. येथे पार्किंगसाठी तासाप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कामुळे आर्थिक संकटातील पालिकेला दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. परंतु पार्किंग सुरू न झाल्याने उत्पन्नालाही फटका बसत आहे. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्मार्ट पार्किंगची कुणी लावली वाट? नागपूर : राज्यातील पहिल्या स्मार्ट पार्किंग प्रकल्पाला उदासिनतेचे ग्रहण लागले असून महापालिका वाहतूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे चांगल्या प्रकल्पाची 'वाट' लागली आहे. प्रकल्प पूर्ण होऊन दोन वर्षे झाली. परंतु आयुक्त व पदाधिकाऱ्यांतील वादाने पार्किंगची अडचण दूर करणाऱ्या या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले असून चांगल्या सुविधेपासून नागपूरकरांना वंचित राहावे लागत आहे.  रामदासपेठेतील वर्दळीच्या सेंट्रल बाजार रोडवर काचीपुरा चौक ते हॉटेल तुली इम्पेरिअलपर्यंतच्या पाचशे मीटर अंतरात स्मार्ट पार्किंग तयार करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पहिली स्मार्ट पार्किंग नागपुरात व्हावी, या हेतूने 140 कोटींचा स्मार्ट ऍन्ड सेफ सिटी प्रकल्प मंजूर केला होता. यात पार्किंगसह स्मार्ट स्ट्रिटचाही समावेश होता. नागपूर स्मार्ट सिटी ऍन्ड डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने स्मार्ट ऍन्ड सेफ सिटीअंतर्गत एलऍन्डटी कंपनीला स्मार्ट पार्किंग तयार करण्याचे काम देण्यात आले होते. सीटीटीव्ही कॅमेरे, पार्किंगस्थळी सेंसर, प्रवेशद्वारावर संगणकीय प्रणालीयुक्त सुविधा या पार्किंगच्या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या एसपीव्ही कंपनी हा प्रकल्प महापालिकेच्या वाहतूक विभागाकडे सुपूर्द केला. वाहतूक विभागाने स्मार्ट पार्किंगच्या संचालनासाठी एका एजन्सीची नियुक्ती करणे अपेक्षित होते. परंतु दोन वर्षे होत असून पालिकेच्या वाहतुक विभागाने या प्रकल्पाचे बारा वाजवल्याचे चित्र आहे. आयुक्त तुकाराम मुंढे आल्यानंतर पार्किंग सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु स्मार्ट सिटीवरून सत्ताधारी व आयुक्त यांच्यातील वादाने शहरातील विकास कामे ठप्प झालीच, शिवाय एका चांगल्या प्रकल्पाचीही वाताहत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सत्ताधारी आता कसे घेरणार तुकाराम मुंढेंना?मनपाची सभा आता होणार व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकीकडे महापालिकेला उत्पन्न नसल्याने विकास कामांच्या फाईल्स आयुक्तांनी रोखल्या आहेत. मात्र, त्याचवेळी महापालिकेच्या उत्पन्नात भर घालण्याची क्षमता असलेल्या प्रकल्प सुरू करण्याकडे आयुक्तांचेही दुर्लक्ष होत आहे.  अतिक्रमणाचा धोका  सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने स्मार्ट पार्किंगमधील अतिक्रमण गायब झाले. परंतु लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे पुन्हा दुकानदारांचे अतिक्रमण होण्याची शक्‍यता आहे. कोरोनाच्या आगमनापूर्वी स्मार्ट पार्किंगच्या वसुलीसाठी तयार करण्यात आलेले स्टॉल येथील चहाटपरीवाल्यांसाठी सोयीचे झाले होते. भविष्यातही अशीच स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.  पालिकेच्या उत्पन्नालाही फटका  स्मार्ट पार्किंगमध्ये 85 कार पार्किंगसाठी जागा निश्‍चित करण्यात आल्याचे पालिकेतील सुत्राने नमुद केले. एवढेच नव्हे दुचाकी वाहनांनाही पार्किंगसाठी स्थान देण्यात येणार आहे. येथे पार्किंगसाठी तासाप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कामुळे आर्थिक संकटातील पालिकेला दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. परंतु पार्किंग सुरू न झाल्याने उत्पन्नालाही फटका बसत आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2C9nteJ
Read More
सावधान! तुमच्या आहारातील कॉम्बिनेशन ठरू शकतं घातक

मुंबई - काही लोक त्यांच्या आहारावर जास्त लक्ष देतात. ठरलेल्या डाएटनुसार त्यांचं खाणं पिणं सुरु असतं. मात्र तरीही अनेकदा कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये याची माहिती त्यांना नसते. फळे, दही, दूध, सॅलड, डाळ, मटण यातून पोषक तत्वे मिळतात पण तेव्हाच जेव्हा तुम्ही त्यासोबत योग्य गोष्टी खाता. एकावेळी अनेक पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. आयुर्वेदात कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये याची माहिती मिळते. थंड आणि गरम, गोड आणि खारट असं मिश्रण खाणं टाळावं. 

जेवणाच्या वेळी अनेकांना दही खाण्याची सवय असते. दह्यासोबत आंबट फळं खाऊ नयेत. दही आणि फळामध्ये वेगवेगळ्या एंजाइम असतात .यामुळे पचनास जड जातं. यासाठी दोन्ही एकत्र खाण्याचा सल्ला दिला जात नाही. दही गरम किंवा उष्णता असलेल्या पदार्थांसोबत खाऊ नये. माशामध्ये उष्णता असते यासाठी मासे दह्यासोबत खाऊ नयेत. पराठे, पूरी यासारख्या तळलेल्या गोष्टींसोबतही दही खाणं चांगलं नसतं. याशिवाय दही आणि खजूर किंवा चिकनसुद्धा एकत्र खाऊ नये.  

हे वाचा - हेल्दी रेसिपी’मध्ये देखील कोहळ्याचे बोंडे बनणार

दुधासोबत काही पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. दूध आणि खारट पदार्थ एकत्र खाणं टाळावं. तसंच दुधाच्या चहासोबतही असे पदार्थ खाऊ नयेत. मिठ मिसळल्याने मिल्क प्रोटीन घट्ट होतं आणि त्यात पोषण कमी होतं. दुधासोबत फळेही खाऊ नयेत. दुधात फळे मिसळून खाल्ल्याने त्यातील कॅल्शिअम फळांच्या एंजाइमला शोषून घेते. यातून शरीराला फळांमधून मिळणारी पोषक द्रव्ये मिळत नाहीत.

शिवाय उडीद दाळ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. हिरव्या भाज्या किंवा मूळा खाल्यानंतरही दुध खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अंडी, मटण आणि पनीर यासारख्या पदार्थांच्या सेवनानंतर दूध पिऊ नये. हे एकत्र खाल्ल्यास पचनशक्ती बिघडू शकते.

हे वाचा - गाढवाच्या दुधापासून बनतं जगातलं सर्वात महागडं पनीर, किंमत वाचून चकीत व्हाल

काही फळेसुद्धा एकत्र खाल्ल्याने आरोग्याला अपाय होऊ शकतो. यामध्ये संत्री आणि केळे एकत्र खाऊ नये. कारण आंबट फळे गोड फळांमधून निघणाऱ्या साखरेमध्ये अडथळा निर्माण करतात यामुळे पचनाला त्रास होऊ शकतो. 

मध कधीच गरम करून खाऊ नये. ताप वाढत असेल तर मधाचे सेवन टाळावे. खाल्ल्याश शरिरात पित्ताचे प्रमाण वाढते. मध आणि लोणी किंवा तूप एकत्र खाऊ नये. इतकंच काय मधात पाणी घालून पिणेही हानीकारक ठरण्याची शकता असते. 

हे वाचा - पाच असे पदार्थ जे जगभरात मानले जातात हेल्दी, तुमच्याही जेवणात असायलाच हवेत!

मासा आणि काळी मिर्ची एकत्र खाऊ नये. 

तिळ आणि पालक यांचे एकत्र सेवन डायरियाला कारणीभूत ठरते. 

तांब्याच्या भांड्यात 10 दिवसापर्यंत ठेवलेलं तूप खाऊ नये.

पिवळ्या छत्रीचे मशरूम मोहरीच्या तेलातून खाऊ नयेय

थंड पाण्यासोत तूप, तेल, पेरू, जांभूळ, भूईमुंगाच्या शेंगा खाऊ नयेत. 

आयुर्वेदात जरी थंड गरम पदार्थांचे सेवन टाळण्याबाबत सांगण्यात आलं असलं तरी मॉडर्न सायन्स बॅलन्स असलेलं डाएट या गोष्टी मान्य करेलच असं नाही. जर तुम्ही एखाद्या आजाराशी झुंज देत असाल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अशा पदार्थांचे सेवन करावे. आपल्या आहारात पचनशक्ती बिघडेल अशा गोष्टींचा समावेश असणार नाही याची काळजी घ्यावी. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावधान! तुमच्या आहारातील कॉम्बिनेशन ठरू शकतं घातक मुंबई - काही लोक त्यांच्या आहारावर जास्त लक्ष देतात. ठरलेल्या डाएटनुसार त्यांचं खाणं पिणं सुरु असतं. मात्र तरीही अनेकदा कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये याची माहिती त्यांना नसते. फळे, दही, दूध, सॅलड, डाळ, मटण यातून पोषक तत्वे मिळतात पण तेव्हाच जेव्हा तुम्ही त्यासोबत योग्य गोष्टी खाता. एकावेळी अनेक पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. आयुर्वेदात कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये याची माहिती मिळते. थंड आणि गरम, गोड आणि खारट असं मिश्रण खाणं टाळावं.  जेवणाच्या वेळी अनेकांना दही खाण्याची सवय असते. दह्यासोबत आंबट फळं खाऊ नयेत. दही आणि फळामध्ये वेगवेगळ्या एंजाइम असतात .यामुळे पचनास जड जातं. यासाठी दोन्ही एकत्र खाण्याचा सल्ला दिला जात नाही. दही गरम किंवा उष्णता असलेल्या पदार्थांसोबत खाऊ नये. माशामध्ये उष्णता असते यासाठी मासे दह्यासोबत खाऊ नयेत. पराठे, पूरी यासारख्या तळलेल्या गोष्टींसोबतही दही खाणं चांगलं नसतं. याशिवाय दही आणि खजूर किंवा चिकनसुद्धा एकत्र खाऊ नये.   हे वाचा - हेल्दी रेसिपी’मध्ये देखील कोहळ्याचे बोंडे बनणार दुधासोबत काही पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. दूध आणि खारट पदार्थ एकत्र खाणं टाळावं. तसंच दुधाच्या चहासोबतही असे पदार्थ खाऊ नयेत. मिठ मिसळल्याने मिल्क प्रोटीन घट्ट होतं आणि त्यात पोषण कमी होतं. दुधासोबत फळेही खाऊ नयेत. दुधात फळे मिसळून खाल्ल्याने त्यातील कॅल्शिअम फळांच्या एंजाइमला शोषून घेते. यातून शरीराला फळांमधून मिळणारी पोषक द्रव्ये मिळत नाहीत. शिवाय उडीद दाळ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. हिरव्या भाज्या किंवा मूळा खाल्यानंतरही दुध खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अंडी, मटण आणि पनीर यासारख्या पदार्थांच्या सेवनानंतर दूध पिऊ नये. हे एकत्र खाल्ल्यास पचनशक्ती बिघडू शकते. हे वाचा - गाढवाच्या दुधापासून बनतं जगातलं सर्वात महागडं पनीर, किंमत वाचून चकीत व्हाल काही फळेसुद्धा एकत्र खाल्ल्याने आरोग्याला अपाय होऊ शकतो. यामध्ये संत्री आणि केळे एकत्र खाऊ नये. कारण आंबट फळे गोड फळांमधून निघणाऱ्या साखरेमध्ये अडथळा निर्माण करतात यामुळे पचनाला त्रास होऊ शकतो.  मध कधीच गरम करून खाऊ नये. ताप वाढत असेल तर मधाचे सेवन टाळावे. खाल्ल्याश शरिरात पित्ताचे प्रमाण वाढते. मध आणि लोणी किंवा तूप एकत्र खाऊ नये. इतकंच काय मधात पाणी घालून पिणेही हानीकारक ठरण्याची शकता असते.  हे वाचा - पाच असे पदार्थ जे जगभरात मानले जातात हेल्दी, तुमच्याही जेवणात असायलाच हवेत! मासा आणि काळी मिर्ची एकत्र खाऊ नये.  तिळ आणि पालक यांचे एकत्र सेवन डायरियाला कारणीभूत ठरते.  तांब्याच्या भांड्यात 10 दिवसापर्यंत ठेवलेलं तूप खाऊ नये. पिवळ्या छत्रीचे मशरूम मोहरीच्या तेलातून खाऊ नयेय थंड पाण्यासोत तूप, तेल, पेरू, जांभूळ, भूईमुंगाच्या शेंगा खाऊ नयेत.  आयुर्वेदात जरी थंड गरम पदार्थांचे सेवन टाळण्याबाबत सांगण्यात आलं असलं तरी मॉडर्न सायन्स बॅलन्स असलेलं डाएट या गोष्टी मान्य करेलच असं नाही. जर तुम्ही एखाद्या आजाराशी झुंज देत असाल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अशा पदार्थांचे सेवन करावे. आपल्या आहारात पचनशक्ती बिघडेल अशा गोष्टींचा समावेश असणार नाही याची काळजी घ्यावी.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dZD8dW
Read More
धक्कादायक! दहावीच्या या निर्णयामुळे राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांचे होणार नुकसान

औरंगाबाद ः दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. रद्द झालेल्या त्या पेपरला आता इतर सहा विषयांत पडणाऱ्या लेखी गुणांच्या सरासरीनुसार गुण देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मात्र, यामुळे राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. म्हणून जे गुण इतिहास विषयाला मिळाले तेच गुण भूगोल विषयाला देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे. विद्यार्थ्यावर अन्याय झाल्यास न्यायालयीन प्रकरणे उपस्थित होतील, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
 
भूगोलाचा पेपर २३ मार्चला होता. कोरोनामुळे तो रद्द करण्यात आला. त्यानंतर देशभरात लॉकडाऊन घोषित झाले. मंडळाने २७ मे रोजी इतर सहा विषयांच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या सरासरीनुसार विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय घेतला. त्यावर पालक, शिक्षकांनी आक्षेप नोंदवला आहे. या निर्णयामुळे मेरीट विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होणार आहे. बोर्डाच्या नियमानुसार अनवधानाने उत्तरपत्रिका गहाळ झाली, फाटली, स्पष्ट न दिसणे अथवा जळाली तर त्यांना सरासरी गुण देण्याचा नियम आहे. 

परंतू, कोरोनाच्या कारणामुळे सरासरी गुण देणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय केल्यासारखे आहे. त्यापेक्षा जे गुण इतिहास विषयाला मिळाले तेच संपूर्ण गुण भूगोल या विषयास देण्यात यावेत. दहावीचा निकाल लागण्यापुर्वी यामध्ये तातडीने लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, बच्चू कडू, शालेय शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. 

भूगोल सरासरी गुणदान पद्धत 
राज्य मंडळाच्या सरासरी गुणदान पद्धतीप्रमाणे प्रथम, द्वितीय आणि तृतीय भाषा, विज्ञान, गणित प्रत्येक विषय ८० गुण; तर इतिहास व भूगोल प्रत्येकी ४० गुणांचे पेपर आहेत. या सर्व विषयांच्या गुणांचा गुणाकार करण्यात येणार असून या गुणाकाराला ४४० ने भागून येणारे सरासरी गुण भूगोलाला देण्यात येणार आहेत. या गुणदान पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फक्त १८ ते २२ गुण मिळणार आहेत. 

सरासरी गुण देण्याचा नियम उत्तरपत्रिका गहाळ होणे, फाटणे, स्पष्ट न दिसणे, जळणे या कारणांसाठी घेतला जातो. परंतु राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांना कोरोनाच्या संकटामुळे पेपर देता आला नाही, यासाठी सरासरीचा नियम योग्य आहे का? म्हणून समाजशास्त्रातील इतिहास या विषयाला मिळालेल्या गुणांच्या तुलनेत समान गुण देण्यात यावेत. 
-वाल्मिक सुरासे (विभागीय कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ) 
-- 

 

भूगोल विषयासाठी राज्यमंडळाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंडळाने काढलेला फार्म्युला हा इतर विषयांत घेतलेल्या गुणांवरुन असल्याने समतोल साधणारा आहे. त्यामुळे हा निर्णय अंतिम राहाणार आहे. 
-आर. पी. पाटील, सहसचिव, औरंगाबाद विभागीय मंडळ, 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

धक्कादायक! दहावीच्या या निर्णयामुळे राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांचे होणार नुकसान औरंगाबाद ः दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. रद्द झालेल्या त्या पेपरला आता इतर सहा विषयांत पडणाऱ्या लेखी गुणांच्या सरासरीनुसार गुण देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मात्र, यामुळे राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. म्हणून जे गुण इतिहास विषयाला मिळाले तेच गुण भूगोल विषयाला देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे. विद्यार्थ्यावर अन्याय झाल्यास न्यायालयीन प्रकरणे उपस्थित होतील, अशी भीतीही व्यक्त केली आहे.   भूगोलाचा पेपर २३ मार्चला होता. कोरोनामुळे तो रद्द करण्यात आला. त्यानंतर देशभरात लॉकडाऊन घोषित झाले. मंडळाने २७ मे रोजी इतर सहा विषयांच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या सरासरीनुसार विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय घेतला. त्यावर पालक, शिक्षकांनी आक्षेप नोंदवला आहे. या निर्णयामुळे मेरीट विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होणार आहे. बोर्डाच्या नियमानुसार अनवधानाने उत्तरपत्रिका गहाळ झाली, फाटली, स्पष्ट न दिसणे अथवा जळाली तर त्यांना सरासरी गुण देण्याचा नियम आहे.  परंतू, कोरोनाच्या कारणामुळे सरासरी गुण देणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय केल्यासारखे आहे. त्यापेक्षा जे गुण इतिहास विषयाला मिळाले तेच संपूर्ण गुण भूगोल या विषयास देण्यात यावेत. दहावीचा निकाल लागण्यापुर्वी यामध्ये तातडीने लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, बच्चू कडू, शालेय शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे केली आहे.  भूगोल सरासरी गुणदान पद्धत  राज्य मंडळाच्या सरासरी गुणदान पद्धतीप्रमाणे प्रथम, द्वितीय आणि तृतीय भाषा, विज्ञान, गणित प्रत्येक विषय ८० गुण; तर इतिहास व भूगोल प्रत्येकी ४० गुणांचे पेपर आहेत. या सर्व विषयांच्या गुणांचा गुणाकार करण्यात येणार असून या गुणाकाराला ४४० ने भागून येणारे सरासरी गुण भूगोलाला देण्यात येणार आहेत. या गुणदान पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फक्त १८ ते २२ गुण मिळणार आहेत.  सरासरी गुण देण्याचा नियम उत्तरपत्रिका गहाळ होणे, फाटणे, स्पष्ट न दिसणे, जळणे या कारणांसाठी घेतला जातो. परंतु राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांना कोरोनाच्या संकटामुळे पेपर देता आला नाही, यासाठी सरासरीचा नियम योग्य आहे का? म्हणून समाजशास्त्रातील इतिहास या विषयाला मिळालेल्या गुणांच्या तुलनेत समान गुण देण्यात यावेत.  -वाल्मिक सुरासे (विभागीय कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ)  --    भूगोल विषयासाठी राज्यमंडळाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंडळाने काढलेला फार्म्युला हा इतर विषयांत घेतलेल्या गुणांवरुन असल्याने समतोल साधणारा आहे. त्यामुळे हा निर्णय अंतिम राहाणार आहे.  -आर. पी. पाटील, सहसचिव, औरंगाबाद विभागीय मंडळ,    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3f0A3f5
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०५ जुलै

पंचांग -
रविवार - आषाढ शु. १५, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१६, गुरुपौर्णिमा, चंद्रोदय सायं. ७.३४, चंद्रास्त प. ५.५८, भारतीय सौर १४, शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९८२ - भक्तिप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचा अविभाज्य घटक बनून राहिलेले एक महान गीतकार  भरत व्यास यांचे निधन.
१९८४ - इंडियन एअरलाईन्सच्या श्रीनगर ते दिल्ली या विमानाचे शीख अतिरेक्‍यांनी अपहरण करून लाहोरला नेले. या विमानात २२५ प्रवासी व ९ कर्मचारी होते.
१९९३ - माजी केंद्रीय कृषीराज्यमंत्री पी. के. पटेल यांचे निधन. ते गुजरातमधील सहकारी चळवळीचे प्रणेते होते. 
१९९४ - मल्याळीतील ज्येष्ठ लेखक व स्वातंत्र्यसेनानी वैक्कोम मुहंमद बशीर यांचे कोझिकोड येथे निधन. बशीर ‘बेपोर सुलतान’ या नावाने मल्याळी साहित्य जगतात ते प्रसिद्ध होते.
१९९६ - संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना प्रतिष्ठेचा ‘आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर.
१९९७ - स्वित्झर्लंडच्या अवघ्या सोळा वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्हात्नाला पराभूत करून कारकिर्दीतील दुसरे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद मिळविताना सर्वांत लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळविण्याची कामगिरी केली.
२००० - राष्ट्रीय मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील मैदानी स्पर्धेत हरियानाच्या शक्तीसिंगने २०.६० मीटर अंतरावर गोळाफेक करुन नवा आशियाई विक्रम नोंदविला. या आधीचा २०.४३ मीटरचा विक्रम कझाकस्तानच्या रुबतोव सर्जीच्या नावावर होता.
२००३ - इंग्रजी भाषेचे ज्येष्ठ तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे माजी संचालक डॉ. रामचंद्र सोनुपंत ऊर्फ रा. सो. सराफ यांचे निधन.
२००४ - युरोपीय फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून विजेत्या ग्रीसचा कर्णधार थिओडोरस झागोराकीस याची निवड.
२००४ - ग्रीसने युरोपीय फुटबॉल स्पर्धेत अप्रतिम खेळ करीत पोर्तुगालला हरवून अविस्मरणीय अजिंक्‍यपद मिळविले.

दिनमान -
मेष : शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. मनोबल वाढेल.
वृषभ : काहींना अचानक धनलाभ संभवतो. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आत्मविश्‍वास वाढेल.
कर्क : नको त्या गोष्टींसाठी वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी.  
सिंह : वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाच्या कामात यश मिळवाल. 
कन्या : प्रॉपर्टीच्या संदर्भात प्रस्ताव समोर येतील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. 
तूळ : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. 
वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. आश्‍वासनांवर अवलंबून राहू नये.
धनू : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. संततिसौख्य लाभेल.
मकर : कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यश लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ : प्रॉपर्टीच्या संदर्भातील कामे हळूहळू मार्गी लावू शकाल. संततिसौख्य लाभेल.
मीन : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०५ जुलै पंचांग - रविवार - आषाढ शु. १५, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१६, गुरुपौर्णिमा, चंद्रोदय सायं. ७.३४, चंद्रास्त प. ५.५८, भारतीय सौर १४, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९८२ - भक्तिप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचा अविभाज्य घटक बनून राहिलेले एक महान गीतकार  भरत व्यास यांचे निधन. १९८४ - इंडियन एअरलाईन्सच्या श्रीनगर ते दिल्ली या विमानाचे शीख अतिरेक्‍यांनी अपहरण करून लाहोरला नेले. या विमानात २२५ प्रवासी व ९ कर्मचारी होते. १९९३ - माजी केंद्रीय कृषीराज्यमंत्री पी. के. पटेल यांचे निधन. ते गुजरातमधील सहकारी चळवळीचे प्रणेते होते.  १९९४ - मल्याळीतील ज्येष्ठ लेखक व स्वातंत्र्यसेनानी वैक्कोम मुहंमद बशीर यांचे कोझिकोड येथे निधन. बशीर ‘बेपोर सुलतान’ या नावाने मल्याळी साहित्य जगतात ते प्रसिद्ध होते. १९९६ - संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना प्रतिष्ठेचा ‘आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर. १९९७ - स्वित्झर्लंडच्या अवघ्या सोळा वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्हात्नाला पराभूत करून कारकिर्दीतील दुसरे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद मिळविताना सर्वांत लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळविण्याची कामगिरी केली. २००० - राष्ट्रीय मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील मैदानी स्पर्धेत हरियानाच्या शक्तीसिंगने २०.६० मीटर अंतरावर गोळाफेक करुन नवा आशियाई विक्रम नोंदविला. या आधीचा २०.४३ मीटरचा विक्रम कझाकस्तानच्या रुबतोव सर्जीच्या नावावर होता. २००३ - इंग्रजी भाषेचे ज्येष्ठ तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे माजी संचालक डॉ. रामचंद्र सोनुपंत ऊर्फ रा. सो. सराफ यांचे निधन. २००४ - युरोपीय फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून विजेत्या ग्रीसचा कर्णधार थिओडोरस झागोराकीस याची निवड. २००४ - ग्रीसने युरोपीय फुटबॉल स्पर्धेत अप्रतिम खेळ करीत पोर्तुगालला हरवून अविस्मरणीय अजिंक्‍यपद मिळविले. दिनमान - मेष : शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. मनोबल वाढेल. वृषभ : काहींना अचानक धनलाभ संभवतो. आरोग्य चांगले राहील. मिथुन : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आत्मविश्‍वास वाढेल. कर्क : नको त्या गोष्टींसाठी वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी.   सिंह : वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाच्या कामात यश मिळवाल.  कन्या : प्रॉपर्टीच्या संदर्भात प्रस्ताव समोर येतील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.  तूळ : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.  वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. आश्‍वासनांवर अवलंबून राहू नये. धनू : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. संततिसौख्य लाभेल. मकर : कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यश लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंभ : प्रॉपर्टीच्या संदर्भातील कामे हळूहळू मार्गी लावू शकाल. संततिसौख्य लाभेल. मीन : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31MuTQ2
Read More
गणेशोत्सव पार्श्वभूमीवर तिथवली ग्रामनियंत्रण समितीचा महत्त्वाचा निर्णय

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - ज्या चाकरमान्यांना गणेशोत्सवाला यायच आहे, त्यांनी 5 ऑगस्टपूर्वीच गावात यावे. गावात संस्थात्मक विलगीकरण कक्षाची सोय नसल्यामुळे राहण्यासाठी स्वतंत्र घराचे नियोजन करूनच यावे, असे आवाहन तिथवली ग्रामनियंत्रण समितीने केले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात आरती, सत्यनारायण पुजा करण्यास मज्जाव करण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे. 

यापुढील काळात येणाऱ्या सर्वच सण, उत्सवांवर कोरोनाचे सावट असणार हे निश्‍चित आहे; परंतु कोकणातील सर्वांत मोठा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सवाला 22 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे; परंतु कोरोनाचे सावट या उत्सवांवर देखील आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांचा आकडा 200 च्या वर गेला आहे. त्यामुळे या उत्सवकाळात कोरोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून प्रत्येक गावात नियोजन सुरू आहे. तिथवली ग्रामपंचायतीने देखील अशाच प्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने नियोजन केले आहे. 

गणेशोत्सव काळात अचानक चाकरमानी गावात आले तर प्रशासनाची धांदल उडु शकते. त्यामुळे ग्रामपंचायतीने आतापासूनच तयारी केली आहे. यासंदर्भात नुकतीच ग्रामनियत्रंण समितीची एक बैठक झाली. या बैठकीत ज्या चाकरमान्यांकडे गावात स्वतंत्र घर आहे. त्यांनी 5 ऑगस्टपूर्वी गावात यावे. जेणेकरून त्यांना 14 दिवसाचा गृहविलगीकरणाचा कालावधी पुर्ण करता येईल. गणेशोत्सव काळात ग्रामस्थांनी एकत्रित आरती, भजने करू नयेत किंवा सत्यनारायण पुजेचे देखील आयोजन करू नये, असा ठराव करण्यात आला. गौरी गणपती विसर्जनावेळी सामाजिक अंतर प्रत्येक ग्रामस्थाने ठेवावे. विनाकारण गावात फिरणे, मास्क न लावता फिरणाऱ्यांवर 500 रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. आपले आप्तेष्ट, पाहुण्यांना उत्सव काळात गावात निमंत्रित करू नये, असे आवाहन देखील समितीने केले आहे. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामनियत्रंण समितीने एक बैठक घेऊन गणेशोत्सवाचे नियोजन केले आहे. गावात संस्थात्मक विलगीकरण कक्ष नसल्यामुळे अचानक येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून बैठकतील निर्णय इतक्‍या लवकर जाहीर करून लोकांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. 
- प्रशांत जाधव, ग्रामसेवक, ग्रामपंचायत तिथवली  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर तिथवली ग्रामनियंत्रण समितीचा महत्त्वाचा निर्णय वैभववाडी (सिंधुदुर्ग) - ज्या चाकरमान्यांना गणेशोत्सवाला यायच आहे, त्यांनी 5 ऑगस्टपूर्वीच गावात यावे. गावात संस्थात्मक विलगीकरण कक्षाची सोय नसल्यामुळे राहण्यासाठी स्वतंत्र घराचे नियोजन करूनच यावे, असे आवाहन तिथवली ग्रामनियंत्रण समितीने केले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात आरती, सत्यनारायण पुजा करण्यास मज्जाव करण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे.  यापुढील काळात येणाऱ्या सर्वच सण, उत्सवांवर कोरोनाचे सावट असणार हे निश्‍चित आहे; परंतु कोकणातील सर्वांत मोठा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सवाला 22 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे; परंतु कोरोनाचे सावट या उत्सवांवर देखील आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांचा आकडा 200 च्या वर गेला आहे. त्यामुळे या उत्सवकाळात कोरोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून प्रत्येक गावात नियोजन सुरू आहे. तिथवली ग्रामपंचायतीने देखील अशाच प्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने नियोजन केले आहे.  गणेशोत्सव काळात अचानक चाकरमानी गावात आले तर प्रशासनाची धांदल उडु शकते. त्यामुळे ग्रामपंचायतीने आतापासूनच तयारी केली आहे. यासंदर्भात नुकतीच ग्रामनियत्रंण समितीची एक बैठक झाली. या बैठकीत ज्या चाकरमान्यांकडे गावात स्वतंत्र घर आहे. त्यांनी 5 ऑगस्टपूर्वी गावात यावे. जेणेकरून त्यांना 14 दिवसाचा गृहविलगीकरणाचा कालावधी पुर्ण करता येईल. गणेशोत्सव काळात ग्रामस्थांनी एकत्रित आरती, भजने करू नयेत किंवा सत्यनारायण पुजेचे देखील आयोजन करू नये, असा ठराव करण्यात आला. गौरी गणपती विसर्जनावेळी सामाजिक अंतर प्रत्येक ग्रामस्थाने ठेवावे. विनाकारण गावात फिरणे, मास्क न लावता फिरणाऱ्यांवर 500 रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. आपले आप्तेष्ट, पाहुण्यांना उत्सव काळात गावात निमंत्रित करू नये, असे आवाहन देखील समितीने केले आहे.  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामनियत्रंण समितीने एक बैठक घेऊन गणेशोत्सवाचे नियोजन केले आहे. गावात संस्थात्मक विलगीकरण कक्ष नसल्यामुळे अचानक येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून बैठकतील निर्णय इतक्‍या लवकर जाहीर करून लोकांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.  - प्रशांत जाधव, ग्रामसेवक, ग्रामपंचायत तिथवली   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VNV6d7
Read More
अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू

आष्टी (जि. गडचिरोली) : शेतात कापसाची पेरणी करून घरी परतत असताना वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 3) चामोर्शी तालुक्‍यातील लक्ष्मणपूर येथे घडली. संगीता टीकाराम मडावी (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. 

लक्ष्मणपूर येथील टीकाराम मडावी व त्यांची पत्नी मृत संगीता टीकाराम मडावी हे दोघेही लक्ष्मणपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील मुधोली चक नं. 2 परिसरातील स्वतःच्या शेतामध्ये कपाशीच्या लागवडीसाठी गेले होते. दरम्यान, सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास शेतशिवारातून घराकडे परत येत असताना संगीता मडावी यांच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पती मात्र काही अंतरावर असल्याने ते बचावले. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू आष्टी (जि. गडचिरोली) : शेतात कापसाची पेरणी करून घरी परतत असताना वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 3) चामोर्शी तालुक्‍यातील लक्ष्मणपूर येथे घडली. संगीता टीकाराम मडावी (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे.  लक्ष्मणपूर येथील टीकाराम मडावी व त्यांची पत्नी मृत संगीता टीकाराम मडावी हे दोघेही लक्ष्मणपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील मुधोली चक नं. 2 परिसरातील स्वतःच्या शेतामध्ये कपाशीच्या लागवडीसाठी गेले होते. दरम्यान, सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास शेतशिवारातून घराकडे परत येत असताना संगीता मडावी यांच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पती मात्र काही अंतरावर असल्याने ते बचावले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BuAYpJ
Read More
निष्काळजीपणाचा ‘व्हायरस’ पसरतोय

कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण पुण्यात ६१ टक्के असल्याने आपण पाठ थोपटून घेत आहोत. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाणही ३.५५ टक्केच असल्याचेही आनंदाने सांगत आहोत. पण,  यंत्रणांवरील ताण वाढत आहे. अत्यंत निष्काळजीपणे बाहेर पडणाऱ्यांमुळे घरातील ज्येष्ठांना आपण कोरोनाचे रुग्ण बनवून त्यांना मरणाच्या दारात सोडून देत आहोत. याला जबाबदार कोण?

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या आठवड्यात दररोज सरासरी सातशे-आठशेच्या पटीत रुग्णांची संख्या वाढत आहे. ती निश्‍चितच चिंता वाढविणारी आहे. एकट्या पुण्यात आठ हजारांवर रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना वाचविण्यासाठी हजारो डॉक्‍टर, नर्स, पॅरामेडिकल कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा, नातेवाईक स्वतःचा जीव धोक्‍यात घालून दिवसरात्र झटत आहेत. अनेक डॉक्‍टर, नर्स गेली शंभर दिवसांहून अधिक काळ आपल्या घरीही गेलेले नाहीत. हे सर्व ते कशासाठी करीत आहेत? आपण अत्यंत बेजबाबदारपणे बाहेर फिरत आहोत. मास्क वापरणे असो की सॅनिटायझेशन कोणतेही नियम गांभीर्याने आपल्याला पाळायचे नाहीत. त्याचा सर्वांत पहिला फटका आपल्या कुटुंबालाच बसत आहे. जे ज्येष्ठ नागरिक तीन महिने बाहेरही पडले नाहीत, त्यांना कोरोना होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढवत आहोत. आपण आपल्याच लोकांच्या भोवती मृत्यूची तलवार टांगती ठेवून फिरत आहोत, हे आपल्याला कळणार तरी कधी?

पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला

घरात बसणे आता कोणालाही परवडणार नाही, हे मान्य आहे. पण, बाहेर पडतानाची काळजी घेताना कोणी दिसत नाही. त्यामुळेच मग मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड, नियमापेक्षा जादा लोक असणाऱ्या वाहनांवर कारवाई, असले उपाय करण्यास आपण प्रशासनाला भाग पाडतो. कार्यालयांमध्ये १५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कर्मचारी नकोत, असा नियम असताना त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. गृहनिर्माण सोसायटीमध्ये सुरक्षेचे नियम आपल्याला जाचक-अन्यायकारक वाटू लागतात. मग, आपल्याला वाचविणार कोण आणि कशासाठी? 

बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश

पुण्यात दर १९ व्या दिवशी रूग्णसंख्या दुप्पट होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून १८ हजार बेडची व्यवस्था केली आहे, त्यापैकी आयसीयूची सोय असणारे ५८० बेडपैकी ३०० बेड सध्या भरले आहेत. हे आकडे यासाठी की, जरी आपण यंत्रणा सज्ज केली असली तर रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आपण काय करीत आहोत. त्यात प्रशासन सोडा नागरिक म्हणून कोणती जबाबदारी घेत आहोत? निष्काळजीपणाचा ‘व्हायरस’ रोखण्यासाठी काय करीत आहोत ?

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निष्काळजीपणाचा ‘व्हायरस’ पसरतोय कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण पुण्यात ६१ टक्के असल्याने आपण पाठ थोपटून घेत आहोत. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाणही ३.५५ टक्केच असल्याचेही आनंदाने सांगत आहोत. पण,  यंत्रणांवरील ताण वाढत आहे. अत्यंत निष्काळजीपणे बाहेर पडणाऱ्यांमुळे घरातील ज्येष्ठांना आपण कोरोनाचे रुग्ण बनवून त्यांना मरणाच्या दारात सोडून देत आहोत. याला जबाबदार कोण? - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेल्या आठवड्यात दररोज सरासरी सातशे-आठशेच्या पटीत रुग्णांची संख्या वाढत आहे. ती निश्‍चितच चिंता वाढविणारी आहे. एकट्या पुण्यात आठ हजारांवर रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना वाचविण्यासाठी हजारो डॉक्‍टर, नर्स, पॅरामेडिकल कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा, नातेवाईक स्वतःचा जीव धोक्‍यात घालून दिवसरात्र झटत आहेत. अनेक डॉक्‍टर, नर्स गेली शंभर दिवसांहून अधिक काळ आपल्या घरीही गेलेले नाहीत. हे सर्व ते कशासाठी करीत आहेत? आपण अत्यंत बेजबाबदारपणे बाहेर फिरत आहोत. मास्क वापरणे असो की सॅनिटायझेशन कोणतेही नियम गांभीर्याने आपल्याला पाळायचे नाहीत. त्याचा सर्वांत पहिला फटका आपल्या कुटुंबालाच बसत आहे. जे ज्येष्ठ नागरिक तीन महिने बाहेरही पडले नाहीत, त्यांना कोरोना होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढवत आहोत. आपण आपल्याच लोकांच्या भोवती मृत्यूची तलवार टांगती ठेवून फिरत आहोत, हे आपल्याला कळणार तरी कधी? पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला घरात बसणे आता कोणालाही परवडणार नाही, हे मान्य आहे. पण, बाहेर पडतानाची काळजी घेताना कोणी दिसत नाही. त्यामुळेच मग मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड, नियमापेक्षा जादा लोक असणाऱ्या वाहनांवर कारवाई, असले उपाय करण्यास आपण प्रशासनाला भाग पाडतो. कार्यालयांमध्ये १५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कर्मचारी नकोत, असा नियम असताना त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. गृहनिर्माण सोसायटीमध्ये सुरक्षेचे नियम आपल्याला जाचक-अन्यायकारक वाटू लागतात. मग, आपल्याला वाचविणार कोण आणि कशासाठी?  बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश पुण्यात दर १९ व्या दिवशी रूग्णसंख्या दुप्पट होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून १८ हजार बेडची व्यवस्था केली आहे, त्यापैकी आयसीयूची सोय असणारे ५८० बेडपैकी ३०० बेड सध्या भरले आहेत. हे आकडे यासाठी की, जरी आपण यंत्रणा सज्ज केली असली तर रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आपण काय करीत आहोत. त्यात प्रशासन सोडा नागरिक म्हणून कोणती जबाबदारी घेत आहोत? निष्काळजीपणाचा ‘व्हायरस’ रोखण्यासाठी काय करीत आहोत ? News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Bx2d2W
Read More
‘मराठा आरक्षणावर भक्कमपणे बाजू मांडू’

मुंबई - ‘मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. याबाबत राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल,’’ असे मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी सांगितले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज वरिष्ठ विधिज्ञांसमवेत झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत मंगळवारी (ता. ७) सर्वोच्च न्यायालयात नियोजित असलेल्या सुनावणीच्या तयारीचा आढावा घेतला. न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या खंडपीठात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका सुनावणीसाठी येणार असून, मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरही विचार होण्याची शक्यता आहे. सुनावणीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘मराठा आरक्षणावर भक्कमपणे बाजू मांडू’ मुंबई - ‘मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. याबाबत राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल,’’ असे मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी सांगितले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज वरिष्ठ विधिज्ञांसमवेत झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत मंगळवारी (ता. ७) सर्वोच्च न्यायालयात नियोजित असलेल्या सुनावणीच्या तयारीचा आढावा घेतला. न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या खंडपीठात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका सुनावणीसाठी येणार असून, मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरही विचार होण्याची शक्यता आहे. सुनावणीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3f12kSN
Read More
तब्बल साडेतीन दशके, हजारो कोटींचा खर्च, तरी अपूर्ण आहे हा प्रकल्प

नागपूर : पूर्व विदर्भातील रखडलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ 36 वर्षांपूर्वी झाला असला, तरी अद्यापही या प्रकल्पाकरिता आवश्‍यक भूसंपादनाची कार्यवाही अद्याप अपूर्ण आहे. आता पुन्हा नव्याने 32 हेक्‍टर जागा संपादन करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणार केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे. 

गोसेखुर्द प्रकल्प पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा दावा करण्यात आला होता. नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा लाभ होणार असून, दोन लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्राचा याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत होते.

या प्रकल्पात नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील 85 गावे विस्थापित झाली असून, दोन हजार हेक्‍टरच्या वर जागा संपादित करण्यात आली. या प्रकल्पाला 36 वर्षे होत असताना अद्याप याचे काम पूर्ण झाले नाही. याच्या कामावर आतापर्यंत 10 हजार कोटींच्या जवळपास खर्च झाला; परंतु काम पूर्ण झाले नाही. या प्रकल्पाच्या कामात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले. एसीबीमार्फत चौकशी सुरू असून अनेक अधिकारी, कंत्राटदारांच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले. हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला असून केंद्र सरकारमार्फतही निधी देण्यात येत आहे.

या प्रकल्पातून 50 हजार हेक्‍टर क्षेत्राला फायदा होत नसल्याचे सांगण्यात येते. कालव्याचे कामच पूर्ण झाले नसल्याने फायदा होत नसल्याचे समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाण्यामुळे बुडीत क्षेत्र वाढणार असून कालव्याकरता जागा संपादन करायची आहे. त्यामुळे आता नव्याने 32 हेक्‍टर जागा संपादन करण्यात येणार आहे. सिंचन विभागाकडून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आल्याचे समजते. 

जाणून घ्या : मध्यरात्री कोविड केअर सेंटरमध्ये माजली खळबळ; काय झाले असे? 

मूळ प्रस्ताव चुकला? 
गोसेखुर्द प्रकल्पासाठी सर्व्हे करून आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याच्या आधारे प्रकल्पकरिता भूसंपादनाची कार्यवाही करण्यात आली. परंतु, भविष्याच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक कालवे, इतर कामासाठी जागा संपादनाचा समावेश आराखड्यात करण्यात आला नाही. त्यामुळे 36 वर्षांनंतरही भूसंपादनाची गरज पडत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.   

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तब्बल साडेतीन दशके, हजारो कोटींचा खर्च, तरी अपूर्ण आहे हा प्रकल्प नागपूर : पूर्व विदर्भातील रखडलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ 36 वर्षांपूर्वी झाला असला, तरी अद्यापही या प्रकल्पाकरिता आवश्‍यक भूसंपादनाची कार्यवाही अद्याप अपूर्ण आहे. आता पुन्हा नव्याने 32 हेक्‍टर जागा संपादन करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणार केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे.  गोसेखुर्द प्रकल्प पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा दावा करण्यात आला होता. नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा लाभ होणार असून, दोन लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्राचा याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत होते. या प्रकल्पात नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील 85 गावे विस्थापित झाली असून, दोन हजार हेक्‍टरच्या वर जागा संपादित करण्यात आली. या प्रकल्पाला 36 वर्षे होत असताना अद्याप याचे काम पूर्ण झाले नाही. याच्या कामावर आतापर्यंत 10 हजार कोटींच्या जवळपास खर्च झाला; परंतु काम पूर्ण झाले नाही. या प्रकल्पाच्या कामात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले. एसीबीमार्फत चौकशी सुरू असून अनेक अधिकारी, कंत्राटदारांच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले. हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला असून केंद्र सरकारमार्फतही निधी देण्यात येत आहे. या प्रकल्पातून 50 हजार हेक्‍टर क्षेत्राला फायदा होत नसल्याचे सांगण्यात येते. कालव्याचे कामच पूर्ण झाले नसल्याने फायदा होत नसल्याचे समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाण्यामुळे बुडीत क्षेत्र वाढणार असून कालव्याकरता जागा संपादन करायची आहे. त्यामुळे आता नव्याने 32 हेक्‍टर जागा संपादन करण्यात येणार आहे. सिंचन विभागाकडून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आल्याचे समजते.  जाणून घ्या : मध्यरात्री कोविड केअर सेंटरमध्ये माजली खळबळ; काय झाले असे?  मूळ प्रस्ताव चुकला?  गोसेखुर्द प्रकल्पासाठी सर्व्हे करून आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याच्या आधारे प्रकल्पकरिता भूसंपादनाची कार्यवाही करण्यात आली. परंतु, भविष्याच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक कालवे, इतर कामासाठी जागा संपादनाचा समावेश आराखड्यात करण्यात आला नाही. त्यामुळे 36 वर्षांनंतरही भूसंपादनाची गरज पडत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VKbk7i
Read More
विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले, निकाल कसा लावणार....

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर पदवीचे अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांचा निकाल लावण्यासाठी फिफ्टी फिफ्टीचे सूत्र निश्‍चित केले आहे. यामध्ये अंतर्गत मूल्यमापनावर ५० टक्के आणि सत्र परीक्षेतील गुणांवर ५० टक्के श्रेणी मिळणार आहे.  

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे निकाल कसा लावावा, हे ठरविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कुलगुरूंची समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्य सरकारने अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांची परीक्षा रद्द केली. ज्यांची परीक्षा रद्द झाली आहे, त्यांचा निकाल सत्र परीक्षेचे गुण व अंतर्गत मूल्यमापनावर लावला जाईल, असे स्पष्ट केले होते. 

बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश

परीक्षा व मूल्यमापन मंडळाने याबाबत परिपत्रक काढले आहे. या सूत्रास विद्यापीठाच्या विद्या परिषद व व्यवस्थापन परिषद या अधिकार मंडळांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.

पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला

महाविद्यालय स्तरावरील परीक्षा तसेच स्वायत्त व संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षांच्या निकालासाठी अधिकार मंडळाने मान्यता दिलेल्या गणितीय सूत्रांचा वापर करावा. त्यासाठी विद्यापीठाने तयार केलेल्या गणितीय सूत्राचा तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले, निकाल कसा लावणार.... पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर पदवीचे अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांचा निकाल लावण्यासाठी फिफ्टी फिफ्टीचे सूत्र निश्‍चित केले आहे. यामध्ये अंतर्गत मूल्यमापनावर ५० टक्के आणि सत्र परीक्षेतील गुणांवर ५० टक्के श्रेणी मिळणार आहे.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे निकाल कसा लावावा, हे ठरविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कुलगुरूंची समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्य सरकारने अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांची परीक्षा रद्द केली. ज्यांची परीक्षा रद्द झाली आहे, त्यांचा निकाल सत्र परीक्षेचे गुण व अंतर्गत मूल्यमापनावर लावला जाईल, असे स्पष्ट केले होते.  बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश परीक्षा व मूल्यमापन मंडळाने याबाबत परिपत्रक काढले आहे. या सूत्रास विद्यापीठाच्या विद्या परिषद व व्यवस्थापन परिषद या अधिकार मंडळांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली. पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला महाविद्यालय स्तरावरील परीक्षा तसेच स्वायत्त व संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षांच्या निकालासाठी अधिकार मंडळाने मान्यता दिलेल्या गणितीय सूत्रांचा वापर करावा. त्यासाठी विद्यापीठाने तयार केलेल्या गणितीय सूत्राचा तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे. - महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31JRInx
Read More
Horoscope Today, 5 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2VLWbCl
कानपुर शूटआउट: विकास दुबे की तलाश तेज, इनाम की राशि बढ़कर हुई एक लाख https://ift.tt/31Kgbch
कोरोना व्हायरस लस : कोव्हॅक्सिन ही देशी लस 15 ऑगस्टपर्यंत आणण्याचा अट्टहास कशासाठी?