ना फिल्में, ना रेडियो में नौकरी, जब मुंबई आए तो ये काम करते थे सुनील दत्त https://ift.tt/2Ui9QQV Latest news updates June 05, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
MP: मंदिरों में नहीं बजेंगे घंटे, मस्जिदों में नहीं होगा वुजू, गाइडलाइंस जारी https://ift.tt/3eUIqIv Latest news updates June 05, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
पुणेकरांनो भवानी पेठेत कोरोनावर नियंत्रण पुणे - "कोरोना'चा हॉटस्पॉट म्हणून भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाकडे आजपर्यंत पाहिले जात होते. परंतु गेल्या महिन्याभरात ही ओळख पुसण्यात कार्यालयाला यश आले. एकेकाळी क्रमांक एकवर असलेल्या या कार्यालयाने घरटी सर्व्हेक्षण.. सर्दी, ताप. खोकला असेल, तर तातडीने उपचार, अशा उपाययोजना राबविल्या. त्यामुळे ते आता दहाव्या क्रमांकावर घसरले आहे. सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या केवळ 121 आहे. आतापर्यंत तेथे 846 रुग्ण आढळले होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण नऊ मार्चला आढळला. त्यास चार दिवसांनी तीन महिने होत आहेत. या तीन महिन्यांत पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 7 हजार 265 हून अधिक झाली. क्षेत्रीय कार्यालयनिहाय रुग्णांची संख्या महापालिकेकडून दररोज प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार गुरुवारी (ता. 4) सर्वाधिक रुग्णांची संख्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असल्याचे दिसून आले. त्या खालोखाल येरवडा- कळस- धानोरी तर तिसऱ्या क्रमांकावर भवानी पेठ कार्यालयाअंतर्गत रुग्णांची संख्या आहे. तेथे रुग्णांची संख्या 865 असली, तर त्यामध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या केवळ 121 आहे. आजपर्यंत बाधितांच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर हे कार्यालय असले, तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाहिली, तर ते दहाव्या क्रमांकावर आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. उपचार घेणाऱ्यांची संख्याही तेथे मोठी आहे. बाधित रुग्णांची संख्या 1,560 असून उपचार घेणाऱ्यांची संख्या सुमारे 509 आहे. त्या खालोखाल येरवडा -कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आजपर्यंत बाधितांची संख्या 935 असून उपचार घेणाऱ्यांची संख्या 289 आहे. पंधरा क्षेत्रीय कार्यालयांत बाधित रुग्णांची संख्या आणि कंसात उपचार घेणाऱ्यांची संख्या पुढील प्रमाणे ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय : 1 हजार 560 ( 509) भवानीपेठ : 865 (121) घोले रोड : 624 (183) येरवडा- कळस-धानोरी : 935 (289) कसबा विश्रामबागवाडा : 646 ( 151) वानवडी-रामटेकडी 431 (184) बिबवेवाडी - 504 (213) नगर रस्ता- वडगावशेरी : 258 (180) धनकवडी- सहकारनगर : 300 (76) हडपसर- मुंढवा : 283 (137) कोंढवा- येवलेवाडी : 112 (34) औध - बाणेर : 48 (40) कोथरूड- बावधन : 46 (23) सिंहगड रस्ता : 280 (204) वारजे- कर्वेनगर: 48 (13) मृतदेह नेण्यासाठी नागरिकांनी काढले पत्रे; जयभवानी नगरमधील घटना! सहा हजारांवर रुग्णसंख्या पुणे महापालिकेची पंधरा क्षेत्रीय कार्यालये आहेत. गुरुवारपर्यंत पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 6 हजार 93 वर पोचली आहे. त्यापैकी आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या रुग्णांची संख्या ही 4 हजार 907 आहे. तर सात क्षेत्रीय कार्यालयात अंतर्गत रुग्णांची संख्या ही 1 हजार 186 असल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 05, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2AM2Gx7 Read More Read more No comments:
माढा तालुक्यात कोरोनाने मृत्यू; 40 जणांचे स्वॅब घेतले जाणार कुर्डू (सोलापूर) : लऊळ (ता. माढा) येथील एका महिलेचा उपचारादरम्यान सोलापूर येथे मृत्यू झाला असून या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या लऊळ, टेंभुर्णी येथील 40 जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. माढा तालुक्यात कोरोनाची एन्ट्री या अगोदर वरवडे येथील बाहेरून आलेल्या एका रुग्णामुळे आल्याची चर्चा होती. पण त्याचाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने वातावरण शांत झाले होते. आज सकाळी लऊळ येथील महिलेचा सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा, कोरोना समिती कामाला लागली असुन या वस्तीवरील एक किलोमीटर परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरातील सर्व्हेसाठी रवाना झाली आहे. सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक हे कुटुंब टेंभुर्णी येथील एका हॉटेलमध्ये काम करत होते. नऊ ते दहा महिन्यांपूर्वी लऊळ येथे त्यांच्या मूळ गावी वास्तव्याला आले आहे. हे कुटुंब गावापासून पाच किलोमीटरवर वस्तीवर वास्तव्याला असून या कुटुंबाचा गावात जास्त संपर्क नसल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेला कोरोनाची लक्षणे असल्याच्या संशयावरून लऊळ प्राथमिक आरोग्य केंद्राने 3 जूनला मोडनिंब येथील रुग्णालयात पाठविले होते. परंतु त्या महिलेचे माहेर टेंभुर्णी असल्याने व इतर आजाराचे उपचार ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे तपासणी केली असता तेथील डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यांनी टेंभुर्णी येथील एका खासगी दवाखान्यात पाठवले. त्यानुसार उपचारासाठी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. येथून सोलापूरला 108 या रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. व्ही. पलंगे यांनी सांगितली. सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. तिच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. दाखल करून घेण्यात आलेला स्वॅब पॉझिटिव्ह निघाल्याने लऊळ गावात खळबळ उडाली आहे. आरोग्य खाते, कोरोना समितीही सतर्क झाली असून या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत आहे. टेंभुर्णी येथून अकलूजच्या प्रवासासाठी नातेपुते येथील अनोळखी अलिशान गाडीतून प्रवास केला असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. तो अनोळखी नातेपुते येथील कोण याची चर्चा सुरू होती. या अहवालाची माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. व्ही. पलंगे व त्यांचे पथक, पोलिस पाटील चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश कांबळे, तलाठी राजाभाऊ आदलिंगे, कृषी सहायक शैलेश घुगे, बीट हवालदार माळी, स्वयंसेवक स्वप्नील जानराव, निलेश जानराव, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांनी त्या परिसरात कोणीही घराबाहेर पडू नका व इतर सूचना दिल्या. ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय मोरे म्हणाले, वस्ती गावापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. या कुटुंबांच्या संपर्कात गावातील एक डॉक्टर व कंपाउंडरसह टेंभुर्णी येथील नातेवाईक व अन्य, लऊळ येथील कोण कोण आहेत याची माहिती घेत असून सध्या 40 जणांचे स्वॅब घेण्यासाठी यादी तयार केली आहे. सरपंच प्रियंका कांबळे म्हणाल्या, गावामध्ये 1 जून ते 5 जून आम्ही जनता कर्फ्यू केला होता. तो आज संपत होता. पण या कोरोना पॉझिटिव्हमुळे आणखी 14 दिवस वाढ होत असून नागरिकांना याचे पालन करावे. या अगोदर गावात निर्जंतुकीकरणाची फवारणी केली असून आणखी फवारणी करणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 05, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2XzFXxn Read More Read more No comments:
VIDEO : कोरोना असो, नाहीतर ऊन-पाऊस; त्यांच्यासाठी सदैव कर्तव्य प्रथम! पिंपरी : कंटेन्मेट झोनच्या परिसरात जायचे म्हटले, तरी अनेकांना अक्षरश: धडकी भरते. मात्र, याच ठिकाणी पोलिस मात्र जीव धोक्यात घालून ड्युटी बजावत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे ऊन, वारा, पाऊस तर दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गाची भीती, अशा स्थितीत पोलिस मात्र बंदोबस्तावर तैनात आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविल्या जात आहेत. एखाद्या भागात रुग्ण आढळल्यास तो भाग कंटेन्मेट झोन म्हणून घोषित करून सील केला जात आहे. येथील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्या परिसरात तातडीने बंदोबस्तही तैनात केला जात आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 93 कंटेन्मेट झोन आहेत. या परिसरातील रस्त्यावरूनही ये-जा करताना कोरोनाच्या भीतीने सामान्य नागरिकाला अक्षरश: धडकी भरते. तर पोलिस मात्र ज्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक भीती आहे, अशा ठिकाणी जीव धोक्यात घालून ड्युटी बजावत आहेत. मात्र, येथील पोलिसांना साधा भक्कम निवाराही उपलब्ध करून दिलेला नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे बंदोबस्तावरील पोलिसांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली. डोक्यावर केवळ कापडी छत असल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी जायचे कुठे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला. कंटेन्मेट झोन असल्याने आसरा घेण्यासाठी आजूबाजूच्या एखाद्या घरातही जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती होती. तरीही मिळेल त्या आडोशाला उभे राहून त्यांनी ड्युटी बजावली. असा असतो बंदोबस्त कंटेन्मेट झोनचा परिसर सील केल्यानंतर येण्या-जाण्याच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त लावला जातो. उपनिरिक्षक अथवा सहायक निरिक्षक दर्जाचा अधिकारी पाच ते सहा कर्मचारी एका पॉईंटवर नेमले जातात. आतील नागरिक बाहेर पडू नये अथवा बाहेरील नागरिक आत जाऊ नये, याची जबाबदारी पोलिसांवर असते. पुलाचा घेतला आधार बुधवारी (ता. 3) सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मंडपामध्ये बसणे शक्य नव्हते. त्यामुळे या पावसापासून बचाव करण्यासाठी चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर परिसरातील मालधक्का या पॉईंटवरील पोलिसांनी पुलाचा आधार घेतला. सर्व कर्मचारी पुलाखाली जाऊन थांबले. तर जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या बाजूने आनंदनगर प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ असलेल्या पॉईंटवरील कर्मचाऱ्यांनी येथे असलेले एक फोटो स्टुडिओ उघडण्याची विनंती करून त्याठिकाणी आधार घेतला. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तकलादू मंडप बंदोबस्ताच्या याठिकाणी पोलिसांसाठी निवाऱ्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. दहा बाय दहा आकाराचा छोटा तकलादू मंडप उभारला असून त्यावर साधे कापडी छत आहे. दोन दिवसांपूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसात अनेक ठिकाणचे मंडप कोसळले. त्यानंतर काही ठिकाणच्या मंडपावर लोखंडी पत्रे टाकण्यात आले. मात्र, हेदेखील मंडप तकलादू आहेत. जीव धोक्यात घालून ड्युटी कंटेन्मेट झोनच्या ठिकाणी सकाळी आठ वाजता ड्युटीवर उभा राहिलेला कर्मचारी रात्री आठ वाजेपर्यंत पॉईंटवर हजर असतो. अनेक लोकांचे ऐकून घेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. अशावेळी कोणता व्यक्ती कसा येईल, याचीही खात्री नाही. यादरम्यान, एखाद्या व्यक्तीकडून दुर्देवाने कोरोनाचा संसर्ग झाल्यास जिवाची भीती आहेच. अशा कठीण परिस्थितीत हे पोलिस जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटत आहेत. पोलिसांनी पोटतिडकीने सांगूनही अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरतच आहेत. येथे जेवण करणेही टाळतात कंटेन्मेट झोनच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याबाबत काहीही कल्पना नसते. संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुवायला सांगितले जाते. मात्र, त्यासाठी पाण्याचीही उपलब्धता हवी. बंदोबस्ताच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जेवण करायचे असल्यास सॅनिटायझर व पाणी उपलब्ध नसल्याने अनेकजण त्याठिकाणी जेवण्याचे टाळतात. आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिस ठाणेनिहाय कंटेन्मेट झोन पोलिस ठाणे कंटेन्मेट झोन पिंपरी 12 चिंचवड 4 भोसरी 15 एमआयडीसी भोसरी 1 निगडी 6 दिघी 9 वाकड 12 सांगवी 13 देहूरोड 5 चिखली 9 तळेगाव दाभाडे 2 शिरगाव चौकी 1 तळेगाव एमआयडीसी 1 चाकण 2 म्हाळुंगे चौकी 1 एकूण 93 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 05, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2XCbHC3 Read More Read more No comments:
शिवकालीन वस्तू पाहून डोळ्यांसमोर तरळतो रोमांचकारी इतिहास औरंगाबाद : छत्रपती शिवरायांचे नाव घेतले तरी त्यांचा अवघा इतिहास लगेच डोळ्यांसमोर उभा राहतो. चारशे वर्षे होऊन गेले तरी जोपर्यंत सूर्य, चंद्र आणि तारे आहेत, तोपर्यंत हा इतिहास पुसला जाणार नाही. त्यांच्या आठवणीबरोबरच इतिहास नवीन पिढीसमोर यावा, यासाठी रमेश रुणवाल यांनी गेल्या तीस वर्षांपासून शिवकालीन वस्तूंचा संग्रह करून शिवरायांचा इतिहास आणि आठवणी जतन केल्या आहेत. या वस्तू स्फूर्ती देतात शिवाय त्या आपले सांस्कृतिक संचितही आहेत. हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान शिवराज्याभिषेक उत्सवदिनाच्या (सहा जून) निमित्ताने सर्वत्र शिवकालीन वस्तूंबद्दल दिवसभर सोशल मीडियावर चर्चा होईल. याशिवाय अलौकिक आनंद आणि मनःशांतीसाठी छंद जोपासणारे अनेक आहेत. त्यातीलच एक म्हणजे रमेश मोतीलाल रुणवाल. अगदी विद्यार्थी जीवनापासूनच त्यांना प्राचीन नाणी जमा करण्याचा छंद जडला. आज त्यांच्याजवळ अगदी ऋग्वेद काळापासून ते ब्रिटिश काळापर्यंत हजारो नाणी त्यांच्या संग्रहातून प्राचीन भारतीय इतिहासाचा संपन्न काळ मोठ्या अभिमानाने सांगत आहेत. हेही वाचा : पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो - उद्योजक सुनील किर्दक संस्कृती संवर्धन आणि लोकसंग्रह या दोन गोष्टींतून त्यांचे जीवन अद्भुत चमत्कारांनी भरलेले असते. रुणवाल यांचे जीवन असेच आहे. त्यांच्या संग्रहातील प्रत्येक दुर्मिळ नाणे हे इतिहास सांगतात. आपल्या या संग्रहाविषयी ते सांगतात, की औरंगाबादपासून जवळ असलेल्या जुन्या सावखेड्यात आमची शेती. गावाजवळ गोदावरी वाहते. गोदाकाठी प्राचीन नृसिंह मंदिर असून विद्यार्थी जीवनात नरसिंह मंदिराच्या उत्सवानिमित्ताने नदीत स्नानासाठी जात असताना एक तांब्याचे नाणे सापडले. हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. ते त्यांनी काकांना, शिक्षकांना दाखविले असता ते नाणे होते सातवाहनांचे. गोदाकाठ ही सातवाहनांची भूमी. त्या नाण्याने त्यांच्या जीवनात एक नवा चमत्कार घडविला. दुर्मिळ नाणी, शिक्के, पुरातन वस्तूंचे संचित अमूल्य बनले असून, पुरातन वस्तूंचे महत्त्व सांगणारा हा खजिना वृद्धिंगत करून जतन करण्यासाठी कुणी काही मदत करू शकतील का, असा प्रश्नही ते उपस्थित करतात. हजारो दुर्मिळ नाणी, शिक्के, चलन वेगवेगळ्या धातूंच्या अत्यंत दुर्मिळ, आकर्षक, पारंपरिक, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मूर्ती रुणवाल यांच्याकडे आहेत. जवळपास सर्व धातूंच्या नाण्यांचा समावेश आहे. हा साठा सातत्याने वाढत असून, या वस्तू सांभाळायच्या कशा, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ तीस वर्षांपासून त्यांना हा छंद जडला. आज त्यांना या वस्तू किंबहुना हा ठेवा ठेवायला जागा नाही. त्याची देखभाल करायला वेळ आणि पैसा पुरत नाही, अशा स्थितीत त्यांना एक ना अनेक ठिकाणाहून मित्र हा दुर्मिळ वस्तू आणून देतात, तर ते स्वतःही भंगारच्या बाजारात जाऊन असा ठेवा जमा करतात. त्यांच्याकडे आज सातवाहन, मोगल, मराठा, पेशवे, निजाम, ब्रिटिशकालीन नाणी व नोटा आहेत. ही नाणी गोळा करता करता त्यांना जुन्या दुर्मिळ मूर्ती, वस्तू, अवजारे, उपकरणे, शिल्पही मिळू लागले. महिलांच्या पायातील वजनदार कडे त्यांच्याकडे आहेत. हेही वाचा : लाॅकडाऊन हटवताना अशी घ्यावी काळजी - डाॅ. अजित भागवत आपला चहापत्तीचा व्यवसाय सांभाळत त्यांनी यासाठी वेळ दिला आहे. अनेक जणांनी त्यांना या खजिन्यातून खूप पैसा करायचा सल्ला दिला. हा सल्ला मानला असता तर माझ्याकडे खूप पैसा आला असता; पण हे आपले संचित आपल्या देशाबाहेर गेले असते. नवीन पिढीला शिवरायांचा इतिहास माहिती व्हावा, यासाठी मी हा इतिहास जपला आहे, असे ते सांगतात. तलवारी अन् बंदूकही शिवरायांच्या काळात लढाईसाठी वापरलेल्या तीन प्रकारच्या तलवारी संग्रहात आहेत. साडेतीनशे वर्षांपूर्वीची बंदूक आहे. त्याकाळी बंदुकीत गोळ्या नव्हत्या. गोळ्यांऐवजी भरमार दारूगोळा भरून लढाईमध्ये याचा वापर केला जात होता. याशिवाय शिवाजी महाराजांच्या काळात जीवनशैली कशी होती, कुठल्या प्रकारची भांडी वापरली जायची, याचे महत्त्व आणि इतिहास सांगणाऱ्या वस्तूही त्यांनी जतन केल्या आहेत. शिवरायांचा इतिहास हा अनमोल ठेवा आहे. शिवकालीन वस्तूंमध्ये गरुडावर बसलेले विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी, बालाजीची मूर्ती; तसेच शिवकालीन दीपलक्ष्मीचा समावेश आहे. याशिवाय महादेवाची पिंड, नंदी याचाही समावेश संग्रहात आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 05, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3eVK1xP Read More Read more No comments:
पिंपरी-चिंचवडमध्ये वादळ अंगावर झेलत तीन दिवस लढले अग्निशमन दलाचे लढवय्ये! पिंपरी : गेल्यावर्षी पुराचं भयानक संकट अनुभवलं. पण यावर्षी वादळ, सोसाट्याचा वारा, उन्मळून पडलेली मोठमोठी झाडं आणि पावसाचा तडाखा आम्ही अनुभवतोय. एकीकडं विजांच्या तारा अंगावर झेलतोय, तर दुसरीकडे फांद्या तोडून हात बधिर झाले. मात्र, न डगमगता काम करतोय. हेच आमचं कर्तव्य आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हे अनुभव सांगतायेत पिंपरीतील अग्निशमन दलाचे जवान. सलग दहा ते बारा तास दिवसभर झाड पडल्याचे कॉल सुरू होते. एक वर्दी झाली, की दुसरी वर्दी लगेच लागत होती. त्यातही दिवसभर पाण्यात. काही परिसरातील नागरिकांनी माणुसकी दाखवत जवानांना चहा दिला. दिवसपाळीनंतर लगेचच रात्रपाळीत सलग १६ तास जवानांना काम करावे लागले आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या पिंपरी-चिंचवडच्या पाच उपअग्निशमन केंद्रात मिळून १२५ जवान आहेत. ही संख्या शहरासाठी नगण्य आहे. त्यामुळे वर्दीची संख्या जास्त आणि मनुष्यबळ कमी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तरीही सलग तिसऱ्या दिवशी (ता. ५) जवानांचे काम सुरू आहे. अजूनही रस्त्यावरील रहदारी सुरळीत केली जात आहे. आजही मोडकळीस आलेल्या झाडांचे 20 ते 25 कॉल होते. त्यामुळे सलग तीन दिवस जवान अहोरात्र काम करत आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काही ठिकाणी नागरिकांनी असहकार्य दाखविल्याने जवानांना मनस्ताप सहन करावा लागला. झाडे काढताना नागरिकांनी जवानांना अरेरावी केली. दुसरी वर्दी असल्याने बहुतांश नागरिकांनी पडलेले झाड लगेच हटविण्यात यावे असा हट्ट धरला. दुसऱ्या वर्दीवर जाण्यासाठी त्यामुळे जवानांना विलंब झाला. बाचाबाची करण्याची वेळ जवानांवर आली. तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून फांद्या हटविण्यासाठी मदत केली. जीवितहानी कुठे झाली नसल्याचे समाधान जवानांनी व्यक्त केले. जवानांना ही होती धाकधूक फांद्या अंगावर पडण्याची भीती विजेचा खांब कोसळण्याची भीती इलेक्ट्रिक स्वा मशीन (जाड फांद्या कापण्याचे मशीन )बंद पडल्याने फांद्या कापण्याची कसरत स्थानिक नागरिकांचे हद्दीवरून असहकार्य News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 05, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3cCmcJO Read More Read more No comments:
वुमन हेल्थ - तंदुरुस्त - मन दुरुस्त! आपल्याला साधारणपणे काही त्रास होत नसल्यास आपण आपल्या आरोग्याचा अजिबात विचार करत नाही. बारीकसे काहीतरी दुखले खुपले, तरी आधी दुर्लक्षच करतो. महिलांच्या बाबतीत तर असे ‘अंगावर काढणे’ अगदी सगळीकडे दिसून येते. घराची, घरातल्या सगळ्यांची काळजी घेताना महिला विसरूनच जातात की, ज्यामुळे त्या इतके काम करू शकतात त्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे! आरोग्य चांगले असणे म्हणजे केवळ शरीरात काही आजार नसणे एवढंच नाही, तर holistic healing म्हणजेच सर्वांगीण सुखरूप अवस्था म्हणजे आरोग्य! शरीरात व्याधी नसणे, मन शांत आणि प्रसन्न असणे, हेवे-दावे-असमाधान नसणे, सामाजिक भान असणे, निसर्गाची जपणूक करणे, या सर्व चांगल्या ऊर्जेचे एकत्रित फळ म्हणजे चांगले आरोग्य! ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आताच्या कोरोनाच्या प्रकोपामुळे ही गोष्ट जास्तच स्पष्ट झाली आहे. महिलाच नव्हे, तर एकुणच सगळेच तब्येतीच्या बाबतीत काळजीत आहेत. पारंपारिक विचारानुसार ज्यामुळे आजार बरा होतो ते औषध! औषध घ्यायचे आणि बरे व्हायचे अशीच विचारसरणी असते. या उलट डब्ल्यूएचओने आरोग्याच्या केलेल्या व्याख्येनुसार, ‘आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य; केवळ आजाराचा अभाव नव्हे!’ इतर सर्व संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण केवळ शारीरिक व्याधीवर लक्ष केंद्रित करायला कधी शिकलो देव जाणे. सर्व बाबींचा नेमका संगम म्हणजे आरोग्य! कोरोनाचे उदाहरण घेतल्यास हा संसर्ग कोणालाही होऊ शकतो, पण अधिक धोका कोणाला आहे? ज्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आहे अशांना जास्त धोका आहे. हे आजार; ताण, चुकीच्या सवयी, चुकीची जीवनशैली यामुळे मागे लागतात. शरीर आतून व्याधींने पोखरलेले असल्यावर कोरोनासारख्या संसर्गाला आक्रमण करायला निमंत्रणच मिळते. म्हणजेच काय, तर आरोग्य ही निरंतर अवस्था आहे. आरोग्य रक्षण करणे म्हणजे तातडीचे उपाय करणे नव्हे. आग लागल्यावर विहीर खणून काय उपयोग? आरोग्य सदैव चांगले राहावे म्हणून आपण काय खातो, किती आणि कसा व्यायाम करतो, आपले नाते-संबंध कसे आहेत, आपण कसा विचार करतो, आपण ताण घेतो का या सर्वाचा एकत्रितपणे विचार करून लक्ष देणे गरजेचे आहे. आजार एका अवयवात दिसला, तरी त्याचा उगम दुसरीकडे असू शकतो. म्हणूनच व्याधीवर उपचार करण्यासाठी सर्व बाजूंचा आणि सर्व घटकांचा एकत्रित विचार करणे गरजेचे असते. सर्वसमावेशक विचार करून जर आरोग्याचे रक्षण केले तर कोणतेही नवनवीन रोग आले तरी तुमचे शरीर तुमचे कवच बनून रक्षण करेल आणि व्याधी झालीच तर त्यातून लवकर बरे व्हायला मदत करेल. महिलांनीच नव्हे, तर सगळ्यांनीच आपल्या आरोग्याकडे डोळसपणे बघून शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक अशा सर्वांगीण तंदुरुस्तीकडे लक्ष देण्याची वेळ आज आली आहे! News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 05, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2MxBjcZ Read More Read more No comments:
पुण्यात रुग्णांपेक्षा वाढले कोरोनामुक्त पुणे नव्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती असतानाच शुक्रवारी (ता. 5) मात्र, रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 182 रुग्ण सापडले आणि 183 जण कोरोनामुक्त झाले. तर नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विविध रुग्णालयांतील 183 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील 45 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मृतांमध्ये 45 ते 50 पेक्षा अधिक वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. त्यांना अन्यही आजार आहेत. दिवसभरात 1 हजार 656 जणांची तपासणी झाली. मृतदेह नेण्यासाठी नागरिकांनी काढले पत्रे; जयभवानी नगरमधील घटना! कोंढव्यातील 49 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, त्यांना उपचारासाठी गुरुवारी दाखल केले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह होता. याच भागातील 72 वर्षीय महिलेचा बळी गेला आहे. त्या 26 मेपासून रुग्णालयात होत्या. या महिलेला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचा आजार होता. घोरपडीतील 63 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर 30 मेपासून उपचार सुरू होते. या महिलेला उच्च रक्तदाब, मूत्रपिंड आणि हृदयाचा त्रास होता. कोरेगाव पार्कमधील 64 वर्षांच्या महिलेवर 2 जूनपासून उपचार सुरू होते. त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला असून, या महिलेला उच्चरक्तदाब, मधुमेह होता. लष्कर परिसरातील 80 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 402 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 05, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/37gzFpT Read More Read more No comments:
शिवराज्याभिषेक दिन विशेष : असे होते शिवरायांचे हस्ताक्षर, पत्र अजूनही सुरक्षित पैठण (जि. औरंगाबाद) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः मोडीलिपीत लिहिलेले पत्र येथील पुराणवस्तू संग्रहालयात आहे. हा अनमोल ठेवा पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने येतात आणि भारावून जातात. येथील इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक बाळासाहेब पाटील यांनी हे पत्र जतन करून ठेवले होते. छत्रपती शिवरायांनी भोसले घराण्याचा धार्मिक विधी करण्याचे अधिकार पैठण येथील गोविंद कावळे भट यांना दिले होते. त्या संबंधीचा उल्लेख या पत्रात आहे. हे पत्र शके १५८१ मध्ये देण्यात आले असल्याची नोंद या पत्रात आहेत. सध्या हे पत्र संत ज्ञानेश्वर उद्यानातील राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या बाळासाहेब पाटील पुराणवस्तू संग्रहालयात शिवप्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या पत्रासह या संग्रहालयात प्राचीन काळातील लाल मातीच्या विविध मूर्ती, खेळणी आणि स्त्री, पुरुषांची तत्कालीन आभूषणे कर्णफुले, अंगठ्या, बांगड्या, पदके चांदीची नाणी, नाण्यांचे साचे, मुद्रांचे ठस्से, वजने हस्तीदंती भोवरा, हांडाचा कज्जलशलाका, दगडी पाटे, जाती, लाकडी, पितळी दिवे, दगडी दिवे टांगते दिवे, पैठणी साडी वीणण्याचे साहित्य, लाकडी नक्षी काम, काचेवरील चित्रे, विविध आकाराच्या तलवारी, बंदुकी, छोट्या तौफा, वाघनखे संदेशवाही साधूची काठी, विविध अलंकाराचे दगडी साचे, ताम्रपाषाण काळातील नक्षीकामे, मोर्य काळातील चकचकीत खापरे आदी दुर्मिळ वस्तू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्ताक्षरातील मोडी पत्र छत्रपती शिवाजी महाराज पैठण येथे आले होते. त्याकाळी गोविंद कावळे यांच्याकडे भोसले घराण्यातील मालोजीराव व त्यांच्या पुर्वाजांच्या वंशावळी कावळे भट पुरोहितांनी दाखविल्या होत्या. त्यात तीर्थाच्या स्थळी होणारे विविध धार्मिक विधी कावळे भट यांच्याकडूनच करण्यात आल्या होत्या. वंशावळीचा हा पुरावा पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी भोसले घराण्यातील कोणीही पैठणला येईल त्यावेळी भोसले घराण्यातील धार्मिक विधी करण्याचा अधिकारी कावळे भट यांना या पत्राद्वारे दिला होता. हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके संपली, मागणी प्रचंड शिवाजी महाराज आग्राभेटीच्या वेळी पैठण येथून जात असताना अधिकाराचे हे दानपत्र त्यांनी दिले. भोसले घराण्यातील कोणीही पैठणला येईल त्यावेळी कावळे भट हेच पुरोहित भोसले घराण्याचा धार्मिक विधी करतील, असा आशय या पत्रात आहे. इतिहास संशोधकांनी शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षराचे हे पत्र असल्याचे प्रमाणित केले आहे. - जयवंत पाटील, पुराणवस्तु संग्राहक बाळासाहेब पाटील यांचे पुत्र. News Story Feeds https://ift.tt/377JUMN Latest news updates June 05, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2MA1H6c Read More Read more No comments:
कचऱ्याचे अनोखे ‘अप-सायकलिंग’ नाव – सोनाली फडके व धारा कबारिया शहर – पुणे ‘पुणेरी लोक म्हणे नवीन कपडा अगदी जीर्ण होऊन फाटेपर्यंत त्याचा सर्वतोपरी वापर करतात. अगदी शेवटी उरलेल्या चिंधीचा निरांजनामध्ये वात म्हणून वापर होईपर्यंत,’ असा केविलवाणा विनोद काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवर फिरत होता. वस्तूंचा पुरेपूर वापर केवळ पुण्यातीलच नाही, तर आपल्या जुन्या पिढीतील सर्वच लोकांनी केला आहे. यालाच तर आपण ‘टाकाऊतून टिकाऊ’ म्हणतो. काटकसर, श्रमाचे मोल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कमीत कमी कचरानिर्मिती ही महत्त्वाची मूल्ये आपल्या दैनंदिन व्यवहाराचाच एक भाग होती, पण आजकालच्या आधुनिक जगात असा वस्तूंचा वापर क्वचितच होताना दिसतो. टाकाऊ वस्तूंचे करायचे काय, असा यक्षप्रश्न समाजापुढे आहे. शिवाय सर्वच वस्तूंचे ‘रि-सायकलिंग’ करता येत नाही. अशावेळी ‘अप-सायकलिंग’ म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून ‘वस्तूंची कलात्मक नवनिर्मिती करणे’ हा एक उत्तम पर्याय समोर येतो. अशा ‘अप-सायकलिंग’ वस्तूंनी सजलेले अनेक आकर्षक कॅफेज्, रेस्टॉरंटस् मी याआधी पाहिले आहेत. किंवा मग अशाच टाकाऊ भंगारातून सुश्राव्य ‘नादनिर्मिती’ करणाऱ्या तौफिकजींच्या ‘मुंबई स्टॅम्प’चे व्हिडीओ तर कित्येकदा ऐकले व पाहिले आहेत. मात्र, अशा कलात्मक निर्मितीची प्रक्रिया पुण्यातील आपल्या दोन मैत्रिणी सोनाली व धारा यांच्यामुळे जाणून घेता आली. ऑन डिफरंट ट्रॅक : गृहिणी ते ज्योतिषी धाराने ‘अल्टरनेट युज ऑफ मटेरियल’ या विषयातून पदव्युत्तर शिक्षण ब्रिटनमधून घेतले आहे, तर सोनालीने पुण्यातील ‘इकॉलॉजी सोसायटी’चा ‘सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे आपण याच क्षेत्रात काम करायचे, या निर्धाराने दहा वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या कामाचे आज मोठ्या व्यवसायात रूपांतर झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्या सांगतात, ‘‘सर्जनशील व कुशल कारागिरांच्या मदतीने आम्ही घरगुती व औद्योगिक भंगारातून चहाचा कप ठेवण्यासाठी वापरले जाणारे ‘कोस्टर्स’ ते राहण्यासाठी किंवा शाळांसाठी उपयुक्त असे ‘कंटेनर्स’ बनवितो. हे शिपिंग कंटेनर्स औद्योगिक वापरानंतर इतर वापरासाठी उपयुक्त असतात शिवाय इतर इमारतींच्या तुलनेत त्वरित उभारता येतात. ते स्वस्त, मजबूत, आकर्षक व पर्यावरणपूरक असतात. शिवाय ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन पुन्हा उभे करता येतात. ही आमची खासियत आहे.’’ मात्र कचऱ्याची वाहतूक व या निर्मितीसाठी लागणारे कुशल व सर्जनशील मनुष्यबळ मिळणे, ही खूप आव्हानात्मक गोष्ट असल्याचेही त्या स्पष्ट करतात. ‘कवडीमोल’ वाटणाऱ्या कचऱ्यावर किंवा भंगारावर अशा अवलियांची जादूची कांडी फिरल्यावर कचराही ‘मौल्यवान’ वाटू लागतो, हे नक्की. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 05, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3eSxwDc Read More Read more No comments:
"झेडपी' शाळांत ऑनलाइन धडे पुणे - राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी यंदापासून ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. यासाठी खासगी शाळांच्या धर्तीवर राज्य सरकार राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांसाठी खास ऍप विकसित करत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हे ऍप वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या ऍन्ड्रॉइड मोबाईलची ग्रामीण भागातील पालकांकडे वानवा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देण्यात मोठा अडसर निर्माण होणार आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा याशिवाय हे ऍप कधीपासून कार्यान्वित होणार, जिल्हा परिषदेच्या शाळा केव्हापासून सुरू होणार, याबाबत अद्यापही राज्य सरकारने काहीही निर्णय घोषित केलेला नाही. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे लक्ष राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे. या वृत्ताला पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती रणजित शिवतरे यांनीही दुजोरा दिला आहे. -जिल्हा परिषदेच्या शाळा दरवर्षी 15 जूनला सुरू होतात. -यंदाचे शैक्षणिक वर्ष नेमके केव्हा सुरू होणार, याबाबतचा संभ्रम कायम आहे. -राज्य सरकार विकसित करणार खास ऍप -जिल्हा स्तरावर मास्टर ट्रेनर तयार केले जाणार -मास्टर ट्रेनर तालुकास्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देणार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 05, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2XAhtE8 Read More Read more No comments:
श्वास रोखून धरण्याची सवय रडत असताना श्वास रोखून धरण्याची सवय ६ महिन्यांपासून ते १८ महिन्यांपर्यंतच्या मुलांना असते. सहसा हट्टी मुले आपल्या मनाप्रमाणे गोष्टी न झाल्यास, एखादे खेळणे किंवा गोष्ट हवी असल्यास सतत रडून असे करतात. याला वैद्यकीय भाषेत ‘ब्रेथ होल्डिंग स्पेल’ असे म्हणतात. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कारणे आपल्या शरीरात अंतर्गत अवयवांवर नियंत्रण ठेवणारे आणि मेंदूला ‘लढावे की पळावे’ हा निर्णय घेण्यास मदत करणरे एक नसांचे जाळे असते. याला ‘ऑटॉनॉमिक नर्व्हस सिस्टम’ असे म्हणतात. लहान मुलांमध्ये ही अजून विकसित झालेली नसल्याने त्यांना राग आल्यावर कसेवागावे, हे नीट कळत नाही. पालकांवर अधिक दबाव टाकण्यासाठी ते अजाणतेपणाने मोठे व लांब उसासे घेऊन रडू लागतात, पण असे करताना एखाद्या लांबलेल्या उसाशाने त्यांचा श्वास अडखळतो आणि तो तसाच रोखलेला राहतो. यामुळे मुलगा बेशुद्ध होऊन काळानिळा पडतो. यात मेंदूला काहीवेळ रक्तप्रवाह खंडित झाल्यामुळे झटके येऊ शकतात. तोंडातून फेस येऊ शकतो. या मानसिक कारणांसोबतच श्वास रोखून धरणाऱ्या मुलांमध्ये शरीरात लोहाची (आयर्न) कमतरता असते. मुलांनी श्वास रोखण्याची कारणे सहसा असे करणारी मुले एकुलती एक किंवा दोन असल्यास इतरांपेक्षा अधिक लाडकी असतात. पहिल्यांदा श्वास रोखून धरल्यावर मूल कितीही लहान असले तरी त्याला हे कळते, की असे केल्यावर पालक घाबरतात व नंतर हवे ते देतात. म्हणून याचा वापर मुलाकडून हवे ते मिळवण्यासाठीही होऊ लागतो. उपचार पालकांनी घाबरून न जाता खंबीर राहणे तसेच श्वास रोखून धरण्याची सवय ही तात्पुरती आहे, हे ओळखणे सर्वांत महत्त्वाचे. याने मुलाच्या जीवाला कुठलाही धोका नाही, तसेच श्वास रोखून धरल्यावर झटके आल्यास पुढे आयुष्यात झटके येत नाहीत. हे पालकांनी समजून घेतले नाही, तर या सवयीमुळे घाबरलेल्या पालकांचे मुलांकडून मानसिक, भावनिक ब्लॅकमेलिंग निश्चित आहे. पालकांनी पुढील गोष्टी कराव्यात - आपण घाबरलो आहोत, हे मुलाला मुळीच जाणवू न देणे. - मुलाचे कपडे सैल करणे. - घरच्यांनी मुलाभोवती गर्दी करून गोंधळ करू नये. - मुलाला सरळ करावं, शांततेत त्याच्या चेहऱ्यावरून ओला हात फिरवावा. - पायावर टिचकी मारून हलवून श्वास पुन्हा चालू करावा. - एकदा श्वास सुरू झाला की, दुर्लक्ष करून आपले इतर काम सुरू करावे. - मूल हट्ट करून श्वास रोखण्याची शक्यता वाटली की, आधी मुलाचे लक्ष इतर ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न करा. ते शक्य झाले नाही तर दुर्लक्ष करा. फक्त श्वास रोखून धरण्यास सुरुवात होते आहे का, यावर आपले घरातील काम मुलाच्या नकळत सुरू ठेवा. - श्वास रोखून धरल्यामुळे मुलाचा हट्ट पूर्ण करू नका. - यासाठी टाइम आउट ही कृती सुचवतो. खेळाताना एखादा खेळाडू चुकीचा खेळला की, त्याला थोडा वेळ खेळू देत नाहीत. तसाच मुलांचा श्वास पूर्ववत झाला की लगेचच १ ते ५ मिनिटे त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे. औषधोपचार – लोहाचे (आयर्न) योग्य डोसामध्ये तीन ते सहा महिने द्यावे लागते. वाढविकास तज्ज्ञ डॉ. अंजली बँगलोर अशा पालकांना समुपदेशन करताना नेमके हे शब्द वापरतात – ‘तुम्ही फार प्रेमळ पालक आहात आणि तुमचा मुलगा चतुर, हुशार आहे. त्याला घरात राजासारखे वागायचे आहे आणि तुम्हाला प्रजा बनवायचे आहे. तुम्ही आज्ञा पाळली नाही म्हणून मुलाने तुम्हाला दिलेली शिक्षा म्हणजे श्वास रोखून धरणे. तुम्हाला दुर्लक्ष करून घरात कोणीही राजा प्रजा नसून, सर्व सदस्य समान आहेत ही भावना प्रस्थापित करावी लागेल.’ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 05, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2zW3Ru9 Read More Read more No comments: