कोरोनामुळे 78 टक्के लघु, सूक्ष्म उद्योगांचे काम बंद पुणे - कोरोनाचा देशभरातील उद्योग आणि सामाजिक क्षेत्रावर गंभीर परिणाम होत असून, आर्थिक उदासीनता, शून्य महसूल निर्मिती यामुळे सुमारे 78 टक्के लघु, सूक्ष्म उद्योगांना (एमएसएमईंना) आपले कामकाज बंद करावे लागल्याचे डेटा विश्लेषक-आधारित बॅंकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी "स्पोक्टो'ने केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. स्पोक्टोने "द ग्राउंड ट्रुथ-व्हॉइस ऑफ इंडियन बॉरोव्हर्स' अंतर्गत मुदत कर्ज देणाऱ्या संस्थांचा आणि ग्राहकांचा अभ्यास केला. मुंबई, पुणे, नवी दिल्ली, बंगळुरू आदींसारख्या 185 शहरांमधून "स्पोक्टो'ने हा अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे. सुमारे 59 टक्के ग्राहकांचे कोरोनाच्या काळात उत्पन्नात नुकसान झाले आहे. तर केवळ 4 टक्के ग्राहकांच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही. सध्याच्या कामगार शक्तीतील 34 टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सुमारे 56 टक्के ग्राहकांनी वैयक्तिक कर्ज घेतले आहे तर गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या 23 टक्के आहे. यानंतर व्यावसायिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा (17 टक्के), कार लोन (16 टक्के), दुचाकी कर्ज (15 टक्के), इतर कर्ज (5 टक्के) यांचा क्रमांक लागतो. एकूण खातेदारांपैकी 76 टक्के लोकांनी ईएमआयमध्ये 50,000 रुपयांची लहान कर्जे घेतली आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुढच्या वर्षभराचा विचार केल्यास 38 टक्के ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या कर्जाची गरज भासणार नसून, 37 टक्के ग्राहकांना मात्र लग्न, शिक्षण यांसारख्या वैयक्तिक खर्चकरिता कर्जाची आवश्यकता असणार आहे. 16 टक्के ग्राहकांना गृहकर्जाची आवश्यकता भासणार असून, स्वतःचे वाहन विकत घेण्यासाठी 9 टक्के ग्राहकांना कर्जाची गरज लागणार आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा स्पोक्टो सोल्यूशन्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समित श्रीवास्तव म्हणाले,""देशातील उद्योग आणि व्यावसायिकांसाठी 2020 हे वर्ष एखाद्या दु:स्वप्नासारखे आहे. बॅंकिंग आणि कर्ज देणाऱ्या इको सिस्टिमला आपली एंगेजमेंट धोरणे आणि योजना नव्याने विकसित कराव्या लागतील.'' News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 01, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2BTVLTs Read More Read more No comments:
तब्बल 60 वर्षांनंतर इंदूरमध्ये झाली विदर्भाची स्वप्नपुर्ती, कशी वाचा नागपूर : घरगुती रणजी क्रिकेटमध्ये कितीही सामने जिंकले, तरीही तुमची चर्चा होत नाही. तुमच्या कामगिरीदेखील कुणी दखल घेत नाही. मात्र, तुम्ही जर "चॅम्पियन' झाला असाल, तर सारेच तुमचे गुणगाण करतात. विदर्भ रणजी संघाला तीन वर्षांपूर्वी इंदूरमध्ये असाच काहीसा अनुभव आला. "ग्रॅण्ड फायनल'मध्ये दिल्लीचा धुव्वा उडवून प्रथमच रणजी करंडक जिंकल्यानंतर विदर्भाची देशभर वाहवा व चर्चा झाली आणि येथूनच सुरू झाला विदर्भाच्या विजयाचा प्रवास. विदर्भाने त्या दिवशी केवळ रणजी करंडकच जिंकला नाही, तर रणजीपाठोपाठ सलग दोनवेळा इराणी करंडकावर नाव कोरले. 2017-18 च्या मोसमात विदर्भाच्या यशात प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले. निर्णायक क्षणी एकतरी खेळाडू आपल्या कामगिरीने संघासाठी धावून येत होता आणि त्यांच्या सोबतीला होते कडक शिस्तीचे चंद्रकांत पंडित सर. विदर्भाच्या खेळाडूंत क्षमता होती, कौशल्य होते. मात्र, जिंकण्याचा आत्मविश्वास नव्हता किंवा भूक नव्हती. तो आत्मविश्वास, ती भूक पंडित सरांनी निर्माण केली आणि इतिहास घडला. पंजाबला त्यांच्या घरच्या मैदानावरच गारद करून विदर्भाने मोसमाची दणक्यात सुरुवात केली होती. मात्र, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या सामन्याने चिंता वाढवली होती. तरीही 31 गुण घेऊन विदर्भाने "ड' गटात आघाडीचे स्थान मिळविले. साखळी फेरीनंतरच विदर्भाची खरी परीक्षा होती. मात्र, सुरत येथे झालेला केरळविरुद्धचा बाद फेरीचा पहिला पेपर विदर्भाच्या फैज फजल (119), अक्षय वाडकर (53), रजनीश गुरबानी (5-38) आणि अक्षय कर्णेवार (6-41) यांनी लीलया सोडविला. *विदर्भाने 34 वर्षांपूर्वी कसे आणले उत्तर प्रदेशच्या नाकीनऊ, वाचा* सर्वांत कठीण सामना उपांत्य फेरीत चिवट असा कर्नाटक संघ होता. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेला हा सामना बहुधा विदर्भाचा हा सर्वांत कठीण सामना होता. कर्नाटकचा शेवटचा फलंदाज सहजपणे खेळत असल्याने विदर्भाची घोडदौड उपांत्य फेरीतच आटोपणार असे वाटत होते. कर्नाटकपुढे नाममात्र 198 धावांचे आव्हान होते. रजनीश गुरबानी जिवाच्या आकांताने गोलंदाजी करीत होता. एकापाठोपाठ षटके टाकत होता. 8 बाद 141 अशी स्थिती आल्यावर विदर्भाचा विजय सोपा झाला असे चित्र होते. श्रेयस गोपाल आणि अभिमन्यू मिथुनने 48 धावांची भागीदारी करून कर्नाटकला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. येथे गुरबानीने मिथुनला टिपले (9-189). शेवटच्या एस. अरविंदसाठी जाळे टाकण्यात आले. उंचपुऱ्या अपूर्व वानखेडेला मुद्दाम पॉइंटवर उभे करण्यात आले आणि कर्णधार फैजने गुरबानीला चेंडू बाहेर टाकण्याचा इशारा केला आणि अरविंद नेमका या जाळ्यात अडकला. झेल घेतल्यावर अपूर्वने घेतलेली धाव ही उसेन बोल्टच्या शंभर मीटरपेक्षाही वेगवान होती. कारण अवघ्या पाच धावांनी विजय मिळवून विदर्भ संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता. हेही वाचा : निर्णय चुकल्याने कसा हिरावला विदर्भाचा विजय रजनीशची हॅट्ट्रीक व वाडकरचे शतक इंदूरच्या होळकर स्टेडियमवर 29 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान खेळल्या गेलेला अंतिम सामना पाहण्यासाठी नागपुरातून व्हीसीए पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी इंदोरच्या दिशेने प्रयाण केले होते. संघ थेट कोलकाता येथून दाखल झाला. दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला असला तरी त्यांची भिस्त दोन-तीन खेळाडूंवरच होती, याची जाणीव प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि कर्णधार फैजला होती. त्यानुसार त्यांनी डावपेच आखले आणि आदित्य ठाकरे या युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिली. गुरबानीला थांबविणे तर अवघडच होते. पहिल्या डावात हॅट्ट्रीक घेताना केलेली गोलंदाजी त्याच्या क्षमतेची साक्ष देत होती. असे असताना भविष्यात त्याच्याऐवजी नवदीप सैन्नीला संधी मिळाली, हे दुर्दैव. यष्टिरक्षक अक्षय वाडकरचे शतक विदर्भाच्या विजेतेपदाच्या आनंदात आणखी भर टाकून गेले. हेही वाचा : प्रेक्षकांनी 25 वर्षांपूर्वी अनुभवला होता नीरस सामन्यात रोमांच आणि तो ऐतिहासिक क्षण... ऐतिहासिक विजयासाठी विदर्भाला केवळ 29 धावांची आवश्यकता होती. फैज व संजयनेच ही औपचारिकता पूर्ण करावी, अशी साऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, तसे घडले नाही. फैज लवकर बाद झाल्यानंतर जाफर व संजयने आवश्यक धावा काढून विजेतेपदाला गवसणी घातली. नववर्षाच्या आदल्याच दिवशी वैदर्भी खेळाडूंनी आपल्या चाहत्यांना अविस्मरणीय भेट दिली. तब्बल सहा दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर विदर्भाने रणजी करंडक जिंकून देशभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांसह खेळाडूंचे कुटुंबीय व असंख्य चाहते ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेत. त्या दिवशी साऱ्यांनीच भावनिक विजय थाटात "सेलिब्रेट' केला. संक्षिप्त धावफलक ः दिल्ली पहिला डाव 295 (ध्रुव शोरी 145, हिम्मत सिंग 66, नितेश राणा 21, ऋषभ पंत 21, गौतम गंभीर 15, रजनीश गुरबानी 6-59, आदित्य ठाकरे 2-74), विदर्भ पहिला डाव 547 (फैज फजल 67, आर. संजय 31, वसीम जाफर 78, अपूर्व वानखेडे 28, अक्षय वाडकर 133, सिद्धेश नेरळ 74, आदित्य सरवटे 79, नवदीप सैन्नी 5-135, आकाश सुदान 2-102, के. खेजरोलिया 2-132), दिल्ली दुसरा डाव 280 (गौतम गंभीर 36, ध्रुव शोरी 62, नितेश राणा 64, ऋषभ पंत 32, विकास मिश्रा 34, अक्षय वखरे 4-95, आदित्य सरवटे 3-30, गुरबानी 2-92), विदर्भ दुसरा डाव 1 बाद 32 (फैज फजल 2, आर. संजय नाबाद 9, वसीम जाफर नाबाद 17, खेजरोलिया 1-21). News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 01, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3ikUeWZ Read More Read more No comments:
जीएसटी वसुलीमध्ये वाढ झाल्याने सरकारला दिलासा नवी दिल्ली - लॉकडाउननंतर अर्थव्यवस्थेचा गाडा हळुहळू रुळावर येऊ लागला असून मागील महिन्यात ९०,९१७ कोटी रुपये ‘जीएसटी’ची (वस्तू आणि सेवा कर) वसुली झाली आहे. एप्रिल आणि मे मधील कोलमडलेला महसूल पाहता जूनच्या आकडेवारीने सरकारला हायसे वाटले आहे. कोविड १९ संकट आणि लॉकडाउनमुळे महसूल लक्षणीय प्रमाणात घटला आहे. लॉकडाउनच्या अंमलबजावणीमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने एप्रिलमध्ये फक्त ३२,२९४ कोटी रुपये जीएसटी वसुल झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची वसुली फक्त २८ टक्के होती. मे मध्ये काही प्रमाणात वसुलीत वाढ होऊन रक्कम ६२,००९ कोटी रुपये झाली. हे प्रमाण मागील वर्षाच्या जीएसटी वसुलीच्या तुलनेत ६२ टक्के होते. आता जीएसटी विवरणपत्र भरण्यात आणि कर भरण्यात सूट दिली त्यानंतर जूनमध्ये बऱ्यापैकी कर वसुली वाढली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत ९१ टक्के आहे. मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीएसटी वसुलीचे प्रमाण ५९ टक्के असले तरी मे महिन्याचा जीएसटी भरण्यासाठी वाढीव मुदत दिल्याने एकत्रित वसुली आणखी वाढण्याची सरकारला अपेक्षा आहे. सरकारने फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे जीएसटी विवरणपत्र जून महिन्यात सादर करण्यास परवानगी दिली होती. तर मे चीही काही विवरणपत्रे जुलैमध्ये भरण्यास संमती देण्यात आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जूनमध्ये झालेल्या ९०,१९७ कोटी जीएसटी वसुलीत रकमेत केंद्रीय जीएसटीचा (सीजीएसटी) वाटा १८,९८० कोटी रुपयांचा तर राज्य जीएसटीचा (एसजीएसटी) वाटा २३,९७० कोटी रुपयांचा आहे. त्यासोबतच आयजीएसटी म्हणजे एकत्रित जीएसटीचा हिस्सा यामध्ये ४०,३०२ कोटी रुपयांचा आहे. यात १५,७०९ कोटी रुपये आयात वस्तूंवरील करातून वसुल करण्यात आले. दरम्यान, सरकारला उपकरापोटी ७,६६५ कोटी रुपये मिळाले आहेत. सरकारने सीजीएसटीचे १३,३२५ कोटीचे तर एसजीएसटी आणि आयजीएसटीचे ११,११७ कोटी रुपयांचे दावे निकाली काढले आहेत. त्यामुळे सर्व दावे निकाली काढल्यानंतर केंद्र आणि राज्यांना जून २०२० मध्ये सीजीएसटीपोटी ३२,३०५ कोटी आणि एसजीएसटीपोटी ३५,०८७ कोटी रुपये मिळाले. यात आयातीवरील करवसुलीपोटी ७१ टक्के तर देशांतर्गत व्यवहारांपोटीची करवसुली ९७ टक्के आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जीएसटी वसुली- एप्रिल २०१९-२० मध्ये - १,१३८६६ कोटी एप्रिल २०२०-२१ मध्ये - ३२२९४ कोटी मे २०१९-२० मध्ये - १,००२८९ कोटी मे २०२०-२१ मध्ये - ६२००९ कोटी जून २०१९-२० मध्ये - ९९९४० कोटी जून २०२०-२१ मध्ये - ९०९१७ कोटी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 01, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2NMGPZV Read More Read more No comments:
जिल्ह्यात विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता घ्या कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापुरातील तिन्ही मंत्र्यांसह प्रशासन विशेषत: पोलिस, आरोग्य, महसूल या सर्वांनी युनिक पॅटर्न राबवून प्रभावीपणे काम केले. नियोजनामुळे संसर्ग रोखण्यात जिल्हा यशस्वी ठरला आहे. यापुढेही असेच चांगले काम करा, जिल्ह्यामध्ये विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता यापुढील काळात घ्या, अशा सूचना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी आज दिल्या. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात देसाई यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या विभागांची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते. मित्तल यांनी कोविडबाबत सद्यःस्थितीची माहिती दिली. जिल्हाधिकारी देसाई यांनी या 18 प्रवेश नाक्यांवरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी अहवालाबाबतही त्यांनी माहिती दिली. डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि कोरोनातील कामकाजाबाबत सादरीकरण केले. मंत्री देसाई म्हणाले, ""पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कोरोना रोखण्यासाठी प्रभावीपणे काम केले आहे. प्रशासनाने युनिक पॅटर्न राबवून कोरोनाचा संसर्ग रोखला आहे. "चोवीस बाय सात' फिल्डवर राहून परिस्थिती हाताळली. पोलिस, महसूल, आरोग्य यांच्यावर अधिक जबाबदारी होती. या सर्वांचे आभार मानून देसाई यांनी सांगली जिल्ह्यातही पालकमंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह प्रशासनाने चांगले काम केले आहे, असे सांगितले. अधिक काम करून महसूल वाढवा पणन, उत्पादन शुल्क, वस्तू व सेवा कर विभाग यांनीही अधिक काम करून महसूल वाढवावा. लोकाभिमुख आणि स्वच्छ प्रशासन राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. यापुढेही आपण सर्व चांगले काम कराल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/31yyIsa Read More Read more No comments:
कांग्रेस ने की चीनी कंपनी Huawei-ZTE को 5G ट्रायल की रेस से बाहर करने की मांग https://ift.tt/3imthT8 Latest news updates June 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
Horoscope Today, 1 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2YN0Upd Latest news updates June 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
दिल्ली पुलिस के इंस्पेक्टर की कोरोना से मौत, 14 दिन से वेंटिलेटर पर थे https://ift.tt/3dNAl7F Latest news updates June 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
दिल्ली: मार्च में चोरी हुई जज की कार, 2 महीने बाद पुलिस ने भेजा चालान https://ift.tt/3ikOYCI Latest news updates June 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
दिल्ली: 12 लाख बच्चों को मिड डे मील ना मिलने पर हाई कोर्ट नाराज https://ift.tt/38eZHKx Latest news updates June 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
दिल्ली में ठक ठक गैंग एक्टिव, पुलिस ने 2 आरोपियों को किया गिरफ्तार https://ift.tt/3dV3zlf Latest news updates June 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
गाजियाबाद से गायब बिल्डर की कार मुजफ्फरनगर में मिली https://ift.tt/2Bi4M8Z Latest news updates June 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
पंजाब: चीन से तकरार के चलते फिर नहीं मिला युवाओं को स्मार्ट फोन https://ift.tt/31xliMY Latest news updates June 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
दिल्ली में चीनी नागरिकों के लिए टैक्सी नहीं, एसोसिएशन ने किया बैन https://ift.tt/3ikceRB Latest news updates June 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments: