Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, June 8, 2020

निसर्ग चक्रीवादळ: 'सात दिवस आईशी बोलणं झालं नाही, अजून किती दिवस लागतील माहीत नाही'
लॉकडाऊन नंतर पूर्ण क्षमतेनं कारखाने चालवणं शक्य होतंय?
नागपुरातील या उद्यानांत जाणे का ठरू शकते धोकादायक?

नागपूर : शहरातील उद्याने ही छोट्या-मोठ्यांसह सर्वांसाठीच आकर्षणाची ठिकाणे असतात. तीस लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात तर शेकडो उद्याने आहेत. 'लॉकडाउन' सुरू झाले आणि ही उद्याने बंद करण्यात आली. तब्बल ऐंशी दिवसांनंतर सोमवारी ही उद्याने नागपूरकरांसाठी खुली झाली. त्यामुळे या उद्यानांत कधी जातो आणि कधी नव्हे असे झाले आहे. परंतु, नागपूर शहरातील अशी अनेक उद्याने आहेत, जिथे ज्येष्ठ नागरिकच काय तर सर्वांनाच जाणे धोकादायक ठरू शकते. 

तब्बल अडीच महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सोमवारपासून शहरातील उद्याने सुरू झाली. मात्र, कोरोनाच्या अनाहूत भीतीमुळे नागरिक फिरायला जात नसल्याचे चित्र शहरात जागोजागी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हिरवी झेंडी मिळूनही बहुतांश उद्यानांमध्ये वर्दळ कमी दिसून आली. काही ठिकाणी 'मास्क' घातलेल्यांनाच आतमध्ये परवानगी देण्यात आली. परंतु, अनेक ठिकाणी हा नियम पाळला जातो की नाही, यावर नियंत्रण दिसत नाही. 

22 मार्चला लॉकडाउन घोषित झाल्यापासून शहरातील उद्यानांना कुलूप लागले होते. त्यामुळे भर उन्हाळ्यातही सर्वत्र शुकशुकाट जाणवला. परिणामत: सकाळ-संध्याकाळ शतपावली करणाऱ्यांची मोठीच पंचाईत झाली. त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर झाला. विशेषत: शहरातील बच्चेकंपनी व ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे उद्याने सुरू करण्याविषयी नागपूरकरांकडून वारंवार मागणी होत होती. प्रशासनाने काही अटींवर आजपासून उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयानुसार, उद्यानांमध्ये फिरताना नागरिकांनी मास्क घालणे तसेच 'सोशल डिस्टन्स'चे पालन करणे आवश्‍यक आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या दिवशी दिसूनही आला. बहुतांश उद्यानांमध्ये नागरिकांना मास्क घातल्यानंतरच आतमध्ये प्रवेश देण्यात आला. तशी सूचना काही उद्यानांमध्ये दर्शनी भागावर लावण्यात आली होती. धंतोलीसह अनेक उद्यानांमध्ये मास्क न घातलेल्या नागरिकांना परत पाठविण्यात आले. शिवाय उद्यानांमध्ये फिरताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याचीही खबरदारी घेण्यात येत आहे. 

हेही वाचा : अमरावतीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; एकूण मृत्यू सतरा

सुरक्षारक्षक नसलेल्या उद्यानांत नियमांना खो 
धंतोलीसारख्या बहुतेक उद्यानांत मास्क घालणे, 'सोशल डिस्टंसिंग' पाळणे आदी खबरदारी घेतली जाते. इथे सुरक्षारक्षकही आहेत. परंतु नागपूर शहरातील अनेक मैदानांवर तसे कुणाचेही नियंत्रण नाही. शहरातील ज्या छोट्या उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षक नाहीत, तिथे मात्र नियमांचा फज्जा उडवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा उद्यानांत जाणे नागरिकांसाठी नक्कीच धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या उद्यानांत जाताना सर्वच नागरिकांनी स्वतःच स्वतःवर बंधन घालून घेणे आवश्‍यक आहे. काही ठिकाणी स्वत: नागरिकही विशेष काळजी घेताना दिसून आले. सुरक्षारक्षक नसलेल्या काही उद्यानांमध्ये मात्र 'सोशल डिस्टन्सिंग'चे पालन होत नसल्याचे आढळून आले. 

 

लॉकडाउनमुळे आमच्या गजानननगरातील उद्यान बंद राहिल्यामुळे माझ्यासारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना तीन महिने खूप त्रास झाला. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ फिरण्याच्या सवयीला लगाम घालावा लागला. घरांमध्ये कोंडमारा होत होता. उशीरा का होईना प्रशासनाने उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. उद्यानांमधील मिळणारी शुद्ध व ताजी हवा आरोग्यासाठी पोषक असल्याने उद्यापासून नियमित "वॉकिंग'ला जाणार आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग मेंटेन करूनच उद्यानांमध्ये फिरण्याचा आनंद घ्यावा. 
-हुकूमचंद मिश्रिकोटकर, ज्येष्ठ नागरिक 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपुरातील या उद्यानांत जाणे का ठरू शकते धोकादायक? नागपूर : शहरातील उद्याने ही छोट्या-मोठ्यांसह सर्वांसाठीच आकर्षणाची ठिकाणे असतात. तीस लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात तर शेकडो उद्याने आहेत. 'लॉकडाउन' सुरू झाले आणि ही उद्याने बंद करण्यात आली. तब्बल ऐंशी दिवसांनंतर सोमवारी ही उद्याने नागपूरकरांसाठी खुली झाली. त्यामुळे या उद्यानांत कधी जातो आणि कधी नव्हे असे झाले आहे. परंतु, नागपूर शहरातील अशी अनेक उद्याने आहेत, जिथे ज्येष्ठ नागरिकच काय तर सर्वांनाच जाणे धोकादायक ठरू शकते.  तब्बल अडीच महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सोमवारपासून शहरातील उद्याने सुरू झाली. मात्र, कोरोनाच्या अनाहूत भीतीमुळे नागरिक फिरायला जात नसल्याचे चित्र शहरात जागोजागी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हिरवी झेंडी मिळूनही बहुतांश उद्यानांमध्ये वर्दळ कमी दिसून आली. काही ठिकाणी 'मास्क' घातलेल्यांनाच आतमध्ये परवानगी देण्यात आली. परंतु, अनेक ठिकाणी हा नियम पाळला जातो की नाही, यावर नियंत्रण दिसत नाही.  22 मार्चला लॉकडाउन घोषित झाल्यापासून शहरातील उद्यानांना कुलूप लागले होते. त्यामुळे भर उन्हाळ्यातही सर्वत्र शुकशुकाट जाणवला. परिणामत: सकाळ-संध्याकाळ शतपावली करणाऱ्यांची मोठीच पंचाईत झाली. त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर झाला. विशेषत: शहरातील बच्चेकंपनी व ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे उद्याने सुरू करण्याविषयी नागपूरकरांकडून वारंवार मागणी होत होती. प्रशासनाने काही अटींवर आजपासून उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, उद्यानांमध्ये फिरताना नागरिकांनी मास्क घालणे तसेच 'सोशल डिस्टन्स'चे पालन करणे आवश्‍यक आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या दिवशी दिसूनही आला. बहुतांश उद्यानांमध्ये नागरिकांना मास्क घातल्यानंतरच आतमध्ये प्रवेश देण्यात आला. तशी सूचना काही उद्यानांमध्ये दर्शनी भागावर लावण्यात आली होती. धंतोलीसह अनेक उद्यानांमध्ये मास्क न घातलेल्या नागरिकांना परत पाठविण्यात आले. शिवाय उद्यानांमध्ये फिरताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याचीही खबरदारी घेण्यात येत आहे.  हेही वाचा : अमरावतीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; एकूण मृत्यू सतरा सुरक्षारक्षक नसलेल्या उद्यानांत नियमांना खो  धंतोलीसारख्या बहुतेक उद्यानांत मास्क घालणे, 'सोशल डिस्टंसिंग' पाळणे आदी खबरदारी घेतली जाते. इथे सुरक्षारक्षकही आहेत. परंतु नागपूर शहरातील अनेक मैदानांवर तसे कुणाचेही नियंत्रण नाही. शहरातील ज्या छोट्या उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षक नाहीत, तिथे मात्र नियमांचा फज्जा उडवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा उद्यानांत जाणे नागरिकांसाठी नक्कीच धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या उद्यानांत जाताना सर्वच नागरिकांनी स्वतःच स्वतःवर बंधन घालून घेणे आवश्‍यक आहे. काही ठिकाणी स्वत: नागरिकही विशेष काळजी घेताना दिसून आले. सुरक्षारक्षक नसलेल्या काही उद्यानांमध्ये मात्र 'सोशल डिस्टन्सिंग'चे पालन होत नसल्याचे आढळून आले.    लॉकडाउनमुळे आमच्या गजानननगरातील उद्यान बंद राहिल्यामुळे माझ्यासारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना तीन महिने खूप त्रास झाला. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ फिरण्याच्या सवयीला लगाम घालावा लागला. घरांमध्ये कोंडमारा होत होता. उशीरा का होईना प्रशासनाने उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. उद्यानांमधील मिळणारी शुद्ध व ताजी हवा आरोग्यासाठी पोषक असल्याने उद्यापासून नियमित "वॉकिंग'ला जाणार आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग मेंटेन करूनच उद्यानांमध्ये फिरण्याचा आनंद घ्यावा.  -हुकूमचंद मिश्रिकोटकर, ज्येष्ठ नागरिक    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30jsOud
Read More
आयटीयन्सना आधीच जॉबची भीती, त्यात आता आरोग्याच्या 'या' तक्रारी!

पिंपरी : आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या अमितचं लॉकडाउनच्या काळात घरातून काम सुरू होतं. आपण तंदुरुस्त आहोत का, हे जाणून घेण्यासाठी त्यानं लॉकडाउन शिथिल होऊ लागल्यानंतर आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये त्याला रक्‍तातील साखर वाढल्याचं आढळून आलं. दोन महिन्यांच्या कालावधीच, हे कसं झालं याचा शोध त्याने घेतला असता वर्क फ्रॉम होममुळे बदलेलं कामाचं वेळापत्रक, कामामुळे आलेला ताण आणि अनेक दिवसांपासून बंद असणारा व्यायाम यामुळं ही समस्या ओढावल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. आयटीयन्सना वर्क फ्रॉम होमने काम करण्याच्या नव्या पद्धतीचा अवलंब करावा लागतोय. मात्र, त्यामुळं मधुमेह, रक्‍तदाब या आरोग्य समस्यांना निमंत्रण मिळू लागलंय. लॉकडाउनच्या काळातील दोन महिन्यांमध्ये हे प्रमाण सुमारे दहा टक्‍यांपर्यंत गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात आलीय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     

या आहेत समस्या 

वर्क फ्रॉम होममुळे आयटीयन्सना घरातून काम करण्याची सुविधा मिळतेय. त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकामध्ये बदल झाला आहे. काम करत असताना अनेकदा वेळेचं बंधन नसते. त्यातून येणारा कामाचा ताण, बऱ्याचदा प्रोजेक्‍ट नसल्यामुळे नोकरीवर असणारी टांगती तलवार, अचानकपणे होणारी पगार कपात, अशा अनेक कारणांमुळे ब्लॅडप्रेशरमध्ये वाढ होणं, रक्‍तातील साखर वाढणं, असे प्रकार वाढीस लागत आहेत. या समस्येतून मानसिक ताण वाढतोय आणि मेंदूमधून रक्‍तामध्ये येणाऱ्या रसायनांचा हृदय आणि रक्‍तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यातून रक्‍तामधील साखरेचं प्रमाण वाढणं, हृदयाची धडधड वाढणं, घाम येणं असे प्रकार होतात. बऱ्याचदा मानसिक आजारांमुळे हृद्यरोगांना आमंत्रण मिळतं. त्यामुळे काम करताना प्रत्येकाने योग्य ती काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काम करताना ही काळजी घ्या... 

हृदयरोगापासून दूर राहाण्यासाठी सर्वात प्रथम आपले मानसिक आरोग्य ठिक ठेवा. 

कोणतेही काम करताना त्याचा ताण घेऊ नका. 

दिवसभराची दिनचर्या सुरू करण्याआधी एक तासभराचा वेळ व्यायामासाठी द्या. 

नकारात्मक विचार मनात आणू नका. 

मन:शांतिसाठी ध्यानधारणा आणि योगसाधनेसाठी वेळ द्या. 

आरोग्याची समस्या जाणवत असल्यास उशीर न करता तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. 

आयटीयन्ससाठी फिटनेस चॅलेंजचा फंडा... 

वर्क फ्रॉम होममुळे आयटीयन्सच्या कामाच्या शैलीत झालेल्या बदलामुळे त्यांना रक्‍तदाब वाढणं, मधुमेह अशा आरोग्य समस्या भेडसावू लागल्या आहेत. प्रामुख्यानं मानसिक ताणतणावातून या गोष्टी उद्भवत आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी या कर्मचाऱ्यांसाठी फिटनेस चॅलेंजचा फंडा राबवण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामध्ये डॉक्‍टरांच्या व्हिडिओच्या माध्यमातून शरीर फिट ठेवण्याच्या टिप्स देणे, अशा प्रकारची माहिती त्यांना पोहोचवण्यात येत असल्याचं राज्य सरकारच्या आयटी समितीचे सदस्य पवनजित माने यांनी सांगितले.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आयटीयन्समध्ये रक्‍तदाब वाढणं, मधुमेह अशा समस्या आढळण्याचं प्रमाण सुमारे 25 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. लॉकडाउनच्या काळात त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकामध्ये बदल झालाय. त्यामुळे आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार संकटात आले आहेत. त्यामुळेही मानसिक ताणतणावात वाढताना दिसत आहेत. काम करताना प्रत्येकानं आरोग्याकडे सर्वाधिक लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. 
- डॉ. अभिजित वैद्य, हृदयरोगतज्ञ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आयटीयन्सना आधीच जॉबची भीती, त्यात आता आरोग्याच्या 'या' तक्रारी! पिंपरी : आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या अमितचं लॉकडाउनच्या काळात घरातून काम सुरू होतं. आपण तंदुरुस्त आहोत का, हे जाणून घेण्यासाठी त्यानं लॉकडाउन शिथिल होऊ लागल्यानंतर आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये त्याला रक्‍तातील साखर वाढल्याचं आढळून आलं. दोन महिन्यांच्या कालावधीच, हे कसं झालं याचा शोध त्याने घेतला असता वर्क फ्रॉम होममुळे बदलेलं कामाचं वेळापत्रक, कामामुळे आलेला ताण आणि अनेक दिवसांपासून बंद असणारा व्यायाम यामुळं ही समस्या ओढावल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. आयटीयन्सना वर्क फ्रॉम होमने काम करण्याच्या नव्या पद्धतीचा अवलंब करावा लागतोय. मात्र, त्यामुळं मधुमेह, रक्‍तदाब या आरोग्य समस्यांना निमंत्रण मिळू लागलंय. लॉकडाउनच्या काळातील दोन महिन्यांमध्ये हे प्रमाण सुमारे दहा टक्‍यांपर्यंत गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात आलीय.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      या आहेत समस्या  वर्क फ्रॉम होममुळे आयटीयन्सना घरातून काम करण्याची सुविधा मिळतेय. त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकामध्ये बदल झाला आहे. काम करत असताना अनेकदा वेळेचं बंधन नसते. त्यातून येणारा कामाचा ताण, बऱ्याचदा प्रोजेक्‍ट नसल्यामुळे नोकरीवर असणारी टांगती तलवार, अचानकपणे होणारी पगार कपात, अशा अनेक कारणांमुळे ब्लॅडप्रेशरमध्ये वाढ होणं, रक्‍तातील साखर वाढणं, असे प्रकार वाढीस लागत आहेत. या समस्येतून मानसिक ताण वाढतोय आणि मेंदूमधून रक्‍तामध्ये येणाऱ्या रसायनांचा हृदय आणि रक्‍तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यातून रक्‍तामधील साखरेचं प्रमाण वाढणं, हृदयाची धडधड वाढणं, घाम येणं असे प्रकार होतात. बऱ्याचदा मानसिक आजारांमुळे हृद्यरोगांना आमंत्रण मिळतं. त्यामुळे काम करताना प्रत्येकाने योग्य ती काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काम करताना ही काळजी घ्या...  हृदयरोगापासून दूर राहाण्यासाठी सर्वात प्रथम आपले मानसिक आरोग्य ठिक ठेवा.  कोणतेही काम करताना त्याचा ताण घेऊ नका.  दिवसभराची दिनचर्या सुरू करण्याआधी एक तासभराचा वेळ व्यायामासाठी द्या.  नकारात्मक विचार मनात आणू नका.  मन:शांतिसाठी ध्यानधारणा आणि योगसाधनेसाठी वेळ द्या.  आरोग्याची समस्या जाणवत असल्यास उशीर न करता तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्या.  आयटीयन्ससाठी फिटनेस चॅलेंजचा फंडा...  वर्क फ्रॉम होममुळे आयटीयन्सच्या कामाच्या शैलीत झालेल्या बदलामुळे त्यांना रक्‍तदाब वाढणं, मधुमेह अशा आरोग्य समस्या भेडसावू लागल्या आहेत. प्रामुख्यानं मानसिक ताणतणावातून या गोष्टी उद्भवत आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी या कर्मचाऱ्यांसाठी फिटनेस चॅलेंजचा फंडा राबवण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामध्ये डॉक्‍टरांच्या व्हिडिओच्या माध्यमातून शरीर फिट ठेवण्याच्या टिप्स देणे, अशा प्रकारची माहिती त्यांना पोहोचवण्यात येत असल्याचं राज्य सरकारच्या आयटी समितीचे सदस्य पवनजित माने यांनी सांगितले.   पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  आयटीयन्समध्ये रक्‍तदाब वाढणं, मधुमेह अशा समस्या आढळण्याचं प्रमाण सुमारे 25 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. लॉकडाउनच्या काळात त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकामध्ये बदल झालाय. त्यामुळे आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार संकटात आले आहेत. त्यामुळेही मानसिक ताणतणावात वाढताना दिसत आहेत. काम करताना प्रत्येकानं आरोग्याकडे सर्वाधिक लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.  - डॉ. अभिजित वैद्य, हृदयरोगतज्ञ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3f32hW3
Read More
सलून उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा...

नागपूर : लॉकडाउनमुळे सलून चालक, मालक आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
त्यामुळे नाभिक समाजाने आता संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. सलून उघडण्यास परवानगी द्या अथवा महिना 15 हजार रुपये द्या, अशी मागणी नाभिक एकता मंचने सरकारकडे केली आहे. अन्यथा राज्यात 11 जून रोजी 'मूक आंदोलन' करण्याचा इशारा दिला आहे. 

लॉकडाउनमुळे सलून बंद असल्यामुळे नाभिक समाजावर संकट कोसळले आहे. सलून व्यवसायी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सलून, ब्युटी पार्लत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या किंवा प्रत्येक सलून व्यावसायिकाला महिना 15 हजार रुपये आर्थिक साहाय्य करा, अशी मागणी नाभिक एकता मंचने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मंचने दिला आहे. 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय 19 मार्चपासून बंद आहे. लॉकडाउनच्या कालावधीत सरकारच्या सर्व नियम व अटींचे पालन करीत असताना आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सलून चालकांवर उपासमारीची वेळ आली. मात्र, त्यानंतरही सलून व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून सरकारला मदत केली. नाभिक समाजावर आलेले आर्थिक संकट अधिकच गडद झालेले आहे. 
नाभिक एकता मंचच्या वतीने शासनास जिल्ह्यातील नाभिक एकता मंचच्या सर्व कार्यकारिणींद्वारे निवेदन देऊन सलून व्यवसायिकांना मदत करण्याची मागणी केली होती. परंतु, दखल घेण्यात आली नाही. 

हेही वाचा : अमरावतीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; एकूण मृत्यू सतरा

शासनास स्मरण करून देण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र, सलून व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली नाही तसेच आर्थिक मदतसुद्धा करण्यात आली नाही. अशा परिस्थितीत नाभिक समाजाला मदतीची अपेक्षा होती. मात्र, सरकारने दुर्लक्ष केले आहे. 
सरकारने 10 जूनपर्यंत सलून दुकान सुरू करून आर्थिक मदत द्यावी किंवा प्रत्येक सलून व्यावसायिकाला दरमहा 15 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी मंचच्या वतीने करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास 11 जून रोजी 11 ते 2 या वेळेत नाभिक एकता मंचच्या वतीने राज्यभर नाभिक समाज आपल्या व्यवसायस्थळी मूक आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, अशी माहिती नाभिक एकता मंचचे अध्यक्ष धनराज वलुकार यांनी दिली. 
 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सलून उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा... नागपूर : लॉकडाउनमुळे सलून चालक, मालक आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.  त्यामुळे नाभिक समाजाने आता संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. सलून उघडण्यास परवानगी द्या अथवा महिना 15 हजार रुपये द्या, अशी मागणी नाभिक एकता मंचने सरकारकडे केली आहे. अन्यथा राज्यात 11 जून रोजी 'मूक आंदोलन' करण्याचा इशारा दिला आहे.  लॉकडाउनमुळे सलून बंद असल्यामुळे नाभिक समाजावर संकट कोसळले आहे. सलून व्यवसायी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सलून, ब्युटी पार्लत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या किंवा प्रत्येक सलून व्यावसायिकाला महिना 15 हजार रुपये आर्थिक साहाय्य करा, अशी मागणी नाभिक एकता मंचने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मंचने दिला आहे.  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय 19 मार्चपासून बंद आहे. लॉकडाउनच्या कालावधीत सरकारच्या सर्व नियम व अटींचे पालन करीत असताना आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सलून चालकांवर उपासमारीची वेळ आली. मात्र, त्यानंतरही सलून व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून सरकारला मदत केली. नाभिक समाजावर आलेले आर्थिक संकट अधिकच गडद झालेले आहे.  नाभिक एकता मंचच्या वतीने शासनास जिल्ह्यातील नाभिक एकता मंचच्या सर्व कार्यकारिणींद्वारे निवेदन देऊन सलून व्यवसायिकांना मदत करण्याची मागणी केली होती. परंतु, दखल घेण्यात आली नाही.  हेही वाचा : अमरावतीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; एकूण मृत्यू सतरा शासनास स्मरण करून देण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र, सलून व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली नाही तसेच आर्थिक मदतसुद्धा करण्यात आली नाही. अशा परिस्थितीत नाभिक समाजाला मदतीची अपेक्षा होती. मात्र, सरकारने दुर्लक्ष केले आहे.  सरकारने 10 जूनपर्यंत सलून दुकान सुरू करून आर्थिक मदत द्यावी किंवा प्रत्येक सलून व्यावसायिकाला दरमहा 15 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी मंचच्या वतीने करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास 11 जून रोजी 11 ते 2 या वेळेत नाभिक एकता मंचच्या वतीने राज्यभर नाभिक समाज आपल्या व्यवसायस्थळी मूक आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, अशी माहिती नाभिक एकता मंचचे अध्यक्ष धनराज वलुकार यांनी दिली.      News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YaUazY
Read More
उपराजधानीला मिळतेय ही नवी ओळख, वाचा हे जळजळीत वास्तव...

 

नागपूर : गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या राज्याच्या उपराधानीला आता नागपूर नव्हे तर गुन्हेपूर नवी ओळख निर्माण झाली आहे. उपराजधानीत पोलिसांचा वचक संपल्यामुळे हत्याकांडाची मालिका आणि गॅंगवार सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल 23 जणांची हत्या झाली तर 20 जणांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून नागपूरला "क्राईम सीटी' म्हणून पुन्हा ओळखल्या जाण्याची शक्‍यता आहे.

 

अरे ओ सांबा...प्रेक्षकांच्या मन:पटलावर राज्य करणारा खलनायक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने गेल्या अडीच महिन्यांत शहरातील अनेक गुन्हेगार अंडरग्राउंड होते. त्यामुळे या काळात गुन्ह्याचे प्रमाणही कमी होते. मात्र, लॉकडाऊनला शिथिलता मिळताच गुन्हेगारांनी तोंड बाहेर काढले असून त्यावर पोलिसांना नियंत्रण मिळविण्यासाठी खूप आटापिटा करावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गुन्हेगारांच्या टोळ्यांनी संयम ठेवला होता. आता संचारबंदीला थांबा मिळताच गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत.

त्यामुळे प्रतिस्पर्धी टोळीचे वर्चस्व संपविण्यासाठी एकेकाचा "गेम' करण्याची तयारी टोळ्या करीत आहेत. पारडीतील कुख्यात गुंड बाल्या वंजारी आणि यशोधरानगरातील गॅंगस्टर अन्नू ठाकूर यांचा गॅंगवॉरमधून "गेम' करण्यात आला. बाल्या आणि अन्नू हे दोघेही खतरनाक गुंड होते, त्यांच्या टोळ्यांचीही शहरात दहशत होती. डॉन संतोष आंबेकर आणि राजू बद्रे कुख्यात गॅंगस्टर कारागृहात असल्याने आता चेल्याचपाट्यांच्या अनेक टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्या टोळ्या वर्चस्व संपविण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठल्या आहेत. पोलिसांचे नेटवर्क अयशस्वी होत असल्याने शहरात हत्याकांडांची मालिका सुरू आहे.
 

सात दिवसांत सात खून

गेल्या सात दिवसांत सात हत्याकांड उघडकीस आले आहेत. यात बाल्या वंजारी (पारडी), अन्नू ठाकूर (यशोधरानगर), कार्तिक सारवे (प्रतापनगर), वैभव मूर्ते (हुडकेश्‍वर), राज डोरले (महाल), नवीन कामठी आणि गणेशपेठमधील हत्याकांडाची अद्याप ओळख पटली नाही. तर मे महिन्यातही पाच हत्याकांड घडले आहेत. हत्याकांड सत्रांवर पोलिसांची वचक संपल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
 

गुन्हे शाखा झाली "म्हातारी'

नागपूर गुन्हे शाखेचा पूर्वी मुंबई पोलिसांप्रमाणेच राज्यात दरारा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखेची कामगिरी खालावली आहे. गुन्हे शाखेत तेच ते कर्मचारी "सेटिंग' लावून प्रवेश करतात. त्यामुळे नव्या दमाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे जुने कर्मचारी तपास आणि प्रकटीकरणाच्या उद्देशापासून भटकत असून भलत्याच कामाकडे त्यांचे लक्ष आहे.

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

उपराजधानीला मिळतेय ही नवी ओळख, वाचा हे जळजळीत वास्तव...   नागपूर : गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या राज्याच्या उपराधानीला आता नागपूर नव्हे तर गुन्हेपूर नवी ओळख निर्माण झाली आहे. उपराजधानीत पोलिसांचा वचक संपल्यामुळे हत्याकांडाची मालिका आणि गॅंगवार सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल 23 जणांची हत्या झाली तर 20 जणांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून नागपूरला "क्राईम सीटी' म्हणून पुन्हा ओळखल्या जाण्याची शक्‍यता आहे.   अरे ओ सांबा...प्रेक्षकांच्या मन:पटलावर राज्य करणारा खलनायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने गेल्या अडीच महिन्यांत शहरातील अनेक गुन्हेगार अंडरग्राउंड होते. त्यामुळे या काळात गुन्ह्याचे प्रमाणही कमी होते. मात्र, लॉकडाऊनला शिथिलता मिळताच गुन्हेगारांनी तोंड बाहेर काढले असून त्यावर पोलिसांना नियंत्रण मिळविण्यासाठी खूप आटापिटा करावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गुन्हेगारांच्या टोळ्यांनी संयम ठेवला होता. आता संचारबंदीला थांबा मिळताच गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी टोळीचे वर्चस्व संपविण्यासाठी एकेकाचा "गेम' करण्याची तयारी टोळ्या करीत आहेत. पारडीतील कुख्यात गुंड बाल्या वंजारी आणि यशोधरानगरातील गॅंगस्टर अन्नू ठाकूर यांचा गॅंगवॉरमधून "गेम' करण्यात आला. बाल्या आणि अन्नू हे दोघेही खतरनाक गुंड होते, त्यांच्या टोळ्यांचीही शहरात दहशत होती. डॉन संतोष आंबेकर आणि राजू बद्रे कुख्यात गॅंगस्टर कारागृहात असल्याने आता चेल्याचपाट्यांच्या अनेक टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्या टोळ्या वर्चस्व संपविण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठल्या आहेत. पोलिसांचे नेटवर्क अयशस्वी होत असल्याने शहरात हत्याकांडांची मालिका सुरू आहे.   सात दिवसांत सात खून गेल्या सात दिवसांत सात हत्याकांड उघडकीस आले आहेत. यात बाल्या वंजारी (पारडी), अन्नू ठाकूर (यशोधरानगर), कार्तिक सारवे (प्रतापनगर), वैभव मूर्ते (हुडकेश्‍वर), राज डोरले (महाल), नवीन कामठी आणि गणेशपेठमधील हत्याकांडाची अद्याप ओळख पटली नाही. तर मे महिन्यातही पाच हत्याकांड घडले आहेत. हत्याकांड सत्रांवर पोलिसांची वचक संपल्याची स्थिती निर्माण झाली आहे.   गुन्हे शाखा झाली "म्हातारी' नागपूर गुन्हे शाखेचा पूर्वी मुंबई पोलिसांप्रमाणेच राज्यात दरारा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखेची कामगिरी खालावली आहे. गुन्हे शाखेत तेच ते कर्मचारी "सेटिंग' लावून प्रवेश करतात. त्यामुळे नव्या दमाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे जुने कर्मचारी तपास आणि प्रकटीकरणाच्या उद्देशापासून भटकत असून भलत्याच कामाकडे त्यांचे लक्ष आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3f1KjmS
Read More
रयतच्या निवडणुकीकडे लागलंय लक्ष, नगरमधून यांची नावे चर्चेत

नगर ः शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठी संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेकडे पाहिले जाते. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं काम कोणी केलं असेल तर ते रयतने. कर्मवीर अण्णा यांनी रयत नावाचं वटवृक्षाचं रोपटं लावलं. त्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात झाला आहे.

या संस्थेवर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि आता ज्येष्ठ नेते शरद पवार धुरा सांभाळत आहेत. या संस्थेने राज्याच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याचे काम केलं. संस्थेतील पारदर्शीपणामुळे ती विस्तारली आणि गुणवत्ता टिकवू शकली. संस्थेतील पदाधिकाऱ्यांनीही शिक्षण यज्ञ सातत्याने तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. आता या महिनाअखेरीस २७ तारखेला संस्थेची निवडणूक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही पदाधिकारी निवड होत आहे.

रयतचा विस्तार कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यात आहे. कामकाजाच्या सुलभिकरणासाठी पाच विभाग पाडण्यात आले आहेत. त्यात उत्तर विभागात नगर, नाशिक, बीड, नंदूरबार हे जिल्हे येतात. पश्चिम विभागात पुण्याचा समावेश होतो. सातारा, सोलापूर हे मध्य विभागात येतात. कोल्हापूर, सांगली, कर्नाटक दक्षिण विभागात मोडते. कोकण रायगड विभागात समाविष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा - कर्जत-जामखेडच्या शिक्षणात रोहित पवारांमुळे आलं डिजीटल पर्व

मॅनेजिंग कौन्सिलमध्ये, लाईफ मेंबर असलेल्या सेवकांमधून अकराजण निवडले जातात. या सर्वांमधून चेअरमनची निवड केली जाते. उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिवांची त्यातून निवड होते. पाच विभागासाठी पाच अध्यक्ष केले जातात. राजकीय मंडळी आणि संस्थेतील सेवकांची मिळून ही बॉडी बनते. कामात सुसूत्रता यावी यासाठी मंडळाची अशी रचना करण्यात आली आहे. 

रयत शिक्षण संस्थेवर नगर जिल्ह्रयाचेच वर्चस्व कायम आहे. जिल्ह्यात शाखांचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थी संख्याही मोठी आहे. कै. शंकरराव काळे, रावसाहेब शिंदे यांनी रयतचे चेअरमनपद भूषवले आहे. सध्या उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, अरूण कडू हे काम पाहतात. तर विभागाचे अध्यक्षपद दादाभाऊ कळमकर भूषवित आहेत. नवीन पिढीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे चांगले काम करीत आहेत. अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सध्या प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे सचिव आहेत तेही नगरकर आहेत. राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ते प्राचार्य होते.

मॅनिजिंग कौन्सिलवर मीनाताई जगधने, आमदार बबनराव पाचपुते आणि नाशिकमधून भगीरथ शिंदे कार्यरत आहेत. यांच्याव्यतिरिक्त अजित पवार, दिलीप वळसे पाटील, रवींद्र पवार, एन.डी. पाटील, विश्वजीत कदम, राम ठाकूर, आबासाहेब देशमुख हे बॉडीवर आहेत. तर डॉ. अनिल पाटील हे चेअरमन आहेत.

संस्थेत मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, चेअरमन आणि सचिव या पदाला मोठे महत्त्व आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता संस्थेत रोटेशन पद्धतीने पदे दिली जातात. एका विभागाला सचिवपद गेले तर चेअरमन दुसरीकडचा केला जातो. मात्र, प्रत्येक निवडणुकीत नगर जिल्ह्याने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मागील वेळी भाजपात गेलेल्या आमदार बबनराव पाचपुते यांना संधी मिळाली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता जे मॅनेजिंग कौन्सिलवर आहेत, त्यांनाच पुन्हा संधी मिळू शकते. त्यात पाचपुते यांच्या पदाबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे. तेच कायम राहतात की दुसरा कोणाची वर्णी लागते, हे औत्सुक्याचे आहे.

सचिवपदासाठी फिल्डिंग

आपल्या मर्जीतील किंवा जिल्ह्यातील सचिव व्हावा यासाठी मोर्चेबांधणी केली जाते. यंदाच्या निवडणुकीपूर्वीही ती सुरू आहे. नगर जिल्ह्यातून श्रीगोंद्यातील प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, डॉ. शिवलिंग मेदनकुळे, प्राचार्यं प्रतिभा गायकवाड, प्राचार्य डॉ. शिवणकर, प्राचार्यं बी.टी. जाधव यांची नावे चर्चेत आहेत. ही पदाधिकारी निवड तीन वर्षांसाठी असणार आहे.

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रयतच्या निवडणुकीकडे लागलंय लक्ष, नगरमधून यांची नावे चर्चेत नगर ः शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठी संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेकडे पाहिले जाते. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं काम कोणी केलं असेल तर ते रयतने. कर्मवीर अण्णा यांनी रयत नावाचं वटवृक्षाचं रोपटं लावलं. त्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात झाला आहे. या संस्थेवर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि आता ज्येष्ठ नेते शरद पवार धुरा सांभाळत आहेत. या संस्थेने राज्याच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याचे काम केलं. संस्थेतील पारदर्शीपणामुळे ती विस्तारली आणि गुणवत्ता टिकवू शकली. संस्थेतील पदाधिकाऱ्यांनीही शिक्षण यज्ञ सातत्याने तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. आता या महिनाअखेरीस २७ तारखेला संस्थेची निवडणूक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही पदाधिकारी निवड होत आहे. रयतचा विस्तार कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यात आहे. कामकाजाच्या सुलभिकरणासाठी पाच विभाग पाडण्यात आले आहेत. त्यात उत्तर विभागात नगर, नाशिक, बीड, नंदूरबार हे जिल्हे येतात. पश्चिम विभागात पुण्याचा समावेश होतो. सातारा, सोलापूर हे मध्य विभागात येतात. कोल्हापूर, सांगली, कर्नाटक दक्षिण विभागात मोडते. कोकण रायगड विभागात समाविष्ट करण्यात आले आहे. हेही वाचा - कर्जत-जामखेडच्या शिक्षणात रोहित पवारांमुळे आलं डिजीटल पर्व मॅनेजिंग कौन्सिलमध्ये, लाईफ मेंबर असलेल्या सेवकांमधून अकराजण निवडले जातात. या सर्वांमधून चेअरमनची निवड केली जाते. उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिवांची त्यातून निवड होते. पाच विभागासाठी पाच अध्यक्ष केले जातात. राजकीय मंडळी आणि संस्थेतील सेवकांची मिळून ही बॉडी बनते. कामात सुसूत्रता यावी यासाठी मंडळाची अशी रचना करण्यात आली आहे.  रयत शिक्षण संस्थेवर नगर जिल्ह्रयाचेच वर्चस्व कायम आहे. जिल्ह्यात शाखांचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थी संख्याही मोठी आहे. कै. शंकरराव काळे, रावसाहेब शिंदे यांनी रयतचे चेअरमनपद भूषवले आहे. सध्या उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, अरूण कडू हे काम पाहतात. तर विभागाचे अध्यक्षपद दादाभाऊ कळमकर भूषवित आहेत. नवीन पिढीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे चांगले काम करीत आहेत. अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सध्या प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे सचिव आहेत तेही नगरकर आहेत. राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ते प्राचार्य होते. मॅनिजिंग कौन्सिलवर मीनाताई जगधने, आमदार बबनराव पाचपुते आणि नाशिकमधून भगीरथ शिंदे कार्यरत आहेत. यांच्याव्यतिरिक्त अजित पवार, दिलीप वळसे पाटील, रवींद्र पवार, एन.डी. पाटील, विश्वजीत कदम, राम ठाकूर, आबासाहेब देशमुख हे बॉडीवर आहेत. तर डॉ. अनिल पाटील हे चेअरमन आहेत. संस्थेत मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, चेअरमन आणि सचिव या पदाला मोठे महत्त्व आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता संस्थेत रोटेशन पद्धतीने पदे दिली जातात. एका विभागाला सचिवपद गेले तर चेअरमन दुसरीकडचा केला जातो. मात्र, प्रत्येक निवडणुकीत नगर जिल्ह्याने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मागील वेळी भाजपात गेलेल्या आमदार बबनराव पाचपुते यांना संधी मिळाली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता जे मॅनेजिंग कौन्सिलवर आहेत, त्यांनाच पुन्हा संधी मिळू शकते. त्यात पाचपुते यांच्या पदाबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे. तेच कायम राहतात की दुसरा कोणाची वर्णी लागते, हे औत्सुक्याचे आहे. सचिवपदासाठी फिल्डिंग आपल्या मर्जीतील किंवा जिल्ह्यातील सचिव व्हावा यासाठी मोर्चेबांधणी केली जाते. यंदाच्या निवडणुकीपूर्वीही ती सुरू आहे. नगर जिल्ह्यातून श्रीगोंद्यातील प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, डॉ. शिवलिंग मेदनकुळे, प्राचार्यं प्रतिभा गायकवाड, प्राचार्य डॉ. शिवणकर, प्राचार्यं बी.टी. जाधव यांची नावे चर्चेत आहेत. ही पदाधिकारी निवड तीन वर्षांसाठी असणार आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YdDRm1
Read More
नागपुरातील सीताबर्डीत येथील दुकानात जाताय... जरा सावधान

नागपूर :  "मिशन बिगीन अगेन' सोमवारपासून सुरू झाले. 80 दिवस "लॉक' झालेले नागपूर शहर पुन्हा नवा श्‍वास घेत सुरू झाले. या शहराला वैभव प्राप्त करून देणारा "सीताबर्डी एरिया'ही पुन्हा कधी नव्हे तो एवढ्या दिवसानंतर बोलका झाला. होय बोलकाच. कारण या एरियात जाताच "बोल' कानी पडतात. हे बोल रस्त्यावरच्या हॉकर्सचे असतात. "ले लो ले लो...रस्ते का माल सस्ते में' म्हणत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अख्ख्या नागपूर शहरात प्रसिद्ध असलेले हे मार्केट खुलले. नागपूरकरांना पुन्हा येथे जाण्याचा मोह नक्कीच होणार. नागपूरकरांनो तुम्ही नक्की जा. परंतु सावधान... या मार्केटमध्ये दुकाने "ऑड-इव्हन'चा फार्म्युला पाळत असले तरी एक धोक्‍याची मोठी घंटा येथे खणखणताना दिसते.

 

शासनाने टप्प्याटप्याने परवानगी दिल्याने "मिशन बिगीन अगेन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सीताबर्डी मार्केटनेही "पुनश्‍च हरिओम'चा मंत्र जपला. पहिल्याच दिवशी सीताबर्डीचा मुख्य मार्ग ग्राहकांनी दुतर्फा फुलला होता. बाजारात परतलेले चैतन्य "होंगे कामयाब'चा विश्‍वास देणारे असले तरी याच चैतन्यातून कुठेतरी धोक्‍याची सूचनाही मिळत होती.

 

आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने ग्राहकही मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले. बाजारातील गर्दी व्यावसायिक आणि ग्राहकांचाही विश्‍वास वाढविणारीच होती. नागपूरचे हृदय असणाऱ्या सीताबर्डी बाजारात "ऑड इव्हन' फॉर्म्यूल्याचे कटाक्षाने पालन होताना दिसले. केवळ डाव्या बाजूचीच दुकाने सोमवारी उघडी होती. समोरच्या भागातील प्रतिष्ठानांची संपूर्ण रांगच बंद होती. तरीही एक गोष्ट सतत खटकत होती.

खासगी चालकांची आर्थिक चाके खोलात, ही आहेत कारणे...

नागपूरकरांच्या बोलण्यात, वागण्यात, स्वभावातच एक वेगळा बिनधास्तपणा आहे. तोच बिनधास्तपणा आजही दिसून आला. ओसंडून वाहणाऱ्या गर्दीत भौतिक अंतराचे कुठेही पालन होताना दिसले नाही. कारवाईच्या भीतीने मास्क किंवा दुपट्टे प्रत्येकाकडे होते खरे. परंतु त्या मास्कने नाक आणि तोंड झाकण्याऐवजी बहुसंख्यकांनी ते मानेभोवती गुंडाळून ठेवण्यातच धन्यता मानल्याचे दिसले. सोमवारपासून शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठा सुरू झाल्या. सम-विषमची भानगड अजूनही व्यावसायिकांच्या पचनी पडली नसल्याचे रस्त्याच्या दुतर्फा सुरू असणाऱ्या प्रतिष्ठानांवरून लक्षात आले.

फुटपाथ विक्रेत्यांनी दोन्ही भागातील फुटपाथ व्यापले होते. यामुळे दुकानदारांनी नियमांचे पालन करूनही शिस्त पूर्णत: विस्कटलेली होती. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने ग्राहकही मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले. बाजारातील गर्दी व्यावसायिक आणि ग्राहकांचाही विश्‍वास वाढविणारीच होती. नागपूरकरांच्या बोलण्या, वागण्यात, स्वभावातील बिनधास्तपणा कोरोनाच्या संकटकाळात नक्‍कीच परवडणारा नाही.

हाच मोकळाधाकळा बाणा कोरोनाच्या मगरमिठीकडे नेणारा असल्याने नागरिकांनीच स्वत:हून काळजी घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. उपराजधानीत दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढतोय, रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस बढतीवरच आहे. त्यामुळे कुठून कसा कोरोना येईल आणि तुम्हाला मगरमिठीत घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सीताबर्डी किंवा इतरही गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग तसेच इतरही नियम पाळाल तरच कोरोनाला दूर ठेवता येईल.
 

मनपा आयुक्‍तांची भेट घेऊ
शहरात 40 हजार हॉकर्स असून, सर्व जण स्वाभिमानाने व्यवसाय करतात. लॉकडाऊनमुळे तीन महिने घरातच बसून रहावे लागले. तेही मेटाकुटीस आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार सीताबर्डी मेन रोडवर त्यांच्यासाठी लाल आणि पिवळ्या पट्टया आखून दिल्या आहेत. मर्यादेत राहूनच सर्व जण व्यवसाय करीत आहेत. कोरोनाचे संकट पाहता सोशल डिस्टन्सिंग आवश्‍यक आहे. त्यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेऊन दोन्ही भागातील हॉकर्सना मर्यादा घालून व्यवसाय करू देण्याची मागणी करणार आहे.
आमदार प्रकाश गजभिये, हॉकर्स असोसिएशनचे नेते

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपुरातील सीताबर्डीत येथील दुकानात जाताय... जरा सावधान नागपूर :  "मिशन बिगीन अगेन' सोमवारपासून सुरू झाले. 80 दिवस "लॉक' झालेले नागपूर शहर पुन्हा नवा श्‍वास घेत सुरू झाले. या शहराला वैभव प्राप्त करून देणारा "सीताबर्डी एरिया'ही पुन्हा कधी नव्हे तो एवढ्या दिवसानंतर बोलका झाला. होय बोलकाच. कारण या एरियात जाताच "बोल' कानी पडतात. हे बोल रस्त्यावरच्या हॉकर्सचे असतात. "ले लो ले लो...रस्ते का माल सस्ते में' म्हणत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अख्ख्या नागपूर शहरात प्रसिद्ध असलेले हे मार्केट खुलले. नागपूरकरांना पुन्हा येथे जाण्याचा मोह नक्कीच होणार. नागपूरकरांनो तुम्ही नक्की जा. परंतु सावधान... या मार्केटमध्ये दुकाने "ऑड-इव्हन'चा फार्म्युला पाळत असले तरी एक धोक्‍याची मोठी घंटा येथे खणखणताना दिसते.   शासनाने टप्प्याटप्याने परवानगी दिल्याने "मिशन बिगीन अगेन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सीताबर्डी मार्केटनेही "पुनश्‍च हरिओम'चा मंत्र जपला. पहिल्याच दिवशी सीताबर्डीचा मुख्य मार्ग ग्राहकांनी दुतर्फा फुलला होता. बाजारात परतलेले चैतन्य "होंगे कामयाब'चा विश्‍वास देणारे असले तरी याच चैतन्यातून कुठेतरी धोक्‍याची सूचनाही मिळत होती.   आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने ग्राहकही मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले. बाजारातील गर्दी व्यावसायिक आणि ग्राहकांचाही विश्‍वास वाढविणारीच होती. नागपूरचे हृदय असणाऱ्या सीताबर्डी बाजारात "ऑड इव्हन' फॉर्म्यूल्याचे कटाक्षाने पालन होताना दिसले. केवळ डाव्या बाजूचीच दुकाने सोमवारी उघडी होती. समोरच्या भागातील प्रतिष्ठानांची संपूर्ण रांगच बंद होती. तरीही एक गोष्ट सतत खटकत होती. खासगी चालकांची आर्थिक चाके खोलात, ही आहेत कारणे... नागपूरकरांच्या बोलण्यात, वागण्यात, स्वभावातच एक वेगळा बिनधास्तपणा आहे. तोच बिनधास्तपणा आजही दिसून आला. ओसंडून वाहणाऱ्या गर्दीत भौतिक अंतराचे कुठेही पालन होताना दिसले नाही. कारवाईच्या भीतीने मास्क किंवा दुपट्टे प्रत्येकाकडे होते खरे. परंतु त्या मास्कने नाक आणि तोंड झाकण्याऐवजी बहुसंख्यकांनी ते मानेभोवती गुंडाळून ठेवण्यातच धन्यता मानल्याचे दिसले. सोमवारपासून शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठा सुरू झाल्या. सम-विषमची भानगड अजूनही व्यावसायिकांच्या पचनी पडली नसल्याचे रस्त्याच्या दुतर्फा सुरू असणाऱ्या प्रतिष्ठानांवरून लक्षात आले. फुटपाथ विक्रेत्यांनी दोन्ही भागातील फुटपाथ व्यापले होते. यामुळे दुकानदारांनी नियमांचे पालन करूनही शिस्त पूर्णत: विस्कटलेली होती. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने ग्राहकही मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले. बाजारातील गर्दी व्यावसायिक आणि ग्राहकांचाही विश्‍वास वाढविणारीच होती. नागपूरकरांच्या बोलण्या, वागण्यात, स्वभावातील बिनधास्तपणा कोरोनाच्या संकटकाळात नक्‍कीच परवडणारा नाही. हाच मोकळाधाकळा बाणा कोरोनाच्या मगरमिठीकडे नेणारा असल्याने नागरिकांनीच स्वत:हून काळजी घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. उपराजधानीत दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढतोय, रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस बढतीवरच आहे. त्यामुळे कुठून कसा कोरोना येईल आणि तुम्हाला मगरमिठीत घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सीताबर्डी किंवा इतरही गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग तसेच इतरही नियम पाळाल तरच कोरोनाला दूर ठेवता येईल.   मनपा आयुक्‍तांची भेट घेऊ शहरात 40 हजार हॉकर्स असून, सर्व जण स्वाभिमानाने व्यवसाय करतात. लॉकडाऊनमुळे तीन महिने घरातच बसून रहावे लागले. तेही मेटाकुटीस आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार सीताबर्डी मेन रोडवर त्यांच्यासाठी लाल आणि पिवळ्या पट्टया आखून दिल्या आहेत. मर्यादेत राहूनच सर्व जण व्यवसाय करीत आहेत. कोरोनाचे संकट पाहता सोशल डिस्टन्सिंग आवश्‍यक आहे. त्यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेऊन दोन्ही भागातील हॉकर्सना मर्यादा घालून व्यवसाय करू देण्याची मागणी करणार आहे. आमदार प्रकाश गजभिये, हॉकर्स असोसिएशनचे नेते   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cMDX9i
Read More
50 वर्षांपूर्वी "टेलेंडर्स'नी राखली होती विदर्भ रणजी संघाची लाज! 

नागपूर : प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ताजमहालनगरीत (आग्रा येथे) तब्बल 50 वर्षांपूर्वी विदर्भ आणि यजमान उत्तर प्रदेश संघांत एक रोमांचक रणजी लढत झाली होती. उत्तर प्रदेशचे वेगवान गोलंदाज असद कासिम विरुद्ध विदर्भाच्या फलंदाजादरम्यान रंगलेल्या जुगलबंदीने गाजलेल्या त्या सामन्यात पराभवाच्या उंबरठ्यावर असताना विदर्भाच्या "टेलेंडर्स'नी अटीतटीच्या प्रसंगी चिवट फलंदाजीचे प्रदर्शन करीत यजमानांच्या आशेवर पाणी फेरले. सुवर्णसंधी असूनही अगदी थोडक्‍यात विजय हुकल्याचे दु:ख उत्तर प्रदेशच्या खेळाडूंना कित्येक वर्षेपर्यंत सलत राहिले. 

1970 मध्ये 16 ते 18 जानेवारीदरम्यान कडाक्‍याच्या थंडीत झालेल्या तीनदिवसीय सामन्यात दोन्ही संघांमध्ये त्या काळातील रथीमहारथींचा समावेश होता. कर्णधार सुधीर साहू यांच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या विदर्भ संघात सलामीवीर विजय पिंप्रीकर, मूर्तिराजन, एम. एस. मनियन, अरुण ओगिराल, शिरीष नजबिले, प्रकाश सहस्त्रबुद्धे, चंदू काळीकर, आर. टंडन व आर. सिद्दीकीसारखे दिग्गज खेळाडू होते. तर, "होमग्राउंड'वर खेळलेल्या उत्तर प्रदेश संघात कर्णधार डी. नौटियाल, के. एस. चमनलाल, रफिउल्लाह खान, शराफुद्दीन, ए. कासिम, जी. माजिद, ए. घोष, एन. कपूर व असद कासिमसारखे दर्जेदार फलंदाज व गोलंदाज होते. हवेतील गारठ्यामुळे खेळपट्‌टीत ओलावा असूनही उत्तर प्रदेशने पहिल्या डावात 292 धावांपर्यंत मजल मारली. कपूर यांनी सर्वाधिक 62, माजिद यांनी 48 व शराफुद्दीन यांनी 48 धावा काढून संघाला तीनशेपर्यंत पोहोचविले होते. विदर्भाकडून फिरकीपटू ओगिराल यांनी पाच बळी टिपून उत्तर प्रदेशला कमी धावांमध्ये थोपविण्याचा प्रयत्न केला. 
 

 हेही वाचा : यवतमाळकरांनी पाहिली हिरवाणीच्या फिरकीची कमाल

या धावसंख्येचा पाठलाग करताना कासिम यांच्या तुफान माऱ्यापुढे विदर्भाचे पहिले चार फलंदाज पन्नीशीतच गारद झाले. मात्र, त्यानंतर कर्णधार साहू (42 धावा), टंडन (39 धावा) व सहस्त्रबुद्धे (33 धावा) यांच्या योगदानामुळे विदर्भ कसाबसा 171 धावांपर्यंत पोहोचू शकला. कासिम यांच्याप्रमाणेच फिरकीपटू रफिउल्लाह खान यांनीही चार बळी टिपून उत्तर प्रदेशला 121 धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. भक्‍कम आघाडी पाठीशी असली तरी उत्तर प्रदेशला दुसऱ्या डावातही फलंदाजीतील सातत्य कायम राखणे आवश्‍यक होते. पण, विदर्भाच्या गोलंदाजांनी यजमानांच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकूच दिले नाही. वेगवान गोलंदाज मनियन (तीन बळी) व काळीकर (चार बळी) यांच्या अचूक माऱ्यापुढे उत्तर प्रदेशचा दुसरा डाव अवघ्या 108 धावांमध्ये संपुष्टात आला. 

हेही वाचा  : *राजस्थानवरील विजयानंतरही राहिला विदर्भ बादफेरीपासून वंचित, वाचा काय झाले असावे...* 

"टेलेंडर्स'चा जिगरबाज खेळ 
वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर 230 धावांचे विजयी लक्ष्य विदर्भासाठी फारच अवघड होते. त्यामुळे सामना वाचविण्याच्या दृष्टीनेच विदर्भाचे खेळाडू दुसऱ्या डावात मैदानात उतरले. परंतु, उत्तर प्रदेशला कोणत्याही परिस्थितीत निर्णायक विजय हवा होता. अशा परिस्थितीत कासिम यांच्यावरच त्यांच्या सर्व आशा टिकून होत्या. कासिम यांनीही नाराज केले नाही. त्यांनी विदर्भाची दाणादाण उडवत पहिले सहाही फलंदाज चाळिशीमध्येच माघारी पाठविले. त्यामुळे विदर्भाचा दारुण पराभव जवळपास निश्‍चित होता. उत्तर प्रदेशलाही विजयाची चाहूल लागली होती. या नाजूक प्रसंगी ओगिराल यांनी (नाबाद 30 धावा) टंडन (11 धावा) व तळातील अन्य फलंदाजांच्या मदतीने किल्ला लढवून उत्तर प्रदेशला विजयापासून वंचित ठेवले. कासिम यांनी दुसऱ्या डावात सात (एकूण 11 बळी) गडी बाद करून विदर्भाच्या तोंडचे पाणी पळविले होते. सामना अनिर्णीत संपला तेव्हा, विदर्भाची 9 बाद 76 अशी दयनीय अवस्था झाली होती. संघाची लाज राखल्याबद्दल विदर्भाच्या सर्व खेळाडूंनी ओगिराल यांची पाठ थोपटली. त्याचवेळी उत्तर प्रदेशचे खेळाडू मात्र स्वत:च्या नशिबाला दोष देत होते. 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

50 वर्षांपूर्वी "टेलेंडर्स'नी राखली होती विदर्भ रणजी संघाची लाज!  नागपूर : प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ताजमहालनगरीत (आग्रा येथे) तब्बल 50 वर्षांपूर्वी विदर्भ आणि यजमान उत्तर प्रदेश संघांत एक रोमांचक रणजी लढत झाली होती. उत्तर प्रदेशचे वेगवान गोलंदाज असद कासिम विरुद्ध विदर्भाच्या फलंदाजादरम्यान रंगलेल्या जुगलबंदीने गाजलेल्या त्या सामन्यात पराभवाच्या उंबरठ्यावर असताना विदर्भाच्या "टेलेंडर्स'नी अटीतटीच्या प्रसंगी चिवट फलंदाजीचे प्रदर्शन करीत यजमानांच्या आशेवर पाणी फेरले. सुवर्णसंधी असूनही अगदी थोडक्‍यात विजय हुकल्याचे दु:ख उत्तर प्रदेशच्या खेळाडूंना कित्येक वर्षेपर्यंत सलत राहिले.  1970 मध्ये 16 ते 18 जानेवारीदरम्यान कडाक्‍याच्या थंडीत झालेल्या तीनदिवसीय सामन्यात दोन्ही संघांमध्ये त्या काळातील रथीमहारथींचा समावेश होता. कर्णधार सुधीर साहू यांच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या विदर्भ संघात सलामीवीर विजय पिंप्रीकर, मूर्तिराजन, एम. एस. मनियन, अरुण ओगिराल, शिरीष नजबिले, प्रकाश सहस्त्रबुद्धे, चंदू काळीकर, आर. टंडन व आर. सिद्दीकीसारखे दिग्गज खेळाडू होते. तर, "होमग्राउंड'वर खेळलेल्या उत्तर प्रदेश संघात कर्णधार डी. नौटियाल, के. एस. चमनलाल, रफिउल्लाह खान, शराफुद्दीन, ए. कासिम, जी. माजिद, ए. घोष, एन. कपूर व असद कासिमसारखे दर्जेदार फलंदाज व गोलंदाज होते. हवेतील गारठ्यामुळे खेळपट्‌टीत ओलावा असूनही उत्तर प्रदेशने पहिल्या डावात 292 धावांपर्यंत मजल मारली. कपूर यांनी सर्वाधिक 62, माजिद यांनी 48 व शराफुद्दीन यांनी 48 धावा काढून संघाला तीनशेपर्यंत पोहोचविले होते. विदर्भाकडून फिरकीपटू ओगिराल यांनी पाच बळी टिपून उत्तर प्रदेशला कमी धावांमध्ये थोपविण्याचा प्रयत्न केला.     हेही वाचा : यवतमाळकरांनी पाहिली हिरवाणीच्या फिरकीची कमाल या धावसंख्येचा पाठलाग करताना कासिम यांच्या तुफान माऱ्यापुढे विदर्भाचे पहिले चार फलंदाज पन्नीशीतच गारद झाले. मात्र, त्यानंतर कर्णधार साहू (42 धावा), टंडन (39 धावा) व सहस्त्रबुद्धे (33 धावा) यांच्या योगदानामुळे विदर्भ कसाबसा 171 धावांपर्यंत पोहोचू शकला. कासिम यांच्याप्रमाणेच फिरकीपटू रफिउल्लाह खान यांनीही चार बळी टिपून उत्तर प्रदेशला 121 धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. भक्‍कम आघाडी पाठीशी असली तरी उत्तर प्रदेशला दुसऱ्या डावातही फलंदाजीतील सातत्य कायम राखणे आवश्‍यक होते. पण, विदर्भाच्या गोलंदाजांनी यजमानांच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकूच दिले नाही. वेगवान गोलंदाज मनियन (तीन बळी) व काळीकर (चार बळी) यांच्या अचूक माऱ्यापुढे उत्तर प्रदेशचा दुसरा डाव अवघ्या 108 धावांमध्ये संपुष्टात आला.  हेही वाचा  : *राजस्थानवरील विजयानंतरही राहिला विदर्भ बादफेरीपासून वंचित, वाचा काय झाले असावे...*  "टेलेंडर्स'चा जिगरबाज खेळ  वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर 230 धावांचे विजयी लक्ष्य विदर्भासाठी फारच अवघड होते. त्यामुळे सामना वाचविण्याच्या दृष्टीनेच विदर्भाचे खेळाडू दुसऱ्या डावात मैदानात उतरले. परंतु, उत्तर प्रदेशला कोणत्याही परिस्थितीत निर्णायक विजय हवा होता. अशा परिस्थितीत कासिम यांच्यावरच त्यांच्या सर्व आशा टिकून होत्या. कासिम यांनीही नाराज केले नाही. त्यांनी विदर्भाची दाणादाण उडवत पहिले सहाही फलंदाज चाळिशीमध्येच माघारी पाठविले. त्यामुळे विदर्भाचा दारुण पराभव जवळपास निश्‍चित होता. उत्तर प्रदेशलाही विजयाची चाहूल लागली होती. या नाजूक प्रसंगी ओगिराल यांनी (नाबाद 30 धावा) टंडन (11 धावा) व तळातील अन्य फलंदाजांच्या मदतीने किल्ला लढवून उत्तर प्रदेशला विजयापासून वंचित ठेवले. कासिम यांनी दुसऱ्या डावात सात (एकूण 11 बळी) गडी बाद करून विदर्भाच्या तोंडचे पाणी पळविले होते. सामना अनिर्णीत संपला तेव्हा, विदर्भाची 9 बाद 76 अशी दयनीय अवस्था झाली होती. संघाची लाज राखल्याबद्दल विदर्भाच्या सर्व खेळाडूंनी ओगिराल यांची पाठ थोपटली. त्याचवेळी उत्तर प्रदेशचे खेळाडू मात्र स्वत:च्या नशिबाला दोष देत होते.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UjqyiP
Read More
अमेरिकी सिनेटरला चीनचे पुरावे सादर करण्याचे आव्हान

बीजिंग - पाश्‍चिमात्य देशांत कोरोनावरील लस संशोधनासाठी सुरू असलेले प्रयत्न धीमे करण्याचा किंवा ते उधळून लावण्याचा आरोप करणाऱ्या अमेरिकी सिनेटरला चीनने पुरावे मागितले आहेत. रिक स्कॉट यांनी हा आरोप केल्यानंतर चोवीस तास उलटण्याच्या आत चीनतर्फे प्रत्युत्तर देण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वॉशिंग्टनमध्ये रविवारी स्कॉट यांनी ‘बीबीसी टीव्ही’ला मुलाखत दिली. ते म्हणाले होते, की ‘‘आपण लस आधी विकसित करावी अशी चीनची इच्छा नाही, त्यामुळे अमेरिका तसेच माझ्यामते देशभरातील लोकशाहीसाठी शत्रू बनायचे चीनने ठरविले आहे.’’ त्यांना पुराव्यांचा तपशील मागण्यात आला, तेव्हा नकार दर्शवित ही माहिती गुप्तचर संस्थेकडून मिळाली, इतकेच त्यांनी सांगितले.

भारतात तब्बल ७ हजार कोटींची गुंतवणूक; कसा टाकणार चीनी वस्तूंवर बहिष्कार?

या संदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुनयिंग यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले, की ते सिनेटर पुरावे असल्याचे म्हणत आहेत, तर कृपया त्यांनी ते सादर करावेत, त्यासाठी आढेवेढे घेण्याची गरज नाही.

कोरोना संसर्गाच्या माहितीबाबत चीनने कुचराई केल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी केला आहे. ‘चिनी विषाणू’ असाही उल्लेख झाला. चीनने मात्र जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्ल्यूएचओ) सर्व देशांना वेळीच सुचित केल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानी चौकीबाहेर गाढव ओरडतेय जोर-जोरात...

लस तयार करणे ही काही दोन देशांमधील स्पर्धा नाही. अमेरिकेने लस तयार केली तर तेसुद्धा चीनच्या प्रतिज्ञेचे अनुकरण करतील आणि ती साऱ्या जगाला मोफत उपलब्ध करतील अशी आम्हाला आशा आहे.
- हुआ चुनयिंग, चीनच्या परराष्ट्र प्रवक्‍त्या

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अमेरिकी सिनेटरला चीनचे पुरावे सादर करण्याचे आव्हान बीजिंग - पाश्‍चिमात्य देशांत कोरोनावरील लस संशोधनासाठी सुरू असलेले प्रयत्न धीमे करण्याचा किंवा ते उधळून लावण्याचा आरोप करणाऱ्या अमेरिकी सिनेटरला चीनने पुरावे मागितले आहेत. रिक स्कॉट यांनी हा आरोप केल्यानंतर चोवीस तास उलटण्याच्या आत चीनतर्फे प्रत्युत्तर देण्यात आले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा वॉशिंग्टनमध्ये रविवारी स्कॉट यांनी ‘बीबीसी टीव्ही’ला मुलाखत दिली. ते म्हणाले होते, की ‘‘आपण लस आधी विकसित करावी अशी चीनची इच्छा नाही, त्यामुळे अमेरिका तसेच माझ्यामते देशभरातील लोकशाहीसाठी शत्रू बनायचे चीनने ठरविले आहे.’’ त्यांना पुराव्यांचा तपशील मागण्यात आला, तेव्हा नकार दर्शवित ही माहिती गुप्तचर संस्थेकडून मिळाली, इतकेच त्यांनी सांगितले. भारतात तब्बल ७ हजार कोटींची गुंतवणूक; कसा टाकणार चीनी वस्तूंवर बहिष्कार? या संदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुनयिंग यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले, की ते सिनेटर पुरावे असल्याचे म्हणत आहेत, तर कृपया त्यांनी ते सादर करावेत, त्यासाठी आढेवेढे घेण्याची गरज नाही. कोरोना संसर्गाच्या माहितीबाबत चीनने कुचराई केल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी केला आहे. ‘चिनी विषाणू’ असाही उल्लेख झाला. चीनने मात्र जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्ल्यूएचओ) सर्व देशांना वेळीच सुचित केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी चौकीबाहेर गाढव ओरडतेय जोर-जोरात... लस तयार करणे ही काही दोन देशांमधील स्पर्धा नाही. अमेरिकेने लस तयार केली तर तेसुद्धा चीनच्या प्रतिज्ञेचे अनुकरण करतील आणि ती साऱ्या जगाला मोफत उपलब्ध करतील अशी आम्हाला आशा आहे. - हुआ चुनयिंग, चीनच्या परराष्ट्र प्रवक्‍त्या News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YgFkbi
Read More
कोविड १९ : ग्रामीण भागासाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करा - डॉ. नितीन राऊत

कोविड १९ : ग्रामीण भागासाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करा - डॉ. नितीन राऊत

June 08, 2020 0 Comments
अनलॉक-१ सुरु झाले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी दक्षता घेण्या...
Read More
कोरोना निदान चाचणीचे शुल्कासंबंधी राज्य सरकार उचलणार पावले

पुणे - राज्यातील खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना निदान चाचणीचे शुल्क साडेचार हजार रुपयांवरून सोळाशे ते दोन हजार रुपयांपर्यंत कमी करण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहेत. त्यासाठी स्थापन करण्यात आलेली वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातील तज्ज्ञांची स्वतंत्र समिती या शुल्क फेररचनेचा अभ्यास करत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कोरोना निदान चाचण्या करणारे राज्य ठरले. यात खासगी प्रयोगशाळांचीही महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, या चाचणीचे शुल्क ही सगळ्यात मोठी समस्या ठरत असल्याचे दिसते. कारण, कोरोना उद्रेकामुळे व्यवसाय कमी झाला आहे.

कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात झाली आहे. काहीजण बेरोजगार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना निदान चाचण्यांचे शुल्क कमी करता येईल का, ती किती कमी करता येईल, या बाबत राज्य सरकार चाचपणी करत आहे. त्यात सुमारे साडेचार हजारांची चाचणी साळाशे ते दोन हजार रुपयांपर्यंत होईल, या दृष्टीने सरकार पावले टाकत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

'सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांनो, परीक्षेचं टेन्शन घेऊ नका; ही बातमी वाचा!

कोरोना निदानाची चाचणीपद्धत
कोरोनाच्या निदानासाठी ‘रिअल टाइम पॉलिमरेज चेन रिॲक्‍शन’ (आरटी-पीसीआर) आणि ‘जेनेक्‍सपर्ट’ या दोन पद्धतींचा वापर होतो. त्यापैकी आरटी-पीसीआर प्रकारच्या चाचणीचे शुल्क कमी करण्याचे विचाराधीन आहे. 

म्हणून शुल्क कमी करणे शक्‍य
रुग्णाचा घेतलेला स्वॅब प्रयोगशाळेपर्यंत आणण्यासाठी रिएजंट आणि लिक्विड लागते. तसेच, प्रत्यक्ष तपासणीसाठी रोगनिदान किट आवश्‍यक असते. याच बरोबर पीपीई (पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट) किट अत्यावश्‍यक आहे. अशा प्रत्येक घटकाच्या किंमतीवर समितीकडून अभ्यास करण्यात आला. प्रत्येक चाचणीसाठी साडेचार हजार रुपये शुल्क निश्‍चित केले तेव्हा रिएजंट परदेशातून आयात करत होतो. ते आता देशात उत्पादन होत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे त्याचे दर आता कमी झाल्याने कोरोना रोगनिदान चाचणीचे शुल्कदेखील कमी करण्याचा विचार सरकार करत आहे.

'राष्ट्रवादी'तर्फे निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन; विद्यार्थ्यांसोबत तज्ज्ञांसाठी सुवर्णसंधी!

मांडलेला आराखडा

प्रयोगशाळाने रोज पाच चाचण्या केल्यास प्रतीचाचणी १६०० ते २००० रुपये खर्च. 

२५ पर्यंत चाचण्या केल्यास तोच खर्च १२०० रुपयांपर्यंत. 

२५ पेक्षा जास्त चाचण्यांची संख्या असल्यास ८०० ते १००० रुये खर्च

News Story Feeds https://ift.tt/2zgtyoT

कोरोना निदान चाचणीचे शुल्कासंबंधी राज्य सरकार उचलणार पावले पुणे - राज्यातील खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना निदान चाचणीचे शुल्क साडेचार हजार रुपयांवरून सोळाशे ते दोन हजार रुपयांपर्यंत कमी करण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहेत. त्यासाठी स्थापन करण्यात आलेली वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातील तज्ज्ञांची स्वतंत्र समिती या शुल्क फेररचनेचा अभ्यास करत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कोरोना निदान चाचण्या करणारे राज्य ठरले. यात खासगी प्रयोगशाळांचीही महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, या चाचणीचे शुल्क ही सगळ्यात मोठी समस्या ठरत असल्याचे दिसते. कारण, कोरोना उद्रेकामुळे व्यवसाय कमी झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात झाली आहे. काहीजण बेरोजगार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना निदान चाचण्यांचे शुल्क कमी करता येईल का, ती किती कमी करता येईल, या बाबत राज्य सरकार चाचपणी करत आहे. त्यात सुमारे साडेचार हजारांची चाचणी साळाशे ते दोन हजार रुपयांपर्यंत होईल, या दृष्टीने सरकार पावले टाकत असल्याची माहिती पुढे आली आहे.  'सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांनो, परीक्षेचं टेन्शन घेऊ नका; ही बातमी वाचा! कोरोना निदानाची चाचणीपद्धत कोरोनाच्या निदानासाठी ‘रिअल टाइम पॉलिमरेज चेन रिॲक्‍शन’ (आरटी-पीसीआर) आणि ‘जेनेक्‍सपर्ट’ या दोन पद्धतींचा वापर होतो. त्यापैकी आरटी-पीसीआर प्रकारच्या चाचणीचे शुल्क कमी करण्याचे विचाराधीन आहे.  म्हणून शुल्क कमी करणे शक्‍य रुग्णाचा घेतलेला स्वॅब प्रयोगशाळेपर्यंत आणण्यासाठी रिएजंट आणि लिक्विड लागते. तसेच, प्रत्यक्ष तपासणीसाठी रोगनिदान किट आवश्‍यक असते. याच बरोबर पीपीई (पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट) किट अत्यावश्‍यक आहे. अशा प्रत्येक घटकाच्या किंमतीवर समितीकडून अभ्यास करण्यात आला. प्रत्येक चाचणीसाठी साडेचार हजार रुपये शुल्क निश्‍चित केले तेव्हा रिएजंट परदेशातून आयात करत होतो. ते आता देशात उत्पादन होत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे त्याचे दर आता कमी झाल्याने कोरोना रोगनिदान चाचणीचे शुल्कदेखील कमी करण्याचा विचार सरकार करत आहे. 'राष्ट्रवादी'तर्फे निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन; विद्यार्थ्यांसोबत तज्ज्ञांसाठी सुवर्णसंधी! मांडलेला आराखडा प्रयोगशाळाने रोज पाच चाचण्या केल्यास प्रतीचाचणी १६०० ते २००० रुपये खर्च.  २५ पर्यंत चाचण्या केल्यास तोच खर्च १२०० रुपयांपर्यंत.  २५ पेक्षा जास्त चाचण्यांची संख्या असल्यास ८०० ते १००० रुये खर्च News Story Feeds https://ift.tt/2zgtyoT

June 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cLsbvO
Read More
"त्या' व्हिडिओप्रकरणी जाणून घ्या उपराजधानीतील धक्‍कादायक वास्तव...

नागपूर : जवळपास प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्टफोन आणि स्वस्त असलेल्या इंटरनेटमुळे अल्पवयीनांसह तरुण-तरुणी पॉर्न व्हिडिओंची देवाण-घेवाण करण्यामध्ये एक्‍स्पर्ट झाले आहेत. उपराजधानीत गेल्या दीड वर्षात पॉर्न व्हिडिओ पाठविणे किंवा अश्‍लील फोटो पाठविण्यासंदर्भात तब्बल 53 गुन्हे दाखल झाले आहेत. या आरोपींमध्ये तरुणींचाही समावेश असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

देशात संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्याने पॉर्न वेबसाईट्‌सवर व्हिजिट करणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. तसेच वेबवाईटवरून पॉर्न डाऊनलोड करणे आणि सोशल मीडियाद्वारे शेअर करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. सध्याच्या स्थितीत पॉर्न बेवसाईट्‌सवर जाऊन पॉर्न बघणाऱ्यांमध्ये मुली व महिलांचा टक्‍काही लक्षणीयरीत्या वाढला आहे.

यात अल्पवयीन मुलींचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे अलीकडच्या काळातील काही सर्वेक्षणांतून स्पष्ट झाले आहे. महिला किंवा तरुणींना पॉर्न व्हिडिओ पाठविल्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी गेल्या दीड वर्षांत 53 गुन्हे दाखल केले आहेत.

कौटुंबिक कलहातून तरुणाने उचलले हे टोकाचे पाऊल

यात तीन आरोपींनी स्वतःच्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना मोबाईलने अश्‍लील व्हिडिओ आणि फोटो काढल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. उपराजधानीत कॉलेजवयीन तरुण-तरुणींमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहण्याची क्रेझ आहे. त्यामुळे अनेक वेबसाईट्‌सवरून व्हिडिओ डाऊनलोड करणे आणि व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून शेअर करण्याचे प्रमाणही वाढले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे जवळपास 90 टक्‍के लोक घरीच आहेत. या कालावधीत अश्‍लील चित्रफिती आणि फोटोंसाठी प्रसिद्ध असलेल्या पॉर्न बेवसाईटवर युवावर्गासह वयोवृद्धांकडून होणाऱ्या सर्चिंगचे प्रमाण वाढले आहे. सर्चिंग हे प्रमाण जवळपास दुप्पट झाल्याचे दिसून आले. पॉर्नचा वाढता प्रसार पाहता नागपूर सायबर पोलिसांनी वॉच ठेवणे सुरू केले आहे. पॉर्नची सर्चिंग किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्यावर आयपीसीच्या 149, आयटी ऍक्‍टच्या सेक्‍शन 67 (अ,ब,क) नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
 

गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले

सायबर क्राईमकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवसेंदिवस पॉर्न बघणाऱ्यांची संख्या वाढल्याने अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. व्हॉट्‌स ऍपमुळे अश्‍लील चित्रफितींची देवाण-घेवाणही वाढली. तसेच प्रेयसीचे अश्‍लील व्हिडिओ किंवा फोटो काढून ते सोशल मीडियावर पसरविण्याचे गुन्हेही वाढले आहे. उपराजधानीतील हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे.

व्हॉट्‌स ऍप ग्रुपमधून ब्ल्यू फिल्म

16 ते 30 वयोगटातील मुली आणि महिला या व्हॉट्‌स ऍपवरून डाऊनलोड करून ब्ल्यू फिल्म पाहतात. काही तरुणी थेट ऑनलाईन व्हिडीओ पाहतात. काही शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुणींचे विशेष व्हॉट्‌स ऍप ग्रुप असतात. ज्यामध्ये फक्‍त मैत्रिणी आणि कॉलेजच्या फ्रेंडस असतात. अशा ग्रुप्समधून मोठ्या प्रमाणात ब्ल्यू फिल्मची देवाणघेवाण होते.
 

कोणत्यावेळी कोण करते सर्च

तरुण मुले दुपारी बारा ते 4 आणि रात्री अकरा ते दोन वाजेपर्यंत सर्वाधिक पॉर्न वेबसाईट सर्च करतात. तर शाळकरी व महाविद्यालयीन मुली दुपारी एक ते चार आणि रात्री अकरा ते एक वाजेपर्यंत ब्ल्यू फिल्म पाहतात. वेगळी बेडरूम असलेल्या तरूणींमध्ये ब्ल्यू फिल्म पाहण्याचे प्रमाण जास्त आहे. तर महिला दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान पॉर्न बघातात, अशी माहिती आहे.
 

ब्ल्यू फिल्म पाहणाऱ्यामध्ये अल्पवयीन

सायबर क्राईमकडून मिळालेल्या माहितीनुसार, पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये 24 टक्‍के तरूणी ऑनलाईन पॉर्न साईट्‌स पाहतात. 3.8 टक्‍के तरूणी रोज मोबाईलमध्ये ब्ल्यू फिल्म पाहतात. तर 2.5 टक्‍के तरूणी अधून-मधून ऑनलाईन ब्ल्यू फिल्म पाहतात. तसेच 7.1 टक्‍के जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मोबाईलवर अश्‍लिल चित्रिफिती किंवा फोटो पाहतात. तर 16 टक्‍के तरूणी थेट मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ब्ल्यू फिल्म पाहतात.

वर्ष गुन्हे

2019 : 31

2020 : (जून) 22

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"त्या' व्हिडिओप्रकरणी जाणून घ्या उपराजधानीतील धक्‍कादायक वास्तव... नागपूर : जवळपास प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्टफोन आणि स्वस्त असलेल्या इंटरनेटमुळे अल्पवयीनांसह तरुण-तरुणी पॉर्न व्हिडिओंची देवाण-घेवाण करण्यामध्ये एक्‍स्पर्ट झाले आहेत. उपराजधानीत गेल्या दीड वर्षात पॉर्न व्हिडिओ पाठविणे किंवा अश्‍लील फोटो पाठविण्यासंदर्भात तब्बल 53 गुन्हे दाखल झाले आहेत. या आरोपींमध्ये तरुणींचाही समावेश असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. देशात संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्याने पॉर्न वेबसाईट्‌सवर व्हिजिट करणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. तसेच वेबवाईटवरून पॉर्न डाऊनलोड करणे आणि सोशल मीडियाद्वारे शेअर करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. सध्याच्या स्थितीत पॉर्न बेवसाईट्‌सवर जाऊन पॉर्न बघणाऱ्यांमध्ये मुली व महिलांचा टक्‍काही लक्षणीयरीत्या वाढला आहे. यात अल्पवयीन मुलींचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे अलीकडच्या काळातील काही सर्वेक्षणांतून स्पष्ट झाले आहे. महिला किंवा तरुणींना पॉर्न व्हिडिओ पाठविल्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी गेल्या दीड वर्षांत 53 गुन्हे दाखल केले आहेत. कौटुंबिक कलहातून तरुणाने उचलले हे टोकाचे पाऊल यात तीन आरोपींनी स्वतःच्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना मोबाईलने अश्‍लील व्हिडिओ आणि फोटो काढल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. उपराजधानीत कॉलेजवयीन तरुण-तरुणींमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहण्याची क्रेझ आहे. त्यामुळे अनेक वेबसाईट्‌सवरून व्हिडिओ डाऊनलोड करणे आणि व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून शेअर करण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे जवळपास 90 टक्‍के लोक घरीच आहेत. या कालावधीत अश्‍लील चित्रफिती आणि फोटोंसाठी प्रसिद्ध असलेल्या पॉर्न बेवसाईटवर युवावर्गासह वयोवृद्धांकडून होणाऱ्या सर्चिंगचे प्रमाण वाढले आहे. सर्चिंग हे प्रमाण जवळपास दुप्पट झाल्याचे दिसून आले. पॉर्नचा वाढता प्रसार पाहता नागपूर सायबर पोलिसांनी वॉच ठेवणे सुरू केले आहे. पॉर्नची सर्चिंग किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्यावर आयपीसीच्या 149, आयटी ऍक्‍टच्या सेक्‍शन 67 (अ,ब,क) नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.   गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले सायबर क्राईमकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवसेंदिवस पॉर्न बघणाऱ्यांची संख्या वाढल्याने अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. व्हॉट्‌स ऍपमुळे अश्‍लील चित्रफितींची देवाण-घेवाणही वाढली. तसेच प्रेयसीचे अश्‍लील व्हिडिओ किंवा फोटो काढून ते सोशल मीडियावर पसरविण्याचे गुन्हेही वाढले आहे. उपराजधानीतील हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. व्हॉट्‌स ऍप ग्रुपमधून ब्ल्यू फिल्म 16 ते 30 वयोगटातील मुली आणि महिला या व्हॉट्‌स ऍपवरून डाऊनलोड करून ब्ल्यू फिल्म पाहतात. काही तरुणी थेट ऑनलाईन व्हिडीओ पाहतात. काही शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुणींचे विशेष व्हॉट्‌स ऍप ग्रुप असतात. ज्यामध्ये फक्‍त मैत्रिणी आणि कॉलेजच्या फ्रेंडस असतात. अशा ग्रुप्समधून मोठ्या प्रमाणात ब्ल्यू फिल्मची देवाणघेवाण होते.   कोणत्यावेळी कोण करते सर्च तरुण मुले दुपारी बारा ते 4 आणि रात्री अकरा ते दोन वाजेपर्यंत सर्वाधिक पॉर्न वेबसाईट सर्च करतात. तर शाळकरी व महाविद्यालयीन मुली दुपारी एक ते चार आणि रात्री अकरा ते एक वाजेपर्यंत ब्ल्यू फिल्म पाहतात. वेगळी बेडरूम असलेल्या तरूणींमध्ये ब्ल्यू फिल्म पाहण्याचे प्रमाण जास्त आहे. तर महिला दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान पॉर्न बघातात, अशी माहिती आहे.   ब्ल्यू फिल्म पाहणाऱ्यामध्ये अल्पवयीन सायबर क्राईमकडून मिळालेल्या माहितीनुसार, पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये 24 टक्‍के तरूणी ऑनलाईन पॉर्न साईट्‌स पाहतात. 3.8 टक्‍के तरूणी रोज मोबाईलमध्ये ब्ल्यू फिल्म पाहतात. तर 2.5 टक्‍के तरूणी अधून-मधून ऑनलाईन ब्ल्यू फिल्म पाहतात. तसेच 7.1 टक्‍के जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मोबाईलवर अश्‍लिल चित्रिफिती किंवा फोटो पाहतात. तर 16 टक्‍के तरूणी थेट मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ब्ल्यू फिल्म पाहतात. वर्ष गुन्हे 2019 : 31 2020 : (जून) 22   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37czxaJ
Read More