50 वर्षांपूर्वी "टेलेंडर्स'नी राखली होती विदर्भ रणजी संघाची लाज!  नागपूर : प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ताजमहालनगरीत (आग्रा येथे) तब्बल 50 वर्षांपूर्वी विदर्भ आणि यजमान उत्तर प्रदेश संघांत एक रोमांचक रणजी लढत झाली होती. उत्तर प्रदेशचे वेगवान गोलंदाज असद कासिम विरुद्ध विदर्भाच्या फलंदाजादरम्यान रंगलेल्या जुगलबंदीने गाजलेल्या त्या सामन्यात पराभवाच्या उंबरठ्यावर असताना विदर्भाच्या "टेलेंडर्स'नी अटीतटीच्या प्रसंगी चिवट फलंदाजीचे प्रदर्शन करीत यजमानांच्या आशेवर पाणी फेरले. सुवर्णसंधी असूनही अगदी थोडक्‍यात विजय हुकल्याचे दु:ख उत्तर प्रदेशच्या खेळाडूंना कित्येक वर्षेपर्यंत सलत राहिले.  1970 मध्ये 16 ते 18 जानेवारीदरम्यान कडाक्‍याच्या थंडीत झालेल्या तीनदिवसीय सामन्यात दोन्ही संघांमध्ये त्या काळातील रथीमहारथींचा समावेश होता. कर्णधार सुधीर साहू यांच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या विदर्भ संघात सलामीवीर विजय पिंप्रीकर, मूर्तिराजन, एम. एस. मनियन, अरुण ओगिराल, शिरीष नजबिले, प्रकाश सहस्त्रबुद्धे, चंदू काळीकर, आर. टंडन व आर. सिद्दीकीसारखे दिग्गज खेळाडू होते. तर, "होमग्राउंड'वर खेळलेल्या उत्तर प्रदेश संघात कर्णधार डी. नौटियाल, के. एस. चमनलाल, रफिउल्लाह खान, शराफुद्दीन, ए. कासिम, जी. माजिद, ए. घोष, एन. कपूर व असद कासिमसारखे दर्जेदार फलंदाज व गोलंदाज होते. हवेतील गारठ्यामुळे खेळपट्‌टीत ओलावा असूनही उत्तर प्रदेशने पहिल्या डावात 292 धावांपर्यंत मजल मारली. कपूर यांनी सर्वाधिक 62, माजिद यांनी 48 व शराफुद्दीन यांनी 48 धावा काढून संघाला तीनशेपर्यंत पोहोचविले होते. विदर्भाकडून फिरकीपटू ओगिराल यांनी पाच बळी टिपून उत्तर प्रदेशला कमी धावांमध्ये थोपविण्याचा प्रयत्न केला.     हेही वाचा : यवतमाळकरांनी पाहिली हिरवाणीच्या फिरकीची कमाल या धावसंख्येचा पाठलाग करताना कासिम यांच्या तुफान माऱ्यापुढे विदर्भाचे पहिले चार फलंदाज पन्नीशीतच गारद झाले. मात्र, त्यानंतर कर्णधार साहू (42 धावा), टंडन (39 धावा) व सहस्त्रबुद्धे (33 धावा) यांच्या योगदानामुळे विदर्भ कसाबसा 171 धावांपर्यंत पोहोचू शकला. कासिम यांच्याप्रमाणेच फिरकीपटू रफिउल्लाह खान यांनीही चार बळी टिपून उत्तर प्रदेशला 121 धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. भक्‍कम आघाडी पाठीशी असली तरी उत्तर प्रदेशला दुसऱ्या डावातही फलंदाजीतील सातत्य कायम राखणे आवश्‍यक होते. पण, विदर्भाच्या गोलंदाजांनी यजमानांच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकूच दिले नाही. वेगवान गोलंदाज मनियन (तीन बळी) व काळीकर (चार बळी) यांच्या अचूक माऱ्यापुढे उत्तर प्रदेशचा दुसरा डाव अवघ्या 108 धावांमध्ये संपुष्टात आला.  हेही वाचा  : *राजस्थानवरील विजयानंतरही राहिला विदर्भ बादफेरीपासून वंचित, वाचा काय झाले असावे...*  "टेलेंडर्स'चा जिगरबाज खेळ  वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर 230 धावांचे विजयी लक्ष्य विदर्भासाठी फारच अवघड होते. त्यामुळे सामना वाचविण्याच्या दृष्टीनेच विदर्भाचे खेळाडू दुसऱ्या डावात मैदानात उतरले. परंतु, उत्तर प्रदेशला कोणत्याही परिस्थितीत निर्णायक विजय हवा होता. अशा परिस्थितीत कासिम यांच्यावरच त्यांच्या सर्व आशा टिकून होत्या. कासिम यांनीही नाराज केले नाही. त्यांनी विदर्भाची दाणादाण उडवत पहिले सहाही फलंदाज चाळिशीमध्येच माघारी पाठविले. त्यामुळे विदर्भाचा दारुण पराभव जवळपास निश्‍चित होता. उत्तर प्रदेशलाही विजयाची चाहूल लागली होती. या नाजूक प्रसंगी ओगिराल यांनी (नाबाद 30 धावा) टंडन (11 धावा) व तळातील अन्य फलंदाजांच्या मदतीने किल्ला लढवून उत्तर प्रदेशला विजयापासून वंचित ठेवले. कासिम यांनी दुसऱ्या डावात सात (एकूण 11 बळी) गडी बाद करून विदर्भाच्या तोंडचे पाणी पळविले होते. सामना अनिर्णीत संपला तेव्हा, विदर्भाची 9 बाद 76 अशी दयनीय अवस्था झाली होती. संघाची लाज राखल्याबद्दल विदर्भाच्या सर्व खेळाडूंनी ओगिराल यांची पाठ थोपटली. त्याचवेळी उत्तर प्रदेशचे खेळाडू मात्र स्वत:च्या नशिबाला दोष देत होते.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, June 8, 2020

50 वर्षांपूर्वी "टेलेंडर्स'नी राखली होती विदर्भ रणजी संघाची लाज!  नागपूर : प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ताजमहालनगरीत (आग्रा येथे) तब्बल 50 वर्षांपूर्वी विदर्भ आणि यजमान उत्तर प्रदेश संघांत एक रोमांचक रणजी लढत झाली होती. उत्तर प्रदेशचे वेगवान गोलंदाज असद कासिम विरुद्ध विदर्भाच्या फलंदाजादरम्यान रंगलेल्या जुगलबंदीने गाजलेल्या त्या सामन्यात पराभवाच्या उंबरठ्यावर असताना विदर्भाच्या "टेलेंडर्स'नी अटीतटीच्या प्रसंगी चिवट फलंदाजीचे प्रदर्शन करीत यजमानांच्या आशेवर पाणी फेरले. सुवर्णसंधी असूनही अगदी थोडक्‍यात विजय हुकल्याचे दु:ख उत्तर प्रदेशच्या खेळाडूंना कित्येक वर्षेपर्यंत सलत राहिले.  1970 मध्ये 16 ते 18 जानेवारीदरम्यान कडाक्‍याच्या थंडीत झालेल्या तीनदिवसीय सामन्यात दोन्ही संघांमध्ये त्या काळातील रथीमहारथींचा समावेश होता. कर्णधार सुधीर साहू यांच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या विदर्भ संघात सलामीवीर विजय पिंप्रीकर, मूर्तिराजन, एम. एस. मनियन, अरुण ओगिराल, शिरीष नजबिले, प्रकाश सहस्त्रबुद्धे, चंदू काळीकर, आर. टंडन व आर. सिद्दीकीसारखे दिग्गज खेळाडू होते. तर, "होमग्राउंड'वर खेळलेल्या उत्तर प्रदेश संघात कर्णधार डी. नौटियाल, के. एस. चमनलाल, रफिउल्लाह खान, शराफुद्दीन, ए. कासिम, जी. माजिद, ए. घोष, एन. कपूर व असद कासिमसारखे दर्जेदार फलंदाज व गोलंदाज होते. हवेतील गारठ्यामुळे खेळपट्‌टीत ओलावा असूनही उत्तर प्रदेशने पहिल्या डावात 292 धावांपर्यंत मजल मारली. कपूर यांनी सर्वाधिक 62, माजिद यांनी 48 व शराफुद्दीन यांनी 48 धावा काढून संघाला तीनशेपर्यंत पोहोचविले होते. विदर्भाकडून फिरकीपटू ओगिराल यांनी पाच बळी टिपून उत्तर प्रदेशला कमी धावांमध्ये थोपविण्याचा प्रयत्न केला.     हेही वाचा : यवतमाळकरांनी पाहिली हिरवाणीच्या फिरकीची कमाल या धावसंख्येचा पाठलाग करताना कासिम यांच्या तुफान माऱ्यापुढे विदर्भाचे पहिले चार फलंदाज पन्नीशीतच गारद झाले. मात्र, त्यानंतर कर्णधार साहू (42 धावा), टंडन (39 धावा) व सहस्त्रबुद्धे (33 धावा) यांच्या योगदानामुळे विदर्भ कसाबसा 171 धावांपर्यंत पोहोचू शकला. कासिम यांच्याप्रमाणेच फिरकीपटू रफिउल्लाह खान यांनीही चार बळी टिपून उत्तर प्रदेशला 121 धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. भक्‍कम आघाडी पाठीशी असली तरी उत्तर प्रदेशला दुसऱ्या डावातही फलंदाजीतील सातत्य कायम राखणे आवश्‍यक होते. पण, विदर्भाच्या गोलंदाजांनी यजमानांच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकूच दिले नाही. वेगवान गोलंदाज मनियन (तीन बळी) व काळीकर (चार बळी) यांच्या अचूक माऱ्यापुढे उत्तर प्रदेशचा दुसरा डाव अवघ्या 108 धावांमध्ये संपुष्टात आला.  हेही वाचा  : *राजस्थानवरील विजयानंतरही राहिला विदर्भ बादफेरीपासून वंचित, वाचा काय झाले असावे...*  "टेलेंडर्स'चा जिगरबाज खेळ  वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर 230 धावांचे विजयी लक्ष्य विदर्भासाठी फारच अवघड होते. त्यामुळे सामना वाचविण्याच्या दृष्टीनेच विदर्भाचे खेळाडू दुसऱ्या डावात मैदानात उतरले. परंतु, उत्तर प्रदेशला कोणत्याही परिस्थितीत निर्णायक विजय हवा होता. अशा परिस्थितीत कासिम यांच्यावरच त्यांच्या सर्व आशा टिकून होत्या. कासिम यांनीही नाराज केले नाही. त्यांनी विदर्भाची दाणादाण उडवत पहिले सहाही फलंदाज चाळिशीमध्येच माघारी पाठविले. त्यामुळे विदर्भाचा दारुण पराभव जवळपास निश्‍चित होता. उत्तर प्रदेशलाही विजयाची चाहूल लागली होती. या नाजूक प्रसंगी ओगिराल यांनी (नाबाद 30 धावा) टंडन (11 धावा) व तळातील अन्य फलंदाजांच्या मदतीने किल्ला लढवून उत्तर प्रदेशला विजयापासून वंचित ठेवले. कासिम यांनी दुसऱ्या डावात सात (एकूण 11 बळी) गडी बाद करून विदर्भाच्या तोंडचे पाणी पळविले होते. सामना अनिर्णीत संपला तेव्हा, विदर्भाची 9 बाद 76 अशी दयनीय अवस्था झाली होती. संघाची लाज राखल्याबद्दल विदर्भाच्या सर्व खेळाडूंनी ओगिराल यांची पाठ थोपटली. त्याचवेळी उत्तर प्रदेशचे खेळाडू मात्र स्वत:च्या नशिबाला दोष देत होते.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2UjqyiP

No comments:

Post a Comment