तब्बल 60 वर्षांनंतर इंदूरमध्ये झाली विदर्भाची स्वप्नपुर्ती, कशी वाचा  नागपूर : घरगुती रणजी क्रिकेटमध्ये कितीही सामने जिंकले, तरीही तुमची चर्चा होत नाही. तुमच्या कामगिरीदेखील कुणी दखल घेत नाही. मात्र, तुम्ही जर "चॅम्पियन' झाला असाल, तर सारेच तुमचे गुणगाण करतात. विदर्भ रणजी संघाला तीन वर्षांपूर्वी इंदूरमध्ये असाच काहीसा अनुभव आला. "ग्रॅण्ड फायनल'मध्ये दिल्लीचा धुव्वा उडवून प्रथमच रणजी करंडक जिंकल्यानंतर विदर्भाची देशभर वाहवा व चर्चा झाली आणि येथूनच सुरू झाला विदर्भाच्या विजयाचा प्रवास. विदर्भाने त्या दिवशी केवळ रणजी करंडकच जिंकला नाही, तर रणजीपाठोपाठ सलग दोनवेळा इराणी करंडकावर नाव कोरले.  2017-18 च्या मोसमात विदर्भाच्या यशात प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले. निर्णायक क्षणी एकतरी खेळाडू आपल्या कामगिरीने संघासाठी धावून येत होता आणि त्यांच्या सोबतीला होते कडक शिस्तीचे चंद्रकांत पंडित सर. विदर्भाच्या खेळाडूंत क्षमता होती, कौशल्य होते. मात्र, जिंकण्याचा आत्मविश्‍वास नव्हता किंवा भूक नव्हती. तो आत्मविश्‍वास, ती भूक पंडित सरांनी निर्माण केली आणि इतिहास घडला. पंजाबला त्यांच्या घरच्या मैदानावरच गारद करून विदर्भाने मोसमाची दणक्‍यात सुरुवात केली होती. मात्र, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या सामन्याने चिंता वाढवली होती. तरीही 31 गुण घेऊन विदर्भाने "ड' गटात आघाडीचे स्थान मिळविले. साखळी फेरीनंतरच विदर्भाची खरी परीक्षा होती. मात्र, सुरत येथे झालेला केरळविरुद्धचा बाद फेरीचा पहिला पेपर विदर्भाच्या फैज फजल (119), अक्षय वाडकर (53), रजनीश गुरबानी (5-38) आणि अक्षय कर्णेवार (6-41) यांनी लीलया सोडविला.  *विदर्भाने 34 वर्षांपूर्वी कसे आणले उत्तर प्रदेशच्या नाकीनऊ, वाचा*    सर्वांत कठीण सामना  उपांत्य फेरीत चिवट असा कर्नाटक संघ होता. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेला हा सामना बहुधा विदर्भाचा हा सर्वांत कठीण सामना होता. कर्नाटकचा शेवटचा फलंदाज सहजपणे खेळत असल्याने विदर्भाची घोडदौड उपांत्य फेरीतच आटोपणार असे वाटत होते. कर्नाटकपुढे नाममात्र 198 धावांचे आव्हान होते. रजनीश गुरबानी जिवाच्या आकांताने गोलंदाजी करीत होता. एकापाठोपाठ षटके टाकत होता. 8 बाद 141 अशी स्थिती आल्यावर विदर्भाचा विजय सोपा झाला असे चित्र होते. श्रेयस गोपाल आणि अभिमन्यू मिथुनने 48 धावांची भागीदारी करून कर्नाटकला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. येथे गुरबानीने मिथुनला टिपले (9-189). शेवटच्या एस. अरविंदसाठी जाळे टाकण्यात आले. उंचपुऱ्या अपूर्व वानखेडेला मुद्दाम पॉइंटवर उभे करण्यात आले आणि कर्णधार फैजने गुरबानीला चेंडू बाहेर टाकण्याचा इशारा केला आणि अरविंद नेमका या जाळ्यात अडकला. झेल घेतल्यावर अपूर्वने घेतलेली धाव ही उसेन बोल्टच्या शंभर मीटरपेक्षाही वेगवान होती. कारण अवघ्या पाच धावांनी विजय मिळवून विदर्भ संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता.  हेही वाचा : निर्णय चुकल्याने कसा हिरावला विदर्भाचा विजय   रजनीशची हॅट्‌ट्रीक व वाडकरचे शतक  इंदूरच्या होळकर स्टेडियमवर 29 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान खेळल्या गेलेला अंतिम सामना पाहण्यासाठी नागपुरातून व्हीसीए पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी इंदोरच्या दिशेने प्रयाण केले होते. संघ थेट कोलकाता येथून दाखल झाला. दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला असला तरी त्यांची भिस्त दोन-तीन खेळाडूंवरच होती, याची जाणीव प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि कर्णधार फैजला होती. त्यानुसार त्यांनी डावपेच आखले आणि आदित्य ठाकरे या युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिली. गुरबानीला थांबविणे तर अवघडच होते. पहिल्या डावात हॅट्‌ट्रीक घेताना केलेली गोलंदाजी त्याच्या क्षमतेची साक्ष देत होती. असे असताना भविष्यात त्याच्याऐवजी नवदीप सैन्नीला संधी मिळाली, हे दुर्दैव. यष्टिरक्षक अक्षय वाडकरचे शतक विदर्भाच्या विजेतेपदाच्या आनंदात आणखी भर टाकून गेले.  हेही वाचा : प्रेक्षकांनी 25 वर्षांपूर्वी अनुभवला होता नीरस सामन्यात रोमांच आणि तो ऐतिहासिक क्षण...  ऐतिहासिक विजयासाठी विदर्भाला केवळ 29 धावांची आवश्‍यकता होती. फैज व संजयनेच ही औपचारिकता पूर्ण करावी, अशी साऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, तसे घडले नाही. फैज लवकर बाद झाल्यानंतर जाफर व संजयने आवश्‍यक धावा काढून विजेतेपदाला गवसणी घातली. नववर्षाच्या आदल्याच दिवशी वैदर्भी खेळाडूंनी आपल्या चाहत्यांना अविस्मरणीय भेट दिली. तब्बल सहा दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर विदर्भाने रणजी करंडक जिंकून देशभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांसह खेळाडूंचे कुटुंबीय व असंख्य चाहते ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेत. त्या दिवशी साऱ्यांनीच भावनिक विजय थाटात "सेलिब्रेट' केला.    संक्षिप्त धावफलक ः दिल्ली पहिला डाव 295 (ध्रुव शोरी 145, हिम्मत सिंग 66, नितेश राणा 21, ऋषभ पंत 21, गौतम गंभीर 15, रजनीश गुरबानी 6-59, आदित्य ठाकरे 2-74), विदर्भ पहिला डाव 547 (फैज फजल 67, आर. संजय 31, वसीम जाफर 78, अपूर्व वानखेडे 28, अक्षय वाडकर 133, सिद्धेश नेरळ 74, आदित्य सरवटे 79, नवदीप सैन्नी 5-135, आकाश सुदान 2-102, के. खेजरोलिया 2-132), दिल्ली दुसरा डाव 280 (गौतम गंभीर 36, ध्रुव शोरी 62, नितेश राणा 64, ऋषभ पंत 32, विकास मिश्रा 34, अक्षय वखरे 4-95, आदित्य सरवटे 3-30, गुरबानी 2-92), विदर्भ दुसरा डाव 1 बाद 32 (फैज फजल 2, आर. संजय नाबाद 9, वसीम जाफर नाबाद 17, खेजरोलिया 1-21).    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 1, 2020

तब्बल 60 वर्षांनंतर इंदूरमध्ये झाली विदर्भाची स्वप्नपुर्ती, कशी वाचा  नागपूर : घरगुती रणजी क्रिकेटमध्ये कितीही सामने जिंकले, तरीही तुमची चर्चा होत नाही. तुमच्या कामगिरीदेखील कुणी दखल घेत नाही. मात्र, तुम्ही जर "चॅम्पियन' झाला असाल, तर सारेच तुमचे गुणगाण करतात. विदर्भ रणजी संघाला तीन वर्षांपूर्वी इंदूरमध्ये असाच काहीसा अनुभव आला. "ग्रॅण्ड फायनल'मध्ये दिल्लीचा धुव्वा उडवून प्रथमच रणजी करंडक जिंकल्यानंतर विदर्भाची देशभर वाहवा व चर्चा झाली आणि येथूनच सुरू झाला विदर्भाच्या विजयाचा प्रवास. विदर्भाने त्या दिवशी केवळ रणजी करंडकच जिंकला नाही, तर रणजीपाठोपाठ सलग दोनवेळा इराणी करंडकावर नाव कोरले.  2017-18 च्या मोसमात विदर्भाच्या यशात प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले. निर्णायक क्षणी एकतरी खेळाडू आपल्या कामगिरीने संघासाठी धावून येत होता आणि त्यांच्या सोबतीला होते कडक शिस्तीचे चंद्रकांत पंडित सर. विदर्भाच्या खेळाडूंत क्षमता होती, कौशल्य होते. मात्र, जिंकण्याचा आत्मविश्‍वास नव्हता किंवा भूक नव्हती. तो आत्मविश्‍वास, ती भूक पंडित सरांनी निर्माण केली आणि इतिहास घडला. पंजाबला त्यांच्या घरच्या मैदानावरच गारद करून विदर्भाने मोसमाची दणक्‍यात सुरुवात केली होती. मात्र, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या सामन्याने चिंता वाढवली होती. तरीही 31 गुण घेऊन विदर्भाने "ड' गटात आघाडीचे स्थान मिळविले. साखळी फेरीनंतरच विदर्भाची खरी परीक्षा होती. मात्र, सुरत येथे झालेला केरळविरुद्धचा बाद फेरीचा पहिला पेपर विदर्भाच्या फैज फजल (119), अक्षय वाडकर (53), रजनीश गुरबानी (5-38) आणि अक्षय कर्णेवार (6-41) यांनी लीलया सोडविला.  *विदर्भाने 34 वर्षांपूर्वी कसे आणले उत्तर प्रदेशच्या नाकीनऊ, वाचा*    सर्वांत कठीण सामना  उपांत्य फेरीत चिवट असा कर्नाटक संघ होता. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेला हा सामना बहुधा विदर्भाचा हा सर्वांत कठीण सामना होता. कर्नाटकचा शेवटचा फलंदाज सहजपणे खेळत असल्याने विदर्भाची घोडदौड उपांत्य फेरीतच आटोपणार असे वाटत होते. कर्नाटकपुढे नाममात्र 198 धावांचे आव्हान होते. रजनीश गुरबानी जिवाच्या आकांताने गोलंदाजी करीत होता. एकापाठोपाठ षटके टाकत होता. 8 बाद 141 अशी स्थिती आल्यावर विदर्भाचा विजय सोपा झाला असे चित्र होते. श्रेयस गोपाल आणि अभिमन्यू मिथुनने 48 धावांची भागीदारी करून कर्नाटकला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. येथे गुरबानीने मिथुनला टिपले (9-189). शेवटच्या एस. अरविंदसाठी जाळे टाकण्यात आले. उंचपुऱ्या अपूर्व वानखेडेला मुद्दाम पॉइंटवर उभे करण्यात आले आणि कर्णधार फैजने गुरबानीला चेंडू बाहेर टाकण्याचा इशारा केला आणि अरविंद नेमका या जाळ्यात अडकला. झेल घेतल्यावर अपूर्वने घेतलेली धाव ही उसेन बोल्टच्या शंभर मीटरपेक्षाही वेगवान होती. कारण अवघ्या पाच धावांनी विजय मिळवून विदर्भ संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता.  हेही वाचा : निर्णय चुकल्याने कसा हिरावला विदर्भाचा विजय   रजनीशची हॅट्‌ट्रीक व वाडकरचे शतक  इंदूरच्या होळकर स्टेडियमवर 29 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान खेळल्या गेलेला अंतिम सामना पाहण्यासाठी नागपुरातून व्हीसीए पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी इंदोरच्या दिशेने प्रयाण केले होते. संघ थेट कोलकाता येथून दाखल झाला. दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला असला तरी त्यांची भिस्त दोन-तीन खेळाडूंवरच होती, याची जाणीव प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि कर्णधार फैजला होती. त्यानुसार त्यांनी डावपेच आखले आणि आदित्य ठाकरे या युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिली. गुरबानीला थांबविणे तर अवघडच होते. पहिल्या डावात हॅट्‌ट्रीक घेताना केलेली गोलंदाजी त्याच्या क्षमतेची साक्ष देत होती. असे असताना भविष्यात त्याच्याऐवजी नवदीप सैन्नीला संधी मिळाली, हे दुर्दैव. यष्टिरक्षक अक्षय वाडकरचे शतक विदर्भाच्या विजेतेपदाच्या आनंदात आणखी भर टाकून गेले.  हेही वाचा : प्रेक्षकांनी 25 वर्षांपूर्वी अनुभवला होता नीरस सामन्यात रोमांच आणि तो ऐतिहासिक क्षण...  ऐतिहासिक विजयासाठी विदर्भाला केवळ 29 धावांची आवश्‍यकता होती. फैज व संजयनेच ही औपचारिकता पूर्ण करावी, अशी साऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, तसे घडले नाही. फैज लवकर बाद झाल्यानंतर जाफर व संजयने आवश्‍यक धावा काढून विजेतेपदाला गवसणी घातली. नववर्षाच्या आदल्याच दिवशी वैदर्भी खेळाडूंनी आपल्या चाहत्यांना अविस्मरणीय भेट दिली. तब्बल सहा दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर विदर्भाने रणजी करंडक जिंकून देशभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांसह खेळाडूंचे कुटुंबीय व असंख्य चाहते ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेत. त्या दिवशी साऱ्यांनीच भावनिक विजय थाटात "सेलिब्रेट' केला.    संक्षिप्त धावफलक ः दिल्ली पहिला डाव 295 (ध्रुव शोरी 145, हिम्मत सिंग 66, नितेश राणा 21, ऋषभ पंत 21, गौतम गंभीर 15, रजनीश गुरबानी 6-59, आदित्य ठाकरे 2-74), विदर्भ पहिला डाव 547 (फैज फजल 67, आर. संजय 31, वसीम जाफर 78, अपूर्व वानखेडे 28, अक्षय वाडकर 133, सिद्धेश नेरळ 74, आदित्य सरवटे 79, नवदीप सैन्नी 5-135, आकाश सुदान 2-102, के. खेजरोलिया 2-132), दिल्ली दुसरा डाव 280 (गौतम गंभीर 36, ध्रुव शोरी 62, नितेश राणा 64, ऋषभ पंत 32, विकास मिश्रा 34, अक्षय वखरे 4-95, आदित्य सरवटे 3-30, गुरबानी 2-92), विदर्भ दुसरा डाव 1 बाद 32 (फैज फजल 2, आर. संजय नाबाद 9, वसीम जाफर नाबाद 17, खेजरोलिया 1-21).    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ikUeWZ

No comments:

Post a Comment