Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, June 15, 2020

कोरोना: महाराष्ट्रापेक्षाही गुजरातमध्ये कोरोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक आहे का?
अभियांत्रिकी, वैद्यकीयच्या प्रवेशासाठी ‘सकाळ’चे पोर्टल

पुणे - अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे; पण त्यासाठी प्रवेश परीक्षांची तयारी झाली नसेल, तर काळजी करू नका. तुमच्याबरोबर ‘सकाळ’ आहे. आम्ही तुमची प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणार आहोत एका पोर्टलद्वारे. त्यामुळे काळजी सोडा आणि ‘सकाळ’च्या उपक्रमात सहभागी व्हा.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याने सर्वत्र लॉकडाउन आहे. शाळा, महाविद्यालये अगदी खासगी क्‍लासही बंद आहेत; पण अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा तोंडावर आल्या आहेत. यासाठी कुणाचे मार्गदर्शन घ्यायचे तरी ते विद्यार्थ्यांना शक्‍य नाही. तुमची ही चिंता दूर करण्यासाठी ‘सकाळ’ने एक पाऊल टाकले आहे. ‘सकाळ’ने बारावीची परीक्षा दिलेल्या आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे.

अजित पवारांच्या बैठकीकडे शहरातील सोसायट्यांचे लक्ष; का? वाचा सविस्तर!

विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या www.sakalntrance.com या पोर्टलवर विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी, जेईई-मेन्स, ॲडव्हान्स्ड, BITSAT आणि नीट या परीक्षांचे मॉक टेस्ट अत्यंत माफक दरात देता येतील. या मॉक टेस्टसाठी आयआयटीपी/एन्ट्रन्स मास्टर संस्था सकाळची पार्टनर आहे. लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांना क्‍लासेसला जाता येत नाही. परीक्षाही लांबल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये ‘सकाळ’चे पोर्टल विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे उपयोगी पडणार आहे.

प्रवेशाचा तपशील
पोर्टल : www.sakalntrance.com
कुणासाठी : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
काय करावे : सुरुवातीला पोर्टलवर जावे. तिथे नोंदणी करावी. नंतर आवश्‍यक टेस्ट सीरिज निवडावी. त्याचे शुल्क भरावे आणि टेस्ट सीरिज घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९९२२९१३५१०

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अभियांत्रिकी, वैद्यकीयच्या प्रवेशासाठी ‘सकाळ’चे पोर्टल पुणे - अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे; पण त्यासाठी प्रवेश परीक्षांची तयारी झाली नसेल, तर काळजी करू नका. तुमच्याबरोबर ‘सकाळ’ आहे. आम्ही तुमची प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणार आहोत एका पोर्टलद्वारे. त्यामुळे काळजी सोडा आणि ‘सकाळ’च्या उपक्रमात सहभागी व्हा. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याने सर्वत्र लॉकडाउन आहे. शाळा, महाविद्यालये अगदी खासगी क्‍लासही बंद आहेत; पण अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा तोंडावर आल्या आहेत. यासाठी कुणाचे मार्गदर्शन घ्यायचे तरी ते विद्यार्थ्यांना शक्‍य नाही. तुमची ही चिंता दूर करण्यासाठी ‘सकाळ’ने एक पाऊल टाकले आहे. ‘सकाळ’ने बारावीची परीक्षा दिलेल्या आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. अजित पवारांच्या बैठकीकडे शहरातील सोसायट्यांचे लक्ष; का? वाचा सविस्तर! विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या www.sakalntrance.com या पोर्टलवर विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी, जेईई-मेन्स, ॲडव्हान्स्ड, BITSAT आणि नीट या परीक्षांचे मॉक टेस्ट अत्यंत माफक दरात देता येतील. या मॉक टेस्टसाठी आयआयटीपी/एन्ट्रन्स मास्टर संस्था सकाळची पार्टनर आहे. लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांना क्‍लासेसला जाता येत नाही. परीक्षाही लांबल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये ‘सकाळ’चे पोर्टल विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे उपयोगी पडणार आहे. प्रवेशाचा तपशील पोर्टल : www.sakalntrance.com कुणासाठी : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय करावे : सुरुवातीला पोर्टलवर जावे. तिथे नोंदणी करावी. नंतर आवश्‍यक टेस्ट सीरिज निवडावी. त्याचे शुल्क भरावे आणि टेस्ट सीरिज घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क : ९९२२९१३५१० News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3d5iXuL
Read More
राज्यातील प्रॉपर्टी कार्ड एका क्‍लिकवर

पुणे - बनावट व चुकीच्या नोंदी टाळण्यासाठी आता ‘ई फेरफार’ पाठोपाठ ‘ई प्रॉपर्टी कार्ड’ (मिळकत पत्रिका) ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे ५६ लाख प्रॉपर्टी कार्ड येत्या दोन महिन्यात एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अकोला शहरात बनावट मिळकतपत्रिका तयार करून, एक भूखंड बळकाविल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यावरून विधानसभेतही गोंधळ झाला होता. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम्‌ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. त्यात राज्यातील मिळकतपत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने ऑनलाइन मिळकतपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश काढले आहेत.

सोशल मीडियावर वायरल होतोय सह्याद्रीचा अनोखा अवतार

राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने यापूर्वी ई-फेरफार हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यात दस्तनोंदणी झाल्यानंतर पंधरा दिवसात ऑनलाइनच्या माध्यमातून फेरफार आणि सातबारा उताऱ्यावर नोंदी घालण्यात येतात. त्या पाठोपाठ भूमी अभिलेख विभागाने दोन हजारांवर लोकसंख्या असलेल्या सुमारे चाळीस हजार वाड्या आणि गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ‘ई प्रॉपर्टी कार्ड इन्फर्मेशन सिस्टिम’ प्रणाली तयार केली आहे. यापूर्वी महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत प्रॉपर्टी कार्ड देण्यात आली आहे. त्यांची संख्या जवळपास ५६ लाख एवढी आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिल्या टप्प्यात ही सर्व प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर टप्याटप्प्याने तयार होणारे प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेचे फायदे -

राज्यातील ५६ लाख प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध 

खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अचूक माहिती मिळणार  

खोटे व्यवहार, चुकीच्या नोंदी घालण्यास अटकाव 

बनावट कागदपत्रे दाखवून होणारे व्यवहार थांबणार

दीर्घकाळ प्रॉपर्टी कार्ड जतन करणे शक्‍य होणार

मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा होणार

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील प्रॉपर्टी कार्ड एका क्‍लिकवर पुणे - बनावट व चुकीच्या नोंदी टाळण्यासाठी आता ‘ई फेरफार’ पाठोपाठ ‘ई प्रॉपर्टी कार्ड’ (मिळकत पत्रिका) ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे ५६ लाख प्रॉपर्टी कार्ड येत्या दोन महिन्यात एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अकोला शहरात बनावट मिळकतपत्रिका तयार करून, एक भूखंड बळकाविल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यावरून विधानसभेतही गोंधळ झाला होता. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम्‌ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. त्यात राज्यातील मिळकतपत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने ऑनलाइन मिळकतपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश काढले आहेत. सोशल मीडियावर वायरल होतोय सह्याद्रीचा अनोखा अवतार राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने यापूर्वी ई-फेरफार हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यात दस्तनोंदणी झाल्यानंतर पंधरा दिवसात ऑनलाइनच्या माध्यमातून फेरफार आणि सातबारा उताऱ्यावर नोंदी घालण्यात येतात. त्या पाठोपाठ भूमी अभिलेख विभागाने दोन हजारांवर लोकसंख्या असलेल्या सुमारे चाळीस हजार वाड्या आणि गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ‘ई प्रॉपर्टी कार्ड इन्फर्मेशन सिस्टिम’ प्रणाली तयार केली आहे. यापूर्वी महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत प्रॉपर्टी कार्ड देण्यात आली आहे. त्यांची संख्या जवळपास ५६ लाख एवढी आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पहिल्या टप्प्यात ही सर्व प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर टप्याटप्प्याने तयार होणारे प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचे फायदे - राज्यातील ५६ लाख प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध  खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अचूक माहिती मिळणार   खोटे व्यवहार, चुकीच्या नोंदी घालण्यास अटकाव  बनावट कागदपत्रे दाखवून होणारे व्यवहार थांबणार दीर्घकाळ प्रॉपर्टी कार्ड जतन करणे शक्‍य होणार मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा होणार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30MIypY
Read More
पुण्यातील पालिका रुग्णालयांत एवढ्या रुग्णांवर होत आहेत उपचार; वाचा सविस्तर

पुणे - शहरातील कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले ६९ टक्के रुग्ण महापालिकेची रुग्णालये आणि महापालिकेने विकसित केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्या खालोखाल २७ टक्के रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये, तर चार टक्के रुग्ण शहरातील सर्वांत मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या ससूनमध्ये दाखल आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला. गेल्या ९७ दिवसांमध्ये पुण्यात कोरोनोबाधित रुग्णांची संख्या आता दहा हजारांच्या टप्प्यावर पोचली आहे. आज कोरोनाचे २३४ रुग्ण नव्याने आढळले. तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला.

शहरात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नऊ हजार ८९० झाली. त्यापैकी सहा हजार ४४६ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर, ४५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात आजच्या दहा रुग्णांचा समावेश आहे. 

पुण्यात सध्या दोन हजार ९८६ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये आणि उपचार केंद्रांमध्ये दाखल आहेत. यात सर्वाधिक रुग्ण महापालिकेची रुग्णालये आणि महापालिकेने विकसित केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

News Story Feeds https://ift.tt/2Y3jadt

पुण्यातील पालिका रुग्णालयांत एवढ्या रुग्णांवर होत आहेत उपचार; वाचा सविस्तर पुणे - शहरातील कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले ६९ टक्के रुग्ण महापालिकेची रुग्णालये आणि महापालिकेने विकसित केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्या खालोखाल २७ टक्के रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये, तर चार टक्के रुग्ण शहरातील सर्वांत मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या ससूनमध्ये दाखल आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला. गेल्या ९७ दिवसांमध्ये पुण्यात कोरोनोबाधित रुग्णांची संख्या आता दहा हजारांच्या टप्प्यावर पोचली आहे. आज कोरोनाचे २३४ रुग्ण नव्याने आढळले. तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नऊ हजार ८९० झाली. त्यापैकी सहा हजार ४४६ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर, ४५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात आजच्या दहा रुग्णांचा समावेश आहे.  पुण्यात सध्या दोन हजार ९८६ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये आणि उपचार केंद्रांमध्ये दाखल आहेत. यात सर्वाधिक रुग्ण महापालिकेची रुग्णालये आणि महापालिकेने विकसित केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.  News Story Feeds https://ift.tt/2Y3jadt

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2zzPJ9A
Read More
भारतीय ३८ टक्के कंपन्या स्टार्टअप दोन महिन्यांत ‘लॉकडाउन’

नवी दिल्ली - कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाल्यानंतर फटका बसलेल्या भारतीय स्टार्टअप कंपन्यांची दोन महिन्यांत निधीच्या आघाडीवर पीछेहाट झाली. विनंती करूनही सरकारकडून विशिष्ट आर्थिक मदतीचे पॅकेजच न मिळाल्याने ३८ टक्के स्टार्टअपवर ही वेळ आली असून, त्यांच्याकडे निधीचा खडखडाट आहे. एका सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दृष्टिक्षेपात -

लोकल सर्कल्स या सामाजिक मंचाकडून सर्वेक्षण

बहुतांश लघुउद्योग आणि स्टार्टअप कधीही बाहेरून निधी उभा करू शकत नाहीत

रोख रकमेचा प्रवाह सुरू होण्यासाठी गुंतवणूकदार पुढाकार घेऊ शकत नाहीत

अशा परिस्थितीत रोखतेची समस्या आणखी गुंतागुंतीची

सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगांसाठी कर्ज मिळणे मोठी घडामोड

हेच स्टार्टअपना बॅंका कर्ज न देणे प्रतिकूल

आजघडीला नोकऱ्यांची संधी निर्माण करणे सर्वांत मोठी गरज असताना व स्टार्टअपमुळे ते साध्य होऊ शकत असताना सरकारने पाठिंबा न देणे गोंधळून टाकणारे

लॉकडाउनमध्ये मिळणाऱ्या निधीचा पुरवठा कोरोना साथीमुळे मंदावला

वाटाघाटी सुरू असलेले करार महिनाअखेर जाहीर होण्याची शक्‍यता

एप्रिल ते जून या तिमाहीतील निधी गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढण्याची शक्‍यता मात्र कमीच

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नित्याच्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना मार्केटिंग व मालाचे नमुने ग्राहकांपर्यंत नेण्यासाठी आमच्या स्टार्टअपचा उपयोग होतो. पण, लॉकडाउनपासून अजिबात उत्पन्न नाही. गेल्या डिसेंबरपासून आम्ही अ-मालिकापूर्व करारासाठी प्रयत्नशील होतो. पण, आता ते ठप्प झाले आहे. आमचे ग्राहक असलेल्या मोठ्या कंपन्यांनी नव्या उत्पादनांचे लाँचिंग पुढे ढकलले आहे. छोट्या कंपन्यांनी खर्चात कपात केली आहे. 
- निकुंज बुबना, ‘दीवोवबॉक्‍स’ कंपनीचे सहसंस्थापक

News Story Feeds https://ift.tt/3hwCjfF

भारतीय ३८ टक्के कंपन्या स्टार्टअप दोन महिन्यांत ‘लॉकडाउन’ नवी दिल्ली - कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाल्यानंतर फटका बसलेल्या भारतीय स्टार्टअप कंपन्यांची दोन महिन्यांत निधीच्या आघाडीवर पीछेहाट झाली. विनंती करूनही सरकारकडून विशिष्ट आर्थिक मदतीचे पॅकेजच न मिळाल्याने ३८ टक्के स्टार्टअपवर ही वेळ आली असून, त्यांच्याकडे निधीचा खडखडाट आहे. एका सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दृष्टिक्षेपात - लोकल सर्कल्स या सामाजिक मंचाकडून सर्वेक्षण बहुतांश लघुउद्योग आणि स्टार्टअप कधीही बाहेरून निधी उभा करू शकत नाहीत रोख रकमेचा प्रवाह सुरू होण्यासाठी गुंतवणूकदार पुढाकार घेऊ शकत नाहीत अशा परिस्थितीत रोखतेची समस्या आणखी गुंतागुंतीची सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगांसाठी कर्ज मिळणे मोठी घडामोड हेच स्टार्टअपना बॅंका कर्ज न देणे प्रतिकूल आजघडीला नोकऱ्यांची संधी निर्माण करणे सर्वांत मोठी गरज असताना व स्टार्टअपमुळे ते साध्य होऊ शकत असताना सरकारने पाठिंबा न देणे गोंधळून टाकणारे लॉकडाउनमध्ये मिळणाऱ्या निधीचा पुरवठा कोरोना साथीमुळे मंदावला वाटाघाटी सुरू असलेले करार महिनाअखेर जाहीर होण्याची शक्‍यता एप्रिल ते जून या तिमाहीतील निधी गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढण्याची शक्‍यता मात्र कमीच - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा नित्याच्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना मार्केटिंग व मालाचे नमुने ग्राहकांपर्यंत नेण्यासाठी आमच्या स्टार्टअपचा उपयोग होतो. पण, लॉकडाउनपासून अजिबात उत्पन्न नाही. गेल्या डिसेंबरपासून आम्ही अ-मालिकापूर्व करारासाठी प्रयत्नशील होतो. पण, आता ते ठप्प झाले आहे. आमचे ग्राहक असलेल्या मोठ्या कंपन्यांनी नव्या उत्पादनांचे लाँचिंग पुढे ढकलले आहे. छोट्या कंपन्यांनी खर्चात कपात केली आहे.  - निकुंज बुबना, ‘दीवोवबॉक्‍स’ कंपनीचे सहसंस्थापक News Story Feeds https://ift.tt/3hwCjfF

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37zMfkc
Read More
चक्रीवादळ । नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

चक्रीवादळ । नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

June 15, 2020 0 Comments
रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.   from Zee24...
Read More
उपेक्षेच्या ‘अनलॉक’ची घरेलू कामगारांना अपेक्षा

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने १६ जून २०११ रोजी घरेलू कामगारांसाठी ठराव मंजूर केला. घरेलू कामगारांना उद्योगांमधील कामगारांच्या धर्तीवर वेतन आणि अन्य फायदे मिळतील, असे ठरावात म्हटले आहे. तेव्हापासून १६ जून हा जागतिक घरेलू कामगार दिवस मानला जातो. भारताने ठराव स्वीकारला; पण अंमलबजावणीसाठी पावले उचललेली नाहीत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा शिरकाव भारतात पर्यायाने आपल्या परिसरात झाला आणि लॉकडाउन आले. सगळेच आपापल्या घरात अडकून पडले. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था आणि नोकऱ्यांची परिस्थिती गंभीर होऊ लागली. याचा आणि एकूण परिस्थितीचा सगळ्यात आधी आणि थेट फटका बसला तो घरेलू कामगारांना.

शहरीकरणाचा आधारच उपेक्षित
घरकामातील मदतनीस, स्वयंपाकी, ड्रायव्हर, गाड्या धुणारे, बागकाम करणारे आदींचा समावेश घरेलू कामगारांमध्ये येतो. पुण्यात सुमारे २.५ लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ८० हजार घरेलू कामगार आहेत. त्यांना तुटपुंजा मोबदला मिळतो. त्यामुळे पुरेसे पैसे कमविण्यासाठी त्यांना एकापेक्षा अधिक ठिकाणी काम करावे लागते. कामावर पोहोचण्याची जागा घरापासून फार दूर असेल तर परवडत नाही. त्यामुळे आलिशान वस्त्यांच्या जवळपास दाटीच्या वस्त्या या कामगारांच्या निवासाची सोय करतात.
शहरीकरणाचा वेग आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, तो झपाट्याने वाढत आहे.

अकुशल मजुरांच्या लोंढ्यासोबतच नोकरदार सुशिक्षित वर्गही पुणे-मुंबईसारख्या शहरात स्थिरावतोय. शहरीकरणाच्या या चक्रात नोकरदार कुटुंबांना घरेलू कामगार आधार ठरतात. तरीही त्यांची नोंद प्रशासकीय पातळीवर होत नाही. कारण, या घटकाकडून कोणत्याही प्रकारचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा होत नाही. परिणामी, लोकप्रतिनिधीही त्याची नोंद घेत नाहीत, हे वास्तव आहे.

वाढतेय ‘सामाजिक’ अंतर
कोरोनामुळे शारीरिक अंतर वाढविणे भाग आहे. पण, घरेलू कामगारांना कामाची संधी नाकारून सामाजिक अंतरही वाढताना दिसतेय. कोरोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दाट वस्तीच्या भागात झाला. बहुतांश घरेलू कामगार तेथे राहतात. तेच परवडते त्यांना. साहजिकच, अनेक ठिकाणी कोरोना आणि लॉकडाउननंतर त्यांना कामावर काय; पण सोसायटीच्या परिसरातही मज्जाव केला गेला. सरकारी अनलॉक सुरू झाल्यानंतरही अनेक ठिकाणी ही उपेक्षा कायम आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने या कामगारांना कामावर जाता येईल, सोसायट्यांनी त्यांचे स्वतःचे नियम त्यांच्यावर लादू नयेत, असे आवाहन वारंवार करूनही अनेक सोसायट्या त्यांची भूमिका बदलण्यास तयार नाहीत.

यावर पुणे शहर मोलकरीण संघटनेच्या मेधा थत्ते म्हणतात, ‘कष्टकरी महिलांना काही प्रमाणात सोसायट्यांची प्रवेशद्वारे आता उघड होऊ लागली आहेत. मात्र, अजूनही दोन-तीन किलोमीटरच्या पुढे त्यांना कामावर जाता येत नाही. त्यांना पीएमपीच्या बसमध्ये प्रवेश दिला पाहिजे. घरेलू कामगार मंडळानेही या महिलांपर्यंत पोचणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही.’

महामंडळ कागदावरच
घरेलू कामगार आणि त्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन संघटनांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑगस्ट २०११ मध्ये महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली. मंडळाला आर्थिक पाठबळही दिले. मंडळावर सरकारतर्फे सहा सदस्य, तर उद्योगांमधून सहा प्रतिनिधी नियुक्त केले. घरेलू कामगारांची नोंदणी जिल्हास्तरावर करण्याची मोहीम सुरू झाली. पहिल्या टप्प्यात सुमारे ४ लाख ५० हजार महिलांची नोंदणी झाली. त्यात ९० हजार महिला पुण्यातील होत्या. २०१४ मध्ये सत्तांतर झाले. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीचे सदस्य काढून महामंडळाची सूत्रे कामगार कल्याण आयुक्तांकडे सोपविली. हळूहळू महामंडळाचा आर्थिक टेकूही कमी झाला आणि हे महामंडळ कागदावरच उरले.

घरेलू कामगार कल्याण महामंडळाचे माजी सदस्य सुनील शिंदे म्हणतात, ‘‘कोरोनाच्या काळात घरेलू कामगार महामंडळ पूर्वीसारखे कार्यान्वित करण्याची गरज अधोरेखित झाली. आपत्तीतही या घटकाकडे दुर्लक्ष केले गेले. शहरीकरणाचा अविभाज्य भाग असूनही या घटकाला सन्मान नाही. त्यामुळे आम्हालाच पदरमोड करून अन्नधान्याचे किट त्यांच्यापर्यंत पोचवावे लागले.’

आपत्तीमध्येही घरेलू कामगार उपेक्षितच 
कोरोना आपत्तीच्या काळात केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. तळागाळातील; पण महत्त्वाचा घटक असलेल्या घरेलू कामगारांसाठी कोणतीही उपाययोजना त्यात नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांनाही विसरच पडला. त्यामुळे आपत्ती काळात भूतदयेवरच हा घटक टिकला आहे. या एकूण परिस्थितीवर पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या किरण मोघे नाराजी व्यक्त करताना म्हणाल्या, ‘आर्थिक पॅकेज देताना सरकारने केवळ उद्योगांकडे लक्ष दिले, याचे वाईट वाटते.’

कामासाठी पूरक वातावरणही द्या
कोरोनानंतर कामाच्या पद्धतीत बदल होत आहेत. त्यामुळे घरेलू कामगारांना कामाची संधी नाकारण्यापेक्षा त्यांना पूरक वातावरण निर्माण करून देणे ही समाजाची जबाबदारी आहे. पुरेसे उत्पन्न एकाच ठिकाणी मिळण्यासाठी आणि कामाचा मोबदला मिळवून देण्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यांना काम आणि कामाचा मोबदला हवाय. त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी पुढाकार घेऊयात.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

उपेक्षेच्या ‘अनलॉक’ची घरेलू कामगारांना अपेक्षा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने १६ जून २०११ रोजी घरेलू कामगारांसाठी ठराव मंजूर केला. घरेलू कामगारांना उद्योगांमधील कामगारांच्या धर्तीवर वेतन आणि अन्य फायदे मिळतील, असे ठरावात म्हटले आहे. तेव्हापासून १६ जून हा जागतिक घरेलू कामगार दिवस मानला जातो. भारताने ठराव स्वीकारला; पण अंमलबजावणीसाठी पावले उचललेली नाहीत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाचा शिरकाव भारतात पर्यायाने आपल्या परिसरात झाला आणि लॉकडाउन आले. सगळेच आपापल्या घरात अडकून पडले. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था आणि नोकऱ्यांची परिस्थिती गंभीर होऊ लागली. याचा आणि एकूण परिस्थितीचा सगळ्यात आधी आणि थेट फटका बसला तो घरेलू कामगारांना. शहरीकरणाचा आधारच उपेक्षित घरकामातील मदतनीस, स्वयंपाकी, ड्रायव्हर, गाड्या धुणारे, बागकाम करणारे आदींचा समावेश घरेलू कामगारांमध्ये येतो. पुण्यात सुमारे २.५ लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ८० हजार घरेलू कामगार आहेत. त्यांना तुटपुंजा मोबदला मिळतो. त्यामुळे पुरेसे पैसे कमविण्यासाठी त्यांना एकापेक्षा अधिक ठिकाणी काम करावे लागते. कामावर पोहोचण्याची जागा घरापासून फार दूर असेल तर परवडत नाही. त्यामुळे आलिशान वस्त्यांच्या जवळपास दाटीच्या वस्त्या या कामगारांच्या निवासाची सोय करतात. शहरीकरणाचा वेग आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, तो झपाट्याने वाढत आहे. अकुशल मजुरांच्या लोंढ्यासोबतच नोकरदार सुशिक्षित वर्गही पुणे-मुंबईसारख्या शहरात स्थिरावतोय. शहरीकरणाच्या या चक्रात नोकरदार कुटुंबांना घरेलू कामगार आधार ठरतात. तरीही त्यांची नोंद प्रशासकीय पातळीवर होत नाही. कारण, या घटकाकडून कोणत्याही प्रकारचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा होत नाही. परिणामी, लोकप्रतिनिधीही त्याची नोंद घेत नाहीत, हे वास्तव आहे. वाढतेय ‘सामाजिक’ अंतर कोरोनामुळे शारीरिक अंतर वाढविणे भाग आहे. पण, घरेलू कामगारांना कामाची संधी नाकारून सामाजिक अंतरही वाढताना दिसतेय. कोरोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दाट वस्तीच्या भागात झाला. बहुतांश घरेलू कामगार तेथे राहतात. तेच परवडते त्यांना. साहजिकच, अनेक ठिकाणी कोरोना आणि लॉकडाउननंतर त्यांना कामावर काय; पण सोसायटीच्या परिसरातही मज्जाव केला गेला. सरकारी अनलॉक सुरू झाल्यानंतरही अनेक ठिकाणी ही उपेक्षा कायम आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने या कामगारांना कामावर जाता येईल, सोसायट्यांनी त्यांचे स्वतःचे नियम त्यांच्यावर लादू नयेत, असे आवाहन वारंवार करूनही अनेक सोसायट्या त्यांची भूमिका बदलण्यास तयार नाहीत. यावर पुणे शहर मोलकरीण संघटनेच्या मेधा थत्ते म्हणतात, ‘कष्टकरी महिलांना काही प्रमाणात सोसायट्यांची प्रवेशद्वारे आता उघड होऊ लागली आहेत. मात्र, अजूनही दोन-तीन किलोमीटरच्या पुढे त्यांना कामावर जाता येत नाही. त्यांना पीएमपीच्या बसमध्ये प्रवेश दिला पाहिजे. घरेलू कामगार मंडळानेही या महिलांपर्यंत पोचणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही.’ महामंडळ कागदावरच घरेलू कामगार आणि त्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन संघटनांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑगस्ट २०११ मध्ये महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली. मंडळाला आर्थिक पाठबळही दिले. मंडळावर सरकारतर्फे सहा सदस्य, तर उद्योगांमधून सहा प्रतिनिधी नियुक्त केले. घरेलू कामगारांची नोंदणी जिल्हास्तरावर करण्याची मोहीम सुरू झाली. पहिल्या टप्प्यात सुमारे ४ लाख ५० हजार महिलांची नोंदणी झाली. त्यात ९० हजार महिला पुण्यातील होत्या. २०१४ मध्ये सत्तांतर झाले. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीचे सदस्य काढून महामंडळाची सूत्रे कामगार कल्याण आयुक्तांकडे सोपविली. हळूहळू महामंडळाचा आर्थिक टेकूही कमी झाला आणि हे महामंडळ कागदावरच उरले. घरेलू कामगार कल्याण महामंडळाचे माजी सदस्य सुनील शिंदे म्हणतात, ‘‘कोरोनाच्या काळात घरेलू कामगार महामंडळ पूर्वीसारखे कार्यान्वित करण्याची गरज अधोरेखित झाली. आपत्तीतही या घटकाकडे दुर्लक्ष केले गेले. शहरीकरणाचा अविभाज्य भाग असूनही या घटकाला सन्मान नाही. त्यामुळे आम्हालाच पदरमोड करून अन्नधान्याचे किट त्यांच्यापर्यंत पोचवावे लागले.’ आपत्तीमध्येही घरेलू कामगार उपेक्षितच  कोरोना आपत्तीच्या काळात केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. तळागाळातील; पण महत्त्वाचा घटक असलेल्या घरेलू कामगारांसाठी कोणतीही उपाययोजना त्यात नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांनाही विसरच पडला. त्यामुळे आपत्ती काळात भूतदयेवरच हा घटक टिकला आहे. या एकूण परिस्थितीवर पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या किरण मोघे नाराजी व्यक्त करताना म्हणाल्या, ‘आर्थिक पॅकेज देताना सरकारने केवळ उद्योगांकडे लक्ष दिले, याचे वाईट वाटते.’ कामासाठी पूरक वातावरणही द्या कोरोनानंतर कामाच्या पद्धतीत बदल होत आहेत. त्यामुळे घरेलू कामगारांना कामाची संधी नाकारण्यापेक्षा त्यांना पूरक वातावरण निर्माण करून देणे ही समाजाची जबाबदारी आहे. पुरेसे उत्पन्न एकाच ठिकाणी मिळण्यासाठी आणि कामाचा मोबदला मिळवून देण्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यांना काम आणि कामाचा मोबदला हवाय. त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी पुढाकार घेऊयात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ADRjrA
Read More
बीजिंगमधील निर्बंध वाढले

बीजिंग - कोरोना रुग्णांच्या संख्येत सोमवारी आणखी भर पडल्यामुळे बीजिंगमधील आणखी दहा विभागांत लॉकडाउन लागू करण्यात आले. सोमवारी चीनमध्ये सापडलेल्या ४९ नव्या रुग्णांत बीजिंगमधील आकडा ३६ होता. त्यामुळे संबंधित ठिकाणी वाहतूक आणि नागरिकांवर निर्बंध आणले आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बीजिंग महापालिकेचे अधिकारी ली जुनजीए यांनी सांगितले की, वायव्येकडील हैडियन जिल्ह्यातील युक्वानडाँग या घाऊक बाजारपेठेत नवे रुग्ण आढळले. ही बाजारपेठ बंद करण्यात आली असून जवळच्या शाळाही बंद केल्या जातील. दहा निवासी विभागांमधील नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. तेथील नागरिकांचा नेमका आकडा काही हजार असेल. याआधी झिनफादी या बाजारपेठेत रुग्ण मिळाले होते. त्यानंतर सामूहिक चाचण्या सुरू करण्यात आल्या. बाजारपेठेतील कामगार, तेथे गेलेले तसेच परिसरातील लोकांच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. आज सकाळी स्थानिक स्टेडियमवर चाचण्यांसाठी लोकांनी रांग लावली होती. त्या वेळी पूर्ण संरक्षक पोशाख घातलेले लोक तेथे बंदोबस्तावर होते. दोन बाजारपेठा बंद करण्यात आल्यामुळे शहरातील अन्न पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

'ते' शब्द मनाला वेदनादायक वाटायचे; ब्रिटन अर्थमंत्र्यांची दाहक प्रतिक्रिया

बाजारपेठेतील दूषित अन्न किंवा मांस किंवा तेथे गेलेली व्यक्ती किंवा तेथील कामगार यांच्यामुळे नवे रुग्ण सापडत असावेत. आयात केलेला साल्मन मासा कापण्यासाठी वापरण्यात आलेल्या फळ्यांवरही विषाणूचे नमुने सापडले आहेत.
- वू झूनयु, चीनचे प्रमुख साथरोगतज्ज्ञ

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बीजिंगमधील निर्बंध वाढले बीजिंग - कोरोना रुग्णांच्या संख्येत सोमवारी आणखी भर पडल्यामुळे बीजिंगमधील आणखी दहा विभागांत लॉकडाउन लागू करण्यात आले. सोमवारी चीनमध्ये सापडलेल्या ४९ नव्या रुग्णांत बीजिंगमधील आकडा ३६ होता. त्यामुळे संबंधित ठिकाणी वाहतूक आणि नागरिकांवर निर्बंध आणले आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बीजिंग महापालिकेचे अधिकारी ली जुनजीए यांनी सांगितले की, वायव्येकडील हैडियन जिल्ह्यातील युक्वानडाँग या घाऊक बाजारपेठेत नवे रुग्ण आढळले. ही बाजारपेठ बंद करण्यात आली असून जवळच्या शाळाही बंद केल्या जातील. दहा निवासी विभागांमधील नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. तेथील नागरिकांचा नेमका आकडा काही हजार असेल. याआधी झिनफादी या बाजारपेठेत रुग्ण मिळाले होते. त्यानंतर सामूहिक चाचण्या सुरू करण्यात आल्या. बाजारपेठेतील कामगार, तेथे गेलेले तसेच परिसरातील लोकांच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. आज सकाळी स्थानिक स्टेडियमवर चाचण्यांसाठी लोकांनी रांग लावली होती. त्या वेळी पूर्ण संरक्षक पोशाख घातलेले लोक तेथे बंदोबस्तावर होते. दोन बाजारपेठा बंद करण्यात आल्यामुळे शहरातील अन्न पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. 'ते' शब्द मनाला वेदनादायक वाटायचे; ब्रिटन अर्थमंत्र्यांची दाहक प्रतिक्रिया बाजारपेठेतील दूषित अन्न किंवा मांस किंवा तेथे गेलेली व्यक्ती किंवा तेथील कामगार यांच्यामुळे नवे रुग्ण सापडत असावेत. आयात केलेला साल्मन मासा कापण्यासाठी वापरण्यात आलेल्या फळ्यांवरही विषाणूचे नमुने सापडले आहेत. - वू झूनयु, चीनचे प्रमुख साथरोगतज्ज्ञ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Y3aVy3
Read More
Video : माझा फिटनेस : स्वच्छंदी राहा, आनंदी जगा

‘वेलनेस’ सुदृढ आयुष्य, मानसिक स्वास्थ्य, आनंदी आणि मजबूत जीवनाची गुरुकिल्ली आहे. दररोज जिम, योगा आणि इतर कोणताही व्यायामप्रकार करून रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आरोग्य उत्तम राखण्यासाठी आनंदी असणे गरजेचे आहे. आपण दिवसभर विविध क्षेत्रांत कार्यरत असताना थकतो, तेव्हा तणावमुक्त राहणे गरजेचे असते.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

थोडक्यात, कुटुंबासोबत सकाळी रपेट मारायला जाणे, वीकएण्डला पिकनिक प्लॅन करून फिरायला जाणे, एखादा छंद जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी काही वेळ खर्च करा. नेहमी सकारात्मक आणि ऊर्जा देणाऱ्या व्यक्तींच्या सान्निध्यात राहा. या सर्व गोष्टी आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात. ‘स्वच्छंदी राहा, आनंदाने जगा’ हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझा आहार खूप साधारण आणि अस्सल महाराष्ट्रीय, समतोल असतो. त्यामुळे माझ्या शरीराला पोषक अन्नघटक मिळतात. ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी किंवा पोळी, वरणभात, भाजी तसेच प्रोटीनयुक्त पदार्थ आणि जेवणामध्ये रोज सॅलड असणे आवश्यक आहे. मी अतितिखट किंवा अतितेलकट गोष्टी टाळतो. दिवसातून तीन-चार लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. तेही वजन आणि वयावर अवलंबून आहे. तरीही दिवसातून किमान २ लिटर पाणी प्यायल्याने वजन कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. आहारात नियमित फळे खाल्ल्याने आपल्याला चांगल्या प्रमाणात फायबर, पोषक जीवनसत्वे मिळतात. 

मी आठवड्यातून दोन दिवस योगा, प्राणायाम व तीन दिवस जिममध्ये व्यायाम करतो. शनिवार-रविवार सोसायटीमधल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळतो. मानसिक आरोग्यासाठी कमीत कमी १० मिनिटे दररोज मेडिटेशन करतो. त्याशिवाय शांत राहणे, आवडते गाणे ऐकणे, टेन्शन न घेणे, त्याचबरोबर आयुष्य  मजेत आणि बिनधास्त जगणे हा माझा मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्याचा उपाय आहे. फिटनेस आणि वेलनेसच्या बाबतीत माझे वडील माझे आदर्श आहेत. योगा आणि प्राणायामाच्या बाबतीत रामदेवबाबा माझे गुरू आहेत.  
(शब्दांकन - अरुण सुर्वे)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : माझा फिटनेस : स्वच्छंदी राहा, आनंदी जगा ‘वेलनेस’ सुदृढ आयुष्य, मानसिक स्वास्थ्य, आनंदी आणि मजबूत जीवनाची गुरुकिल्ली आहे. दररोज जिम, योगा आणि इतर कोणताही व्यायामप्रकार करून रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आरोग्य उत्तम राखण्यासाठी आनंदी असणे गरजेचे आहे. आपण दिवसभर विविध क्षेत्रांत कार्यरत असताना थकतो, तेव्हा तणावमुक्त राहणे गरजेचे असते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप थोडक्यात, कुटुंबासोबत सकाळी रपेट मारायला जाणे, वीकएण्डला पिकनिक प्लॅन करून फिरायला जाणे, एखादा छंद जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी काही वेळ खर्च करा. नेहमी सकारात्मक आणि ऊर्जा देणाऱ्या व्यक्तींच्या सान्निध्यात राहा. या सर्व गोष्टी आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात. ‘स्वच्छंदी राहा, आनंदाने जगा’ हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.   पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा माझा आहार खूप साधारण आणि अस्सल महाराष्ट्रीय, समतोल असतो. त्यामुळे माझ्या शरीराला पोषक अन्नघटक मिळतात. ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी किंवा पोळी, वरणभात, भाजी तसेच प्रोटीनयुक्त पदार्थ आणि जेवणामध्ये रोज सॅलड असणे आवश्यक आहे. मी अतितिखट किंवा अतितेलकट गोष्टी टाळतो. दिवसातून तीन-चार लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. तेही वजन आणि वयावर अवलंबून आहे. तरीही दिवसातून किमान २ लिटर पाणी प्यायल्याने वजन कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. आहारात नियमित फळे खाल्ल्याने आपल्याला चांगल्या प्रमाणात फायबर, पोषक जीवनसत्वे मिळतात.  मी आठवड्यातून दोन दिवस योगा, प्राणायाम व तीन दिवस जिममध्ये व्यायाम करतो. शनिवार-रविवार सोसायटीमधल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळतो. मानसिक आरोग्यासाठी कमीत कमी १० मिनिटे दररोज मेडिटेशन करतो. त्याशिवाय शांत राहणे, आवडते गाणे ऐकणे, टेन्शन न घेणे, त्याचबरोबर आयुष्य  मजेत आणि बिनधास्त जगणे हा माझा मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्याचा उपाय आहे. फिटनेस आणि वेलनेसच्या बाबतीत माझे वडील माझे आदर्श आहेत. योगा आणि प्राणायामाच्या बाबतीत रामदेवबाबा माझे गुरू आहेत.   (शब्दांकन - अरुण सुर्वे) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Bbe0mO
Read More
'ऑनलाइन'ची अवस्था ना तळ्यात, ना मळ्यात

पुणे - सावित्रीबाई फुले विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासंदर्भात महाविद्यालयांना फर्मान सोडले असले तरी या शिक्षणाची अवस्था ‘ना तळ्यात, ना मळ्यात’ अशीच आहे. यासाठी आवश्‍यक असलेल्या ‘ई कंटेट’चा तुटवडा असून, प्राध्यापकांनाही याबाबत कसलेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही, त्यामुळे ऑगस्टपासून ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे आव्हान महाविद्यालयांसमोर आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा प्रभाव पुढील काही महिने असणार आहे. याचा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात परिपत्रक काढून शैक्षणिक आराखडा तयार करण्याच्या सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत. यामध्ये १ सप्टेंबरपासून प्रथम वर्षाचे, तर १ ऑगस्टपासून इतर वर्षांचे ऑनलाइन व ऑफलाइन वर्ग सुरू करण्याबाबत सांगण्यात आले आहे. 

अजित पवारांच्या बैठकीकडे शहरातील सोसायट्यांचे लक्ष; का? वाचा सविस्तर!

शहरी भागातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन शिक्षणासाठी काही प्रमाणात पायाभूत सुविधा आहेत; पण ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव आहे. अनेक विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांना पगार नसल्याने ते कामावर नसल्याने अडचण येत आहे. यातून मार्ग काढण्याचे आव्हान संस्थांसमोर आहे. 

- कॉंग्रेसच्या 'या' नेत्याला विधान परिषदेवर घ्या; कार्यकर्त्यांची मागणी!

महाविद्यालयांची एकूण संख्या 
९६८ - पुणे विद्यापीठाशी संलग्न 
३४६ - कला, वाणिज्य, विज्ञान 
१०९ - अभियांत्रिकी 
५१३ - इतर
६.९२ लाख विद्यार्थी संख्या

- अंत्यविधीसाठी करू नका धावपळ; 'मोक्ष सेवा' मिळणार एका कॉलवर!

‘ई कंटेंट’ कसा तयार करावा, याचे प्रशिक्षण महाविद्यालयांना देणे गरजेचे आहे. यासाठी आवश्‍यक असलेल्या पायाभूत सुविधा महाविद्यालयात निर्माण करण्यासाठी विद्यापीठाकडे अनुदानाची मागणी केली जाणार आहे. द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदलल्याने त्यावर कार्यशाळा घेणे गरजेचे आहे.
- डॉ. संजय चाकणे, प्राचार्य, इंदापूर महाविद्यालय

विद्यापीठाने अद्याप निकाल जाहीर केलेले नाहीत. निकाल लागल्यानंतर ऑनलाइन शिक्षणासाठीची प्रक्रिया सुरू होईल. तसेच विनाअनुदानित महाविद्यालय असल्याने आता प्राध्यापकही उपलब्ध नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन असल्याने ‘झूम’सह इतर माध्यमाद्वारे शिक्षण दिले जाईल.
-डॉ. सुनील पवार, प्राचार्य, रत्नाई महाविद्यालय, राजगुरुनगर

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र स्टुडंट युनियनने (मासू) सर्वेक्षण केले होते. त्यात ३२ हजार मुलांनी सहभाग घेतला होता. त्यात ऑनलाइन समजत नसल्याचे ७२.९ टक्के मुलांनी सांगितले होते. ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने सुविधा दिल्या पाहिजेत. केवळ परिपत्रक काढून जबाबदारी संपणार नाही.
- सिद्धार्थ तेजाळे, विभागप्रमुख, ‘मासू’

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'ऑनलाइन'ची अवस्था ना तळ्यात, ना मळ्यात पुणे - सावित्रीबाई फुले विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासंदर्भात महाविद्यालयांना फर्मान सोडले असले तरी या शिक्षणाची अवस्था ‘ना तळ्यात, ना मळ्यात’ अशीच आहे. यासाठी आवश्‍यक असलेल्या ‘ई कंटेट’चा तुटवडा असून, प्राध्यापकांनाही याबाबत कसलेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही, त्यामुळे ऑगस्टपासून ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे आव्हान महाविद्यालयांसमोर आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाचा प्रभाव पुढील काही महिने असणार आहे. याचा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात परिपत्रक काढून शैक्षणिक आराखडा तयार करण्याच्या सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत. यामध्ये १ सप्टेंबरपासून प्रथम वर्षाचे, तर १ ऑगस्टपासून इतर वर्षांचे ऑनलाइन व ऑफलाइन वर्ग सुरू करण्याबाबत सांगण्यात आले आहे.  अजित पवारांच्या बैठकीकडे शहरातील सोसायट्यांचे लक्ष; का? वाचा सविस्तर! शहरी भागातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन शिक्षणासाठी काही प्रमाणात पायाभूत सुविधा आहेत; पण ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव आहे. अनेक विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांना पगार नसल्याने ते कामावर नसल्याने अडचण येत आहे. यातून मार्ग काढण्याचे आव्हान संस्थांसमोर आहे.  - कॉंग्रेसच्या 'या' नेत्याला विधान परिषदेवर घ्या; कार्यकर्त्यांची मागणी! महाविद्यालयांची एकूण संख्या  ९६८ - पुणे विद्यापीठाशी संलग्न  ३४६ - कला, वाणिज्य, विज्ञान  १०९ - अभियांत्रिकी  ५१३ - इतर ६.९२ लाख विद्यार्थी संख्या - अंत्यविधीसाठी करू नका धावपळ; 'मोक्ष सेवा' मिळणार एका कॉलवर! ‘ई कंटेंट’ कसा तयार करावा, याचे प्रशिक्षण महाविद्यालयांना देणे गरजेचे आहे. यासाठी आवश्‍यक असलेल्या पायाभूत सुविधा महाविद्यालयात निर्माण करण्यासाठी विद्यापीठाकडे अनुदानाची मागणी केली जाणार आहे. द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदलल्याने त्यावर कार्यशाळा घेणे गरजेचे आहे. - डॉ. संजय चाकणे, प्राचार्य, इंदापूर महाविद्यालय विद्यापीठाने अद्याप निकाल जाहीर केलेले नाहीत. निकाल लागल्यानंतर ऑनलाइन शिक्षणासाठीची प्रक्रिया सुरू होईल. तसेच विनाअनुदानित महाविद्यालय असल्याने आता प्राध्यापकही उपलब्ध नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन असल्याने ‘झूम’सह इतर माध्यमाद्वारे शिक्षण दिले जाईल. -डॉ. सुनील पवार, प्राचार्य, रत्नाई महाविद्यालय, राजगुरुनगर अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र स्टुडंट युनियनने (मासू) सर्वेक्षण केले होते. त्यात ३२ हजार मुलांनी सहभाग घेतला होता. त्यात ऑनलाइन समजत नसल्याचे ७२.९ टक्के मुलांनी सांगितले होते. ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने सुविधा दिल्या पाहिजेत. केवळ परिपत्रक काढून जबाबदारी संपणार नाही. - सिद्धार्थ तेजाळे, विभागप्रमुख, ‘मासू’ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2C2eBYn
Read More

Sunday, June 14, 2020

सुशांत सिंह राजपूतच्या 50 स्वप्नांची डायरी : काही स्वप्नं राहिली कायमचीच अधुरी...
जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात करत होते हे अवैध काम अन् गुलाबी पाण्याजवळच...

लोणार (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण भारतातील अभयारण्ये बंद आहे. काल मेहकर वनपरिक्षेत्रातील अकोला वन्यजीव विभागातील कर्मचारी गस्ती करीत असताना अवैध मार्गाने सरोवर परिसरात घुसखोरी करून तिथे मद्यपान करताना तिघांना अटक करण्यात आली.

या संदर्भात अधिक माहिती देताना अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी सांगितले की, लोणार अभयारण्य संरक्षित क्षेत्र आहे. या अभयारण्यात जगप्रसिद्ध लोणार सरोवर असून, त्याचे व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी अकोला वन्यजीव विभागकडे आहे. करोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे. 

महत्त्वाची बातमी - लहान भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकली अन् मोठ्यानेही सोडला प्राण

तसेच गेल्या काही दिवसांपासून या सरोवरातील पाणी गुलाबी रंगाचे झाल्यामुळे या भागात कोणी विना परवानगी येवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त असताना (ता.13) मेहकर वनपरिक्षेत्रातील लोणार सरोवरात गस्ती दरम्यान वासुदेव तुळशीराम सुरडकर रा. अवरा, योगेश वसंतराव सोनाग्रे रा. अटाळी, सोपान राजाराम थोरात रा. अटाळी हे तिघे झाडांमध्ये लपून मद्यपान करताना आढळले. या आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे 27 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास सुरू आहे.

मेहकर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की, कोणी ही या लोणार अभयारण्यामध्ये विना परवानगी प्रवेश करू नये, असे करणे गुन्हा आहे. सध्या या तलावातील गुलाबी पाणी मिळविण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करून राहीले आहे, या पाण्याचे सॅम्पल घेण्यासाठी अकोला वन्यजीव विभागाची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे, कोणीही विनापरवानगी हे पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये तसे करणे कायद्याने गुन्हा तसेच धोकादायक आहे.

कारण या परिसरात बिबट आपल्या पिल्लांसह वावरतो आहे, त्यामुळे तो हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अभयारण्यातील सर्व परिसरात ई सर्विलन्स कॅमेरे लावण्यात आले आहे व या कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाते आहे. तरी लोणार सरोवरातील पाणी व अभयारण्याचे संरक्षण करण्यास स्थानिक लोकांनी सहकार्य करावे. मेहकर वनपरिक्षेत्रातील वनपाल नप्ते, वनरक्षक माने, शिंदे व सरकटे यांनी ही कारवाई केली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात करत होते हे अवैध काम अन् गुलाबी पाण्याजवळच... लोणार (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण भारतातील अभयारण्ये बंद आहे. काल मेहकर वनपरिक्षेत्रातील अकोला वन्यजीव विभागातील कर्मचारी गस्ती करीत असताना अवैध मार्गाने सरोवर परिसरात घुसखोरी करून तिथे मद्यपान करताना तिघांना अटक करण्यात आली. या संदर्भात अधिक माहिती देताना अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी सांगितले की, लोणार अभयारण्य संरक्षित क्षेत्र आहे. या अभयारण्यात जगप्रसिद्ध लोणार सरोवर असून, त्याचे व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी अकोला वन्यजीव विभागकडे आहे. करोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे.  महत्त्वाची बातमी - लहान भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकली अन् मोठ्यानेही सोडला प्राण तसेच गेल्या काही दिवसांपासून या सरोवरातील पाणी गुलाबी रंगाचे झाल्यामुळे या भागात कोणी विना परवानगी येवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त असताना (ता.13) मेहकर वनपरिक्षेत्रातील लोणार सरोवरात गस्ती दरम्यान वासुदेव तुळशीराम सुरडकर रा. अवरा, योगेश वसंतराव सोनाग्रे रा. अटाळी, सोपान राजाराम थोरात रा. अटाळी हे तिघे झाडांमध्ये लपून मद्यपान करताना आढळले. या आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे 27 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास सुरू आहे. मेहकर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की, कोणी ही या लोणार अभयारण्यामध्ये विना परवानगी प्रवेश करू नये, असे करणे गुन्हा आहे. सध्या या तलावातील गुलाबी पाणी मिळविण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करून राहीले आहे, या पाण्याचे सॅम्पल घेण्यासाठी अकोला वन्यजीव विभागाची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे, कोणीही विनापरवानगी हे पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये तसे करणे कायद्याने गुन्हा तसेच धोकादायक आहे. कारण या परिसरात बिबट आपल्या पिल्लांसह वावरतो आहे, त्यामुळे तो हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अभयारण्यातील सर्व परिसरात ई सर्विलन्स कॅमेरे लावण्यात आले आहे व या कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाते आहे. तरी लोणार सरोवरातील पाणी व अभयारण्याचे संरक्षण करण्यास स्थानिक लोकांनी सहकार्य करावे. मेहकर वनपरिक्षेत्रातील वनपाल नप्ते, वनरक्षक माने, शिंदे व सरकटे यांनी ही कारवाई केली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30G1XZl
Read More
प्रसिद्ध मांगेलीचे सौंदर्य पाहण्यास पर्यटक मुकणार कारण...

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली येथील धबधबा मॉन्सूनने दमदार हजेरी लावल्याने प्रवाहित झाला. त्यामुळे वर्षा पर्यटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांमध्ये समाधानाची बाब असली तरी या वर्षी कोरोनाचा धोका असल्याने गावकरी पर्यटकांवर बंदी घालण्याची शक्‍यता आहे. 

मांगेली धबधबा देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने मांगेलीत येतात. उंच आणि थंड हवेचे ठिकाण, संपूर्ण परिसरावर दिवसभर दाट धुक्‍याची दुलई, अंगाखांद्याला स्पर्शून जाणारा गार वारा आणि रिमझिम पाऊस याचे पर्यटकांना मोठे आकर्षण असल्याने विकेंडला तेथे खूप गर्दी असते. शिवाय मांगेली धबधबा जसा वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसाच धबधब्याचा परिसर ट्रेकिंगसाठी सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे पर्यटकांना धबधबा कधी सुरू होतो याची प्रतीक्षा होती. अखेर कालपासून धबधबा सुरू झाला आहे; पण तेथे पर्यटकांना प्रवेश मिळण्याची शक्‍यता मात्र कोरोनामुळे धूसर आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रसिद्ध मांगेलीचे सौंदर्य पाहण्यास पर्यटक मुकणार कारण... साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली येथील धबधबा मॉन्सूनने दमदार हजेरी लावल्याने प्रवाहित झाला. त्यामुळे वर्षा पर्यटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांमध्ये समाधानाची बाब असली तरी या वर्षी कोरोनाचा धोका असल्याने गावकरी पर्यटकांवर बंदी घालण्याची शक्‍यता आहे.  मांगेली धबधबा देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने मांगेलीत येतात. उंच आणि थंड हवेचे ठिकाण, संपूर्ण परिसरावर दिवसभर दाट धुक्‍याची दुलई, अंगाखांद्याला स्पर्शून जाणारा गार वारा आणि रिमझिम पाऊस याचे पर्यटकांना मोठे आकर्षण असल्याने विकेंडला तेथे खूप गर्दी असते. शिवाय मांगेली धबधबा जसा वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसाच धबधब्याचा परिसर ट्रेकिंगसाठी सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे पर्यटकांना धबधबा कधी सुरू होतो याची प्रतीक्षा होती. अखेर कालपासून धबधबा सुरू झाला आहे; पण तेथे पर्यटकांना प्रवेश मिळण्याची शक्‍यता मात्र कोरोनामुळे धूसर आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30E6c7X
Read More