Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 2, 2020

कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत लाभ - सहकारमंत्री

कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत लाभ - सहकारमंत्री

July 02, 2020 0 Comments
 कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.    from Zee24 Taas: Maharash...
Read More
देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ विधानं अस्वस्थतेतून, शरद पवारांबाबतच्या दाव्यांवर अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण
कानपूरमध्ये गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या 8 पोलिसांचा मृत्यू
सरोज खान यांचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
चाचणीसाठी ‘प्रिस्क्रिप्शन’ गरजेचे नाही; कोरोनाबाबत ‘आयसीएमआर’ची नवी नियमावली जाहीर

मुंबई -एखाद्या व्यक्तीला कोरोना चाचणीसाठी सरकारी डॉक्‍टरांच्या चिठ्ठीची (प्रिस्क्रिप्शनची) आता गरज नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कोरोना चाचणीबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून त्यात हा बदल सुचवण्यात आला आहे.

‘आयसीएमआर’ने यापूर्वी केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार कोरोना चाचणीसाठी सरकारी डॉक्‍टरांची चिठ्ठी असणे अनिवार्य केले होते. त्यामुळे सरकारी दवाखाने तसेच रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांची गर्दी होत होती. शासकीय आरोग्य यंत्रणा तसेच डॉक्‍टरांवरही याचा ताण येत होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

‘आयसीएमआर’ने सरकारी तसेच खासगी मिळून एक हजार ४९ प्रयोगशाळांना कोरोना चाचणीची परवानगी दिली आहे. त्यात ७६१ सरकारी, तर २८८ खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.  राज्याचे प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण पाच हजार ८४७ एवढे असून देशपातळीवरील हे प्रमाण चार हजार ६१० एवढे आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य चाचणी मूलभूत अधिकार
अनेक खासगी प्रयोगशाळा चांगले काम करत आहेत. त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करणे गरजेचे आहे, असेही ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे. आपल्या आरोग्यासाठी आवश्‍यक चाचणी करणे हा रुग्णाचा मूलभूत अधिकार आहे, आपण त्यांना रोखू शकत नाही. रुग्णांनी अधिकाधिक चाचण्या केल्यास त्याच्या आरोग्यासाठी ते महत्त्वाचे ठरणार असून, कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात मदत मिळणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चाचणीसाठी ‘प्रिस्क्रिप्शन’ गरजेचे नाही; कोरोनाबाबत ‘आयसीएमआर’ची नवी नियमावली जाहीर मुंबई -एखाद्या व्यक्तीला कोरोना चाचणीसाठी सरकारी डॉक्‍टरांच्या चिठ्ठीची (प्रिस्क्रिप्शनची) आता गरज नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कोरोना चाचणीबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून त्यात हा बदल सुचवण्यात आला आहे. ‘आयसीएमआर’ने यापूर्वी केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार कोरोना चाचणीसाठी सरकारी डॉक्‍टरांची चिठ्ठी असणे अनिवार्य केले होते. त्यामुळे सरकारी दवाखाने तसेच रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांची गर्दी होत होती. शासकीय आरोग्य यंत्रणा तसेच डॉक्‍टरांवरही याचा ताण येत होता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    ‘आयसीएमआर’ने सरकारी तसेच खासगी मिळून एक हजार ४९ प्रयोगशाळांना कोरोना चाचणीची परवानगी दिली आहे. त्यात ७६१ सरकारी, तर २८८ खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.  राज्याचे प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण पाच हजार ८४७ एवढे असून देशपातळीवरील हे प्रमाण चार हजार ६१० एवढे आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आरोग्य चाचणी मूलभूत अधिकार अनेक खासगी प्रयोगशाळा चांगले काम करत आहेत. त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करणे गरजेचे आहे, असेही ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे. आपल्या आरोग्यासाठी आवश्‍यक चाचणी करणे हा रुग्णाचा मूलभूत अधिकार आहे, आपण त्यांना रोखू शकत नाही. रुग्णांनी अधिकाधिक चाचण्या केल्यास त्याच्या आरोग्यासाठी ते महत्त्वाचे ठरणार असून, कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात मदत मिळणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gjBe9F
Read More
हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य

नागपूर : हुंड्यात 25 तोळे सोने न दिल्याने डॉक्‍टरने 35 वर्षीय पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करीत अत्याचार केला. ही खळबळजनक घटना बेलतरोडी भागात उघडकीस आली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी डॉक्‍टरविरुद्ध अनैसर्गिक कृत्य व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलाही डॉक्‍टर असल्याची माहिती आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्‍टर आणि पीडित डॉक्‍टर युवती सारख्या व्यवसायात असल्यामुळे 2008 मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही डॉक्‍टर असल्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

अधिक वाचा : मनोरंजन केंद्राच्या आड सुरू होते हे धंदे, पोलिस आले आणि...

2010 मध्ये डॉक्‍टरने पीडित महिलेशी लग्न केले. लग्नानंतर तो पत्नी व तिच्या आईवडिलांना 25 तोळे सोन्याचे मागणी करायला लागला. एवढे सोन्याचे दागिने देण्यास पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे डॉक्‍टरने पत्नीशीच अनैसर्गिक कृत्य करायला सुरुवात केली. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डॉक्‍टर फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य नागपूर : हुंड्यात 25 तोळे सोने न दिल्याने डॉक्‍टरने 35 वर्षीय पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करीत अत्याचार केला. ही खळबळजनक घटना बेलतरोडी भागात उघडकीस आली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी डॉक्‍टरविरुद्ध अनैसर्गिक कृत्य व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलाही डॉक्‍टर असल्याची माहिती आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्‍टर आणि पीडित डॉक्‍टर युवती सारख्या व्यवसायात असल्यामुळे 2008 मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही डॉक्‍टर असल्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला.  अधिक वाचा : मनोरंजन केंद्राच्या आड सुरू होते हे धंदे, पोलिस आले आणि... 2010 मध्ये डॉक्‍टरने पीडित महिलेशी लग्न केले. लग्नानंतर तो पत्नी व तिच्या आईवडिलांना 25 तोळे सोन्याचे मागणी करायला लागला. एवढे सोन्याचे दागिने देण्यास पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे डॉक्‍टरने पत्नीशीच अनैसर्गिक कृत्य करायला सुरुवात केली. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डॉक्‍टर फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eY6JFZ
Read More
पुणेकरांनो, शहरांमधील प्रत्येक पाचवी व्यक्ती बेरोजगार; कोरोनामुळे रोजगारांमध्ये घट

पुणे- देशातील शहरांमध्ये प्रत्येक पाचवी व्यक्ती सध्या बेरोजगार आहे. मार्चअखेपर्यंत शहरांमध्ये ९.३५ टक्के असणारी बेरोजगारी एप्रिलमध्ये २४.९५ टक्के झाली. तर, मेमध्ये २६.३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढली. त्यामुळे भविष्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढण्याचा धोका वर्तविण्यात आला. यात महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण २०.९ टक्के असल्याची माहिती पुढे आली आहे. 

देशात २०१९च्या शेवटच्या काही महिन्यांपासून आर्थिक मंदी दिसत आहे. त्यामुळे सर्वाधिक रोजगार देणाऱ्या कृषी क्षेत्रावर यापूर्वीच ताण आला आहे. त्यातच आता देशातील बहुतांश शहरी भागात कोरोना विषाणूंचा उद्रेक झाल्याने तेथून स्थलांतर वाढले. तसेच, शहरांमधील रोजगाराच्याही संधी कमी झाल्या. त्याचा थेट परिणाम शहरांमधील बेरोजगारीचे प्रमाण वाढल्यावर झाला, असे निरीक्षण सेंटर  फॉर सायन्स अँण्ड इन्व्हार्मेंट (सीएसई) नोंदले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

अशी वाढली बेरोजगारी
देशातील शहरांमध्ये गेल्या वर्षी म्हणजे मार्च २०१९ ला ८.५८ टक्के बेरोजगारी होती. वर्षभरात (मार्च २०२०) त्याचे प्रमाण वाढून ते ९.३५ टक्के झाले. याच दरम्यान, कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला. वेगाने रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे लॉकडाउन करावे लागले. शहरांमधून लाखोंच्या संख्येने मजुरांचे स्थलांतर सुरू झाले. यातून ग्रामीण भागातील शेतीवरचा ताण वाढला. शहरांमध्येही रोजगाराच्या संधी कमी झाल्या. त्यामुळे एप्रिलमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २४.९५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. हेच प्रमाण मेअखेपर्यंत २६.३ टक्के झाले.  दरम्यान महाराष्ट्रात एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर २०.९ टक्के असल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांनी म्हटले आहे. त्या दरम्यान, तमिळनाडूचा बेरोजगारीचा दर  ४९.८ टक्के होता. उत्तर भारतातील राज्यांमध्ये हा दर २० टक्‍क्‍यांच्या वर असल्याचे निरीक्षण नोंदण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आर्थिक मंदीपेक्षाही भयंकर स्थिती
मंदीच्या काळापेक्षाही सध्या रोजगाराची स्थिती भयंकर असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. त्या वेळी सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांमध्ये बेरोजगारिचा दर ७ टक्के होता. तो जानेवारी ते एप्रिल दरम्यान ११.८ टक्के असल्याचे समोर आले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणेकरांनो, शहरांमधील प्रत्येक पाचवी व्यक्ती बेरोजगार; कोरोनामुळे रोजगारांमध्ये घट पुणे- देशातील शहरांमध्ये प्रत्येक पाचवी व्यक्ती सध्या बेरोजगार आहे. मार्चअखेपर्यंत शहरांमध्ये ९.३५ टक्के असणारी बेरोजगारी एप्रिलमध्ये २४.९५ टक्के झाली. तर, मेमध्ये २६.३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढली. त्यामुळे भविष्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढण्याचा धोका वर्तविण्यात आला. यात महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण २०.९ टक्के असल्याची माहिती पुढे आली आहे.  देशात २०१९च्या शेवटच्या काही महिन्यांपासून आर्थिक मंदी दिसत आहे. त्यामुळे सर्वाधिक रोजगार देणाऱ्या कृषी क्षेत्रावर यापूर्वीच ताण आला आहे. त्यातच आता देशातील बहुतांश शहरी भागात कोरोना विषाणूंचा उद्रेक झाल्याने तेथून स्थलांतर वाढले. तसेच, शहरांमधील रोजगाराच्याही संधी कमी झाल्या. त्याचा थेट परिणाम शहरांमधील बेरोजगारीचे प्रमाण वाढल्यावर झाला, असे निरीक्षण सेंटर  फॉर सायन्स अँण्ड इन्व्हार्मेंट (सीएसई) नोंदले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    अशी वाढली बेरोजगारी देशातील शहरांमध्ये गेल्या वर्षी म्हणजे मार्च २०१९ ला ८.५८ टक्के बेरोजगारी होती. वर्षभरात (मार्च २०२०) त्याचे प्रमाण वाढून ते ९.३५ टक्के झाले. याच दरम्यान, कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला. वेगाने रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे लॉकडाउन करावे लागले. शहरांमधून लाखोंच्या संख्येने मजुरांचे स्थलांतर सुरू झाले. यातून ग्रामीण भागातील शेतीवरचा ताण वाढला. शहरांमध्येही रोजगाराच्या संधी कमी झाल्या. त्यामुळे एप्रिलमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २४.९५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. हेच प्रमाण मेअखेपर्यंत २६.३ टक्के झाले.  दरम्यान महाराष्ट्रात एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर २०.९ टक्के असल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांनी म्हटले आहे. त्या दरम्यान, तमिळनाडूचा बेरोजगारीचा दर  ४९.८ टक्के होता. उत्तर भारतातील राज्यांमध्ये हा दर २० टक्‍क्‍यांच्या वर असल्याचे निरीक्षण नोंदण्यात आले आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आर्थिक मंदीपेक्षाही भयंकर स्थिती मंदीच्या काळापेक्षाही सध्या रोजगाराची स्थिती भयंकर असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. त्या वेळी सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांमध्ये बेरोजगारिचा दर ७ टक्के होता. तो जानेवारी ते एप्रिल दरम्यान ११.८ टक्के असल्याचे समोर आले आहे.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZvVKgD
Read More
भारतात रुग्ण संख्येचा आलेख चढाच; भारत रशियाला मागे टाकणार 

नवी दिल्ली - देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या सहा लाखांपेक्षा जास्त झाली आहे. केवळ पाच दिवसांत पाच लाखांवरून आकडा सहा लाखांवर पोचला आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या २६ जून रोजी पाच लाख झाली होती. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळला होता. त्यानंतर ११० दिवसांत म्हणजे १० मे रोजी एक लाख रूग्ण संख्या होती. 

भारत रशियाला मागे टाकणार 
संसर्गाचा वेग एवढा वाढला की १० मे नंतर केवळ १५ दिवसांत ही संख्या दोन लाखांवर गेली. दोन लाखांवरून तीन लाखांचा टप्पा केवळ दहा दिवसांत गाठला तर त्यानंतरच्या आठ दिवसांत नवे एक लाख बाधित आढळून रुग्ण संख्या चार लाखांवर पोचली. हा आलेख वाढत राहिल्याने सहा दिवसांत पाच लाख तर त्यानंतरच्या पाच दिवसात भारतातील एकूण रुग्ण सहा लाख रुग्ण झाले आहेत. म्हणजेच प्रत्येक पाच दिवसांत नवे एक लाख रुग्ण तयार झाले आहेत. असाच वेग वाढत राहिला तर पुढील तीन-चार दिवसांत भारत रशियाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वाधिक संक्रमित देश बनेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

अमेरिकेत सर्वांत कमी ८६ दिवसांत सहा लाख लोक पॉझिटिव्ह आढळले होते. भारतात १५४ दिवसांत सहा लाख रुग्ण संख्या झाली. 
सहा लाखांचा टप्पा गाठण्यासाठीचा काळ (दिवस) 
-१५४ 
अमेरिका 
सहा लाख रुग्ण 

१०० 
ब्राझील 

१४६ 
रशिया 

१५४ 
भारत 
---------- 
भारतात आधी ११० दिवसांत रुग्ण संख्या एक लाखावर पोचली. आता प्रत्येक पाच दिवसांतच एक लाखाचा आकडा गाठला जात आहे. 
रुग्णसंख्या व दिवस 
५०,००० - ९८ (६ मे रोजी) 
५०,००० - १२ (६ मेनंतर) 
१.५ लाख - ८ 
२ लाख - ७ 
२.५ लाख - ५ 
३ लाख - ५ 
३.५ लाख - ४ 
४ लाख- ४ 
त्यानंतर आत्तापर्यंत प्रत्येत दोन ते अडीच दिवसांत ५० हजार रुग्णांची भर पडत आहे. 
------- 
देशात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. १०० रुग्णांमधील ५९ रुग्ण बरे झाले आहेत. 

६ लाख - एकूण रुग्ण 

३.७५ लाख - बरे झालेले रुग्ण 

५९.४० टक्के - बरे होण्याचे प्रमाण 

जगाचा विचार करता रशियात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 
सर्वांत जास्त आहे. भारताचा क्रमांक दुसरा आहे. 
देश, एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (टक्केवारी) 
रशिया - ६.५४ लाख - ६४.६२ 
भारत - ६.२ लाख - ५९.४० 
ब्राझील - १४.२६ - ५५.३६ 
अमेरिका - २७.४५ - ४१ - ६६ 
----------- 
देशातील महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार सर्वाधिक आहे. मेघालयात सर्वांत कमी रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सिक्कीमचा क्रमांक येतो. तेथे ८८ रुग्ण आहेत. 
रुग्णसंख्येचे प्रमाण (टक्क्यांत) 
२९.९४  महाराष्ट्र 

१५. ६२ तमिळनाडू 

१४.९१ दिल्ली 
--------- 
देशात आत्तापर्यंत १७ हजार ७८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
मृतांचे प्रमाण (टक्क्यांत) 

४५. २७  महाराष्‍ट्र 

१५. ७५  दिल्ली 

१०.३९  गुजरात 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भारतात रुग्ण संख्येचा आलेख चढाच; भारत रशियाला मागे टाकणार  नवी दिल्ली - देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या सहा लाखांपेक्षा जास्त झाली आहे. केवळ पाच दिवसांत पाच लाखांवरून आकडा सहा लाखांवर पोचला आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या २६ जून रोजी पाच लाख झाली होती. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळला होता. त्यानंतर ११० दिवसांत म्हणजे १० मे रोजी एक लाख रूग्ण संख्या होती.  भारत रशियाला मागे टाकणार  संसर्गाचा वेग एवढा वाढला की १० मे नंतर केवळ १५ दिवसांत ही संख्या दोन लाखांवर गेली. दोन लाखांवरून तीन लाखांचा टप्पा केवळ दहा दिवसांत गाठला तर त्यानंतरच्या आठ दिवसांत नवे एक लाख बाधित आढळून रुग्ण संख्या चार लाखांवर पोचली. हा आलेख वाढत राहिल्याने सहा दिवसांत पाच लाख तर त्यानंतरच्या पाच दिवसात भारतातील एकूण रुग्ण सहा लाख रुग्ण झाले आहेत. म्हणजेच प्रत्येक पाच दिवसांत नवे एक लाख रुग्ण तयार झाले आहेत. असाच वेग वाढत राहिला तर पुढील तीन-चार दिवसांत भारत रशियाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वाधिक संक्रमित देश बनेल.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    अमेरिकेत सर्वांत कमी ८६ दिवसांत सहा लाख लोक पॉझिटिव्ह आढळले होते. भारतात १५४ दिवसांत सहा लाख रुग्ण संख्या झाली.  सहा लाखांचा टप्पा गाठण्यासाठीचा काळ (दिवस)  -१५४  अमेरिका  सहा लाख रुग्ण  १००  ब्राझील  १४६  रशिया  १५४  भारत  ----------  भारतात आधी ११० दिवसांत रुग्ण संख्या एक लाखावर पोचली. आता प्रत्येक पाच दिवसांतच एक लाखाचा आकडा गाठला जात आहे.  रुग्णसंख्या व दिवस  ५०,००० - ९८ (६ मे रोजी)  ५०,००० - १२ (६ मेनंतर)  १.५ लाख - ८  २ लाख - ७  २.५ लाख - ५  ३ लाख - ५  ३.५ लाख - ४  ४ लाख- ४  त्यानंतर आत्तापर्यंत प्रत्येत दोन ते अडीच दिवसांत ५० हजार रुग्णांची भर पडत आहे.  -------  देशात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. १०० रुग्णांमधील ५९ रुग्ण बरे झाले आहेत.  ६ लाख - एकूण रुग्ण  ३.७५ लाख - बरे झालेले रुग्ण  ५९.४० टक्के - बरे होण्याचे प्रमाण  जगाचा विचार करता रशियात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  सर्वांत जास्त आहे. भारताचा क्रमांक दुसरा आहे.  देश, एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (टक्केवारी)  रशिया - ६.५४ लाख - ६४.६२  भारत - ६.२ लाख - ५९.४०  ब्राझील - १४.२६ - ५५.३६  अमेरिका - २७.४५ - ४१ - ६६  -----------  देशातील महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार सर्वाधिक आहे. मेघालयात सर्वांत कमी रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सिक्कीमचा क्रमांक येतो. तेथे ८८ रुग्ण आहेत.  रुग्णसंख्येचे प्रमाण (टक्क्यांत)  २९.९४  महाराष्ट्र  १५. ६२ तमिळनाडू  १४.९१ दिल्ली  ---------  देशात आत्तापर्यंत १७ हजार ७८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मृतांचे प्रमाण (टक्क्यांत)  ४५. २७  महाराष्‍ट्र  १५. ७५  दिल्ली  १०.३९  गुजरात  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VDpvuv
Read More
मुंबई: मशहूर कोरियोग्राफर सरोज खान का कार्डियक अरेस्ट के चलते निधन https://ift.tt/2NfH8z5
आयसीसीतील "मनोहर' अध्यायाला पूर्णविराम, काय आहे वाचा

नागपूर : काही व्यक्‍ती असे असतात, जे काम कमी परंतु, गवगवाच अधिक करतात. आणि काही व्यक्‍ती असे असतात, जे कामे करतात, पण ते कुठेही विनाकारण गवगवा करीत नाहीत. आयसीसीचे चेअरमन राहिलेले ऍड. शशांक व्यंकटेश मनोहर हे यातील दुसऱ्या कॅटेगरीत मोडतात. ऍड. मनोहर यांनी आतापर्यंत ज्या विविध क्रिकेट संघटनांवर मानाची पदे भूषविलीत, त्या सर्वच ठिकाणी त्यांनी आपला अमिट ठसा उमटविला. क्रिकेटला लोकप्रियतेच्या एका उंच शिखरावर नेवून ठेवले. 

स्वच्छ प्रतिमा, स्पष्टवक्‍तेपणा, कुशल संघटक आणि पारदर्शी कारभारासाठी क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध असलेले ऍड. मनोहर यांनी आयसीसीचे सर्वोच्च पद भूषविणे हा देशवासीयांसह वैदर्भींसाठीही फार मोठा बहुमान आहे. कारण आतापर्यंत कोणत्याच भारतीय किंवा विदर्भातील क्रिकेट प्रशासकाला हा सर्वोच्च मान मिळालेला नाही. मात्र, ऍड. मनोहर यांनी बुधवारी अचानक पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे बीसीसीआयचे आयसीसीवरील वजन तर कमी झालेच, शिवाय आयसीसीला एका कुशल लोकप्रिय संघटकाची कमरताही भविष्यात जाणवणार आहे. तशी भावना विदर्भ क्रिकेट संघटनेशी जुळलेले माजी रणजी कर्णधार प्रवीण हिंगणीकर यांनी बोलून दाखविली. तीन-तीन क्रिकेट संघटनांचे कार्य समर्थपणे सांभाळणे, हे केवळ ऍड. मनोहरांसारखीच व्यक्‍ती करू शकते. ऍड. मनोहर स्पष्टवक्‍ते असले तरी, मीडियापासून नेहमीच दूर राहिले आहेत. हीच त्यांची खासियतही होती. 

 

हेही वाचा : तब्बल 60 वर्षांनंतर इंदूरमध्ये झाली विदर्भाची स्वप्नपुर्ती, कशी वाचा

व्यवसायाने वकील असलेले 62 वर्षीय ऍड. मनोहर यांनी विदर्भ क्रिकेट संघटनेची धुरा सांभाळल्यानंतर त्यांना 2008 ते 2011 आणि नोव्हेंबर 2015 ते मे 2016 अशा दोनवेळा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. त्यांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच भारतीय क्रिकेटनेही प्रगतीचे उच्च शिखर गाठले. एकीकडे भारतीय कसोटी संघाने अव्वल स्थान पटकाविले, तर त्याचवेळी 2011 मध्ये प्रतिष्ठेचा "आयसीसी वर्ल्डकप'देखील जिंकला. "मिस्टर क्‍लीन' अशी ख्याती असलेले ऍड. मनोहर आतापर्यंतचे सर्वोत्तम बीसीसीआय अध्यक्ष असल्याचे बोलले जाते. नोव्हेंबर 2015 ते मार्च 2017 आणि मार्च 2017 ते जून 2020 या काळात ते आयसीसीवरही होते. ही सर्व पदे भूषविताना त्यांनी नेहमीच क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या भल्यासाठी निर्णय घेतले. त्यांनी सदैव भारतीय क्रिकेटलाच आपल्या अजेंड्यावर प्रथम प्राधान्य दिले. व्हीसीएशी जुळले असतानाही त्यांनी अनेक युवा खेळाडूंच्या करिअरला उभारी दिली. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या. 2010 मध्ये सुरू झालेली महत्त्वाकांक्षी निवासी क्रिकेट अकादमी व पंचांची क्रिकेट अकादमी त्यांच्याच डोक्‍यातील कल्पना आहे. शहरी व ग्रामीण भागातील असंख्य खेळाडू या अकादमीत घडले. उशिरा का होईना त्याचे फळ आता व्हीसीएला मिळू लागले आहे. 

 

"ऍड. शशांक मनोहर यांनी व्हीसीए, बीसीसीआय आणि आयसीसीवर पद भूषविताना नेहमीच आपला ठसा उमटविलेला आहे. त्यांच्या कारकिर्दीत क्रिकेटची नेहमीच भरभराट झाली. उल्लेखनीय म्हणजे, त्यांच्यामुळेच विदर्भाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर नावलौकिक मिळाला आहे. व्हीसीएने आज जी प्रगती साधली आहे, त्यात ऍड. मनोहर यांचे फार मोठे योगदान आहे. असा कुशल क्रिकेट संघटक दुसरा होणे शक्‍य नाही.' 
-प्रवीण हिंगणीकर, विदर्भाचे माजी रणजी कर्णधार 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आयसीसीतील "मनोहर' अध्यायाला पूर्णविराम, काय आहे वाचा नागपूर : काही व्यक्‍ती असे असतात, जे काम कमी परंतु, गवगवाच अधिक करतात. आणि काही व्यक्‍ती असे असतात, जे कामे करतात, पण ते कुठेही विनाकारण गवगवा करीत नाहीत. आयसीसीचे चेअरमन राहिलेले ऍड. शशांक व्यंकटेश मनोहर हे यातील दुसऱ्या कॅटेगरीत मोडतात. ऍड. मनोहर यांनी आतापर्यंत ज्या विविध क्रिकेट संघटनांवर मानाची पदे भूषविलीत, त्या सर्वच ठिकाणी त्यांनी आपला अमिट ठसा उमटविला. क्रिकेटला लोकप्रियतेच्या एका उंच शिखरावर नेवून ठेवले.  स्वच्छ प्रतिमा, स्पष्टवक्‍तेपणा, कुशल संघटक आणि पारदर्शी कारभारासाठी क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध असलेले ऍड. मनोहर यांनी आयसीसीचे सर्वोच्च पद भूषविणे हा देशवासीयांसह वैदर्भींसाठीही फार मोठा बहुमान आहे. कारण आतापर्यंत कोणत्याच भारतीय किंवा विदर्भातील क्रिकेट प्रशासकाला हा सर्वोच्च मान मिळालेला नाही. मात्र, ऍड. मनोहर यांनी बुधवारी अचानक पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे बीसीसीआयचे आयसीसीवरील वजन तर कमी झालेच, शिवाय आयसीसीला एका कुशल लोकप्रिय संघटकाची कमरताही भविष्यात जाणवणार आहे. तशी भावना विदर्भ क्रिकेट संघटनेशी जुळलेले माजी रणजी कर्णधार प्रवीण हिंगणीकर यांनी बोलून दाखविली. तीन-तीन क्रिकेट संघटनांचे कार्य समर्थपणे सांभाळणे, हे केवळ ऍड. मनोहरांसारखीच व्यक्‍ती करू शकते. ऍड. मनोहर स्पष्टवक्‍ते असले तरी, मीडियापासून नेहमीच दूर राहिले आहेत. हीच त्यांची खासियतही होती.    हेही वाचा : तब्बल 60 वर्षांनंतर इंदूरमध्ये झाली विदर्भाची स्वप्नपुर्ती, कशी वाचा व्यवसायाने वकील असलेले 62 वर्षीय ऍड. मनोहर यांनी विदर्भ क्रिकेट संघटनेची धुरा सांभाळल्यानंतर त्यांना 2008 ते 2011 आणि नोव्हेंबर 2015 ते मे 2016 अशा दोनवेळा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. त्यांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच भारतीय क्रिकेटनेही प्रगतीचे उच्च शिखर गाठले. एकीकडे भारतीय कसोटी संघाने अव्वल स्थान पटकाविले, तर त्याचवेळी 2011 मध्ये प्रतिष्ठेचा "आयसीसी वर्ल्डकप'देखील जिंकला. "मिस्टर क्‍लीन' अशी ख्याती असलेले ऍड. मनोहर आतापर्यंतचे सर्वोत्तम बीसीसीआय अध्यक्ष असल्याचे बोलले जाते. नोव्हेंबर 2015 ते मार्च 2017 आणि मार्च 2017 ते जून 2020 या काळात ते आयसीसीवरही होते. ही सर्व पदे भूषविताना त्यांनी नेहमीच क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या भल्यासाठी निर्णय घेतले. त्यांनी सदैव भारतीय क्रिकेटलाच आपल्या अजेंड्यावर प्रथम प्राधान्य दिले. व्हीसीएशी जुळले असतानाही त्यांनी अनेक युवा खेळाडूंच्या करिअरला उभारी दिली. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या. 2010 मध्ये सुरू झालेली महत्त्वाकांक्षी निवासी क्रिकेट अकादमी व पंचांची क्रिकेट अकादमी त्यांच्याच डोक्‍यातील कल्पना आहे. शहरी व ग्रामीण भागातील असंख्य खेळाडू या अकादमीत घडले. उशिरा का होईना त्याचे फळ आता व्हीसीएला मिळू लागले आहे.    "ऍड. शशांक मनोहर यांनी व्हीसीए, बीसीसीआय आणि आयसीसीवर पद भूषविताना नेहमीच आपला ठसा उमटविलेला आहे. त्यांच्या कारकिर्दीत क्रिकेटची नेहमीच भरभराट झाली. उल्लेखनीय म्हणजे, त्यांच्यामुळेच विदर्भाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर नावलौकिक मिळाला आहे. व्हीसीएने आज जी प्रगती साधली आहे, त्यात ऍड. मनोहर यांचे फार मोठे योगदान आहे. असा कुशल क्रिकेट संघटक दुसरा होणे शक्‍य नाही.'  -प्रवीण हिंगणीकर, विदर्भाचे माजी रणजी कर्णधार    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38oJQsS
Read More
चिनी ऍपवरील बंदी, भारतीयांना संधी 

चिनी "ऍप'वर घातलेली बंदी, ही भारतीय बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करणारी दर्जेदार देशी "ऍप' विकसित करण्यासाठी भारतीय स्टार्ट अपसाठी एक संधी ठरू शकते. मात्र त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. 

ही तर समृद्धीची संधी 
व्हॉट्‌स ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, जीमेल, पेटीएम, टिकटॉक अशा सर्वच प्रकारच्या मोबाइल ऍपच्या माध्यमातून, ही ऍप विकसित करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर महसुली उत्पन्न मिळते. आपापली कार्यक्षमता आणि वैशिष्ट्यांनुसार ही "ऍप"आपल्या फोन आणि टॅब्लेट्‌सना स्मार्ट बनवतात. आजघडीला भारतात वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच ऍपची निर्मिती आणि व्यवस्थापन परदेशी कंपन्या करतात. यात प्रामुख्याने पाश्‍चात्त्य देशांचा समावेश आहे आणि अलिकडच्या काळात चीनने तयार केलेली अनेक ऍपही आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

आजघडीला भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या 80 कोटीपेक्षा जास्त झाली आहे आणि त्या माध्यमातून आपण ही ऍप तयार करणाऱ्यांच्या महसुली उत्पन्नात वाढ करण्यात हातभार लावत आहोत. "टिकटॉक"ची बाजारपेठ भारतात वेगाने वाढत आहे. जगभरातल्या दोन अब्ज लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले असून त्यात भारतीयांचे प्रमाण तब्बल 30 टक्के आहे. "ऍप' निर्माण करणाऱ्या परदेशी कंपन्यांच्या तोडीस तोड काम करून वापरकर्त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात भारतीय कंपन्या आतापर्यंत अयशस्वी ठरल्या आहेत. 

चीनने कसे साध्य केले? 
सुमारे दहा वर्षांपूर्वी चीनमध्ये अशीच काहीशी परिस्थिती होती, जेव्हा अमेरिका आणि युरोपमध्ये विकसित झालेल्या ऍपनी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. एक वेळ अशी आली, की चीन सरकारने यापैकी अनेक "ऍप'वर बंदी घातली. उदाहरण घ्यायचे झाले तर आज चीनमध्ये व्हॉट्‌स ऍपवर बंदी आहे. अशा अनेक ऍपवर बंदी घातल्यानंतर चीनमधल्या देशी कंपन्यांनी कंबर कसली आणि दर्जेदार ऍप तयार केली. त्यामुळे अमेरिकी उत्पादनांच्या तोडीस तोड अशी अनेक उत्पादने चिनी वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाली. नंतरच्या काळात प्रतिस्पर्ध्याने बाजारपेठेतून काढता पाय घेतल्याचा सर्वात जास्त फायदा WeChat सारख्या चिनी ऍपना झाला. अशाच प्रकारे गुगल मॅपसह गुगलच्या सर्व ऍपवर चीनमध्ये बंदी घालण्यात आली, त्यानंतर तिथे "बाईडू' (लोकप्रिय सर्च इंजिन) तर्फे तशाच प्रकारची ऍप विकसित करण्यात आली. नंतरच्या काळात फेसबुक, ट्‌वीटर आणि इन्स्टाग्रामची जागा अलीपे (Alipay) आणि क्‍यूबेने (Qqube) घेतली. अलिबाबा ग्रुपसारख्या चिनी उपक्रमांनी अशा प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा केला आणि आता या ऍप कंपन्या पाश्‍चिमात्य कंपन्यांइतक्‍याच सधन झाल्या आहेत. अलिकडच्या काळात यापैकी काही चिनी ऍपनी भारतातही चांगलाच शिरकाव केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतीयांची तांत्रिक क्षमता उत्तम 
चिनी "ऍप'वर घातलेली बंदी, ही भारतीय बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करणारी दर्जेदार देशी ऍप विकसित करण्यासाठी भारतीय स्टार्ट अप्ससाठी एक संधी ठरू शकते का? आगामी काळात आपण विकसित केलेल्या ऍपचा विस्तार जगभरात होऊ शकतो का? होय. ही खचितच एक उत्तम संधी आहे, मात्र ते सोपे नाही. अशा प्रकारची ऍप विकसित करण्याची तांत्रिक क्षमता निश्‍चितपणे भारतीय युवकांकडे आहे. आपल्याकडील अनेक जण फेसबुक आणि गुगलसारख्या, या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या उत्पादनांवर काम करतात. अशा प्रकारच्या कामासाठी आवश्‍यक कौशल्यांचा आपल्या देशात सातत्याने विस्तार होतो आहे. नुकताच आयआयटी मद्रासने "बी. एस्सी. - डेटा सायन्स ऑनलाईन" अभ्यासक्रमाचा शुभारंभ केला. कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतील. या माध्यमातून दर्जेदार ऍप्लिकेशन्स विकसित करणारे युवक देशाला लाभतील, अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या क्षमता अधिक विकसित होतील. 

भांडवलाची आवश्‍यकता 
मात्र मोबाइल ऍप यशस्वी होण्यासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नाही. वापरकर्त्यांना आकर्षित करणारी ऍप त्यांच्या वेधक स्वरूपामुळे, वापर करण्यातील सुलभतेमुळे आणि नावीन्यपूर्ण सुविधांमुळे लोकप्रिय होत असतात. ती सतत अद्ययावत होत राहतात. प्रत्येक प्रदेशातील वापरकर्त्यांच्या सवयी ओळखून, ऍप्सची रचना आणि फेररचना करत, त्यात नव्या सुविधांचा समावेश करत ही ऍप आपल्या वापरकर्त्यांना जास्तीत जास्त वापर करण्यास भाग पाडत राहतात. अशा प्रकारची ऍप विकसित करण्यासाठी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या चमूची आणि त्यांना उत्तम वित्तपुरवठा करण्याची आवश्‍यकता असते. बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने पुरेशा भांडवलाचीही आवश्‍यकता असते. आजघडीला स्टार्ट अप्ससमोर ही सगळी आव्हाने आहेत. 

मात्र तरीही भारतातील स्टार्ट अप्स समुदाय, हे आव्हान पेलण्यास उत्सुक आहेत, सक्षमही आहेत. संधी उपलब्ध होतीच, आता सरकारने चिनी ऍपवर बंदी घातल्यामुळे या संधीचा पुरेपूर लाभ घेणे शक्‍य होणार आहे. तो घेण्यासाठी "स्टार्ट अप्स'नी पुढाकार घेतला पाहिजे, यशस्वी झाले पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, अपयशातून शिकावे लागेल आणि सर्व प्रकारच्या प्रतिकूलतांवर मात करावी लागेल. खरे तर स्टार्ट अपचा अर्थ हाच आहे. सुदैवाने आजघडीला भारतात स्टार्ट अप्ससाठी व्यापक यंत्रणा उपलब्ध आहे, यशस्वी होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्हाला खात्री वाटते की एक दिवस निश्‍चितच असा येईल, जेव्हा आपल्या मोबाइलवर भारतीय "ऍप" आवडीने वापरली जातील. 
(लेखकद्वय आयआयटी, मद्रास येथे कार्यरत आहेत.) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चिनी ऍपवरील बंदी, भारतीयांना संधी  चिनी "ऍप'वर घातलेली बंदी, ही भारतीय बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करणारी दर्जेदार देशी "ऍप' विकसित करण्यासाठी भारतीय स्टार्ट अपसाठी एक संधी ठरू शकते. मात्र त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील.  ही तर समृद्धीची संधी  व्हॉट्‌स ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, जीमेल, पेटीएम, टिकटॉक अशा सर्वच प्रकारच्या मोबाइल ऍपच्या माध्यमातून, ही ऍप विकसित करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर महसुली उत्पन्न मिळते. आपापली कार्यक्षमता आणि वैशिष्ट्यांनुसार ही "ऍप"आपल्या फोन आणि टॅब्लेट्‌सना स्मार्ट बनवतात. आजघडीला भारतात वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच ऍपची निर्मिती आणि व्यवस्थापन परदेशी कंपन्या करतात. यात प्रामुख्याने पाश्‍चात्त्य देशांचा समावेश आहे आणि अलिकडच्या काळात चीनने तयार केलेली अनेक ऍपही आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    आजघडीला भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या 80 कोटीपेक्षा जास्त झाली आहे आणि त्या माध्यमातून आपण ही ऍप तयार करणाऱ्यांच्या महसुली उत्पन्नात वाढ करण्यात हातभार लावत आहोत. "टिकटॉक"ची बाजारपेठ भारतात वेगाने वाढत आहे. जगभरातल्या दोन अब्ज लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले असून त्यात भारतीयांचे प्रमाण तब्बल 30 टक्के आहे. "ऍप' निर्माण करणाऱ्या परदेशी कंपन्यांच्या तोडीस तोड काम करून वापरकर्त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात भारतीय कंपन्या आतापर्यंत अयशस्वी ठरल्या आहेत.  चीनने कसे साध्य केले?  सुमारे दहा वर्षांपूर्वी चीनमध्ये अशीच काहीशी परिस्थिती होती, जेव्हा अमेरिका आणि युरोपमध्ये विकसित झालेल्या ऍपनी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. एक वेळ अशी आली, की चीन सरकारने यापैकी अनेक "ऍप'वर बंदी घातली. उदाहरण घ्यायचे झाले तर आज चीनमध्ये व्हॉट्‌स ऍपवर बंदी आहे. अशा अनेक ऍपवर बंदी घातल्यानंतर चीनमधल्या देशी कंपन्यांनी कंबर कसली आणि दर्जेदार ऍप तयार केली. त्यामुळे अमेरिकी उत्पादनांच्या तोडीस तोड अशी अनेक उत्पादने चिनी वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाली. नंतरच्या काळात प्रतिस्पर्ध्याने बाजारपेठेतून काढता पाय घेतल्याचा सर्वात जास्त फायदा WeChat सारख्या चिनी ऍपना झाला. अशाच प्रकारे गुगल मॅपसह गुगलच्या सर्व ऍपवर चीनमध्ये बंदी घालण्यात आली, त्यानंतर तिथे "बाईडू' (लोकप्रिय सर्च इंजिन) तर्फे तशाच प्रकारची ऍप विकसित करण्यात आली. नंतरच्या काळात फेसबुक, ट्‌वीटर आणि इन्स्टाग्रामची जागा अलीपे (Alipay) आणि क्‍यूबेने (Qqube) घेतली. अलिबाबा ग्रुपसारख्या चिनी उपक्रमांनी अशा प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा केला आणि आता या ऍप कंपन्या पाश्‍चिमात्य कंपन्यांइतक्‍याच सधन झाल्या आहेत. अलिकडच्या काळात यापैकी काही चिनी ऍपनी भारतातही चांगलाच शिरकाव केला आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भारतीयांची तांत्रिक क्षमता उत्तम  चिनी "ऍप'वर घातलेली बंदी, ही भारतीय बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करणारी दर्जेदार देशी ऍप विकसित करण्यासाठी भारतीय स्टार्ट अप्ससाठी एक संधी ठरू शकते का? आगामी काळात आपण विकसित केलेल्या ऍपचा विस्तार जगभरात होऊ शकतो का? होय. ही खचितच एक उत्तम संधी आहे, मात्र ते सोपे नाही. अशा प्रकारची ऍप विकसित करण्याची तांत्रिक क्षमता निश्‍चितपणे भारतीय युवकांकडे आहे. आपल्याकडील अनेक जण फेसबुक आणि गुगलसारख्या, या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या उत्पादनांवर काम करतात. अशा प्रकारच्या कामासाठी आवश्‍यक कौशल्यांचा आपल्या देशात सातत्याने विस्तार होतो आहे. नुकताच आयआयटी मद्रासने "बी. एस्सी. - डेटा सायन्स ऑनलाईन" अभ्यासक्रमाचा शुभारंभ केला. कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतील. या माध्यमातून दर्जेदार ऍप्लिकेशन्स विकसित करणारे युवक देशाला लाभतील, अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या क्षमता अधिक विकसित होतील.  भांडवलाची आवश्‍यकता  मात्र मोबाइल ऍप यशस्वी होण्यासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नाही. वापरकर्त्यांना आकर्षित करणारी ऍप त्यांच्या वेधक स्वरूपामुळे, वापर करण्यातील सुलभतेमुळे आणि नावीन्यपूर्ण सुविधांमुळे लोकप्रिय होत असतात. ती सतत अद्ययावत होत राहतात. प्रत्येक प्रदेशातील वापरकर्त्यांच्या सवयी ओळखून, ऍप्सची रचना आणि फेररचना करत, त्यात नव्या सुविधांचा समावेश करत ही ऍप आपल्या वापरकर्त्यांना जास्तीत जास्त वापर करण्यास भाग पाडत राहतात. अशा प्रकारची ऍप विकसित करण्यासाठी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या चमूची आणि त्यांना उत्तम वित्तपुरवठा करण्याची आवश्‍यकता असते. बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने पुरेशा भांडवलाचीही आवश्‍यकता असते. आजघडीला स्टार्ट अप्ससमोर ही सगळी आव्हाने आहेत.  मात्र तरीही भारतातील स्टार्ट अप्स समुदाय, हे आव्हान पेलण्यास उत्सुक आहेत, सक्षमही आहेत. संधी उपलब्ध होतीच, आता सरकारने चिनी ऍपवर बंदी घातल्यामुळे या संधीचा पुरेपूर लाभ घेणे शक्‍य होणार आहे. तो घेण्यासाठी "स्टार्ट अप्स'नी पुढाकार घेतला पाहिजे, यशस्वी झाले पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, अपयशातून शिकावे लागेल आणि सर्व प्रकारच्या प्रतिकूलतांवर मात करावी लागेल. खरे तर स्टार्ट अपचा अर्थ हाच आहे. सुदैवाने आजघडीला भारतात स्टार्ट अप्ससाठी व्यापक यंत्रणा उपलब्ध आहे, यशस्वी होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्हाला खात्री वाटते की एक दिवस निश्‍चितच असा येईल, जेव्हा आपल्या मोबाइलवर भारतीय "ऍप" आवडीने वापरली जातील.  (लेखकद्वय आयआयटी, मद्रास येथे कार्यरत आहेत.)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZvTS7r
Read More
मराठमोळ्या रीवाचा जागतिक गौरव; डायना पुरस्काराने सन्मान

पुणे - दुबईस्थित रीवा तुळपुळे या अवघ्या चौदा वर्षांच्या मराठी मुलीला जागतिक पातळीवरील मानाचा "डायना पुरस्कार 2020' देऊन गौरविण्यात आले. गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून तिने ई-कचरा या विषयी जनजागृती आणि पुनर्वापर या बाबत दुबईमध्ये चळवळ उभी केली आहे. या कामाची दखल घेत तिला प्रिन्सेस डायना यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार देण्यात आला आहे. 

मूळचे पुण्याचे; पण सध्या दुबईस्थित असणारे मराठी उद्योजक राहुल तुळपुळे यांची ती कन्या आहे. सध्या ती दुबईमधील जेम्स मॉर्डन ऍकॅडमी आयसीएसई बोर्डाच्या शाळेत दहावीचे शिक्षण घेत आहे. घरातील ई-कचरा बाहेर फेकून देऊ शकत नाही. मग त्याचे करायचे काय, असा प्रश्न तिला काही वर्षांपूर्वी पडला आणि तिचा ई-कचऱ्याबाबतचा शोध सुरू झाला. तिने पहिल्या वर्षात एक टन ई-कचरा जमा केला. त्यानंतरच्या वर्षात तिने तीन ते चार टन कचरा जमा केला. सध्या वेगवेगळ्या शहरांतील आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत काम करत असून, त्यांनी एकत्रितरीत्या तब्बल 20 टन ई-कचरा जमा केला आहे. त्यांनी "एन्व्हायरो सर्वे' यांच्या समवेत ई-कचऱ्याच्या पुनर्वापराबाबत करार केला आहे. त्यानुसार काम सुरू आहे. ई-कचरा गोळा करण्यासाठी तिने दुबईमधील कार वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या हुबून ट्रान्स्पोर्टचे सहकार्य घेतले. याच वाहतूक सेवेने डायना पुरस्कारासाठी रीवाचे नाव सुचविले आणि तिला हा पुरस्कार मिळाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रीवाचे आजवरचे उपक्रम 
- शहापूर येथील आदिवासी मुलींमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती आणि सॅनिटरी पॅडचे वाटप 
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "काईन्डनेस पॅक' (धान्याचे पॅक) भारतीय दूतावासाच्या कामगार विभागाला दिले 

डायना पुरस्काराने मला प्रोत्साहन मिळाले आहे. पुरस्काराच्या निमित्ताने अनेकांशी संपर्क वाढला. यापुढे मी आणखी जोमाने काम करणार आहे. शहापूर येथील आदिवासी मुलींचे प्रश्न जाणून घेताना त्यांना अनवाणी पायपीट करावी लागत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यासाठी "स्माइलिंग फूट' उपक्रम राबविणार आहे. जवळपास 600 मुलींना शूज देणार आहे. 
- रीवा तुळपुळे, पुरस्कार्थी 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मराठमोळ्या रीवाचा जागतिक गौरव; डायना पुरस्काराने सन्मान पुणे - दुबईस्थित रीवा तुळपुळे या अवघ्या चौदा वर्षांच्या मराठी मुलीला जागतिक पातळीवरील मानाचा "डायना पुरस्कार 2020' देऊन गौरविण्यात आले. गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून तिने ई-कचरा या विषयी जनजागृती आणि पुनर्वापर या बाबत दुबईमध्ये चळवळ उभी केली आहे. या कामाची दखल घेत तिला प्रिन्सेस डायना यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार देण्यात आला आहे.  मूळचे पुण्याचे; पण सध्या दुबईस्थित असणारे मराठी उद्योजक राहुल तुळपुळे यांची ती कन्या आहे. सध्या ती दुबईमधील जेम्स मॉर्डन ऍकॅडमी आयसीएसई बोर्डाच्या शाळेत दहावीचे शिक्षण घेत आहे. घरातील ई-कचरा बाहेर फेकून देऊ शकत नाही. मग त्याचे करायचे काय, असा प्रश्न तिला काही वर्षांपूर्वी पडला आणि तिचा ई-कचऱ्याबाबतचा शोध सुरू झाला. तिने पहिल्या वर्षात एक टन ई-कचरा जमा केला. त्यानंतरच्या वर्षात तिने तीन ते चार टन कचरा जमा केला. सध्या वेगवेगळ्या शहरांतील आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत काम करत असून, त्यांनी एकत्रितरीत्या तब्बल 20 टन ई-कचरा जमा केला आहे. त्यांनी "एन्व्हायरो सर्वे' यांच्या समवेत ई-कचऱ्याच्या पुनर्वापराबाबत करार केला आहे. त्यानुसार काम सुरू आहे. ई-कचरा गोळा करण्यासाठी तिने दुबईमधील कार वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या हुबून ट्रान्स्पोर्टचे सहकार्य घेतले. याच वाहतूक सेवेने डायना पुरस्कारासाठी रीवाचे नाव सुचविले आणि तिला हा पुरस्कार मिळाला.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रीवाचे आजवरचे उपक्रम  - शहापूर येथील आदिवासी मुलींमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती आणि सॅनिटरी पॅडचे वाटप  - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "काईन्डनेस पॅक' (धान्याचे पॅक) भारतीय दूतावासाच्या कामगार विभागाला दिले  डायना पुरस्काराने मला प्रोत्साहन मिळाले आहे. पुरस्काराच्या निमित्ताने अनेकांशी संपर्क वाढला. यापुढे मी आणखी जोमाने काम करणार आहे. शहापूर येथील आदिवासी मुलींचे प्रश्न जाणून घेताना त्यांना अनवाणी पायपीट करावी लागत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यासाठी "स्माइलिंग फूट' उपक्रम राबविणार आहे. जवळपास 600 मुलींना शूज देणार आहे.  - रीवा तुळपुळे, पुरस्कार्थी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gn3iJq
Read More

Wednesday, July 1, 2020

पुण्याच्या प्रदूषणात किंचित वाढ; ‘अनलॉक’नंतर नागरिकांची वर्दळ 

पुणे - लॉकडाउनमध्ये पुण्यातील हवेची गुणवत्ता ही चांगल्या श्रेणीची नोंदली गेली होती; परंतु लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर प्रदूषणात किंचित वाढ झाली. नागरिकांची वर्दळ आणि वाहनांच्या रहदारीमुळे हवेची गुणवत्ता आता चांगल्या श्रेणीतून समाधानकारक श्रेणीत पोचली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

जूनमध्ये शहरातील विविध खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये कामकाज सुरू झाले. तसेच अनलॉक १.० मुळे नागरिकही घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) आकडेवारीतून स्पष्ट झाले. २३ ते ३० जूनपर्यंत शहरातील हवेची गुणवत्ता ५१ ते १०० च्या मध्ये (मायक्रोग्रॅम प्रतिक्‍यूबिक घनमीटर) नोंदविली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) निरीक्षणानुसार जूनच्या सुरवातीस झालेल्या पावसामुळे प्रदूषणात जास्त वाढ झाली नाही; परंतु त्याचा अभ्यास  सुरू आहे, अशी माहिती आयआयटीएमचे शास्त्रज्ञ डॉ. गुफ्रान बेग यांनी दिली.

सफरद्वारे घेतलेल्या निरीक्षणातून असे समजले की, जून महिन्यातील काही दिवसांच्या पावसामुळे देशातील विविध शहरांमध्ये पीएम २.५ आणि नायट्रोजन ऑक्‍साईडमध्ये काही प्रमाणात घट झाली. मात्र, यामागचे संपूर्ण कारण अस्पष्ट आहे. तसेच आयआयटीएममार्फत या संबंधातील अभ्यास सुरू आहे.
- डॉ. गुफ्रान बेग, शास्त्रज्ञ, आयआयटीएम

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्याच्या प्रदूषणात किंचित वाढ; ‘अनलॉक’नंतर नागरिकांची वर्दळ  पुणे - लॉकडाउनमध्ये पुण्यातील हवेची गुणवत्ता ही चांगल्या श्रेणीची नोंदली गेली होती; परंतु लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर प्रदूषणात किंचित वाढ झाली. नागरिकांची वर्दळ आणि वाहनांच्या रहदारीमुळे हवेची गुणवत्ता आता चांगल्या श्रेणीतून समाधानकारक श्रेणीत पोचली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    जूनमध्ये शहरातील विविध खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये कामकाज सुरू झाले. तसेच अनलॉक १.० मुळे नागरिकही घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) आकडेवारीतून स्पष्ट झाले. २३ ते ३० जूनपर्यंत शहरातील हवेची गुणवत्ता ५१ ते १०० च्या मध्ये (मायक्रोग्रॅम प्रतिक्‍यूबिक घनमीटर) नोंदविली आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) निरीक्षणानुसार जूनच्या सुरवातीस झालेल्या पावसामुळे प्रदूषणात जास्त वाढ झाली नाही; परंतु त्याचा अभ्यास  सुरू आहे, अशी माहिती आयआयटीएमचे शास्त्रज्ञ डॉ. गुफ्रान बेग यांनी दिली. सफरद्वारे घेतलेल्या निरीक्षणातून असे समजले की, जून महिन्यातील काही दिवसांच्या पावसामुळे देशातील विविध शहरांमध्ये पीएम २.५ आणि नायट्रोजन ऑक्‍साईडमध्ये काही प्रमाणात घट झाली. मात्र, यामागचे संपूर्ण कारण अस्पष्ट आहे. तसेच आयआयटीएममार्फत या संबंधातील अभ्यास सुरू आहे. - डॉ. गुफ्रान बेग, शास्त्रज्ञ, आयआयटीएम News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BXIJEt
Read More